मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ धारक यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरकमोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय महावितरणकडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली.
रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरी राजापूरवासीयांच्या स्थानकावरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांची पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्याशी रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि समस्यांबाबत संदर्भात चर्चा करून एक निवेदन सादर केले.
त्यांना दिलेल्या निवेदनात राजापूर रेल्वेस्थानकासाठी खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
स्थानकात लिफ्ट सुरू करणे
जनशताब्दी तसेच गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस किंवा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूरचा थांबा देणे फलाट क्रमांक २ चे काम करून सुसज्ज करावे,
कोविड काळात बंद करण्यात आलेला तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यात वाढ करण्यात यावी
पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुरू करणे
राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर बस सेवा कायम सुरू ठेवावी,
स्टेशनबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावा
या समस्यांबाबत यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आले होते
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्गः मुंबई गोवा महामार्गावर आजची पहाट प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे. माणगाव येथे भीषण कार आणि ट्रक च्या धडकेने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास . कणकवली येथे खासगी बस उलटून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Mumbai Goa Highway News: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहेया अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,
ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कार जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला पाच पुरूषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झालेत. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
Konkan Railway News 18/01/2022 :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वे मध्यरेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसमटी ते मडगाव दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालवणार आहे.
Train No. 01471 Mumbai CSMT – Madgaon Jn. Special
ही विशेष गाडी मुंबई सीएसमटी येथून शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल ती मडगाव जंक्शन येथे दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.
पेण: २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई ठाणे ह्या शहरांतून पालीसाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा गाड्यांसाठी प्रवाशांनी आजच आपले आरक्षण निश्चित करण्याचे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी माघी गणेशोत्सवाला मोठी यात्रा भरत असते. त्यातच यंदा २५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा होत असल्याने दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने या यावर्षी दरवर्षी पेक्षा भक्तांची जास्त गर्दी अपेक्षित आहे. याचा विचार करून एसटी महामंडळाने दहा जादा गाड्या मुंबई-ठाणे ह्या शहरातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच दहा गाड्यांव्यातिरिक्त पेण आगारातील चार बसेस, रोहा आगारातील दोन बसेस, अलिबाग आगारातील दोन बसेस आणि कर्जत आगारातील दोन बसेस अशा एकुण आणखी दहा बसेस पाली बस स्थानकातून लोकल प्रवासासाठी सज्ज ठेवण्याचा निर्णय देखील एसटी महामंडळाने घेतला आहे.
जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर वापर करून घ्यावा आणि आपले आरक्षण लवकरात लवकर निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि msrtc च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे असे एसटी महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.
MSRTC NEWS :एसटी महामंडळात बसगाडय़ांवर वाहक म्हणून महिला असतानाच प्रथमच महिला चालक बसचे स्टेरिंग हातात घेणार आहेत. औरंगाबाद येथे मागील एक वर्षांपासून १६३ महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या मार्च अखेर हे प्रशिक्षण पूर्ण करून एप्रिल महिन्याच्या सुरवातीस महाराष्ट्राच्या रस्त्यावर प्रत्यक्ष महिला बसचालक एसटी बस चालवताना दिसतील असे महामंडळातर्फे सांगितले जात आहे.
तीन वर्षांपूर्वी महिला चालक ह्या पदाकरिता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून आदिवासी व दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया साधारण मार्च २०१९ मध्ये सुरू झाली. मात्र करोना निर्बंध, बेमुदत संपामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. त्यांचे बंद झालेले प्रशिक्षण गेल्यावर्षी मार्च मध्ये पुन्हा सुरु झाले होते.
मार्चअखेर प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईल, त्यानंतर त्यांची एक दिवसाची अंतिम चाचणी घेतली जाईल. उत्तीर्ण होणार्यांना बस चालविण्याची परवानगी मिळेल. नापास होणाऱ्यांना पुन्हा १० दिवसांचे प्रशिक्षण देऊन एक संधी दिली जाईल. त्यानंतरहि नापास होतील त्यांना इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल असे एसटी प्रशिक्षण विभागाचे वाहतूक निरीक्षक अनंत पवार म्हणाले आहेत.
रत्नागिरीः रत्नागिरी शहराजवळ शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत शेट्ये नगर येथील दुमजली घरावरील पहिल्या मजल्यावर असलेल्या घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे लागलेल्या आगीने मोठा आहाकार उडाला आहे. पहाटे पाच सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोटात कुटुंबातील पाच जण अडकले होते. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, दोन महिला घरातच अडकल्या आहेत. त्याना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत
अश्फाक काझी हे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या घराला आग लागली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जवळपास दोन किलोमीटरच्या परिसरात या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. अश्फाक काझी पहाटे पाचच्या सुमारा घरी आले व त्यांनी लाईट लावली. त्यानंतरच स्फोट झाल्याचे बोलले जात आहे
Mumbai Metro News:संध्याकाळी ऑफिस ते घर असा मेट्रो रेल्वेने प्रवाशांची उद्या मोठी गैरसोय होणार आहे. कारण उद्या संध्याकाळी 5:45 ते 7:30 दरम्यान मेट्रो सेवा बंद रहाणार आहे. काही ऑपरेशनल आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो बंद करण्यात येणार असल्याचं मुंबई मेट्रो प्रशासनाच्या वतीनं सांगितलं आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी यावेळी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही मेट्रोकडून करण्यात आलं आहे.
नेमक्या ऑफिसेस सुटण्याच्या वेळात मेट्रो बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.
SERVICE UPDATE | On 19th January 2023 (Thursday), metro services will not be available from 05:45 pm to 07:30 pm, due to operational and administrative reasons. Please plan your travel accordingly. Inconvenience is regretted.
रत्नागिरी:चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या लोककला महोत्सवाचा शुभारंभ सोहळा होणार आहे.
कोकणातील लोप लावत चाललेल्या सर्व प्रकारच्या लोककला, खाद्य संस्कृती आणि पर्यटन संस्कृतीचा जागर दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या अनुभवायला मिळणार आहे.
पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत चा लोककला आणि खाद्य संस्कृतीचा समावेश देखील या लोककला महोत्सवात असणार आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत लोककला महोत्सवाचे स्वागाध्यक्षपद तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून डॉ तानाजीराव चोरगे हे जबाबदारी सांभाळणार आहेत
पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोककला महोत्सवाला होणार सुरवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.