नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे करिता भरीव तरतूद केल्याची दिसत आहे. २०१३-१४ च्या तुलनेत रेल्वेला नऊ पट अधिक वाटप देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून देशात १०० नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली.
रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी करण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख रुपयांच्या तरतुदीमुळे रेल्वेचे पायाभूत प्रकल्प मार्गी लागतील, असं मत रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री आदित्य वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. वंदे भारत रेल्वेत अमुलाग्र बदल होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
या पुलामुळे समुद्र किनार्यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.
तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.
सिंधुदुर्ग: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिरपरिसरात मोबाईल नेटवर्क ची समस्या येत होती. ह्या परिसरात कोणत्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क पकडत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ह्या समस्येवर आता उपाय योजना करण्यात आली आहे.
या परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मालवण तालुक्या तील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. पंरतू, आंगणेवाडी परिसरात गेलीअनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल जत्रेच्या दरम्यान उपलब्ध राहणार आहेत.
या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.
सिंधुदुर्ग : एका मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोलीत आलेल्या व्यक्तिचा त्या मृतदेहासोबत दरीत पडून मृत्यू झाल्याची खळबळ माजवणारी घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कराड येथील एका विट व्यावसायिकाने एका व्यक्तीला दोन ते तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे परत करत नसल्यानं त्या व्यक्तीला व्यावसायिकाने एका मित्राच्या मदतीने मारहाण केली. या मारहाणी दरम्यान त्या व्यक्तिचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो व्यावसायिक आणि त्याचा मित्राने सरळ आंबोली गाठली आणि मृतदेह एका खोल दरीत टाकायचे ठरवले. पण तो मृतदेह दरीत टाकताना त्या व्यावसायिकाचा पाय घसरला आणि त्यात त्याचाही मृत्यू झाला. काल रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. व्यावसायिकचा मित्र आता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन्ही मृतदेह पण सापडले आहेत. मारहाणी दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमूळे न होता हार्ट अॅटॅक मुळे झाला असल्याचेही त्याने सांगितले. नेमकी घटना काय आहे ह्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) २०२२’ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे. आज दिनांक 31 जानेवारीपासून ऑनलाईन पध्दतीने हे अर्ज स्विकारले जातील. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे.
परीक्षेकरिता अर्जप्रक्रिया
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या वेबसाईटला क्लिक करून उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत आहे
प्रवेशपत्र डाऊनलोड
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 प्रवेशपत्र दिनांक १५/०२/२०२३ पासून डाउनलोड करू शकता
वेळापत्रक
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी Tait 2023 Exam दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो)
परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपध्दती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महत्त्वाचे
अर्ज भरताना परिक्षार्थीनी इयत्ता १० वी इयत्ता १२ वी, पदविका, पदवी इ. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच दिव्यांगत्य राखीव प्रवर्गाचे असल्यास त्याबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी.
स्कॅन केलेला अद्ययावत रंगीत फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी व स्व-हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे आवश्यक आहे. सदर परीक्षेस व पुढील कार्यवाहीसाठी उमेदवारांशी SMS, Email व्दारे संपर्क होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक व Email ID अचूक द्यावा.
ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही प्रमाणपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही. मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीस अधीन राहून उमेदवारांना परिक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषीत केला जाईल.
ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ प्रमाणपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारी रद्द केली जाईल.
सिंधदुर्ग :दिनांक 1 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग विमानतळावरून पहिल्यांदा राज्याबाहेरील विमानसेवेचा प्रारंभ होणार आहे. देशातील दोन महत्त्वाच्या शहरांसोबत सिंधुदुर्ग जोडला जाणार आहे. मुंबई- सिंधुदुर्ग-मुंबई ही सेवा देणार्या अलायन्स एअर या कंपनीतर्फे हैदराबाद-मैसूर-सिंधुदुर्ग-मैसूर- हैदराबाद या दुसर्या विमानसेवेचा प्रारंभ होत आहे.
सुरवातीला दर बुधवारी आणि रविवारी अशी आठवड्यातून दोन दिवस ही सेवा उपलब्ध असेल. या सेवेच्या प्रारंभाने सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्वेस हैद्राबाद आणि दक्षिणेस मैसूर या देशातील अत्यंत महत्वाच्या शहराशी विमानसेवेने जोडला जाणार आहे .अशी माहिती आयआरबी कंपनीच्या प्रसिद्ध विभागातून देण्यात आली.
वेळापत्रक
शहर
HYD -SDW
SDW – HYD
हैदराबाद
13:40 ⇓
21:55
म्हैसूर
16:00
19:30
सिंधुदुर्ग
17:30
18:00 ⇑
प्रवास मार्ग
प्रवास भाडे
सिंधुदुर्ग – हैदराबाद
4,613.00
हैदराबाद – सिंधुदुर्ग
6,158.00
प्रवास मार्ग
प्रवास भाडे
सिंधुदुर्ग – म्हैसूर
2,513.00
म्हैसूर – सिंधुदुर्ग
3,353.00
Note : The information given above is indicative.
कोकणातल्या प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे.
