Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या जबलपूर – कोईमतूर ०२१९७/०२१९८ या गाडीला जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती मात्र आता तिला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५० सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १४:४० वाजता पोहोचेल.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती पण आता तिला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १७:०५ वाजता सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ट्रेन नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन ,नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरु जं., कासारगोड, कन्नूर, वडकोडे, तिरूर, शोरानूर जं. आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 24 कोच = फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
Facebook Comments Box
Vision Abroad