Author Archives: Kokanai Digital

Kudal: साळगाव शाळा क्र.१ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त मोफत महा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

   Follow us on        

कुडाळ: पुढील वर्षी 1 जून 2026 रोजी शाळा साळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. रविवार 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 11वा. पर्यंत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव क्र.1 (ग्रामपंचायत कार्यालय नजीक, साळगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग ) येथे हे महा आरोग्य शिबीर आहे.

या शिबिरासाठी जिल्ह्यातील नामांकित डॉक्टर डॉ. जी. टी.राणे (प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर (शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. मोनालिसा वजराटकर (शस्त्रक्रिया – स्त्रीरोग तज्ञ), डॉ. नेहा पावसकर -कोल्हे (नेत्ररोग – शस्त्रक्रिया तज्ञ ), डॉ. सौरभ पाटील (अस्थिरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. प्रियांका कासार _ पाटील (स्त्रीरोग – शस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. नितेश साळगावकर (बालरोग तज्ञ ), डॉ. स्वप्नाली साळगावकर (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. चेतन परब (आयुर्वेद आणि पंचकर्म), डॉ. दत्तात्रय मडवळ (होमिओपॅथी उपचार), डॉ. राहुल गव्हाणकर (MD आयुर्वेद )हे डॉक्टर तपासणी साठी उपलब्ध असणार आहेत तसेच काही विशिष्ट आजारा बाबतीत मार्गदर्शन पण करण्यात येईल.

शिबिरात करण्यात येणाऱ्या चाचण्या – ई.सी.जी, रक्तातील साखरेची तपासणी ( डायबेटिस), रक्तदाब तपासणी, नेत्रविकार तपासणी (मोतीबिंदू व तत्सम डोळ्याचे आजार), मूळव्याध -भगेंदर अश्या दुर्धर आजाराची तपासणी, स्त्रियांच्या आजाराची तपासणी (गर्भपिशवी / मासिक पाळी / स्तनाचे आजार अशा संबंधित तपासणी), संधिवात/ आमवात किंवा हाडाच्या कुठल्याही आजार संबंधित तपासणी, लहान मुलांच्या आजार संबंधित तपासणी, इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. तरी साळगाव पारिसरातील ग्रामस्थानी या भव्य मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

२६ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 08:30:22 पर्यंत, चतुर्दशी – 28:52:21 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 06:27:53 पर्यंत, रेवती – 27:39:31 पर्यंत
  • करण-वणिज – 08:30:22 पर्यंत, विष्टि – 18:43:21 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वैधृति – 08:40:42 पर्यंत, विश्कुम्भ – 28:34:12 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:16
  • सूर्यास्त- 18:57
  • चन्द्र-राशि-मीन – 27:39:31 पर्यंत
  • चंद्रोदय- 29:30:59
  • चंद्रास्त- 17:33:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • एलियन डे Alien Day
  • जागतिक बौद्धिक संपदा दिवस World Intellectual Property Day
  • राष्ट्रीय लहान मुले आणि पाळीव प्राणी दिवस National Kids And Pets Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1755 : रशियातील जुन्या प्रसिद्ध मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
  • 1841 : द बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची मुंबईत स्थापना झाली आणि ती प्रथम रेशमी कापडावर प्रकाशित झाली
  • 1903 : ऍटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
  • 1933 : गेस्टापो, नाझी जर्मनीच्या गुप्त पोलिस दलाची स्थापना झाली.
  • 1962 : नासाचे ‘रेंजर-4’ चंद्रावर कोसळले.
  • 1964 : टांगानिका झांझिबारमध्ये विलीन होऊन टांझानिया देशाची निर्मिती झाली.
  • 1970 : जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करणारे अधिवेशन अंमलात आले.
  • 1973 : अजित नाथ रे भारताचे 14 वे सरन्यायाधीश बनले.
  • 1986 : रशियातील चेरनोबिल येथील अणुभट्टीत मोठा स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात सोडले.
  • 1989 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 1,300 लोकांचा मृत्यू झाला, 12,000 लोक जखमी झाले आणि 80,000 बेघर झाले.
  • 1995 : भारताच्या निशा मोहोता हिने आशियाई प्रादेशिक बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला मास्टर विजेतेपद पटकावले.
  • 2005 : आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाखाली सीरियाने लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1479 : ‘वल्लभाचार्य’ – पुष्टिमार्गाचे संस्थापक यांचा जन्म.
  • 1900 : ‘चार्लस रिश्टर’ – रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1985)
  • 1908 : ‘सर्व मित्र सिकरी’ – भारताचे 13 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 24 सप्टेंबर 192)
  • 1942 : ‘मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी’ – भारतीय मोल्वी आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2014)
  • 1948 : ‘मौशमी चटर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘मेलानिया ट्रम्प’ – अमेरिकेचे 45वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1920 : ‘श्रीनिवास रामानुजन’ – थोर भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 डिसेंबर 1887)
  • 1976 : त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ – साहित्यिक चिंतामणी यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1930)
  • 1987 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
  • 1999 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 20 जून 1920)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