Konkan Railway News : आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्या भाविकां साठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोकणरेल्वेतर्फे सोडण्यात आलेल्या विशेष Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 31 जानेवारीपासून सकाळी रेल्वे च्या सर्व आरक्षण तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
या गाडीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून त्यासंबंधी बातमी वाचा.
Konkan Railway News : कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने फेब्रुवारी आणि मार्च या २ महिन्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावर एक आठवडी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिच्या विचित्र वेळापत्रकामुळे तिचा फायदा कोकणवासीयांना होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 7:40 वाजता सुटणार आहे. या गाडीची सावंतवाडी स्थानकावर येण्याची वेळ रात्री 01:52, कुडाळला 02:24 , सिंधुदुर्गला 02:36, कणकवलीला 02:52, रत्नागिरीला 05:55 तर संगमेश्वर या स्थानकावर पहाटेचा 06:50 असा आहे. या विचित्र वेळेला स्थानकावर पोहोचून गाडी पकडणे खूपच गैरसोईचे आहे. त्यामुळे तळकोकणातील प्रवाशांसाठी ती असून नसल्यासारखी आहे.
कोकणातील बहुतेक स्थानके मुख्य शहरापासून दूर आहेत. संध्याकाळी 7 नंतर एसटीची सेवा बंद होते. खाजगी वाहतुक दिवसा परवडत नाही तर रात्रीचे विचारूच नका. बहुतेक रस्ते निर्जन आणि जंगल भागातून जाणारे आहेत त्यामुळे अनेक समस्या येतात. रात्री जंगलातील प्राणी (खासकरून गवा रेडा) सर्रास रस्तावर येत असल्यामुळे या रस्त्यांतून रात्रीचा प्रवास करताना दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
याआधी असेच विचित्र वेळापत्रक आखून विशेष गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या विशेष गाड्या कोकणच्या प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत की दक्षिणेकडील प्रवाशांसाठी सोडल्या जात आहे असा प्रश्न कोकणातील प्रवाशांकडून विचारला जात आहे.
Mumbai-Goa Highway News | मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यामुळे आणि महामार्गावर होणाऱ्या दुय्यम कामामुळे येथे होणाऱ्या अपघातांस सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे माणगाव येथील लोणेरे येथील भीषण अपघातात बळी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी मुंबई गोवा जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दिनांक १९/०१/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रक समोरासमोर आढळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. जर महामार्ग वेळेत पूर्ण झाला असता तर हा अपघात टळला असता. या अपघातास पूर्णपणे सरकार जबाबदार आहे त्यामुळे सरकारतर्फे त्वरित नुकसान भापाई जाहीर करण्यात यावी अशी समितीची मागणी आहे.
कोकणातील जनतेसोबत दुजाभाव का?
चार दिवसापूर्वी तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील चौघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली होती . चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली होती .सदर घटना घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्वरित 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. ईतरांना मदत जाहिर होते तर कोकणाला का नाही? असा प्रश्न समितीने उपस्थित केला आहे.
कोकणाला आणि कोकणातील जनतेला नेहमीच दुय्यम स्थान देणार असाल तर आता कोकणकर शांत बसणार नाही .या अपघातात निधन झालेल्याना लवकरात लवकर मदत जाहिर करावी तसेच शिमग्यापूर्वी कामाला सुरुवात करून प्रवासासाठी प्रवासायोग्य महामार्ग करावा अन्यथा विविध संघटना,मंडळ आणि कोकणकर लवकरच मुंबईत आणि शिमग्यानंतर रस्त्यावर उतरून कोकणातील आजी माजी नेत्यांच्या नावे शिमगा करतील अशी चेतावणी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे देण्यात आली आहे.
खेड : खेड तालुक्यातील सत्विणगाव येथे लागलेल्या वणवा विझवण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर ग्रामस्थांनी हल्ला केला. या हल्ल्यात २ कर्मचारी जखमी झाले आहेत.याप्रकरणी २० संशयितांविरोधात पोलीस व वनविभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील सत्विणगाव येथील संरक्षित वनक्षेत्राच्या उत्तर दिशेच्या खाजगी मालकी क्षेत्रात वणवा लागल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. वनपाल खेड, वनरक्षक काडवली, वनरक्षक तळे, वनरक्षक खवटी व मौजे मोरवंडे चे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने वणवा विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यावेळी मौजे दाभिळ, बैकरवाडी खेड येथील २० ते २५ जण घटनास्थळी आले. त्यांना हा वणवा वन कर्मचाऱ्यांनी लावला असल्याचा गैरसमज झाला. त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.
निलेश फावरे (रा.दाभिळ, बैकरवाडी) व इतर २० जणांनी तळे वनरक्षक परमेश्वर नवनाथ डोईफोडे यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी केले. वनरक्षक काडवली अशोक अजिनाथ ढाकणे यांनाही मारहाण केली. त्यांनी वनक्षेत्राच्या हद्दीखुणामध्ये बदल केला. दरम्यान, जखमी परमेश्वर डोईफोडे यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयामध्ये दाखल केले आहे. या प्रकरणी संशयित आरोपी निलेश फावरे (रा . दाभिळ , बैकरवाडी), अरविंद फावरे (रा. दाभिळ, बैकरवाडी), धोंडु बैकर (रा . दाभिळ, बैकरवाडी) यांच्यासह २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.