Category Archives: कोकण
गोवा – गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या बद्दल सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी उशिरा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.
या ट्रकची तपासणी करताना या ट्रक च्या पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.
सिमेंट लाद्यांखाली दारूचे बॉक्स
ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण – माझ्या जमिनीत अतिक्रमण झाले आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार असे म्हणत एका प्रकल्पग्रस्त शेतकर्यांने मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे चक्क लोळण घातली आणि महामार्ग अर्धा तास अडविला. भर उन्हात काल सकाळी तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे तो रस्त्यावर झोपून होता. यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.
चिपळूण पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नैनीश दळी नामक त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत महामार्ग मोकळा केला.
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर ब्राउन हेरॉईन ची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने काल अटक केली, त्याच्याकडून 12.8 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ मिळून आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमदलार शहरातील विविध भागांमध्ये पेट्रो लिंग करत होते.तेव्हा रत्नागिरी रेल्वेस्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म नं.1 वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे एक तरुण जाताना त्यांना दिसून आला.त्याच्या पाठीवर एक सॅक होती आणि त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने या पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली.तेव्हा त्याच्या जिन्स पॅन्टच्या उजव्या खिशात 5 पारदर्शक प्लास्टिक पिशव्या ज्यात 450 टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या मिळून आल्या.त्याच्याकडील सर्व मुददेमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात एन.डी.पी .एस अॅक्ट कलम 8 (क),22 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपिनिरीक्षक आकाश साळुंखे,पोलिस हेड काँस्टेबल प्रसाद घोसाळे,गणेश सावंत,प्रविण बर्गे,अमोल भोसले,पोलिस नाईक आशिष भालेकर,विनय मनवाल आणि रत्नकांत शिंदे यांनी केली असून अधिक तपास सुरु आहे.
Road Accident News – राज्यातील खेड्यापाड्यात वाहतुकीची सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सोय, खिशाला न परवडणारे खाजगी वाहतुकीचे पर्याय यामुळे तेथे सर्रास नियम मोडून क्षमते पेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवण्यात येतात, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. अशाच एका प्रकारामुळे रत्नागिरी येथील खेड येथे एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या काल मंगळवारी 9 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खेड शिवतर मार्गावर मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना एक रिक्षा नातवडी धरणाच्या कॅनलमध्ये कोसळली.यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात मुरडे शिंदेवाडी येथून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये घडला.माहितीनुसार खेडमधील एकाच कुटुंबातील काही लोक ऑटो रिक्षा मधून मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात होते. नातूवाडी धरणाच्या कॅनॉलच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या चढावर रिक्षा चढली नाही व रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटी खाली येऊन थेट आठ ते दहा फूट खोल असणाऱ्या कॅनॉलमध्ये पडली. या रिक्षात 7 ते 8 प्रवासी बसले होते.
Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.
Sr. No. Train No. Journey Commences On Coach Augmented
1 22908 Hapa - Madgaon Express Ex Hapa on 10/05/2023 1
2 22907 Madgaon Jn. - Hapa Express Ex. Madgaon Jn. on 12/05/2023 1
3 20910 Porbandar - Kochuveli Express Ex. Porbandar on 11/05/2023 1
4 20909 Kochuveli - Porbandar Express Ex. Kochuveli on 14/05/2023 1
5 17310 Vasco Da Gama - Yesvantpur Daily Express Ex. Vasco Da Gama on 09/05/2023 1
6 17309 Yesvantpur - Vasco Da Gama Daily Express Ex. Yesvantpur on 10/05/2023 1
7 16595 KSR Bengaluru City - Karwar Daily Express Ex. KSR Bengaluru City on 09/05/2023 1
8 16596 Karwar - Bengaluru City Daily Express Ex Karwar on 10/05/2023 1
Janaakrosh Committee’s bike Rally: दिनांक ७ मे २०२३ रोजी दुपारी ४:०० वाजता कामोठे टोल नाका ते खारपाडा टोल नाका दुचाकी (बाईक) रॅलीचे आयोजन मुंबई गोवा जन आक्रोश समिती तर्फे करण्यात आले होते . मुंबई गोवा महामार्गाचे काम १२ वर्षे रखडलेले असून मंत्रीमहोद यांची आश्वासने , न्यायालयाचे आदेश याना प्रशासनाने हरताळ फासला आहे . या दिरंगाई आणि ढिसाळपणामुळे अपघातात ३००० पेक्षा जास्त कोकणकर मृत्युमुखी पडले आहेत तर अनेक जण कायमचे जायबंदी झालेले आहेत . या निषेधार्थ काढलेल्या या दुचाकी रॅलीला कोकणकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन शिस्तबद्धपणे यशस्वीरित्या पार पडला.
रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून दुपारी ४.०० वाजता झाली . वाहतूक उपायुक्त यांनी रॅलीच्या सूचना दिल्यानंतर समितीचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नागरिक श्री. देवरुखकर काका यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून Flag off करण्यात आले . वाहतूक पोलिसांच्या आणि समितीच्या पायलट व्हॅन रॅलीचा मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने जाऊन खारपाडा टोलनाका येथे रॅली ची सांगता झाली .
खारपाडा टोल येथे हॉटेल वैष्णवीच्या पटांगणात रॅलीची समारोप सभा झाली .
या सभेला संबोधित करताना समितीचे पनवेल विभागाचे प्रमुख डॉ. अमित चव्हाण यांनी रखडलेला मुंबई गोवा महामार्ग हा कोकणावरील अन्याय असून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समितीचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कुठल्याही अपघातग्रस्ता साठी पहिला 1 तास अत्यंत महत्वाचा असतो,वैद्यकीय भाषेत त्याला “गोल्डन अवर”(golden hour) असे म्हणतात ,या वेळेत जर पेशंट वर योग्य उपचार झाले तर ,मेंदूतील रक्तस्त्राव वैगरे कारण मुळे होणारे मृत्यू चे प्रमाण कमी होते. दुर्दैवाने अगदी पोलादपूर -महाड पासून पनवेल पर्यंत कुठंही अद्यावत ट्रॅमा सेंटर(trauma centre) नाही , त्यात च रस्त्या ची अवस्था बिकट,त्यामुळे पेशंट वेळेवर डॉक्टर पर्यंत पोहचत नाही व मृत्यू चे प्रमाण वाढते.१२ वर्षात या महामार्गावर सुमारे ३३०० लोक मृत्युमुखी पडले आणि १०,००० पेक्षा जास्त लोकांना कायम चे अपंगत्व आले. महामार्ग वर आद्यवत ट्रामा सेंटर असावे ही एक जनाअक्रोश समिती ची प्रमुख मागणी आहे,तसेच रस्त्यावरील खड्ड्यामूळे अगदी तरुण लोकांना स्लिप डिस्क सारखे मणक्यांचे आजर बाळवत आहेत त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे . कोकणावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवण्यासाठीच मी या समितीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन काम करत आहे आणि यापुढेही करत राहीन असे सांगितले . खारपाडा येथील सक्रिय कार्यकर्ते संतोष ठाकूर हे देखील या रॅलीमध्ये आपल्या दुचाकीस्वारांच्या समूहाला घेऊन सामील झाले होते . याबाबतीत आपले विचार मांडताना श्री. संतोष ठाकूर यांनी यापुढे मुंबई गोवा महामार्गाच्या निमित्ताने झालेला अन्याय सहन केला जाणार नाही आणि समितीच्या पुढच्या प्रत्येक आंदोलनात माझे किमान ५०० कार्यकर्ते घेऊन सहभागी होईन असे जाहीर केले . कोकण विकास युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. अजय यादव यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश समिती या महामार्गासाठी जे काही आंदोलन करत आहे ते कौतुकास्पद आहे आणि सर्व कोकणकरांनी स्वतःहून यात लाखोंच्या संख्येने सामील व्हायला हवे आणि ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच सर्व कोकणकरांनी यापुढे सामील व्हावे असं आवाहन केलं . महामार्गाचे काम पूर्ण न होण्यास कंत्राटदाराबरोबरच अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांना जाब न विचारणारे त्यांच्यावर अंकुश न ठेवणारे राजकीय नेतृत्व जबाबदार आहेत . राजकीय नेत्यांना आपण निवडून देतो आणि म्हणूनच त्यांच्यावर या कामासाठी दबाव ठेवण्याची जबाबदारी अप्लाय सर्वांची आहे . अलिबाग न्यायालयात वकिली करणारे अॅडव्होकेट अजय उपाध्ये हे देखील आपले विचार मांडताना म्हणाले की , मी 2016 पासून महामार्ग संदर्भात अलिबाग न्यायालयात मी लढा देत आहे ज्यावेळेस शासनाच्या वतीने एक अहवाल येतोय की मुंबई गोवा महामार्ग पूर्णतः प्रवासासाठी योग्य आहे व कोणते खड्डे नाहीत परंतु प्रत्यक्षात आपण कोकण करांनी पाहिले तर महामार्गाला रस्ताच नाही अशी अवस्था आहे यासाठी समस्त कोकणकर अराजकीय अजेंडा घेऊन जे काही करत आहेत त्याला आमचा पूर्णता पाठिंबा राहून आम्ही समस्त कोकणकरांसोबत तीव्र आंदोलनात सामील होऊ.
