Holi Special Trains | प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोंकण रेल्वेमार्गावर ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी कोंकण रेल्वे मार्फत काही अतिरिक्त गाड्या सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोकणात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायक होईल हे नक्की
1) Train no. 09057 / 09058 Udhana Jn – Mangaluru Jn – Udhana Jn Special on Special Fare
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn
ही गाडी दिनांक ०१/०३/२०२३ (बुधवार), ०५/०३/२०२३ (रविवार) या दिवशी ही गाडी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 – Mangaluru Jn – Udhana Jn
ही गाडी दिनांक ०२/०३/२०२३ (गुरुवार), ०६/०३/२०२३ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल, तोकुर
डब्यांची संरचना
दिनांक ०१/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक ०२ /०३/०२२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०1 + जेनेरेटर वॅन – 01 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 02 असे मिळून एकूण LBH 22 डबे
दिनांक ०५/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक ०६ /०३/२०२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 डबे
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad – Karmali – Ahmedabad Jn Special on Special Fare
Train no. 09412 Ahmedabad – Karmali
ही गाडी दिनांक ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी ०९:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:२५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 – karmali – Ahmedabad
ही गाडी दिनांक ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
गेरातपुर, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 05+ स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 24 डबे
आरक्षण
गाडी क्रमांक 09411 या गाडीचे आरक्षण दिनांक २६/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad