Category Archives: महाराष्ट्र

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा परभणी व नागपूर दौरा संपन्न

   Follow us on        

मुंबई (प्रतिनिधी):
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्री. श्रीकांत सावंत यांचा परभणी आणि नागपूर जिल्ह्याचा दौरा नुकताच उत्साहात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

धार्मिक महोत्सवात सहभाग
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील श्री क्षेत्र दत्तवाडी (नैकोटा) येथे प.पू. श्री नारायण दत्तानंद स्वामी आणि प.पू. श्री परमगुरु माधवाश्रम स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे तसेच दत्तवाडी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात श्रीकांत सावंत प्रामुख्याने सहभागी झाले होते.

दौऱ्याचा तपशील:

४ जानेवारी: श्री. सावंत यांनी खडका येथे भेट दिली, जिथे माधवाश्रम स्वामी यांनी जलसमाधी घेतली होती. तसेच येथील आश्रमाचे अध्यक्ष श्रीराम खडकेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली.

५ व ६ जानेवारी: नागपूर येथे आयोजित ‘सुदर्शन क्रिया’ आणि ‘रुद्राभिषेक’ कार्यक्रमात ते सहभागी झाले.

दत्तहोम: ६ जानेवारी रोजी परदेशी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘ऑनलाइन दत्तहोम’ कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन स्वामी शंकरानंद यांच्या अधिपत्याखाली करण्यात आले होते.


सत्कार आणि भावना
याप्रसंगी श्री. श्रीकांत सावंत यांचा श्रीफळ आणि प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. “या अतिशय सुंदर महोत्सवात सहभागी होता आले आणि ऋषी देवव्रत व इतर स्वामींचे सानिध्य लाभले, हे माझे भाग्य आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या समाजजागृती आणि राष्ट्रजागृतीच्या कार्यासाठी आपले मार्गदर्शन व सहकार्य सदैव कायम राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Shaktipeeth Expressway: ८०४ किमीचा महामार्ग झाला ८४० किमी. मोजणी पूर्ण; आता भूसंपादनाची प्रतीक्षा

   Follow us on    

 

 

नागपूर: राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) ‘शक्तीपीठ’ महामार्गाच्या कामाला आता वेग आला असून, या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने सांगलीपर्यंतच्या आखणीस आणि भूसंपादनास मान्यता दिली होती, ज्यानुसार आतापर्यंत १५० पेक्षा जास्त गावांमधील जमीन मोजणीचे काम यशस्वीरीत्या पार पडले आहे. या महामार्गाच्या आराखड्यात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, सातारा जिल्ह्यातील काही भागांचा यात नव्याने समावेश करण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून हा मार्ग वळवण्यात आल्यामुळे महामार्गाची एकूण लांबी आता ८०२ किलोमीटरवरून वाढून ८४० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाने २० हजार ७८७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, एमएसआरडीसीकडून उर्वरित तांत्रिक कामेही पूर्णत्वास येत आहेत.

​हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण १२ जिल्ह्यांतील ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे. या महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे राज्यातील तीन प्रमुख शक्तीपीठे—माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर यांना एकमेकांशी जोडणार आहे. याव्यतिरिक्त परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर आणि नरसोबाची वाडी यांसारख्या एकूण १८ धार्मिक स्थळांना हा मार्ग जोडणार असल्याने राज्यात धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, कागल यांसारख्या तालुक्यांच्या आखणीची अधिसूचना आधी रद्द करण्यात आली होती, मात्र आता नवीन बदलांसह हा प्रकल्प भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मोजणी पूर्ण झाल्यामुळे आता बाधित शेतकऱ्यांना दिलासा देऊन प्रत्यक्ष जमीन संपादन प्रक्रिया कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावधान! ”राज्य सरकार फ्री लॅपटॉप योजना २०२६” ची बातमी खोटी; फसवणूक होण्याची शक्यता

   Follow us on    

 

 

मुंबई: सोशल मीडियावर सध्या ‘महाराष्ट्र मोफत लॅपटॉप योजना २०२६’ बाबत एक संदेश वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, राज्य सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा पूर्णपणे बनावट (False) असल्याचे जाहीर केले आहे.

​नेमका प्रकार काय?

