सिंधुदुर्ग: गोव्याच्या दिशेने जाणार्‍या ट्रकचा विचित्र अपघात

   Follow us on        

ओटवणे : कोल्हापूरहून बांदा-गोव्याच्या दिशेने लोखंडी प्लेट्स आणि स्टील ट्यूब्स घेऊन जाणारा एक कॅन्टर (MH 09 BA 9279) विलवडे तिठ्यावर पहाटे एका विचित्र अपघाताचा बळी ठरला. रस्त्यावरील मोठी चढण, खड्डे आणि क्षमतेपेक्षा जास्त भरलेला लोखंडी माल यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

​चढणीवर गाडी आवरताना कॅन्टरची पुढची दोन्ही चाके जमिनीपासून तब्बल १० ते १५ फूट हवेत उडाली. गाडी अशा विचित्र अवस्थेत हवेत लटकलेली पाहून परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने, मागच्या बाजूला असलेला जड माल जमिनीला टेकल्यामुळे गाडी मागे सरकली नाही किंवा उलटली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​या घटनेत चालक सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती, जी जेसीबीच्या मदतीने पूर्ववत करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी या धोकादायक चढणीची आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search