Author Archives: Kokanai Digital

मालवणात उद्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ; असा असेल नवीन पुतळा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, माजी मंत्रीआ णि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.

राजकोट किल्ल्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. शिवरायांच्याहा तातील तलवार २३ फुटांची असून चबुतऱ्याची उंची ३ मीटर असेल. पुतळा मजबूत करण्यासाठी ३.७० मीटरचा पाया तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून असून पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ९३ फुट असेल. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा अन् पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड काँक्रीट वापरण्यात येत असून, आयआयटी मुंबईकडून

पुतळ्याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. ताशी २०० किमी वाऱ्याच्या वेगातही पुतळ्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रान्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात असून राजकोट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचा पाया आणि चबुतरा बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

एलएचबी स्वरुपात धावलेल्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचे उद्घाटन

   Follow us on        

Konkan Railway : मत्स्यगंधा एक्सप्रेस काल 17 फेब्रुवारी रोजी नव्याने जोडण्यात आलेल्या LHB (लिंक हॉफमन बुश) डब्यांसह पहिल्यांदा चालविण्यात आली. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी LHB डब्यांमध्ये प्रवास करून या नवीन रेकचे उद्घाटन केले.

25 वर्षांपासून सुरू असलेल्या या ट्रेनला आता जुने डबे बदलून नवीन डबे बसवण्यात आले आहेत. अपग्रेड केलेल्या ट्रेनचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी झाले. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी LHB स्वरुपात चालविण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.

“मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील समस्यांवर प्रकाश टाकणारा धीरजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री सोमन्ना यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली. युनियनच्या मान्यतेने, जर्मन मॉडेलवर आधारित सुधारित मत्स्यगंधा ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेनमध्ये आता तात्काळ अपघाताचे संकेत दिले गेले आहेत आणि ते अधिक प्रवासी-अनुकूल आणि कमी गोंगाट करणारे डिझाइन केले आहे. याशिवाय, कोकण रेल्वे स्थानकासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून त्यात सुधारित पार्किंग आणि इतर सुविधांचा समावेश आहे. डिझाईन 1 मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रियेकडे जाईल. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार यशपाल सुवर्णा, रेल्वेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

१८ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 07:36:32 पर्यंत
  • करण-गर – 18:16:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 09:51:08 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:38
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 23:27:59
  • चंद्रास्त- 10:18:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • प्लूटो डे
महत्त्वाच्या घटना :
  • 1965: गांबियाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1998: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 2001: संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2002: नासाच्या मार्स ओडिसी स्पेस प्रोबने त्याच्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टमचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यास सुरुवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1486:’ योगी चैतन्य महाप्रभू’ –  यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1534)
  • 1745: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ  यांचा जन्म. (मृत्यू: 5 मार्च 1827)
  • 1823:  ‘रावबहादूर गोपाळ हरी देशमुख’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1892)
  • 1836: ‘रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्यायस्वामी विवेकानंदांचे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1886 – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • 1871:  ‘बॅ. विठ्ठलभाई पटेल’ – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑक्टोबर 1933)
  • 1883: ‘मदनलाल धिंग्रा’ – क्रांतिवीर  यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑगस्ट 1909)
  • 1898: ‘एन्झो फेरारी’ – फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1988)
  • 1911:  ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2000)
  • 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार  यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1976)
  • 1922:  ‘एरिक गेयरी’ – ग्रेनेडा देशाचे 1ले पंतप्रधान, ग्रेनेडियन शिक्षक आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1997)
  • 1926: ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 2010)
  • 1927: ‘मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी’ – संगीतकार  यांचा जन्म.
  • 1931: ‘टोनी मॉरिसन’ – अमेरिकन लेखक, – नोबेल, पुलित्झर पुरस्कार यांचा जन्म.  (मृत्यु: 5 ऑगस्ट 2019)
  • 1933: ‘नवाब बानू’ – अभिनेत्री  यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1294: ‘कुबलाई खान’ – मंगोल सम्राट यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1215)
  • 1405:  ‘तैमूरलंग’ – मंगोल सरदार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1336)
  • 1564: ‘मायकेल अँजेलो’ – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार  यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1475)
  • 1967: ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक  यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1904)
  • 1992: ‘नारायण श्रीधर बेन्द्रे’ – चित्रकार  यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1910)
  • 1994: ‘पंडित गोपीकृष्ण’ – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते  यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1935)
  • 2015:  ‘डी. रामनाडू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन.  (जन्म: 6 जून 1936)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: महाकुंभमेळा विशेष गाडीच्या डब्यांत वाढ

   Follow us on        

Konkan Railway: महाकुंभमेळ्यासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. ०११९२ / ०११९१  उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष या गाडीला स्लीपर श्रेणीचे २ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ होणार आहे. प्रवाशांनी या गाडीला दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे.

गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून  सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:००  वाजता  (बुधवार)  पोहोचेल.

गाडी क्र. ०११९१  तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून  गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.

ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.

या गाडीच्या डब्यांची सुधारित  रचना : एकूण 22 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 12 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.

…. शेवटी ‘तो’ चुकीच्या मराठीत लिहिलेला बॅनर बदलण्यात आला..

   Follow us on        

डोंबिवली: समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून आपला आवाज योग्य ठिकाणी पोहोचवून प्रशासनाकडून झालेल्या चुका सुधारता येतात हे डोंबिवली मध्ये एका नागरिकाने सिद्ध केले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यासाठी काम चालू असल्याच्या सुचनेचा बॅनर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आला होता. मात्र या बॅनर वर लिहिण्यात आलेली मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आली होती. त्यात बर्‍याच चुका होत्या.

ही गोष्ट अनुजा धाकरस नावाच्या महिलेने ‘एक्स’ माध्यमावर दिनांक १० फेब्रुवारी रोजीला पोस्ट करून मध्य रेल्वे आणि संबधित आस्थापनांना टॅग केले.

”हे कोणतं मराठी आहे??? रेल्वेमध्ये मराठी भाषिकांचा एवढा तुटवडा असावा का की २ ओळींची सूचना सुद्धा धड मराठीत लिहू शकत नाहीत?” अशा शब्दात ही पोस्ट करण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाने या प्रकारची दखल घेतली आणि दोन दिवसांतच या जागी चुका दुरुस्त केलेला बॅनर लावला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाचे बदल.

   Follow us on        

Ladki bahin Yojna: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त गरजवंत महिलांना पोहोचावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा तपशील खालीलप्रमाणे

● नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.

● दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई- केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार.

● या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

● अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे.

● अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाकड्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येईल.

१७ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 28:56:47 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-कौलव – 15:37:02 पर्यंत, तैतुल – 28:56:47 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 08:54:05 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:08
  • सूर्यास्त- 18:38
  • चन्द्र-राशि-कन्या – 18:03:39 पर्यंत
  • चंद्रोदय- 22:37:59
  • चंद्रास्त- 09:45:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • जागतिक पर्यटन लवचिकता दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1801: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि आरोन बर यांना समान मते मिळाली. प्रतिनिधी सभागृहाने जेफरसन यांना अध्यक्ष आणि बर यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले.
  • 1859: द ग्रेट अटलांटिक अँड पॅसिफिक टी कंपनी (ए अँड पी) ची स्थापना झाली.
  • 1949: इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून चैम वेझमन यांचा कार्यकाळ सुरू झाला.
  • 1959: प्रोजेक्ट व्हॅनगार्ड: व्हॅनगार्ड 2: ढगांच्या आवरणाचे वितरण मोजण्यासाठी पहिला हवामान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1965: प्रोजेक्ट रेंजर: अपोलो मोहिमेच्या तयारीसाठी चंद्राच्या मारे ट्रँक्विलिटाटिस प्रदेशाचे छायाचित्रण करण्यासाठी रेंजर 8 प्रोब त्याच्या मोहिमेवर निघाला.
  • 2008: कोसोव्होने सर्बियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1781: ‘रेने लेनेक’ – फ्रेंच डॉक्टर, स्टेथोस्कोपचे संशोधक  यांचा जन्म.  (मृत्यू : 13 ऑगस्ट 1826)
  • 1874: ‘थॉमस वॉटसन’ – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. चे अध्यक्ष  यांचा जन्म. (मृत्यू: 19 जून 1956)
  • 1880: ‘अल्वारो ओब्रेगन’ – मेक्सिको देशाचे 46वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 जुलै 1928)
  • 1886: ‘एरिक झेग्नर’ – सॅक्सनी देशाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 1949)
  • 1888: ‘ओटो स्टर्न’ – नोबेल पुरस्कार, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.  (मृत्यू : 17 ऑगस्ट 1969)
  • 1951: ‘जगदीश मोहंती’ – भारतीय लेखक आणि अनुवादक यांचा जन्म. (मृत्यू : 29 डिसेंबर 2013)
  • 1957 : ‘प्रफुल्ल पटेल’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1963: ‘जेन-ह्सून’ – हुआंगएनव्हीडिया चे सहसंस्थाक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1881: ‘लहुजी राघोजी साळवे’ – क्रांतीवीर, समाजसेवक  यांचे निधन.
  • 1883: ‘वासुदेव बळवंत फडके’ – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे  क्रांतिकारक  यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1845)
  • 1978: ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक  यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1910)
  • 1986: ‘जे. कृष्णमूर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 मे 1895)
  • 1988:  ‘कापुरी ठाकूर’ – बिहारचे 11 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 24 जानेवारी 1924)
  • 2023: ‘अमृतपाल छोटू’ – भारतीय विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2023: ‘विजय किचलू’ – पद्मश्री, भारतीय शास्त्रीय गायक यांचे निधन.  (जन्म: 16 सप्टेंबर 1930)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर! संपूर्ण माहिती येथे पाहा

