Category Archives: कोकण

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

Konkan Railway: यंदा उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एका विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.

०११०३/ ०११०४ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०४/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २५/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २६/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Railway: १०० कोटी उत्त्पन्न मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच!

   Follow us on        
Kokanai Exclusive: कोकण रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे २४-२५ उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन ते ९८ कोटी ६२ लाख झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानके म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी कोकण रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न  मिळवून देणाऱ्या पहिल्या १० स्थानकांमध्ये मोडत आहेत. तर जिल्ह्यातून पूर्ण वर्षात जवळपास ४८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.  कणकवली आणि कुडाळ स्थानकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन ते प्रत्येकी ३४ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ही दोन्ही स्थानके उत्पन्नात संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा जवळपास ९ ते १० टक्क्याने वाढ होऊन ते १६ कोटीच्या घरात गेले असून संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर आहे. वैभववाडी (७ कोटी) सिंधदुर्ग (५.६० कोटी)  ही स्थानके सुद्धा रेल्वे ला चांगले उत्त्पन्न मिळवून देत आहेत.
असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच पडत असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण १५ गाडयांना या जिल्ह्यात एकही स्थानकावर थांबा नाही आहे. खर ते महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले असताना या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जिल्हातील स्थानकांवर आलटून पालटून थांबे देणे गरजेचे होते. मात्र प्रवाशी संघटनांनी वारंवार मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन हे थांबे देत नाही आहे.
सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीस वाव 
सावंतवाडी पंचक्रोशीमध्ये येणारे तालुके आणि गावे पाहता या स्थानकाचा विकास करून इथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले जावेत, उदघाटन झालेल्या टर्मिनस चे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे. टर्मिनस चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिक गाडयांना थांबे दिल्यावर या स्थानकावरून रेल्वे ला मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
वैभववाडी आणि सिंधुदुर्ग स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होत असूनही येथे आरक्षण सुविधा, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरत आहे. खरे तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस

Mumbai Goa Highway: खुशखबर! कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार

   Follow us on        
Kashedi Tunnel | मे महिन्याच्या सुट्टीत मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायक होणार आहे. कशेडीच्या दोन्ही बोगद्यांपैकी पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा कार्यान्वित झाला असून, उर्वरित वीजपुरवठा १५ दिवसांत पूर्ववत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून १५ मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बोगद्याचा वापर सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंत केल्याने, ही सुविधा वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
spacer height=”20px”]
कशेडी घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यामुळे ४० ते ४५ मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या १० ते १५ मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे.
बोगद्यात दोन्ही बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी अपेक्षित असून, १५ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणारा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांचा स्लीपर डब्यांत मोठी कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही सुधारणा करताना या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला असून सामान्य प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या स्लीपर डब्यांत कपात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
१) २२१४९/२२१५०  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ६ जुलै २०२५ पासून  सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
२ ) ११०९७/११०९८  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ५ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सध्याची आणि सुधारित संरचना खालीलप्रमाणे असणार आहे.
सध्याची संरचना सुधारित संरचना
२ टियर एसी – ०१
२ टियर एसी – ०२
३ टियर एसी – ०४
३ टियर एसी – ०४
स्लीपर – ११ स्लीपर – ०७
जनरल – ०३ जनरल – ०४
पॅन्ट्री कार – ०१ पॅन्ट्री कार – ०१
एसएलआर – ०२ एसएलआर – ०२
एकूण – २२ आयसीएफ कोच
एकूण – २० एलएचबी कोच
LHB मध्ये अपग्रेड करताना दोन्ही या गाड्यांचे तब्बल ४ स्लीपर डबे कमी करण्यात आले आहेत. एकिकडे कोकण रेल्वे मार्गावर स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना या गाड्यांचे हे डबे कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Monsoon 2025: मान्सूनची चाहुल! पावसाची वर्दी देणारा ‘नवरंग’ कोकणात दाखल

   Follow us on        

रत्नागिरी: पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘इंडियन पिट्टा’ कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)

भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.

