Author Archives: Kokanai Digital

रविवारी दक्षिण रेल्वेचा ‘ब्लॉक’; कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांवर परिणाम

Konkan Railway News | दक्षिण रेल्वे काही अभियांत्रिकी कार्यासाठी येत्या रविवारी दिनांक २१/०५/२०२३ रोजी एक ब्लॉक घेणार आहे. या ब्लॉक चा परिणाम कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्यांवर होणार आहे. तो पुढील प्रमाणे
पूर्ण रद्द झालेल्या गाड्या 
  • Train no. 12202 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express ही गाडी २१/०५/२०२३ रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. 
  • Train no. 12201 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express ही गाडी २२/०५/२०२३ रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. 
अंशतः रद्द झालेल्या गाड्या
  • Train no. 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddinही गाडी २१/०५/२०२३ रोजी थ्रिसूर ते एर्नाकुलम या स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आलेली आहे. 
वेळापत्रकात बदल केलेल्या गाड्या
  • Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Express ही गाडी दिनांक २१/०५/२०२३ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल या स्थानकावरून आपल्या नियमित वेळापत्रकाच्या वेळेपेक्षा सुमारे  ३ तास उशिरा दुपारी १२:१५ वाजता सुटेल.
  • Train no. 20909 Kochuveli – Porbandar Express ही गाडी दिनांक २१/०५/२०२३ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल या स्थानकावरून आपल्या नियमित वेळापत्रकाच्या वेळेपेक्षा सुमारे 1 तास ३५ मिनिटे उशिरा दुपारी १२:४५ वाजता सुटेल.
[email-subscribers-form id=”2″]

तळकोकणात ‘बारसू-२’? दिल्लीतील मोठ्या उद्योगपतीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीची पाहणी….

सिंधुदुर्ग – दिनांक १५ मे सोमवारी एका मोठ्या उद्योगपतीने दोडामार्ग तालुक्यातील शिरवल या भागास भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केल्याने अनेक चर्चांना ऊत आले आहे. या उद्योगपती नाव समजले नसले तरी तो एक दिल्लीतील मोठा उद्योगपती असलयाचे समजते. सुमारे १० ते १२ गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर होता, तसेच  स्थानिक प्रशासनाने त्याला या दौऱ्यासाठी सुरक्षा दिल्याचे समजते. पण याबाबत कोणतीही बातमी किंवा माहिती प्रशासनतर्फे प्रसिद्धीसाठी दिली नाही आहे, त्यामुळे जनतेला अंधारात ठेवून काहीतरी शिजवले जात आहे असे तर्क लावण्यात येत आहेत.
 
तळकोकणातील दोडामार्ग तालुका गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. अलीकडेच गोवा – महाराष्ट्र सीमेवर नवीन विमानतळ झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जमिनींवर भूमाफियांची, परप्रांतीयांची वक्रदृष्टी पडली आहे. अलीकडेच या तालुकयातील काही जमिनीबाबत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्ववभूमीवर जमिनीचे अनेक गैरव्यवहार झाले होते. तसाच प्रकार येथे होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे .मोठ्या उद्योगपतींनी पण येथे रस दाखविला असल्याने येथे पण एक प्रकल्प येईल का असे तर्क लावले जात आहेत.  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

गणेशोत्सव २०२३ रेल्वे आरक्षण | ५ मिनिटात आरक्षण फुल्ल…

Konkan Railway News |गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे. परंतु रेल्वे गाड्यांचे आरक्षण अगदी काही मिनिटात फुल्ल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या पदरात निराशा पडत आहे. तर काही प्रवासी प्रतीक्षा यादीत तिकीट काढत आहेत; त्यामुळे प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० च्या घरात गेली आहे. तर काही गाड्यांची वेटिंग लिस्ट पण बंद होऊन Regret स्थिती दाखवत आहे.

कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस, मंगुळुरु एक्सप्रेस या गाड्यांच्या १५ सप्टेंबरची स्लीपर श्रेणीची कणकवली पर्यंतची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे. तर तुतारी, जनशताब्दी, एलटीटी-मडगाव या गाड्यांची आरक्षण प्रतीक्षा यादी २०० च्या वर गेली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे.

