सिंधुदुर्ग :महिलांना रोजगाराच्या व आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटोरिक्षा’ ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केली. या योजनेसाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीचा व्याजदरात अर्थसहाय्य, प्रशिक्षणासह बॅच परमिट चा खर्च करणार असल्याची ही माहिती आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या नाविन्यपूर्ण योजनेची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळशेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.पिंक ऑटो रिक्षा म्हणून रेल्वे स्थानके जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये अशी रिक्षा सेवा सुरू व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेने ही योजना हाती घेतली आहे.
आमदार नितेश राणे यांचे आवाहन
जिल्ह्यात रोजगाराला चालना मिळावी तसेच आता येत असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाबरोबरच सुरू झालेल्या विमानसेवा जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ यासाठी या विकासाला सहाय्य करणारी सेवा जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी करावी व या योजनेत जिल्ह्यातील महिला व तरुणीनी पुढाकार घ्यावा व या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेकडून या योजनेसाठी नऊ टक्के सवलतीचा व्याजदर आकारण्यात येणार आहे. एकूण किमतीच्या 85% कर्जपुरवठा जिल्हा बँक करणार आहे.
पाहिल्या पाच महिला रिक्षाचालकांना विशेष सवलत
कोणत्याही क्रांतीची सुरवात करताना कोणीतरी सुरवात करणे महत्त्वाचे असते. हीच सुरवात करण्यासाठी नितेश राणे यांनी पहिल्या पाच अर्जदारांसाठी स्वतः काही सवलती जाहीर केल्या आहेत. या सवलती पुढीलप्रमाणे असतील.
उर्वरित पंधरा टक्के कर्ज पुरवठा (Down Payment) स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत.
ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच परमिटचा खर्च देखील ते करणार आहेत.
पहिल्या पाच महिलांना जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात पिंक रिक्षांचे वितरण लाभार्थी महिलांना होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
महिला अधिकारी नमिता खेडेकर यांची नियुक्ती.
जिल्ह्यातील महिलांच्या या योजनेसाठी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील नमिता खेडेकर यांचे खास नियुक्ती करण्यात आली असून इच्छुक महिला व युवतीने या पिंक ऑटो रिक्षा अबोली योजनेसाठी नोंदनों णी करावी व जिल्ह्याच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले आहे. संपर्कासाठी 9421149421 हा श्रीमती नमिता खेडेकर यांचा मोबाईल नंबर ही जाहीर करण्यात आला