रत्नागिरी:राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खुनातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचे तो वापरात असलेल्या मोबाईल सेवा कंपनीकडे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा कोणा कोणाशी संपर्क होते त्याचा उलगडा होणार आहे.
वारीसे यांचा खून हा पूर्वनियोजित व प्लॅन करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार घटनेच्या दिवशी पंढरीनाथ हा कुणाकुणाच्या संपर्कात होता. याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच या आरोपीच्या संपर्कात मोठे नेते आणि अधिकारी असल्याचे आरोप पण होत आहेत. पंढरीनाथ याच्या कॉल डिटेल्स मुळे पोलिसांना आरोपी सोबत या खुनात कोण कोण सामील आहेत याचा तपास लावणे सोपे होईल.
दरम्यान आरोपी पंढरीनाथ यानेही खुनाची कबुली पोलिसांजवळ दिली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अखेर पोलिसांकडून पंढरीनाथ याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभववाडी : येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
महेश अनिल गावडे रा. फलटण, जि. सातारा असे त्या मयत तरुणाचे नाव आहे.
मी माझ्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे. असे चिठ्ठीत लिहून ठेवले
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, पोलीस अभिजित मोरे, सुरज पाटील आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तरुणाचा मृतदेह पोलीसानी शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे.
अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.
13-02-2023 12:00 AM
इंडियन आयडॉल च्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा कणकवली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याद्वारे आयोजित
कणकवली:छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली भाजप ऑफिस समोरील कणकवली पर्यटन महोत्सव च्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
या निमित्ताने इंडियन आयडॉल च्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी होणार आहे.
यासोबत १९ ते २१ फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी सूक्ष्म, लघु व मध्यम या केंद्रीय उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजनांचे स्टॉ ल देखील लावले
जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवलेजात असून या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे…
मुंबई : लोकमान्य टिळक स्टेशन येथील ७ नंबरच्या रेल्वे वॉशिंग पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी मध्यरेल्वे एक ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ दरम्यान ३५ दिवसांसाठी असेल. या ब्लॉक मुळे कोंकणरेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या पनवेल पर्यंत चालविण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
16346 – तिरुअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावर संपेल.
16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१२:४५) सुरू होईल.
12620 – मंगळूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ पनवेल स्थानकावर संपेल.
12619 –लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१६:२२) सुरू होईल.
KR News 12/02/23 2:45 PM : :दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकणरेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगला एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडून तिला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
सध्या हातात आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
KR News 12/02/23 1:10 PM : दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्याने २ तासापासून गाडी उभी आहे त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या अन्य गाड्याच्या वेळापत्रकावर परिमाण झाला आहे. नवीन इंजिन आणून वाहतुक पूर्ववत करण्यासाठी कोंकण रेल्वेचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
सध्या हातात आलेल्या माहितीनुसार मडगावच्या दिशेने जाणाऱ्या खालील गाड्या उशिराने धावत आहेत… 10103 – मांडवी एक्सप्रेस – करंजाडी येथे आहे 10105 – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस – अंजनी स्थानकावर उभी आहे
दिल्ली : राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते.
अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज एकूण 13 नवीन राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
दरम्यान, रमेश बैस हे राज्याचे नवे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. रमेश बैस हे सात वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगढचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता, अशी त्यांची ओळख आहे.
रत्नागिरी: शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान डिझेलची तस्करी करणारी बाेट सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून हर्णै- गुहागर दरम्यानच्या समुद्रात पकडली.आयएनडी/एमएच/७/एमएम/२८५१ (साेन्याची जेजुरी) असे कारवाई केलेल्या बाेटीचे नाव असून, बाेटीच्या मालकाचे नाव कळू शकलेले नाही. या बाेटीवरून सुमारे २४ हजार रुपयांचा डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे
मागील महिन्यात दिवसांत ५० मेट्रिक टन डिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरीतील सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला हाेता. हर्णै-गुहागर समुद्रात ४/५ नाॅटीकल माईलमध्ये दुपारी १:३० वाजता डिझेल भरून नेणारी बाेट अधिकाऱ्यांना दिसली. या बाेटीत तस्करीचे डिझेल असल्याच्या संशयावरून ही बाेट पकडून दाभोळ बंदरामध्ये आणण्यात आली.