Mumbai to Konkan RORO Service: अवघ्या ५ तासांत मुंबईतून तळकोकणात! वाहतुकीचा जलद पर्याय लवकरच खुला होणार

   Follow us on        
मुंबई: यावर्षी कोकणात जाण्यासाठी वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांना  मोठी खुशखबर दिली असून माझगाव ते मालवण जलवाहतुकीने अवघ्या पाच तासांत पोहोचता येणार आहे. येत्या गणेशचतुर्थी पर्यंत ही वाहतूक खुली होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
या वॉटर मेट्रोमुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा पडणारा मोठा ताण हा विभागला जाणार असून जलवाहतुकीचा मोठा पर्याय आगामी काळात मुंबईकरांना खुला होऊ शकणार आहे, असेही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
रेल्वेचे तिकीट जरी मिळाले नाही तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सागरी मंडळाने रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतुकीची जलद सेवा चाकरमान्यांसाठी गणेश चतुर्थीला उपलब्ध करून दिली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केली. मालवणला जाऊ इच्छिणारे थेट दुचाकी, चारचाकी गाडी घेऊन माझगाव ते मालवण हा जलप्रवास जलद गतीने करता येणे शक्य आहे. याकरता मालवण आणि विजयदुर्ग असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यांना मालवणी येथे पोहोचायचे असेल त्यांनी मालवणला, तर ज्यांना विजयदुर्ग येथून कोकणातील आपल्या गावी जायचे असेल त्यांच्याकरता विजयदुर्ग येथे दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.
सरकार जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे काम करत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रात आपल्याला अधिकाधिक काम करण्यास सांगितले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर ट्रान्सपोर्टला म्हणजेच जलवाहतुकीला शासकीय पातळीवर गती देण्याचे काम प्रगतिपथावर असून याबाबतचे डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी नसला तरी आगामी वर्षात साधारणपणे फेब्रुवारी, मार्चच्या सुमारास कोचीनच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर मेट्रोला मान्यता देण्यात येईल.
यंदाच्या गणपती उत्सवात सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांसाठी माझगाव पासून ते थेट मालवणपर्यंत रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

Konkan Wildlife: रत्नागिरीत पांढर्‍या बिबटय़ाचे दर्शन

   Follow us on        

Ratnagiri: रत्नागिरीतील एका शेताच्या जवळील जंगलात एका मादी बिबट्याने एका पांढर्‍या रंगाच्या पिल्लाला जन्म दिल्याची अजब घटना घडली आहे. मात्र या पिल्ला सोबत जन्म घेतलेली ईतर पिल्ले मात्र सामान्य रंगाची आहेत.

“चार दिवसांपूर्वी, शेताच्या मालकाने आम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या बिबट्याच्या पिल्लाबद्दल माहिती दिली, जी दुर्मिळ आहे. मात्र मादी बिबट्याची ईतर पिल्ले सामान्य रंगांची आहेत.” या पिल्लाची आई शेतात पिल्लांसह आहे, परंतु ती तिच्या सध्याच्या ठिकाणी किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही. अल्बिनिझम किंवा ल्युसिझम – दोन्ही अनुवांशिक स्थितींमुळे – हे पिल्लू पांढरे जन्माला आले आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.असे रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्यात. वन्यजीव प्रेमी आणि जनतेला शेतात येण्यापासून रोखण्यासाठी देसाई यांनी स्थान उघड केले नाही.

“त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिनच्या पूर्ण अनुपस्थितीमुळे अल्बिनिझम होतो. जास्त मेलेनिनमुळे त्वचा गडद आणि काळी होते. ब्लॅक पेंथरचे मूळ हेच आहे. या स्थितीला मेलेनिझम म्हणतात. तर मेलेनिनच नव्हे तर सर्व रंगद्रव्ये कमी झाल्यामुळे किंवा आंशिकपणे नष्ट झाल्यामुळे ल्युसिझम होतो आणि त्यामुळे प्राण्याचा रंग फिकट असू शकतो.” असे महाराष्ट्राचे माजी मुख्य वन्यजीव वॉर्डन सुनील लिमये याबद्दल अधिक माहिती देताना म्हणालेत.