​व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एका बातमीचा स्क्रीनशॉट फिरत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की महाराष्ट्र सरकार २०२६ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप करत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकही देण्यात आली आहे. या पोस्टमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

​DGIPR कडून खुलासा

​महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) या बातमीचे खंडन केले आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती देताना त्यांनी खालील मुद्दे स्पष्ट केले आहेत:

​अधिकृत घोषणा नाही: शासनाने अशी कोणतीही ‘मोफत लॅपटॉप योजना’ जाहीर केलेली नाही.

​GR चा अभाव: या योजनेबाबत कोणताही शासन निर्णय (GR) किंवा अधिकृत अधिसूचना निर्गमित झालेली नाही.

​सायबर सुरक्षेचा धोका: व्हायरल पोस्टमध्ये दिलेली लिंक संशयास्पद असून ती युझर्सला ‘ब्रोकन’ किंवा चुकीच्या वेबपेजवर घेऊन जाते. अशा लिंक्सचा वापर तुमची वैयक्तिक माहिती (Personal Data) चोरण्यासाठी केला जाऊ शकतो.

​नागरिकांना आवाहन

​अशा प्रकारच्या ‘क्लिकबेट’ स्वरूपाच्या अफवांना बळी पडू नका. कोणत्याही सरकारी योजनेची खातरजमा करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच, आपली वैयक्तिक माहिती अनोळखी लिंकवर शेअर करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 

शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाच्या सर्वेक्षणाला वेग; संभाव्य गावांची यादी समोर

   Follow us on    

 

 

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने प्रस्तावित असलेल्या ८०२ किलोमीटरच्या नागपूर-गोवा ‘शक्तीपीठ महामार्गा’बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये (नव्या मार्गामध्ये) समाविष्ट असलेल्या गावांसाठी सध्या ‘व्हिलेज मॅप’ (गाव नकाशा) संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यानुसार गावांच्या याद्या तयार केल्या आहेत. या यादीत प्रामुख्याने खालील जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे:

विदर्भ आणि मराठवाडा: नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा या तालुक्यांमधील अनेक गावांच्या नकाशांची मागणी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर (बार्शी, मोहोळ, माढा, पंढरपूर, माळशिरस), सातारा (माण, खटाव) आणि सांगली (खानापूर, पलूस, वाळवा) या जिल्ह्यांतील गावेही या प्रक्रियेत आहेत.

कोल्हापूर आणि कोकण: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील गावांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील बांदा, कोळझर यांसारख्या गावांचाही यात समावेश आहे.

स्थानिक विरोध आणि फेरबदल: दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही भागांतून या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर, सरकारने काही तालुक्यांना मूळ आराखड्यातून वगळण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, समोर आलेल्या ताज्या यादीत अद्यापही या भागातील गावांची नावे दिसत असल्याने, ही ‘नवीन अलाइनमेंट’ मधील गावे आहेत का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे.

अद्याप जमिनीच्या संपादनाचे (Land Acquisition) काम पूर्ण झालेले नसून, केवळ नकाशांची जुळवाजुळव करण्याचे प्राथमिक काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

जिल्ह्यानुसार आणि तालुक्‍यानुसार संभाव्य गावांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

.
नांदेड जिल्हा
हदगाव: पेवा, शिराड, कोहाळी, महाटला , चाक्री, कोळी, मर्दगा.

.
हिंगोली जिल्हा

कळमनुरी: येहळेगाव तुकाराम, घोडा, कामठा, पिंपरी बु., डोंगरगाव पूल, गणगाव, कुप्ती, सापाळी, धारधावंडा, कसबे धावंडा, किल्ले वडगाव, गोरलेगाव, पोत्रा, बोल्डा, बोल्डावाडी.

वसमत: पांगरा शिंदे, गुंडा, करंजाळा, बोरसावंत, आडगाव, हट्टा, पिंपळगाव हजाम, संगमेश्वर.

औंढा: राजदरी, सोनवाडी, लोहारा खु., लोहारा बु., सावरखेडा, आसोला तर्फ लाख, दरेगव्हाण, नागेशवाडी, पुंजाळ, रांजाळा.

.
परभणी आणि बीड जिल्हा

परभणी: नांदगाव खु., नांदगाव बु., आलापूर पंढरी, धनगरवाडी, आसोला.

सोनपेठ: रेवा तांडा.

परळी (बीड): कौथळी तांडा.

 

सोलापूर जिल्हा

बार्शी: रतनंजन, सर्जापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा), दहिठणे, मौजे ताडवळे.

मोहोळ: वाळूज , भैरववाडी, देगांव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेतफळ, वैरागवाडी .

