
Vision Abroad

Vision Abroad
काँग्रेस अध्यक्ष निवडणूक :काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,385 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली.
तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम सीताराम केसरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं आहे.
नाव | सन | |
1 | पट्टाभी सीतारामय्या | 1948-1949 |
2 | पुरुषोत्तम दास टंडन | 1950 |
3 | इंदिरा गांधी | 1959, 1966-67, 1978-84 |
4 | नीलम संजीव रेड्डी | 1960-1963 |
5 | के कामराज | 1964-1967 |
6 | एस सिद्धवनल्ली निजलिंगप्पा | 1968-1969 |
7 | जगजीवन राम | 1970-1971 |
8 | शंकरदयाल शर्मा | 1972-1974 |
9 | देवकांत बरुआ | 1975-1977 |
10 | पी.व्ही. नरसिंह राव | 1992-96 |
11 | सीताराम केसरी | 1996-1998 |
12 | सोनिया गांधी | 1998-2017 आणि 2019 |
13 | राहुल गांधी | 2017-2019 |
स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या अध्यक्षांची यादी
सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.
काय म्हणाले होते भास्कर जाधव?
नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.
Vision Abroad
रत्नागिरी : खास दिवाळीसाठी या आधी काही विशेष गाड्या कोकण रेल्वेमार्गावर सोडल्या आहेत. आता प्रवासी संख्या वाढल्याने कोकण रेल्वे मार्गे धावणार्या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेमार्गे धावणार्या हापा -मडगाव (22908/22907) तसेच पोरबंदर कोचुवेली (20910/20909) या दोन नियमित एक्स्प्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे. यातील हापा-मडगाव गाडीला दि. 19 ऑक्टोबरच्या फेरीपासून तर पोरबंदर – कोचुवेली या गाडीच्या दि. 20 ऑक्टोबर 2022 पासून अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
दसर्या दिवाळीपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांव्यतिरिक्त फेस्टीवल स्पेशल गाड्यांच्या फेर्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर, सुरत, उधना तसेच मुंबईतून देखील कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी रेल्वेच्या अतिरिक्त गाड्या करण्यात आल्या आहे.
Vision Abroad
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात एकूण चार ग्रामपंचायतीचे निकाल आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात भाजपने जोर लावल्याचे दिसून आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील. झरे दोन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपा पक्षाच्या श्रुती विठ्ठल देसाई तर पाटये पूर्नवसन येथे भाजपचे प्रविण पांडुरंग गवस सरपंचपदी विजयी झाले आहेत. भाजपने दोन्ही ग्रामपंचायतवर झेंडा फडकवल्यानंतर जल्लोष केला.
देवगड तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत वर भाजप झेंडा फडकवला आहे. पडवणे ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने झेंडा फडकविला आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिल्ह्यात आमदार मंत्री असताना एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही.
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे
Vision Abroad
तामिळनाडू : दिवाळी आली की नोकरदार वर्गाला उत्सुकता असते ती बोनसची. दिवाळीत एक किंवा दीड अतिरिक्त पगार बहुतेक ठिकाणी दिला जातो. पण काही मालक एवढे दिलदार असतात की ते ह्यापुढे जाऊन आपल्या कर्मचार्यांना खुश करारात. अशाच एका मालकाने या वर्षाच्या दिवाळीला आपल्या कर्मचार्यांना चक्क कार आणि बाईक बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.
तामिळनाडू येथील या जयंती लाल चयांति या ज्वेलरी शॉप मालकाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्याने 20 मोटर बाईक्स आणि 10 कार खरेदी केल्या आहेत. ह्या सर्वाचा खर्च 1 कोटी पेक्षा जास्त होणार आहे.
“ह्या सर्व कर्मचार्यांनी मला माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेत साथ दिली आहे. ह्या भेटीने त्यांना प्रोत्साहन भेटेल” असे जयंती यांचे म्हणने आहे.
मुंबई :अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून राज ठाकरेंनी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घ्यावा, भाजपनं निवडणूक लढवू नये, असं आवाहन केलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र आवाहन राज ठाकरेंनी ट्वीट केलं आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
गोवा : राज्य सरकारने बिअर वरच्या उत्पादन शुल्क करामध्ये (Excise Duty) वाढ करायचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात बिअर च्या किमती वाढणार आहेत. हि वाढ प्रति बल्क लिटर मागे १० ते १२ रुपये असेल. इतर मद्यावरच्या उत्पादन शुल्कात सध्यातरी कोणताही बदल करण्यात येणार नाही असे सरकारने म्हंटले आहे.
गोवा हे एक पर्यटन राज्य म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पूर्ण जगभरातून पर्यटक येतात. पर्यटनाला चालना देण्याचा एक भाग म्हणून गोवा सरकारने राज्यात मद्यावर इतर राज्यापेक्षा कमीत कमी कर लावले आहेत त्यामुळे इथे मद्य जवळ जवळ ५०% कमी किंमतीत भेटते.
पण ह्या सर्वच फायदा सीमेलगत राज्यातील काही तस्कर घेत असल्याचे प्रकार वाढत चालले होते. हल्लीच महाराष्ट्राच्या नवीन सरकारने अशा तस्करीला आळा घालण्यासाठी अशा तस्करांना कडक कारवाई करण्यासाठी ‘मोक्का’ या कायद्यानुसार कारवाई करता येईल यासंबधी विचार करत असल्याचे जाहीर केले होते. महाराष्ट्र सरकारच्या हा निर्णयाच्या धर्तीवर गोवा सरकार किंमतील फरक कमी करण्यासाठी पाऊले उचलत आहे.
ह्याआधी नॉर्मल बिअर जिला ३० रुपये उत्पादन शुल्क कर होता तो आता ४२ रुपये प्रति बल्क लिटर झाला आहे. स्ट्रॉग बिअर चा उप्तादन शुल्क आता ६० रुपये करण्यात आले आहे, ह्या आधी हे शुल्क ५० रुपये एवढे होते.
मुंबई :कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये आवश्यकते बदल करण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
सीट बेल्ट बांधणे टाळून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर १ नोव्हेंबर २०२२ पासीन मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ १९४(ब)(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Vision Abroad
Content Protected! Please Share it instead.