खुशखबर! रंगपंचमी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अजून एक विशेष गाडी; एकूण ४ फेऱ्या

   Follow us on        
Konkan Railway News कोकणात होळीसाठी जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.  होळी सणासाठी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी विशेष प्रवासी भाड्यावर  चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीच्या जात येत एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. 09057/09058 उधना जं. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष :
गाडी क्र. 09057 उधना जं. – मंगळुरू जं.  ही गाडी उधना जंक्शन येथून रविवार दिनांक  31/03/2024 आणि बुधवार दिनांक  03/04/2024  रोजी रात्री 08 वाजता सुटून मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 09058 मंगलोर जं. – उधना जं. ही गाडी सोमवार दिनांक 01/04/2024आणि गुरुवार दिनांक 04/04/2024 रोजी रात्री  मंगलोर जं. वरून रात्री 10 वाजता ट्रेन सुटेल ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल.
थांबे: 
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन.
डब्यांची रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 कोच , SLR – 02.
Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search