या बाेटीची तपासणी केली असता बाेटीवर चार खलाशी असल्याचे पुढे आले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता रात्री समुद्रात माेठ्या व्हेसलमधून डिझेल बाेटीत उतरून घेतल्याचे सांगितले. बाेटीची तपासणी केली असता बाेटीमध्ये एकूण १७ वेगवेगळे भाग आहेत. त्यातील दाेन भाग रिकामे असून, उर्वरित १५ भागांमध्ये डिझेलचा साठा सापडला. हा साठा सुमारे २४ हजारांचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही बाेट नेमकी काेठून आली याचा तपास सुरू आहे. रत्नागिरी सीमा शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अमित नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील सभेत तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला.
याप्रकरणी सखोल चौकशी होऊन खऱ्या सूत्रधारांचा छडा लागेपर्यंत आम्ही आवाज उठविणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. प्रकल्प परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या असून त्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा राऊत यांनी दिला.कोकणात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश नाईक आणि आता वारिसे यांची हत्या झाली. सरकार बदलताच कोकणात हत्येचे सत्र सुरू झाले असल्याचा आरोप करून राऊत म्हणाले, आरोपींनी आतापर्यंत किती सुपाऱ्या घेतल्या, कोणाच्या हत्या केल्या, याचा शोध घेतला पाहिजे. वारिसे काही नेत्यांच्या डोळय़ांत खुपत होते. त्यांना आधीही धमक्या आल्या होत्या. वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीमागील खरे सूत्रधार कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या आसपास ज्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या, त्यांची माहिती देण्यास वारिसे यांनी सुरुवात केली होती. प्रकल्प समर्थक, सरकारमधील काही व्यक्तीआणि रत्नागिरीतील काही राजकारणी यांचे जमिनी लाटण्यात साटलोटे आहे. परप्रांतीयांबरोबर अब्जावधी रुपयांचे व्यवहार झाले असून जमिनी घेणाऱ्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा राऊत यांनी दिला.
रत्नागिरी : पत्रकार वारिसे यांच्या मृत्यूनंतर रिफायनरी विरोधकांकडून, पत्रकारांकडून आणि सामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रया देण्यात येत आहेत.. तळकोकणतील ‘रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे याच्या संतापाचा परखड भाषेतील एक विडिओ पण बराच व्हायरल होत आहे.
‘रानमाणूस’ म्हणतो >>>>>>>>>
तो मेला नाही! तो मारला गेला आहे! रिफायनरी विरोधी गावकर्यांचा आवाज बनलेल्या शशिकांत वारिसे या निर्भीड, सच्च्या पत्रकाराचा दिवसाढवळ्या खून झाला. माझं शांत, संयमी, सुखी आणि समाधानी कोंकण आता तसे राहिले नाही. देवाला, देवचाराला सत्याच्या रुपाला घाबरणारे लोक आता बदलेले आहेत. रानपाखरांसारखे जगण्याचे स्वातंत्र्य भोगणारे लोक आता घाबरून जगात आहेत कारण उकिरड्यावरची गिधाडे आता आमचा आसमंत बळकावू पाहत आहेत. आज वारिसे गेला, उद्या गावडे जाईल तर परवा परब.
तुम्ही लाईक, शेयर आणि कंमेंट करून मोकळे व्हा. विरोध करू नका आणि व्यक्त होऊ नका कारण इथल्या राखणदारालाही मारून टाकणारी नरभक्षकी जमात मोकाट फिरते आहे. सत्ता,संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हंटला तर डोकं फोडतील……. हलकट, लाचारांचा देश म्हंटला तर रस्त्यावर झोडतील…….. खरीदले जाणाऱ्यांच्या देश म्हंटला तर वाट रोखतील…….. देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोलले तर नाक्यावर गाठून ठोकतील…….. शोषण करणाऱ्यांचा देश म्हंटला तर नोकरीवरून कडून टाकतील……. म्हणून माझ्या प्यारे भाईयों और बेहेनों, माझ्याकडून या नपुसंकत्वाला सलाम…… सबको सलाम ………. सबको सलाम……….
