Category Archives: अपघात
Amaravati Express Fire: मुबंईत दोन वेळा लोकल रुळावरून घसरल्याची घटना ताजी असताना दादर स्टेशनवर आज अजून एक दुघटना घडली आहे. अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी दादर स्टेशनला ही घटना घडली. सकाळी एक्स्प्रेस विदर्भातून दादरच्या स्टेशनला आहे. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागल्याने ही बाब समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावीत एक्स्प्रेसच्या बी ९ च्या कोचमधून धूर दिसल्यानंतर ही घटना समोर आली. आग किरकोळ असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु आगीच्या घटनेमुळे स्टेशनवर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीची माहिती मिळताच, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेतून उतरून आग विझवली
Ad -
शिवडी न्हावा शेवा अटल सेतुवर आज पहिल्या अपघाताची नोंद; अपघाताचा विडिओ समोर https://t.co/tl3KquTQG1#AtalSetu #MTHL #Accident pic.twitter.com/oBhpPdK8Ig
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) January 21, 2024
मुणगे : आचऱ्याहून देवगडला (Devgad) जाणाऱ्या बसचे चाक मातीच्या ढिगाऱ्यावर चढल्याने चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याजवळील घरात घुसली. या अपघातात (Bus Accident) चालक बापू लक्ष्मण काळे (वय ५४, रा. तळेरे) गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात काल (शनिवार) दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर (ता. देवगड) येथे झाला. यात वाहकासह दोन प्रवासीही जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी : आचरा-खुडीमार्गे देवगड बस घेऊन दुपारी चालक बापू काळे निघाले होते. बस दुपारी अडीचच्या सुमारास पोयरे-गोंदापूर येथे आली असता चालक काळे यांचा अचानक बसवरील ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्याजवळ असलेल्या संजय सावंत यांच्या घराला धडकली.
मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दीपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समीर तावडे, मंगेश पालव यांसह ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या चालकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडून बाहेर काढले. अपघातात चालक काळे यांच्यासह वाहक राजेंद्र मनोहर जाधव व प्रवासी रुही दीनानाथ पडवळ (वय २१) व मिताली प्रवीण मुणगेकर (१९, दोघे रा. कुडोपी) जखमी झाले.

देवगड : सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून एकजण असून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे येथील संकल्प सैनिक अॅकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यातील काहीजण समुद्रात आनंद लुटण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.











