Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग | सिंधुनगरीत काल रविवारी सायंकाळी प्रशासकीय संकुलानजीक असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले.
टॉवरच्या खाली वाढलेल्या गवतामुळे टॉवरला आग.
प्रशासकीय संकुलानजीकच बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बीएसएनएल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. या टॉवरच्या खाली वाढलेले गवत आधीच साफ केले असते तर ही आग टॉवरपर्यंत पोहोचली नसती.

Vision Abroad

सिंधुदुर्ग – येत्या ०१ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टोल नाक्याला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
जर ओसरगाव येथे टोल वसुली करणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी केलेल्या MH07 वाहनांना टोलमुक्ती मिळावी अशी सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीची भूमिका आहे. मात्र जर हा टोल नाका खारेपाटण किंवा बांदा या ठिकाणी शिफ्ट केल्यास आपला त्याला कोणताही विरोध नसेल अथवा टोल मुक्तीची मागणी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१ जूनला ओसरगाव टोल नाका सुरू झाल्यास टोलमुक्ती समितीतर्फे लाक्षणीय आंदोलन छेडले जाईल. असा इशारा टोलमुक्ती कृती सिमतीचेअध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. टोलमुक्ती कृती सिमती तर्फे कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
सिंधुदुर्ग |कुडाळ तालुक्यातील साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर मध्ये वार्षिक उत्सवाचे आयोजन दि. 20 मे व 21 मे रोजी केले आहे. शनिवार दि. 20 मे 2023 रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन केले आहे. रात्रौ 8:30 वाजता लहान मुला मुलींचे, महिलांचे नृत्य, गायन, वादन असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
रविवार दि. 21 मे 2023 रोजी रात्रौ 8:30 वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ चा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सावंत कुलस्वामि मंडळ ( भांडारसावंतवाडी साळगाव ) ने केले आहे.
Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत.
वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे.
मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे.