Konkan Railway: अखेर ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी आरक्षण सुरु; फेऱ्यांमध्ये मात्र कपात

   Follow us on        
Konkan Railway News: दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मात्र दोन महिन्याचे आगाऊ आरक्षण चालू झाले असताना त्यात वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांची नावे दिसत नसल्याने आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संभ्रम निर्माण झाला होता. या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार कि काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसी संकेतस्थळावर दिसत असल्याने या शंकेचे निरसन झाले आहे. मात्र या गाड्यांच्या फेऱ्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
रेक्स च्या कमतरतेमुळे कपात
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.

Vaibhavwadi Railway Station: चांगले उत्त्पन्न मिळत असून सुद्धा कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानकाकडे दुर्लक्ष

   Follow us on        
Vaibhavwadi Railway Station:  कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. या स्थानकापासून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्त्पन्न भेटत असताना सुद्धा या स्थानकावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत होत असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ ला या स्थानकावरून कोकण रेल्वेला ७ कोटी २२ लाख इतके उत्पन्न भेटले असल्याचे माहिती रेल्वे अभ्यासक श्री ओंकार लाड यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली आहे. २०२३-२४ या वर्षाच्या उत्पन्नाशी तुलना करता गेल्या वर्षीच्या उत्पन्नात जवळपास ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हे स्थानक  कोकण रेल्वेच्या पहिल्या १५ स्थानकामध्ये मोडत आहे. असे असून देखील या स्थानकांवर मूलभूत सुविधांची मारामारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.

कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील २०२३-२०२४ चे वार्षिक उत्पन्न हे ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२४- मार्च २०२५ यावर्षीचे उत्पन्न ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपयांची विक्रमी वाढ झाली. या स्थानकावरून प्रवास करणार्‍या दररोजच्या प्रवाशांची संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेकडे जाणून बुजून पाठ फिरवली जात असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.

संगमेश्वर रेल्वे स्थानकातून काही अंतरावर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने हे स्मारकस्थळ बहुचर्चित झाले आहे. पर्यटकांची झुंबड संगमेश्वर येथे दाखल होते.त्यात रेल्वेचा प्रवास केलेले पर्यटक पुन्हा रेल्वे प्रवास नको! असा नाराजीचा सूर आळवितात.

कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार यासाठी निधी पुरवला जाणार! पर्यटनाला वाव मिळणार! गोवा,केरळ याच धर्तीवर आपल्या संगमेश्वराकडेही पर्यटकआकर्षित होणार! हे खरे असले तरी आताचा कोकण रेल्वेचा प्रवास हा खच्चून भरलेल्या कोंबड्या बकऱ्यांसारखा करावा लागतो आहे. मग या स्थानकांवर मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसला थांबा देऊन हा प्रवाशी भार नक्कीच हलका करता येईल.

गेल्या दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गतवर्षीचे आणि यावर्षीचे वार्षिक उत्पन्न दाखवून ही डोळेझाक का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

हाच विचार ध्यानात ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जनसामान्यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस अडवून निषेध नोंदविण्याचा विचार केला. तसे निवेदन कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिले. त्या पत्राचीही म्हणावी तशी दखल घेतली नाही.

आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे यांच्यासज्ञ काही राजकीय नेत्यांनी आपापली पत्रे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिली. पण अद्याप सुस्त यंत्रणा वेग धरीत नाही.

संगमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका! केवळ राजकीय पोळी, श्रेय लाटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची पोकळ अस्मिता दाखवू नका. खरोखरच संगमेश्वर तालुक्यात जगविख्यात स्मारक उभारायचे असेल तर या मातीचे ऐतिहासिक महत्व ध्यानात घ्यावे. केरळ, गोवा, या राज्यांतील पर्यटनाला गतिमान करण्याच्या नादात संगमेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वाला कमी लेखू नका!

-रुपेश मनोहर कदम/सायले  

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search