Author Archives: Kokanai Digital

सावंतवाडी तालुक्यातील पोस्टऑफिस मध्ये रेल्वे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी… .

Read full article by clicking on below link https://kokanai.in/2023/04/15/1-426/

Loading

कोंकण रेल्वे मार्गावर एलटीटी ते थिवीम विशेष गाडी उद्यापासून धावणार

Konkan Railway News: एप्रिल महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने एलटीटी ते थिवीम दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

1) Train no. 01185 / 01186 Lokmanya Tilak (T) – Thivim – Lokmanya Tilak (T) Special

Train no. 01185 Lokmanya Tilak (T) – Thivim Special 

दिनांक १५/०४/२०२३ ते २९/०४/२०२३ दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार,बुधवार आणि शनिवार या दिवशीं ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि सकाळी ११:३० वाजता थिवीम या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01186  Thivim – Lokmanya Tilak (T) Special 
दिनांक १६/०४/२०२३ ते ३०/०४/२०२३ दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार,गुरुवार आणि रविवार या दिवशीं ही गाडी थिवीम स्थानकावरुन संध्याकाळी १६:०४ वाजता सुटेल आणि पहाटे ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची संरचना

एसएलआर – 02  + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण 21 डबे

आरक्षण
या गाड्यांचे आरक्षण आज दिनांक १४ एप्रिल २०२३ पासून रेल्वेच्या सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत.
T. No. 01185 Station Name T. No. 01186
22:15 LOKMANYATILAK T 04:05
22:37 THANE 03:00
23:30 PANVEL 02:15
01:05 ROHA 01:00
01:30 MANGAON 23:30
02:30 KHED 22:08
02:54 CHIPLUN 21:40
03:08 SAVARDA 21:10
03:30 SANGMESHWAR 20:48
05:00 RATNAGIRI 20:00
05:40 ADAVALI 19:18
06:40 RAJAPUR ROAD 18:44
07:16 VAIBHAVWADI RD 18:28
08:10 KANKAVALI 18:00
08:38 SINDHUDURG 17:42
08:50 KUDAL 17:30
09:35 SAWANTWADI ROAD 17:08
11:30 THIVIM 16:40






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांना दिले जाणार एचएचटी मशिन; वेटिंग लिस्ट प्रवाशांना होणार फायदा

Konkan Railway News:कोकण रेल्वेने ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच गाड्यांमधील तिकीट पर्यवेक्षकांना एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिन देण्यात येणार असल्याची माहिती कोकणरेल्वेने दिली आहे. याआधी मंगलोर, कन्याकुमारी, नेत्रावती, राजधानी एक्स्प्रेस, दुरोतो, एर्नाकुलम या गाड्यांसाठी ही सुविधा वापरली  जात होती. 
कोकण रेल्वेतील  तिकीट परीक्षकांना (टीटीई) कागदावर छापलेला आरक्षण तक्ता बाळगावा लागणार नाही. आरक्षण स्थिती तपासण्यासाठी आणि पुढील आरक्षण स्थितीची माहिती देण्यासाठी, तिकीट तपासण्यासाठी आणि सीट वाटप करण्यासाठी आता कागदी तक्त्याची गरज भासणार नाही. या मशिन रेल्वे सर्व्हरशी जोडल्या जाणार आहेत. ज्यामध्ये एक 4G सिम कार्ड असणार आहे. याद्वारे तिकीट, सीट संदर्भातील प्रत्येक अपडेट कळण्यास मदत होणार आहे.
एचएचटी उपकरण हे रेल्वे प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. एचएचटी उपकरणात फक्त एका क्लिक वर किती रिकाम्या सीट आहेत याची माहिती होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीच्या आणि RAC च्या प्रवाशांना तिथे सीट मिळणे शक्य होणार आहे. 
एचएचटी (हॅन्ड हेल्ड टर्मिनल) मशिनची वैशिष्ट्ये
  • रेल्वे सुटल्यानंतर, कोणतेही तिकीट रद्द झाल्यास, पर्यवेक्षकांना माहिती मिळेल.
  • रेल्वे सर्व्हरशी मशिन कनेक्ट असेल.
  • प्रतीक्षा करणाऱ्यांना सीट रिकामी असेल तर मिळेल.
  • सीट वाटपात पारदर्शकता निर्माण होईल.
  • रेल्वेतील पाणी, वीज, अस्वच्छता, बेडरोल, स्वच्छतागृह, आजारी रुग्ण यासंबंधित माहिती नोंदवली जाणार.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