माढा: धनोरे, मानेगाव , बुद्रुकवाडी, पंच फुलवाडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव खु., मोडनिंब, वैरागवाडी .

पंढरपूर: बर्डी, करकंब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, आव्हे.

माळशिरस: जांबुड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंंगफळ, मगरवाडी, गरवाड.

.
सातारा जिल्हा

माण: कारखेल, पर्यंत, खडकी, वरकुटे म्हसवड, वाकी, दिवाड, धामणी, गेटेवाडी, वडजाळ, कुकुडवाड.

खटाव: कण्हेरवाडी, हिवरवाडी, पाडल, मयाणी, अनफळे, कांकत्रे.

 

सांगली जिल्हा

खानापूर: भिकावाडी बु., माहुली, चिखलहोल, नागवाडी, घाणावड, नेवरी, आंबेगाव, वाडीयेरायबाग, भालवणी.

पलूस: वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव.

वाळवा: मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव, वाळवा, उरण इस्लामपूर, कामेरी, येडे निपाणी, इटाकरे, येळूर, कुरळप, ऐतवडे खु.

.
कोल्हापूर जिल्हा
हातकणंगले: पारगाव, मणपाडळे .

पन्हाळा: बहिरेश्वर, जाखले, गिरोली, पोहळे तर्फ आळते, कुशिरे.

करवीर: केरली, केरले, वरंगे, पाडळी बु., शिंदेवाडी, खुपिरे, वाकरे, कुडित्रे , बहिरेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सादोली दुमाला, भाटणवाडी, हासूर.

राधानगरी: राशिवडे बु., कोडावडे, वाघवडे, मोहडे, चाफोडी तर्फ तारळे, कौलव, पिंपळवाडी, ठिकपुर्ली, कुऱ्हाडवाडी, माजगाव, तळशी, तुरंबे, कापिलश्वर, सरवडे.

कागल: उंदरवाडी .

भुदरगड: खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवाडे, पाचवडे, बासरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटीवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, करडवाडी, शेलोली, पाडखंबे, सोनुर्ली, मेघोली, बेडीव, अरळगुंडी.

आजरा: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी , मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.

चंदगड: गवसे, बुजावडे, कुरणी, महाळुंगे इनाम, बिजूर , भोगोली, कानूर बु., पिळणी, जांबरे, इसापूर .

.
सिंधुदुर्ग जिल्हा

सावंतवाडी: केगड , पडवे माजगाव, पडवे, डेगवे, बांदा.

दोडामार्ग: कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर, तळकट, झोळंबे.

महत्वाची सूचना: सदर माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून,या यादीवर शिक्केमार्फत झालेले नाही किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही आहे. त्यामुळे ही यादी संभाव्य स्वरूपाची असून अंतिम मानता येणार नाही.

 

Shaktipeeth Expressway: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार?

   Follow us on    

 

 

सावंतवाडी: महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या मूळ आराखड्यात बदल करण्याचे संकेत मिळाल्यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमक्या कोणत्या गावांतून हा मार्ग जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या मार्गात बदल करण्याचे स्पष्ट केले असले तरी, स्थानिक प्रशासनाकडे अद्याप नवीन बदलांचे कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झालेले नाहीत.

​नव्या बदलांनुसार जिल्ह्यातील गावांची नेमकी स्थिती काय असेल, याबाबत खातरजमा करण्यासाठी येथील स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी अद्याप नवीन सर्वेक्षण किंवा भूसंपादनाबाबत वरिष्ठांकडून कोणतेही आदेश आले नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी कार्यालयाकडून अधिकृत सूचना मिळाल्यावरच पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

​शक्तीपीठ महामार्गाचा जुना आराखडा हा पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (गोवा) असा ८०२ किमीचा प्रस्तावित आहे. या जुन्या आराखड्यानुसार हा मार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्हे, ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे.​ या प्रकल्पामुळे सुपीक जमिनी आणि पर्यावरणाचे नुकसान होईल, या भीतीने स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यापूर्वीच मोठा विरोध दर्शवला होता.

​महामार्गाच्या आराखड्यात बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यापासून सिंधुदुर्गातील गावांमधील लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नक्की कोणत्या जमिनी संपादित केल्या जातील आणि कोणाचे घर किंवा शेती वाचेल, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे लोकांची ‘धाकधूक’ वाढली आहे.