गावावरुन परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार आहे एक विशेष गाडी; एकूण ४ फेर्‍या…

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी  एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक लांब पल्ल्याची वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण ४ फेर्‍या होणार आहेत.

Train No. 06055 / 06056 Tambaram – Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):

Train No. 06055 /Tambaram – Jodhpur Jn. Superfast Special (Weekly):
दिनांक २५/०५/२०२३ आणि ०१/०६/२०२३ गुरुवारी ही गाडी ताम्बरम स्थानकावरुन दुपारी ०३:०० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता जोधपूर या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06056 /Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):
दिनांक २८/०५/२०२३ आणि ०४/०६/२०२३ रविवारी ही गाडी जोधपूर स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:१५ वाजता ताम्बरम या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, मडगाव
डब्यांची संरचना
फर्स्ट एसी – 01 + थ्री टायर एसी – 08  + इकॉनॉमी थ्री टायर एसी – 11 + जेनेरेटर व्हॅन  -02 असे मिळून एकूण 22LHB  डबे

हापूस आंब्याची आवक वाढली; दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. 

वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. 

मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे. 

 

 

कोकण रेल्वेमार्गावर लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार;आज चाचणी

Konkan Railway News : बहुप्रतिक्षित मुंबई – गोवा वंदे भारत रेल्वे लवकरच सुरु होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आज मंगळवारी या गाडीसाठी रुळांची चाचणी TRIAL घेतली जाणार आहे. ही गाडी चालू झाल्यावर मुंबई वरून सुटणारी ती चौथी गाडी ठरणार आहे. या आधी मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – गांधीनगर, मुंबई – साईनगर शिर्डी आणि मुंबई – सोलापूर या तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या मुंबईवरून सोडण्यात येणार आहे. 
मार्च महिन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आता भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी – मडगांव दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या नियोजन केले आहेत. वंदे भारत ट्रेनचे आज मंगळवारी (ता.१६) चाचणी घेण्यात येणार आहे. आज  सकाळी ५.३५ मिनिटांनी सीएसएमटीवरून सोळा डब्याची वंदे भारत ट्रेन मडगांवसाठी रवाना होणार आहे. या चाचणी दरम्यान रेल्वे बोर्डाचे आणि मध्य आणि कोकण रेल्वेचे अधिकारी उपस्थितीत असणार आहेत.
कोकण रेल्वेमार्गावर झालेल्या १००% विद्युतीकरणामुळे या मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस चालवणे शक्य होणार आहे. या प्रस्तावित गाडीमुळे मुंबई गोवा या  दरम्यान वाहतुकीचा एक जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. ही गाडी काही महत्वाचे आणि मोजकेच थांबे घेणार आहे. रुळांची चाचणी यशस्वी झाल्यावर इतरही तांत्रिक बाजू तपासून ही गाडी लवकरच सुरु करण्यात येणार आहे.  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

मद्यपान करून गाडी चालविणे पडणार महाग; महाराष्ट्रात लवकरच कठोर कायदा..

मुंबई, दि.१५ : विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध  कायद्यात कठोर तजवीज करण्यात येण्याची शक्यता आहे. अशा गुन्ह्यात सापडलेल्या आरोपींना अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना जीव गमवावा लागू नये यासाठी कडक कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गृह विभागाच्या यासंदर्भात सार्वजनिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालविणे हा अजामिनपात्र गुन्हा करण्याबाबतच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे होणारे अपघात आणि त्यात प्रवाशांचा होणारा मृत्यू यासाठी वाहनाचालकांविरुद्ध प्रभावी कारवाई होण्यासाठी कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करावी. विनापरवाना वाहन चालविणारे तसेच मद्यपी वाहनचालकांना त्याच्या कक्षेत आणावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बेदरकारपणे तसंच मद्य सेवन करून निष्काळजीपणे वाहन चालिवण्यामुळे अपघात आणि त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मृत्यू यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2021 मध्ये अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांची संख्या 20 हजार 860 आहे तर त्यात 9829 जणांचा मृत्यू झाला आहे.

