Category Archives: कोकण
अलिबाग:बैलगाडीच्या शर्यतीला शासनाकडून मान्यता तर मिळाली आहे पण प्रेक्षकांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ते नियम बनवले नसल्याने या शर्यतींदरम्यान अनेक जीवघेणे अपघात घडताना दिसत आहे. अशाच एका अपघातात बैल उधळून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने अलिबाग येथे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
धुळवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्रकिनार्यावर बैलगाडी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. मात्र यादरम्यान बैलगाडीचे बैल उधणून प्रेक्षकांमध्ये घुसल्याने विनायक जोशी (७०) राजाराम गुरव (७५) हे जखमी झाले. त्यांना अलिबाग येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेताना वाटेतच मृत्यू झाला. तर राजाराम गुरव यांचे बुधवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले.
Vision Abroad
अलिबाग पोलीस ठाण्यात स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलेश सणस करत आहेत. बैलगाडी स्पर्धेच्यावेळी घडलेली ही चौथी दुर्घटना असल्याने प्रेक्षकांची सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाली आहे.
वेळापत्रकामध्ये पुढील बदल करण्यात आलेले आहेत.
Station | सध्याची वेळ | सुधारित वेळ (०९/०६/२०२३ पर्यंत) | सुधारित वेळ (१०/०६/२०२३ पासून- पावसाळी वेळापत्रक) |
Diva Jn. | 15:20 | 17:50 | 17:50 |
Panvel | 15:50 | 18:30/18:33 | 18:30/18:33 |
Apta | 16:12 | 18:55/18:56 | 18:55/18:56 |
Jite | 16:24 | 19:08/19:09 | 19:08/19:09 |
Pen | 16:37 | 19:19/19:20 | 19:19/19:20 |
Kasu | 16:50 | 19:30/19:31 | 19:30/19:31 |
Nagothane | 17:03 | 19:43/19:44 | 19:43/19:44 |
Roha | 17:25 | 20:07/20:12 | 20:07/20:12 |
Kolad | 17:47 | 20:24/20:25 | 20:24/20:25 |
Indapur | 17:59 | 20:35/20:36 | 20:35/20:36 |
Mangaon | 18:12 | 20:45/20:46 | 20:45/20:46 |
Goregaon Road | 18:24 | 20:56/20:57 | 20:56/20:57 |
Veer | 18:36 | 21:05/21:06 | 21:05/21:06 |
Sape Wamne | 18:46 | 21:15/21:16 | 21:18/21:19 |
Karanjadi | 18:56 | 21:25/21:26 | 21:30/21:31 |
Vinhere | 19:11 | 21:34/21:35 | 21:44/21:45 |
Diwankhavati | 19:29 | 21:42/21:43 | 21:58/21:59 |
Kalambani Budruk | 19:39 | 21:53/21:54 | 22:12/22:13 |
Khed | 19:59 | 22:03/22:04 | 22:23/22:24 |
Anjani | 20:15 | 22:15/22:16 | 22:41/22:42 |
Chiplun | 20:40 | 22:30/22:35 | 23:00/23:05 |
Kamathe | 21:00 | 22:49/22:50 | 23:21/23:22 |
Sawarda | 21:12 | 22:58/22:59 | 23:34/23:35 |
Aravali Road | 21:25 | 23:09/23:10 | 23:49/23:50 |
Kadavai | 21:35 | 23:19/23:20 | 23:55/23:56 |
Sangameshwar Road | 21:45 | 23:33/23:34 | 00:20/00:21 |
Ukshi | 22:10 | 23:45/23:46 | 00:50/00:51 |
Bhoke | 22:40 | 00:08/00:09 | 01:20/01:21 |
Ratnagiri | 00:35 | 00:35 | 02:00 |
रत्नागिरी| होळीसाठी रेल्वेने गावी जाणार्या चाकरमान्यांचा त्रास वाढवणारी एक बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी या मार्गावर सोडण्यात आलेल्या 2 गाड्या रद्द केल्या आहेत.
पुढील दोन गाड्या दिनांक 09/03/2023 ते 12/03/2023 दरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत.