समितीचे सचिव श्री . रुपेश दर्गे यांनी आपले विचार मांडताना जन आक्रोश आंदोलन ही सर्वसामान्य कोकणकरांची एक समिती म्हणून महामार्गासाठी काम करीत आहे.कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा न घेता किंवा कोणत्याही राजकीय अजेंडा न घेता महामार्गासाठी लढत आहेत. जर शासन, प्रशासन व ठेकेदार यांनी दिलेल्या मुदतीपर्यंत म्हणजे 31 मे 2023 पर्यंत एक मार्गी काम पूर्ण न केल्यास शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांचे आशीर्वाद घेऊन आम्ही समस्त कोकणकर आणि समस्त कोकणातील सर्व संघटना एकत्रित निर्णय घेऊन एकाच दिवशी एकाच वेळेस संपूर्ण कोकणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे जाहीर केले.
खारपाडा गावकज सरपंच श्री . दयानंद भगत यांनी महामार्गाच्या लगतच्या सर्व गावात ग्रामपंचायतीत जनजागृती केल्यास त्यासाठी समितीला सर्व सहकार्य करू आणि समितीच्या यापुढील उपक्रमात आम्ही सर्व सहभागी होऊन पाठिंबा देऊ असे जाहीर केले.
सभेच्या समारोपाच्या वेळी समितीचे कार्याध्यक्ष Adv. सुभाष सुर्वे यांनी मागील १३ वर्षे महामार्गाचे काम रखडले याला जबाबदार कोण ? कोकणाचा विकास त्यामुळे रखडला त्या जबाबदार कोण ? अपघातात ३३०० लोकांचा मृत्यू आणि ११००० लोक अपंग झाले त्याला जबाबदार कोण ? महाराष्ट्रात इतर ठिकाणी अपघात झाला तर त्यांना नुकसान भरपाई मिळते आणि महामार्गावरील अपघातात मृत्यू पडले त्यांना भरपाई दिली जात नाही याला जबाबदार कोण ? हजारो झाडांची कत्तल झाली आणि नवीन झाडे लावली गेली नाहीत याला जबाबदार कोण ? कंत्राटदार काम अर्धवट टाकून पळून गेले त्यांना नोकर्यादेश द्यायला जबाबदार कोण ? रस्ता आता होईल तेव्हा होईल पण या सगळ्यांना जबाबदार असणाऱ्यांवर फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाचं खटला दाखल करण्यात यावा व त्यासाठी चौकशी समिती नेमून जबाबदार कोण हे निश्चित करण्यात यावे . समितीची पुढची वाटचाल करताना पळस्पे ते झाराप या महामार्गावरील सर्व ग्रामपंचायतीमधून जन-जागृती करून या सामाजिक जनचळवळीला सर्वसमावेशक व्यापक स्वरूप येईल आणि त्यातून मग पुढचा लढा आखण्यात येईल असे जाहीर केले.
मुंबई गोवा जन आक्रोश समितीतर्फे या बाईक रॅलीचे चांगल्या पद्धतीने नियोजन अन् आयोजन करण्यात आले. या रॅलीला सहकार्य करणाऱ्या वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले . या रॅलीच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष ॲड. सुभाष सुर्वे सचिव रुपेश दर्गे, ॲड. संदीप विचारे, डॉ. अमित चव्हाण, श्री. संजय सावंत , सी. ए. संदेश चव्हाण , सौ. सोनल सुर्वे व इतर मान्यवरांनी रांत्रदिवस मेहनत घेऊन हा कार्यक्रम समितीच्या सदस्यांना सोबत घेऊन यशस्वी केला.
Train no. 09302 Indore – Mangaluru Jn. One Way Special:
Vision Abroad