बारसू परिसरातील मातीचे नमुने घेण्याचे काम पूर्ण; प्रकल्प विरोधकांचे मनाई आदेश रद्द

राजापूर, ता. १५: रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश रद्द केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी दिली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जारी केलेल्या मनाई आदेशान्वये रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील काही आंदोलनकर्त्यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्यास व संचार करण्यास मनाई आदेश जारी करण्यात आला होता. 
बारसू परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी नमुने घेण्याचे काम हाती घेण्यात आले होते.जमीन सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले होते त्याला विरोध होऊ लागला होता. प्रशासकीय कार्यवाहीत आंदोलनकर्त्यांकडून अडथळे आणले जात होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये मनाई आदेश काढले होते. त्यामध्ये काही व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला होता. बारसू परिसरातील पाणी नमुने घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींना मनाई आदेश जारी करण्यात आले होते ते आता रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार देवाप्पा अण्णा शेट्टी ऊर्फ राजू शेट्टी (रा. अर्जुनवाड रोड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गुंडू पाटील (रा. परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अशोक केशव वालम (रा. नाणार, ता. राजापूर), जालिंदर गणपती पाटील (रा. राशिवडे बुद्रुक, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), स्वप्नील सीताराम सोगम (रा. पन्हळेतर्फे राजापूर, ता. राजापूर), सत्यजित विश्वनाथ चव्हाण (रा. राम आंनदनगर, हाउसिंग सोसायटी, दहिसर पूर्व-मुंबई) यांचा समावेश आहे. या संबंधित रद्द आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.

मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव; अजून २ महाप्रकल्पांना महापुरुषांची नावे देण्याची मागणी

मुंबई – मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याची घोषणा मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. मुंबईच्या गेट ऑफ इंडिया येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 
छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपल्या सगळ्यांना प्रेरणा, एक आदर्श घेण्यासारखा आहे. त्यांचं बलिदान आहे हे कोणी विसरू शकणार नाही. त्यामुळे मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार असल्याच त्यांनी यावेळी जाहीर केले.
यासंर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर वर मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती आपण एका पत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती अशा  आशयाची पोस्ट प्रसिद्ध केली आहे. याशिवाय आजून दोन मोठ्या प्रकल्पास महापुरुषांची नवे देण्यात यावी अशीही या पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.
१) वांद्रे वर्सोवा सी लिंक ला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव देण्यात यावे 
२) मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी  वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे.

गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीची ‘पुष्पा स्टाईल’; मुंबई – गोवा महामार्गाच्या तपासणी नाक्यावर २२ लाखांची दारू जप्त

गोवा – गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या बद्दल सविस्तर वृत्त असे की काल सायंकाळी उशिरा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. कागदपत्रे तपासताना वैयक्तिक चौकशीवेळी चालक गांगरला. ते पाहून ट्रकची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरवून अधिकारी बाहेर आले. तेवढ्यात चालकाने तेथून पळ काढला.

या ट्रकची तपासणी करताना या ट्रक च्या पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक आढळून आलेत. या कारवाईत पेडणे अबकारी निरीक्षक कमलेश माजीक, विभूती शेट्ये यांच्यासह विनोद सांगडेकर, नितेश नाईक, दिनकर गवस, रामचंद्र आचार्य, रामनाथ गावस, सत्यवान नाईक, नितेश मळेवाडकर, विठोबा नाईक, स्वप्नेश नाईक, चालक दीपक परुळेकर यांनी सहभाग घेतला.

सिमेंट लाद्यांखाली  दारूचे बॉक्स

ट्रकच्या बाहेरील भागात सिमेंट काँक्रीटच्या लाद्या रचून ठेवल्या होत्या. अबकारी कर्मचाऱ्यांनी त्या खाली उतरवल्या असता त्यात दारूचे लपवलेले बॉक्स आढळले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कर्मचाऱ्यांनी कळविले.सर्व बॉक्सचा पंचनामा करून ट्र्क ताब्यात घेतला यात आँरेंज ,ग्रीन ॲपल,रॉयल ब्ल्यू ,किंग फिशर बीअर , डारवेज व्हीस्की, बाँम्बे कस्क या प्रकारचे बॉक्स मिळाले. सदर गाडी फोंड्याहून मुंबईला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search