01597 मेमू ट्रेन रोहा येथून चिपळूण साठी सुटणारी रोहा – चिपळूण अनारक्षित मेमू
01598 मेमू चिपळूण येथून रोहा या स्थानकासाठी सुटणारी चिपळूण – रोहा अनारक्षित मेमू
दिवा स्थानकावरून रोहा स्थानकापर्यंत चालविण्यात येणार्या गाडीचा विस्तार करून या गाड्या चालविल्या जात होत्या. या गाड्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील ईतर गाड्यांमध्ये होणारी गर्दी विभागली जात असताना रेल्वे प्रशासनाने अचानक या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
संबंधित बातमी >खुशखबर| होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर मेमू ट्रेनसह अजून ६ विशेष गाड्या…
मुंबई |शनिवार दिनांक 11 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता जनता दल सेक्युलर पक्ष आणि कोकण जन विकास समिती यांच्या वतीने दादरमध्ये कोकणवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, रिफायनरीसारखे प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न तसेच ‘कोकणच्या विकासाची दिशा’ या विषयी चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दादर पूर्व-नायगाव येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या प्राध्यापक सुरेंद्र गावसकर सभागृहात हा मेळावा होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या तसेच तांत्रिकदृष्टय़ा त्रुटी असलेल्या कामामुळे या रस्त्याने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. दुसरीकडे सगळी वाहतूक पुणे-कोल्हापूरमार्गे होत असल्यामुळे कोकणवासीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मुळात बांधकामात त्रुटी असल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही अपघातांची शक्यता कायम राहणार आहे. त्यामुळे रस्त्याचे ऑडिट करावे तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही टोल लावण्यात येऊ नये, अशी मागणी मेळाव्यात करण्यात येणार आहे. कोकणवासीयांनी मोठय़ा संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जनता दलाचे प्रभाकर नारकर आणि कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग |शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या अवैध दारूची महाराष्ट्रात छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून गोवा बनावटीची बेकायदा दारु वाहतूक केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी बेळगाव येथील एकाला ताब्यात घेतले आहे.मंगळवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८ हजारांच्या दारुसह ४ लाखाची गाडी मिळून तब्बल ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. कलमेश अल्लाप्पा मुलाबट्टी (३६, रा.अदालट्टी, ता. अथणी, बेळगांव ) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई व होमगार्ड जंगले यांनी आंबोली तपासणी नाक्यावर केली. यात गोवा बनावटीच्या इम्पेरियल ब्ल्यू ब्रँडच्या बाटल्यांचे नऊ बॉक्स जप्त करण्यात आले. तर या प्रकरणी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची शेवरलेट एन्जॉय ( के ए – २३ एन ३६३५) ही कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे.
रत्नागिरी : प्रगतीमुळे विज्ञानामुळे माणसाचं आयुष्य वाढला. असं म्हणतात. पण यामुळे नद्या प्रदूषित झाल्या जंगला उध्वस्त झाले, कारखान्यांनी हवा प्रदूषित केली.
कोकणात असे गाव आहे जेथे स्वातंत्र्यानंतरही गेली 73 वर्ष रस्ता नव्हता. या गावात रुग्णाला डोलीतून खाली सात आठ किलोमीटर डोंगर उतरून दवाखान्यात आणावे लागत होते. अगदी दोन वर्षांपूर्वी या गावात पहिल्यांदा रस्ता आला.
अतिशय साधी मातीची घरे, तथाकथित कोणताही विकास नाही, निसर्ग पूरक जीवनशैली, हायब्रीड आणि केमिकल यांचा रोजच्या जगण्याशी काही संबंध नाही, कोणतेही प्रदूषण नाही, म्हटले तर अविकसीत पण जीवनशैलीच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आणि प्रगत असे हे रत्नागिरीतील लांजा या तालुक्यातील गाव म्हणजे माचाळ.
या गावात 105 वर्षाचे आजोबा आणि शंभर वर्षाच्या आजी हे दांपत्य राहते. या गावात अनेक वृद्ध माणसे 80/ 90 /95 वर्षाची आपल्याला भेटतील.
समृद्ध जीवनशैली प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी दोन दिवस आपण माचाळला येऊन राहिले पाहिजे. हे कोकणातील पहिले हिल स्टेशन येथील कार्यकर्त्यांनी इको हिल स्टेशन निसर्ग समृद्ध पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचं ठरवलं.
निसर्गावर प्रेम करणाऱ्या पर्यटकांनी येथे येऊन राहावं आणि या गावातील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यातून ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित व्हावी अशा स्वरूपाचा हा उपक्रम आहे. याच साठी माचाळ महोत्सव 2023 आयोजित करत आहोत. अकरा व बारा मार्च हा विशेष महोत्सव आयोजित होत आहे
येथील निसर्ग समृद्ध जीवनशैली लोककला उत्सव यांचा अनुभव निसर्गप्रेमी पर्यटकांनी सहपरिवार घ्यावा अशा स्वरूपाची संकल्पना आहे अर्थात मर्यादित पर्यटकांना या पर्यटन केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरीक संघ, आणि स्थानिक कार्यकर्त्यांची टीम संपूर्ण नियोजन करत आहे.
संजय यादवराव
कोकण क्लब /कोकण बिझनेस फोरम
इमारत शिफ्टिंग करणाऱ्या कंपन्या इमारत लिफ्टिंग आणि इमारत शिफ्टिंग तसेच इमारतीची दिशा बदलणे या मुख्य सेवा देतात. इमारत लिफ्टिंग म्हणजे घर काही फूट वर उचलणे. या मध्ये घर जास्तीत जास्त १० फुटांपर्यंत वर उचलेले जाते. साहजिकच घराचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आणि किती जुने आहे या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. आमच्या प्रतिनिधेने दिल्लीतील एका कंपनीशी संपर्क साधला असता ३ फुटापर्यतच्या लिफ्टिंग करण्यासाठी साधारणपणे ४०० ते ५०० रुपये प्रति चौरस फूट खर्च येईल असे सांगण्यात आले. इमारत शिफ्टिंग बद्दल विचारले असता जर १००० चौरस फुटाचे घर १५ ते २० फूट सरकावायचे असेल तर साधारणपणे १० ते १५ लाख खर्च येतो. साहजिकच घराच्या बांधकामाच्या स्वरूपानुसार खर्च कमी जास्त येतो.