​जोपर्यंत सरकार नवीन नकाशा किंवा लेखी आदेश प्रसिद्ध करत नाही, तोपर्यंत हा संभ्रम असाच कायम राहण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका क्षेत्रांत १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर; कामानिमित्त क्षेत्राबाहेर असलेल्यांना…..

   Follow us on    

 

 

​मुंबई: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे.

​लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्यपालांच्या आदेशानुसार ही सुट्टी देण्यात आली आहे. ही सुट्टी केवळ संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील कार्यालयांनाच नव्हे, तर खालील घटकांनाही लागू असेल:

​शासकीय व निमशासकीय कार्यालये: सर्व सरकारी कार्यालये, महामंडळे आणि मंडळे.

​बाहेर असलेले मतदार: जर एखादा मतदार निवडणूक क्षेत्रातील रहिवासी असेल परंतु कामानिमित्त क्षेत्राबाहेर असेल, तर त्यालाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहील.

​केंद्र सरकारची कार्यालये व बँका: संबंधित क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँकांनाही ही सुट्टी लागू असेल.

​कोणत्या महानगरपालिकांचा समावेश आहे?

​प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार, कोकण, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या विभागांमधील एकूण २९ महानगरपालिकांचा यात समावेश आहे.

​बृहन्मुंबई महानगरपालिका

​ठाणे महानगरपालिका

​नवी मुंबई महानगरपालिका

​उल्हासनगर महानगरपालिका

​कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

​भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

​मिरा-भाईंदर महानगरपालिका

​वसई-विरार महानगरपालिका

​पनवेल महानगरपालिका

​नाशिक महानगरपालिका

​मालेगाव महानगरपालिका

​अहिल्यानगर महानगरपालिका

​जळगाव महानगरपालिका

​धुळे महानगरपालिका

​पुणे महानगरपालिका

​पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

​सोलापूर महानगरपालिका

​कोल्हापूर महानगरपालिका

​इचलकरंजी महानगरपालिका

​सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका

​छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

​नांदेड-वाघाळा महानगरपालिका

​परभणी महानगरपालिका

​जालना महानगरपालिका

​लातूर महानगरपालिका

​अमरावती महानगरपालिका

​अकोला महानगरपालिका

​नागपूर महानगरपालिका

​चंद्रपूर महानगरपालिका

 

Central Railway: आता प्रवास होणार अधिक सुरक्षित आणि सुखकर; मध्य रेल्वेच्या ‘या’ ८ गाड्या आधुनिक LHB कोचसहित धावणार

   Follow us on    

 

 

मुंबई:रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने आपल्या ८ महत्त्वाच्या गाड्यांमधील जुन्या पारंपारिक (Conventional) डब्यांच्या जागी आधुनिक LHB (Linke-Hofmann-Busch) कोच लावण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२६ पासून हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होतील.

​LHB कोचमुळे काय बदलणार?

​LHB कोच हे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून ते स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. यांचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:

​सुरक्षा: या कोचमध्ये ‘अँटी-क्लायंबिंग’ फिचर असते, ज्यामुळे अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाहीत.

​वेग: हे डबे १६० ते २०० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहेत.

​आराम: डब्यांची लांबी जास्त असल्याने प्रवाशांना अधिक जागा मिळते. तसेच यात उत्तम सस्पेंशन, LED लायटिंग, ५-पिन चार्जिंग सॉकेट्स आणि कार्यक्षम डिस्क ब्रेक्स असतात.

​आणीबाणीची सोय: यात ४ आपत्कालीन खिडक्या आणि ६ तास बॅकअप देणारे आपत्कालीन लाईट युनिट (ELU) असते.

​या गाड्यांमध्ये होणार बदल (वेळापत्रकासह):

१. मुंबई – चेन्नई एक्सप्रेस:

​गाडी क्र. २२१५७ (CSMT-Chennai): १४ जानेवारी २०२६ पासून.

​गाडी क्र. २२१५८ (Chennai-CSMT): १७ जानेवारी २०२६ पासून.

​(एकूण १६ डबे: २ एसी-टायर, ३ एसी-३ टायर, ५ स्लीपर, ४ जनरल, १ गार्ड ब्रेक वॅन, १ जनरेटर वॅन)

​२. पुणे येथून सुटणाऱ्या ४ गाड्या:

​पुणे-वेरावळ एक्सप्रेस (११०८८/८७): पुणे येथून १५ जानेवारी, तर वेरावळ येथून १७ जानेवारी २०२६ पासून.