   Follow us on        
IPL 2025 Schedule :क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूंची आणि क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या 18 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
कधी होणार पहिला सामना? 
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी 23 मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं (एकाच दिवशी 2 सामने) आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने असतील, तर दुसरा सामना हा महामुकाबला असणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई असा असणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात एकूण 65 दिवसांत 74 सामने खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. केकेआर हा 3 जेतेपदे जिंकणारा तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. यंदा एकूण 13 ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने खेळवण्यात येणार आहेत.
दरम्यान यंदाच्या हंगामात एकूण 12 डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि गुजरात हे 4 संघ दुपारी प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. तर उर्वरित 6 संघ दुपारी प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहेत.
ग्रुप A – कोलकाता, बंगळुरु, राजस्थान, चेन्नई आणि पंजाब
ग्रुप B – मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनऊ आणि हैदराबाद
कधी होणार अंतिम सामना?
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर-1 20 मे रोजी आणि एलिमिनेटर 21 मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर-2 सामना 23 मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे.

 

नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदेभारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा

   Follow us on        
Konkan Railway: नागपूर -सिकंदराबाद  दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २०१०१ /२०१०२ नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या ही गाडी  वंदे भारत एक्सप्रेसच्या २० डब्यांचा रेकसहित चालविण्यात येत आहे. मात्र त्याप्रमाणात प्रवासी संख्या नसल्याने ही गाडी ८ डब्यांच्या रेकसह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे  करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे विकास समितीच्या वतीने जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे ई-मेल द्वारे ही मागणी केली आहे. तर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने ‘एक्स’ माध्यमातून ही मागणी नोंदवली आहे.
मुंबई मडगाव दम्यान सुरु करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. देशातील आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस च्या यादीत या गाडीची गणना होत आहे. या गाडीची आरक्षण स्थिती नेहमीच फुल्ल आणि प्रतीक्षा यादीत असते कारण ही  गाडी ८ रेकसह चालविण्यात येते. या मात्र गाडीची या मार्गावरील लोकप्रियता आणि गरज पाहता ही गाडी जास्त डब्यांसह चालविणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस  १६ किंवा २० रेकसह चालविण्यात यावी अशी  मागणी होत आहे.

कोकण रेल्वेच्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण; आता थेट सेवा मिळणार

RORO Service on Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे देण्यात येत असलेल्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १९९९ रोजी ही सेवा सुरु करण्यात आली  होती. कोलाड -वेर्णा-  सुरतकल दरम्यान ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या विपणन आणि संचालनासाठी मेसर्स अंजना ट्रेड आणि एजन्सीला दिलेला आऊटसोर्सिंग करार १४/०२/२०२५ रोजी संपुष्टात आला असल्याने आता ट्रक वाहतूक व्यायसायिकांनी  थेट कोकण रेल्वे च्या कोलाड आणि सुरथकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सुविधा म्हणजे दूसरे तिसरे कांही नसून रेल्वेच्या ओपन फ्लॕट वॕगन्सवर (ज्याला रेल्वेत BNR वॕगन्स म्हणतात) मालाने भरलेल्या ट्रक्सची रोड ऐवजी मालगाडीवरून एका गावापासून दूस-या गावी केलेली वाहतूक होय. या सेवा मुंबई(कोलाड)-गोवा(वेर्णा) अशी ४१७ किमी तर मुंबई(कोलाड)-सूरतकल(कर्नाटक) 721 किमी या मार्गावर सुरू आहे. वरील अंतर रोडमार्गे अनुक्रमे २४ तास व ४० तास घेते. पण RORO मुळे ते अंतर अनुक्रमे १२ ते २२ तासात कापले जाते.

रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेचे फायदे 

या योजनेमुळे केन्द्र सरकारच्या ‘Operation Green’ ला चांगलाच फायदा होत आहे. डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होते  व सरकारचे इम्पोर्ट बिलही कमी होते  त्यामुळे देशातून डाॕलर्सचा बाहेर जाणारा प्रवाह थांबतो. जलद वाहतूक झाल्याने वेळेचा अपव्यय टळतो. रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होते आणि प्रदूषणही कमी  होते. ट्रक चालकांना लांबच्या ड्रायविंगचा त्रास व होणारा टोल, आदिचा खर्चही वाचतो. ट्रकच्या टायर व इंजनचा वापर कमी झाल्याने त्याचा घसारा कमी होतो .अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या सेवेमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडली आहे.

या सेवेचे दर खालीलप्रमाणे

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search