मुंबई :पत्रकार वारीसे यांच्या मृत्यू नंतर अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत असताना अजून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पत्रकार उन्मेष गुजराथी यांनी पुराव्यानिशी ‘स्प्राऊट्स’ या इंग्रजी दैनिकात रत्नागिरीतील रिफायनरी संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली आहे.
या बातमीचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे
रत्नागिरी येथील विनाशकारी रिफायनरीच्या विरोधात स्थानिक जनतेमध्ये प्रक्षोभ आहे. या प्रक्षोभाला वाचा फुटू नये. म्हणून प्रसारमाध्यमांनाच ‘मॅनेज’ करण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक पत्रकारांना तर थेट जमिनीच आमिषापोटी दिलेल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आलेली आहे.*
‘टीव्ही ९ मराठी’चे स्थानिक पत्रकार मनोज लेले, ‘मुंबई आजतक’चे राकेश गुडेकर आणि ‘साम’चे अमोल कलये यांना पंढरीनाथ आंबेकर यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी अमिषापोटी दिल्या आहेत. यासंबंधीचा सातबारा उताराच ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीच्या हाती आलेला आहे.
या सातबारा / नमुना ८ अ मध्ये स्वतः प्रमुख आरोपी आंबेकरसुद्धा जमीन मालक असल्याचे दिसून येत आहे. आंबेकर हाच अशी जमिनी गिफ्ट देण्याचे प्रकार करायचा. या पत्रकारांना विविध कामांसाठी लागणारी प्रकल्पातील कंत्राटेसुद्धा मिळणार आहेत. याशिवाय प्रकल्पग्रस्त दाखला, नोकरी किंवा नुकसानभरपाई तर मिळेलच. स्मार्ट सिटीत घरसुद्धा हातात येणार आहे. हे सर्व फायदे समोर ठेवत रत्नागिरी परिसरातील बहुतांशी दैनिके, टीव्ही आणि सोशल मीडियाचे पत्रकार यांना आंबेकरने आपल्या बाजूने वळवले आहे. परिणामी सध्या वारिसे यांच्यासारखा एखाद दुसरा पत्रकार याला अपवाद ठरत होता.
पंढरीनाथ आंबेकर हा भूमाफिया आहे. रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार यांना दहशत दाखवण्याचे काम हा आंबेकर करीत असे. याच आंबेकर याने पत्रकार शशिकांत वारिसे याची अंगावर अवजड जीप घालून हत्या केली. सध्या हा प्रमुख आरोपी अटकेत आहे.
केवळ स्थानिकच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांत रिफायनरीसंदर्भात बातम्या येवू नये, याची काळजी रिफायनरीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर करत असतात. त्यासाठी या काही प्रमुख प्रसारमाध्यमांच्या मालक व संपादकांना ‘पाकिटे’ देण्याचे काम नागवेकर करीत असतात. जे पत्रकार ही आमिषे, धमक्या यांना भीक घालत नाहीत. त्यांना अगदी जीवे मारण्यातही येते, ही सर्व कामगिरी आरोपी पंढरीनाथ आंबेकर करीत असे. आरोपी आंबेकर हा नागवेकर यांचा उजवा हात मानला जात आहे. त्यामुळे वारिसे यांच्या हत्या प्रकरणात नागवेकर यांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
भीतीपोटी पत्रकारांनी नातेवाईकांच्या नावावर घेतल्या जमिनी ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेल्या कागदपत्रांमध्ये वरील पत्रकारांना आंबेकरने जमिनी दिल्याचे आढळून येते. काही पत्रकारांनी मात्र स्वतःच्या नावावर जमिनी न घेता नातेवाईकांच्या नावांवर जमिनी घेतल्याचे दिसून आले आहे. नाणार प्रकल्प जाहीर झाल्यापासून आंबेकर हा जमीन माफिया म्हणून समोर आला. त्याने गुजरात, राजस्थान, दिल्लीमधील लोकांनासुद्धा ‘स्थानिक शेतकरी’ दाखवून बेकायदेशीरपणे जमिनी विकलेल्या आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, मात्र ही चौकशी ‘मॅनेज’ होण्याची शक्यता अधिक आहे.