Loading

गुहागर समुद्र किनारी रंगणार ”सर्फ फिशिंग” स्पर्धा

रत्नागिरी– गुहागर समुद्र किनारी स्पोर्ट फिशिंग असोसिएशन, महाराष्ट्र तर्फे ”सर्फ फिशिंग” टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा गुहागर समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. या टूर्नामेंटला जिल्ह्याचे पालक मंत्री माननीय उदयजीं सामंत साहेब प्रमुख पाहुणे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ६.०० वा. होणार असून बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी ७.०० वा. होणार आहे.

सर्फ फिशिंग म्हणजे काय? 

सर्फ मासेमारी किनाऱ्यावर उभे राहून मासे पकडण्याचा किवा सर्फ मध्ये विहार करण्याचा खेळ आहे. सर्फ फिशिंग ही एक सामान्य संज्ञा आहे. आणि त्यात आमिष किवा आमिष टाकणे समाविष्ट असू शकते किवा नसू शकते. सर्व प्रकारच्या किनाऱ्यावरील मासेमारीचा संदर्भ देते. वालुकामय आणि खडकाळ किनारे, रॉक जेटी किवा अगदी मासेमारीच्या घाटांपासून अटी सर्फ कास्टिंग किवा बीच कास्टिंग किनाऱ्यावर किवा त्याच्या जवळ सर्फ मध्ये टाकून समुद्र किनाऱ्यावरून सर्फ करण्यासाठी विशेषतः खारट पाण्यामध्ये सर्फ मासेमारी केली जाते. सर्फ मच्छीमार सहसा १२ ते १६ फुट लांब मासेमारी रॉड वापरतात आणि लांब रॉडणे लांब अंतर टाकण्यासाठी कौशल्य आणि अनुभव आवश्यक असतो.

जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मध्ये सहभाग नोंदवावा तसेच जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुवर्णसंधीचा गुहागर किनारी फिशिंग स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य भेट द्या असे आव्हान पर्यटन व्यवसायिक महासंघ गुहागर तालुका अध्यक्ष श्री संतोष घुमे व उपाध्यक्ष श्री संजय भागवत यांनी केले आहे

Loading

मुंबई – गोवा महामार्गावरील हातीवले येथील टोलवसुली एका दिवसात बंद

रत्नागिरी| मुंबई – गोवा महामार्ग अपूर्ण असताना सरकारद्वारे पुन्हा पुन्हा या मार्गावर टोल वसुलीसाठी प्रयत्न केला जात आहे. दिनांक 11 एप्रिल 2023 ला सुद्धा राजापूर तालुक्यातील हातीवले टोलनाका सुरू करून टोल वसुली चालू झाली होती. महामार्ग अपूर्ण असताना टोल वसुली का असा प्रश्न प्रसारमाध्यमांतून पत्रकारांननी उठवला होता. पत्रकारांच्या दबावापुढे अखेर सरकारला नमावे लागले. मंगळवारी सुरू केला गेलेला राजापूर – हातिवले टोल नाका एका दिवसातच म्हणजे काल बुधवारी सायंकाळी बंद केला गेला. 

हातीवले येथील टोलवसुली पूर्णपणे थांबवण्यात आल्याची माहिती काल पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जोवर तेथील स्थानिकांचे समाधान होणार नाही तोपर्यंत तेथील टोल वसुली सुरू केली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

 कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटीच्या व्यवस्थापनाखाली हातीवले येथील टोल नाका मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आला होता. मात्र मुंबई गोवा हाय-वे चे काम अपूर्ण अवस्थेत असतानाही हा टोलनाका सुरू करण्यात आला. याला पत्रकारांनी प्रसारमाध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. येथील स्थानिकांचा विरोधही होता, या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सावंत यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

.