​पुणे-भगत की कोठी एक्सप्रेस (११०९०/८९): पुणे येथून १८ जानेवारी, तर भगत की कोठी येथून २० जानेवारी २०२६ पासून.

​पुणे-भुज एक्सप्रेस (११०९२/९१): पुणे येथून १९ जानेवारी, तर भुज येथून २१ जानेवारी २०२६ पासून.

​पुणे-अहमदाबाद एक्सप्रेस (२२१८६/८५): पुणे येथून २१ जानेवारी, तर अहमदाबाद येथून २२ जानेवारी २०२६ पासून.

​(एकूण २० डबे: २ एसी-टायर, ४ एसी-३ टायर, ८ स्लीपर, ४ जनरल, १ गार्ड ब्रेक वॅन, १ जनरेटर वॅन)

. कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) येथून सुटणाऱ्या ३ गाड्या:

​कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस (११४०४/०३): कोल्हापूर येथून १९ जानेवारी, तर नागपूर येथून २० जानेवारी २०२६ पासून.

​कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (१२१४७/४८): कोल्हापूर येथून २० जानेवारी, तर निजामुद्दीन येथून २२ जानेवारी २०२६ पासून.

​कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस (११०५०/४९): कोल्हापूर येथून २४ जानेवारी, तर अहमदाबाद येथून २५ जानेवारी २०२६ पासून.

​(एकूण १८ डबे: २ एसी-टायर, ४ एसी-३ टायर, ६ स्लीपर, ४ जनरल, १ गार्ड ब्रेक वॅन, १ जनरेटर वॅन)

​मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार खातीपुरा – मडगाव स्पेशल एक्सप्रेस

   Follow us on    

 

 

Konkan Railway Updates: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि पर्यटकांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेता उत्तर-पश्चिम रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. खातीपुरा (जयपूर) ते मडगाव जंक्शन (गोवा) दरम्यान विशेष शुल्कासह ‘वन-वे’ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या या गाडीमुळे राजस्थान आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना गोव्याला जाणे अधिक सोयीचे होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

गाडी क्र. 09701 खातीपुरा – मडगाव स्पेशल: ही गाडी २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी खातीपुरा येथून संध्याकाळी १६:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०४:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 09702 मडगाव – खातीपुरा स्पेशल: ही गाडी ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) रोजी मडगाव जंक्शन येथून पहाटे ०५:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १६:१५ वाजता खातीपुरा येथे पोहोचेल.

थांबे:

​ही ट्रेन प्रवासादरम्यान जयपूर जंक्शन, किशनगड, अजमेर जंक्शन, बिजायनगर, भिल्वाडा, चित्तोडगड, रतलाम जंक्शन, वडोदरा जंक्शन, सुरत, वसई रोड जंक्शन, पनवेल जंक्शन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या  स्थानकांवर थांबेल.

गाडीची संरचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २० एलएचबी (LHB) कोच असतील. यामध्ये:

​AC २ टायर: २ कोच

​AC ३ टायर: ८ कोच

​AC ३ टायर इकॉनॉमी: २ कोच

​स्लीपर क्लास: ४ कोच

​द्वितीय श्रेणी आसन: २ कोच

​जनरेटर कार: २ कोच

या गाडीच्या अधिकृत वेळेसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा ‘KR Mirror’ अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

परराज्यातील गाड्या मुंबईपर्यंत; महाराष्ट्रातील गाड्यांना ‘मार्गच’ नाही- मध्यरेल्वेचा दुजाभाव

   Follow us on    

 

 

मुंबई: जिथे परराज्यात जाणार्‍या गाड्यांना मध्य रेल्वे मुंबई भागात हिरवा कंदील देत आहे तिथे कोरोना काळापासून बंद झालेली आणि कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेली ‘रत्नागिरी-दादर पॅसेंजर’ रेल्वे प्रशासनाने दिवा स्टेशनवर मर्यादित केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आता थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नात आक्रमकपणे लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

​रेल्वेचा दुटप्पी कारभार: परराज्यातील गाड्यांना रेड कार्पेट, महाराष्ट्राच्या गाड्यांना बाहेरचा रस्ता!

​समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी पत्रात रेल्वेच्या कार्यपद्धतीवर गंभीर बोट ठेवले आहे. मध्य रेल्वेने ‘मार्गाची क्षमता नाही’ (Line Capacity) असे तांत्रिक कारण देऊन रत्नागिरी पॅसेंजर दादरऐवजी दिव्यातून चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्याच मार्गावरून दादर-गोरखपूर आणि दादर-बालिया यांसारख्या परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना रेल्वेने हिरवा कंदील दिला आहे. एवढेच नाही तर अलीकडेच नव्याने घोषणा करण्यात आलेली एलटीटी बंगळुरू एक्सप्रेस एलटीटी वरून सुटणार आहे. मग महाराष्ट्रातील अंतर्गत गाड्यांसाठीच रेल्वेकडे मार्ग उपलब्ध का नाही? असा संतप्त सवाल कोकणवासीयांनी विचारला आहे.

​दिव्यापर्यंत गाडी मर्यादित केल्याने प्रवाशांचे हाल:

​वेळेचा अपव्यय: दादरला गाडीत पाणी भरण्याची सोय होती. आता दिव्यात सोय नसल्याने पनवेलला गाडी थांबवून पाणी भरावे लागते, ज्यात ३० ते ४० मिनिटे वाया जात आहेत.

​क्षमता असूनही प्रवासी वंचित: दिवा स्थानकातील फलाट आखूड असल्याने या गाड्यांना १७ पेक्षा जास्त डबे लावता येत नाहीत. हीच गाडी दादर किंवा CSMT वरून सुटल्यास २२-२४ डबे लावता येतील, ज्यामुळे दररोज ३ ते ४ हजार अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येईल.

​कनेक्टिव्हिटी तुटली: दक्षिण मुंबई, वसई-विरार आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी दादर हे सर्वात सोयीचे स्थानक होते, जे आता हिरावले गेले आहे.

यापूर्वी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि गोपाळ शेट्टी यांसारख्या अनेक नेत्यांनी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने याला केराची टोपली दाखवली आहे. संसदेत आणि विधिमंडळात विषय मांडूनही तो निकाली निघत नसल्याने आता या प्रश्नावर राजकीय लढा उभारण्याची गरज पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

​आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वळण

​”कोकण रेल्वे प्रकल्पात महाराष्ट्राचा २२% आर्थिक सहभाग आहे. तरीही मराठी प्रवाशांना त्यांच्या हक्काच्या गाडीसाठी झगडावे लागत आहे,” असा आरोप समितीने केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर, मुंबईतील मोठा मतदार असलेल्या कोकणवासीयांचा हा प्रश्न उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केंद्र सरकारकडे लावून धरतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ ५०१०४/५०१०३ रत्नागिरी दादर पॅसेंजर कोरोनापूर्वीप्रमाणे पूर्ववत दादर स्थानकावरूनच सुरू करावी आणि डब्यांची संख्या वाढवून कोकणवासीयांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी समितीने केली आहे.

कानसे ग्रुपच्या २७ वर्षातील पदार्पणाच्या निमित्ताने ‘दख्खनचा वाघ’ या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे मुंबईत सादरीकरण 

   Follow us on    

 

 

मुंबई: गेली २६ वर्षे विविध नाट्यकलाकृतींमधून रंगमंच गाजवणारा कानसे ग्रुप आपल्या २७व्या वर्षात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यावर्षी समूहाच्या वतीने स्वराज्याचा धगधगता, शौर्यपूर्ण आणि अजूनही पूर्णपणे न उलगडलेला इतिहास रंगमंचावर दिमाखात सादर केला जाणार आहे.

“हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा” या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या स्वराज्यासाठी असंख्य मावळ्यांनी आपले प्राण अर्पण केले. त्यातील काही पराक्रम इतिहासात नोंदले गेले असले, तरी अनेक शूर मावळ्यांचे योगदान आजही अज्ञात आहे. अशाच १६०० पराक्रमी मावळ्यांच्या शौर्याची साक्ष शिवनेरी आजही अभिमानाने मिरवते. त्या न वाचलेल्या इतिहासाच्या पानांना नाट्यरूप देत, प्रेक्षकांना केवळ पाहण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे.

कोकण सांस्कृतिक कलामंच निर्मित,

दिनेश कुडतरकर साहेब पुरस्कृत

आणि साईश्रद्धा कलापथक व कानसे ग्रुप आयोजित

कोकणची लोककला “नमन”

हा भव्य नाट्यप्रयोग

दिनांक : २३ डिसेंबर २०२५

स्थळ : दिनानाथ नाट्यगृह

वेळ : रात्री ८:३० वाजता

स्वराज्याचा तेजस्वी इतिहास, कोकणची लोककला आणि पराक्रमाची ज्वाला अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search