गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्‍या जादा गाड्या परतीच्या प्रवासात मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात – अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरती जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची केली मागणी : श्री.यशवंत जडयार

परतीच्या प्रवासात चतुर्थी पुर्वी ३ दिवस सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवून सर्व सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणात जादा थांबे मिळावेत

   Follow us on        

मुंबई: दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात चार महिन्यापूर्वी कोकणात जाणार्‍या नेहमीच्या सर्व ट्रेनचे पहिल्या दोन मिनिटांमध्येच बुकिंग फुल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे अनेक चाकरमनी नवीन रेल्वेबुकिंग च्या प्रतीक्षेत आहेत, म्हणूनच कोकणाला गणपतीसाठी साधारणता जादा ८०० फेऱ्यांची आवश्यकता आहे,गणेश चतुर्थी शनिवार दि.७ सप्टेंबर २०२४ रोजी असल्याने ३० ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान १५ अप आणि १५ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक ( मालगाडया ) पूर्णतः बंद करावी.

यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे,वसई,वलसाड,उधना,अहमदाबाद,सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी,कुडाळ,सावंतवाडी,पेडणे, थिमिव,करमळी,मडगाव दरम्यान आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.तर गर्दी कमी करण्यासाठी डहाणू ते पनवेल, पनवेल ते खेड,वसई ते चिपळूण,दिवा ते चिपळूण,दादर ते रत्नागिरी व पनवेल ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात.11003/04 तुतारी एक्सप्रेस २४ कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डब्बलडेकर चालवाव्यात.

शनिवार दि.७ सप्टेबर ला चतुर्थी असल्याने ४ / ५ आणि ६ सप्टे.ला मुंबईतून कोकणाच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडाव्यात,तर सिंगल ट्रकवर क्रासिंगला वेळ लागत असल्याने मुंबई ते मडूरा दरम्याने चाकरमन्यांचा प्रवास साधारण १८ ते २० तासाचा होतो म्हणून याच ३ दिवसामध्ये परतीच्या प्रवासातील सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात.तसेच नियमित सर्व सुपारफास्ट एक्सप्रेसना गणपतीच्या कालावधीमध्ये रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जादाचे थांबे दयावेत.तर गुरूवार दि.१२ सप्टे.ला गौरी गणपती विसर्जन असल्याने १३/१४ आणि १५ सप्टे.ला प्रत्येक दिवसाला कोकणातून मुंबईच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडव्यात.

या निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव साहेब,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,जनरल मॅनेजर मध्य रेल्वे,रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब,माझी रेल्वेमंत्री मा.श्री.सुरेश प्रभू साहेब,पालघर चे खासदार मा.डॉ.हेमंत सावरा साहेब,रायगडचे खासदार मा.श्री. सुनील तटकरे साहेब व बोरिवली चे खासदार मा.श्री.पियुष गोयल साहेब यांना दिल्या असून या निवेदन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.शांताराम नाईक व प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी पाठवलेले आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search