Loading

काजूला 160 रुपये प्रति किलो हमीभाव द्यावा; अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

मुंबई : काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी ला योग्य दर मिळत नाही आहे. लॉकडाऊन च्या आधी 150 रुपये किलो असा काजूला भाव होता. लॉकडाऊन नंतर तो उतरुन 90 रुपये किलो असा झाला. पण त्यानंतर हा भाव 150 च्या आसपास गेला नाही. यंदा सुरुवातीला 135 रुपये किलो असलेला भाव दिवसेंदिवस उतरून 100 रुपये किलो वर येवुन ठेपला आहे. बाजारातील व्यापारी हा भाव पडताना दिसत आहेत. काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार पुढे सरसावले आहेत. कच्च्या काजूला किमान 160 रुपये प्रति किलो भाव द्यावा अशी मागणी त्यांनी पत्राव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.  

त्यांनी या पत्रात म्हटले आहे, तळ कोकणातील बहुतांश शेतकरी काजू उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजू बीचे दर सुमारे 25 ते 30 टक्के खाली घसरले आहेत. काजू गराचे दर वाढत असताना काजू बी चे दर कमी होत आहेत. गेल्या वर्षी मिळालेला 135 ते 140 रुपयांचा दर या वर्षी 100 ते 105 रुपयांवर आला आहे. काजू बी खरेदीचे व्यापाऱ्यांचे धोरण हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. वातावरणातील बदल, मजुरीचे वाढलेले दर, खतांचे वाढलेले दर, कीड रोगासाठी करावा लागणारा खर्च, वन्य प्राण्यांसह आग व चोरांपासून होणारे नुकसान ही आव्हाने पेलत काजू उत्पादक काजूचे उत्पादन घेत असतात. परंतु, मनमानीपणे काजू बी चे दर व्यापारी पाडत असल्यामुळे काजू उत्पादकांना उत्पानाची शाश्वती देण्यासाठी सरकारने 160 रुपयांचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी कोकणतील काजू उत्पादक शेतकऱ्यांची आहे. तरी शासनाने काजू उत्पादकांचे शोष थांबवण्यासाठी तातडीने काजू बी साठी हमीभाव जाहीर करावा अशी मागणी पत्राव्दारे करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी च्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना आज भेटून याबद्दल लक्ष वेधले होते. त्यांच्या भेटीनंतर ताबडतोब अजित पवार यांनी हे पत्र लिहिले आहे.

Loading

सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक विस्टाडोम कोच

Konkan Railway News: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-मडगाव तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.
कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. या बदलानंतरतेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.
मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.
व्हिस्टाडोम कोचमध्ये एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट आणि पुशबॅक खुर्च्या, जीपीएस आधारित माहिती प्रणाली, विद्युतीयरित्या चालणारे स्वयंचलित स्लाइडिंग कंपार्टमेंट दरवाजे, विशेष दिव्यांगांसाठी रुंद बाजूचे सरकते दरवाजे आणि सिरेमिक टाइल फ्लोअरिंग असलेली शौचालये हि वैशिष्ट्ये आहेत. तीन बाजूंना मोठ्या काचेच्या खिडक्या असलेली व्ह्यूइंग गॅलरी हे या डब्यांचे सर्वात मोठे आकर्षण आहे, रेल्वे अधिकार्‍यांच्या मते, आणि प्रवाशांना त्यातून छायाचित्रे आणि सेल्फी काढणे आवडते.

Loading

मुंबई – गोवा महामार्गाचे काम अपुरे असताना NHAI ला टोल वसुलीची घाई

रत्नागिरी | विजय सावंत : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बॉर्डरवरील हातिवले येथील टोलनाका आजपासून सुरू करण्यात आला आहे. सकाळ सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी टोलवसुली सुरू झाली असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.

या टप्प्यातील जवळपास 98.02 टक्के काम पूर्ण झाल्याने हा टोल नाका सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे असे NHAI म्हणने आहे. कोल्हापूर नॅशनल हायवे अथॉरिटी इंडिया या व्यवस्थापनाखाली राजापूर हातिवले येथील टोल नाका सुरू होणार आहे.या टोलनाक्यावर कारसाठी वन वे 90 रुपये भरावे लागतील. तर ट्रक बससाठी 295 रुपये आकारले जात आहेत.

