१३ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 19:42:16 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 07:50:48 पर्यंत, कृत्तिका – 29:48:31 पर्यंत
  • करण-कौलव – 09:05:19 पर्यंत, तैेतिल – 19:42:16 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 11:53:37 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-मेष – 13:19:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:03:59
  • चंद्रास्त- 29:47:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • माल्टाचा प्रजासत्ताक दिन
  • जागतिक व्हायोलिन दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १९३०: ’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.
  • १९३७: ला जपान आणि चीन या दोघांमध्ये झालेल्या युद्धात नरसंहार आणि अत्याचाराचे युग सुरु झाले होते.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९८१: पोलंड मध्ये मार्शल लॉ चा कब्जा.
  • १९८९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे आतंकवाद्यांनी अपहरण करून ५ आतंकवाद्यांना सोडून घेतले होते.
  • १९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९६: कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बनले होते.
  • २००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.
  • २००१: आजच्या दिवशीच दिल्लीच्या संसद भवनावर अतिरेक्यांचा हल्ला.
  • २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
  • २००३: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना त्यांच्या घरून अटक.
  • २००४: अपहरण आणि नरसंहार यांचे ९ आरोप चिली च्या माजी राष्ट्रपती वर लाऊन त्यांना घरामध्ये नजरबंद ठेवल्या गेले.
  • २०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
  • २०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७८०: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १८४९)
  • १८०४: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)
  • १८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)
  • १८९९: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer), ’हंस पिक्चर्स’ चे एक भागीदार. ’छाया’, ’धर्मवीर’, ’प्रेमवीर (१९३७)’, ’ज्वाला (१९३८)’, ’ब्रह्मचारी’, ’ब्रँडीची बाटली (१९३९)’, ’देवता’, ’सुखाचा शोध (१९३९)’, ’लग्न पहावं करुन (१९४०)’, ’अर्धांगी (१९४०)’, ’पहिला पाळणा’, ’भक्त दामाजी (१९४२)’, ’पैसा बोलतो आहे (१९४३)’, ’रामशास्त्री (१९४४)’, ’लाखारानी (१९४५)’, ’चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)
  • १९०३: प्रसिद्ध कादंबरीकार इलाचंद्र जोशी यांचा जन्म.
  • १९२५: प्रसिद्ध लेखक लक्ष्मी चंद्र जैन यांचा जन्म.
  • १९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)
  • १९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.
  • १९५५: मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री
  • १९६०: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपटांचे अभिनेते व्यंकटेश दग्गुबाती यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १०४८: ला फारसी विद्वान लेखक अलबेरूनी यांचे निधन.
  • १७८४: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)
  • १९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)
  • १९३०: फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)
  • १९६१: अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? १८६०)
  • १९८६: स्मिता पाटील – अभिनेत्री. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (जन्म: १७ आक्टोबर १९५५ – पुणे)
  • १९९४: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (जन्म: १७ आक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)
  • १९९६: श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार, (जन्म: ? ? ????)
  • २००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search