याआधी पण येथील टोल नाका सुरू करून टोल वसुली चालू केली होती. मात्र स्थानिकांचा त्याला मोठा विरोध झाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी या ठिकाणी आंदोलन केले होते. त्यामुळे येथील टोल वसुली बंद करण्यात आली होती.

महामार्गावर अनेक ठिकाणी कामे चालू आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळे येत आहेत. या ठिकाणावरून गाड्या खूप कमी वेगाने आणि सांभाळून चालवाव्या लागत आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी अनेक बाबीत कमतरता असल्याने अपघात होत आहेत. आमचा टोल वसुली करिता विरोध नाही पण महामार्गाचे काम अपूर्ण असताना आणि फक्त काही भागाचे काम पूर्ण झाले असा दावा करून टोल वसुली करणे पूर्णपणे चुकीचे आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एकीकडे या महामार्गाला 12 वर्ष रखडवून येथील जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिला; त्यात भर म्हणुन या अपुऱ्या महामार्गावर टोल वसुली करून प्रशासन त्यांचा रोष ओढवून घेणार आहे. 

Loading

सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, ‘ही’ परीक्षा उद्याच..मुंबई विद्यापीठाचे आवाहन

मुंबई – आजकाल समाज माध्यमांतून अफवा पसरवणे हे नेहमीचे झाले आहे. काही लोक फक्त मजा किंवा निव्वळ टाईमपास म्हणुन काही पोस्ट बनवून त्या सोशल मीडिया वर पसरवत असतात. या अफवांवर विश्वास ठेवून समाजातील इतर घटकांचे खूप नुकसान होते.

मागे एकदा बारावीची परीक्षा देणारे काही विद्यार्थी एका पेपरला परीक्षा केंद्रात हजेर राहू शकले नाहीत. कारण कोणीतरी परीक्षेचे चुकीचे वेळापत्रक व्हायरल केले होते. त्या वेळापत्रकावर

विश्वास ठेवल्याने त्यांचा पेपर हुकला आणि नुकसान झाले. असाच प्रकार आता मुंबई विद्यापीठाच्या उद्या होणार्‍या T.Y. B.A या परीक्षेच्या बाबतीत घडला आहे. उद्या होणारी परीक्षा पुढच्या कोणत्या तरी तारखेला होणार आहे अशा आशयाचे मेसेज सोशल मीडिया वर पसरविण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या हे लक्षात येताच त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून ते प्रसिद्ध केले आहे.T.Y. B.A (Semester VI) ची परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रका प्रमाणेच होणार असून सोशल मीडिया वरील अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Loading

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी बसविण्यात येत आहेत ‘स्पीड गन कॅमेरे’


संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाने गाडी ड्राईव्ह करताना महामार्गाच्या बाजूला असलेल्या फलकांवर दिलेल्या वेगमर्यादेचे पालन न केल्यास तुम्ही आता तुम्ही सहज पकडले जाणार आहात. कारण या महामार्गावर आता स्पीड गन बसवण्यात येत आहेत.

सध्या खानु मठ दरम्यान येथे स्पीड गन कॅमेरा लावला आहे. या भागात 75 किलोमीटर पेक्षा अधिक वेगमर्यादा ओलांडून जाणाऱ्या वाहन चालकांकडून 2 हजार रुपये दंड आरटीओ कडून वसूल केले जात आहे. महामार्ग जसा जसा पूर्ण होईल तसे अपघातप्रवण क्षेत्रात असे अजुन स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

वेगाने गाड्या चालवून होणारे अपघात टाळण्यासाठी स्पीड गन कॅमेरे बसविण्यात येतात. या गन वाहनाची दिशा, वेग, कोणत्या लेनने वाहन मार्गस्थ झाले, कॅमेरा कुठे लावला आहे, तारीख, वेळ आदी सर्व माहिती देतात. त्यामुळे आरटीओ कर्मचार्‍यांना कारवाई करणे सोपे जाते. दंडाची पध्दतही ऑनलाईन असल्याने तो भरण्याशिवाय गत्यंतर नाही. दंडात्मक कारवाई होत असल्याने वाहनचालक वेगमर्यादेचे पालन करतात आणि अपघात कमी होतात.

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search