२५ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 11:47:42 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 08:54:29 पर्यंत
  • करण-तैतुल – 11:47:42 पर्यंत, गर – 22:12:12 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-इंद्रा – 12:30:00 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 18:57
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 28:48:59
  • चंद्रास्त- 16:32:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • जागतिक मलेरिया दिवस World Malaria Day
  • आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिवस International Delegates Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1859 : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
  • 1901 : स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
  • 1953 : डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
  • 1966 : भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला.
  • 1982 : भारतात दूरदर्शनवर पहिल्यांदा रंगीत प्रसारण सुरू झाले यात रामायण, महाभारत अशा मालिका होत्या.
  • 1983: पायोनियर-10 अंतराळयान सूर्यमालेतून बाहेर गेले.
  • 1989 : श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या 330,000 तमिळांना मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
  • 2000: सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त अलमट्टी धरणाची उंची 519.6 मीटरपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली.
  • 2008 : जागतिक मलेरिया दिन
  • 2015 : नेपाळमध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपात 9100 लोकांचा मृत्यू
  • 2022 : ट्वीटरने एलोन मस्क कडून 44 अब्ज अमेरिकन डॉलर्सला खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1214 : लुई (नववा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 1270)
  • 1874 : ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ – रेडिओचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1937)
  • 1918 : ‘शाहू मोडक’ – हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1993)
  • 1940 : ‘अल पचिनो’ – हॉलिवूडमधील अभिनेता यांचा जन्म.
  • 1961 : ‘करण राझदान’ – अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1961 : ‘दिनेश डिसोझा’ – भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.
  • 1964 : ‘आर. पी. एन. सिंग’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1999 : ‘पंढरीनाथ रेगे’ – साहित्यिक यांचे निधन.
  • 2002 : ‘इंद्रा देवी’ – लाटव्हियाच्या योगशिक्षिका यांचे निधन. (जन्म: 12 मे 1899)
  • 2003 : ‘लिन चॅडविक’ – ब्रिटिश शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 24 नोव्हेंबर 1914)
  • 2005 : ‘स्वामी रंगनाथानंद’ – भारतीय साधू आणि शिक्षक यांचे निधन. (जन्म: 15 डिसेंबर 1908)
  • 2023 : ‘प्रकाशसिंग बादल’ – भारतीय राजकारणी, पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील २०२३-२०२४ चे वार्षिक उत्पन्न हे ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२४- मार्च २०२५ यावर्षीचे उत्पन्न ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपयांची विक्रमी वाढ झाली. या स्थानकावरून प्रवास करणार्‍या दररोजच्या प्रवाशांची संख्येत वाढ होत असताना प्रशासनाकडून प्रवाशांच्या सुविधेकडे जाणून बुजून पाठ फिरवली जात असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.

संगमेश्वर रेल्वे स्थानकातून काही अंतरावर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने हे स्मारकस्थळ बहुचर्चित झाले आहे. पर्यटकांची झुंबड संगमेश्वर येथे दाखल होते.त्यात रेल्वेचा प्रवास केलेले पर्यटक पुन्हा रेल्वे प्रवास नको! असा नाराजीचा सूर आळवितात.

कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार यासाठी निधी पुरवला जाणार! पर्यटनाला वाव मिळणार! गोवा,केरळ याच धर्तीवर आपल्या संगमेश्वराकडेही पर्यटकआकर्षित होणार! हे खरे असले तरी आताचा कोकण रेल्वेचा प्रवास हा खच्चून भरलेल्या कोंबड्या बकऱ्यांसारखा करावा लागतो आहे. मग या स्थानकांवर मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसला थांबा देऊन हा प्रवाशी भार नक्कीच हलका करता येईल.

गेल्या दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गतवर्षीचे आणि यावर्षीचे वार्षिक उत्पन्न दाखवून ही डोळेझाक का? असा प्रश्न विचारला जातो आहे.

हाच विचार ध्यानात ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जनसामान्यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस अडवून निषेध नोंदविण्याचा विचार केला. तसे निवेदन कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिले. त्या पत्राचीही म्हणावी तशी दखल घेतली नाही.

आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे यांच्यासज्ञ काही राजकीय नेत्यांनी आपापली पत्रे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिली. पण अद्याप सुस्त यंत्रणा वेग धरीत नाही.

संगमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका! केवळ राजकीय पोळी, श्रेय लाटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची पोकळ अस्मिता दाखवू नका. खरोखरच संगमेश्वर तालुक्यात जगविख्यात स्मारक उभारायचे असेल तर या मातीचे ऐतिहासिक महत्व ध्यानात घ्यावे. केरळ, गोवा, या राज्यांतील पर्यटनाला गतिमान करण्याच्या नादात संगमेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वाला कमी लेखू नका!

-रुपेश मनोहर कदम/सायले  

Konkan Railway: वंदेभारत एक्सप्रेससह तीन गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार?

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सीएसएमटी – मडगाव वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एलटीटी – मडगाव एक्स्प्रेसचे या गाड्यांचे आरक्षण इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) या ऑनलाईन पोर्टल वर दाखवत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद ठेवण्यात येणार कि काय अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
गाडी क्रमांक २२२२९ / २२२३० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२११९ / २२१२० सीएसएमटी – मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमियम रेल्वेगाड्यांसह गाडी क्रमांक ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांचे १५ जूननंतरचे आरक्षण करताना प्रवाशांना अडचणी येत आहे.
अनेक प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळावरून वंदे भारत, तेजस, एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळू शकले नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रेल्वेगाड्यांचे तिकीट काढावे लागत आहे. तसेच पावसाळ्यात कोकणातील वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस, एलटीटी – मडगाव एक्स्प्रेस धावणार की नाही याबाबत प्रवासी संभ्रमात आहेत.
या वर्षीच्या कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक रेल्वे प्रशासनाकडून अजून काही माहिती उपलब्ध  झाली नाही आहे. तथापि, सामान्यतः कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत लागू केले जाते, कारण या काळात दरडी कोसळणे आणि पाणी साचणे यासारख्या समस्या उद्भवतात. या कालावधीत गाड्यांचा वेग कमी केला जातो, ज्यामुळे वेळापत्रकात बदल केले जातात

२४ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 14:35:36 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 10:50:29 पर्यंत
  • करण-बालव – 14:35:36 पर्यंत, कौलव – 25:15:49 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-ब्रह्म – 15:55:11 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 18:57
  • चन्द्र-राशि-कुंभ – 27:26:40 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:08:59
  • चंद्रास्त- 15:31:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय पंचायत राज दिवस
  • बहुपक्षीयता आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस International day of multilateralism & diplomacy for peace
महत्त्वाच्या घटना :
  • 1674 : भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.
  • 1717 : खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.
  • 1800 : अमेरिकेत जगातील सर्वोत्कृष्ट ग्रंथालय ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ उघडली.
  • 1967 : रशियन अंतराळयान सोयुझ-1 क्रॅश. अंतराळवीर व्लादिमीर कोमारोव यांचे निधन.
  • 1968 : मॉरिशस संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1970 : गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.
  • 1990 : अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
  • 1993 : दिल्लीहून श्रीनगरला जाणारे इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट 427 दहशतवाद्यांनी अपहरण केले. सर्व 141 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
  • 2013 : ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून 1129 जणांचा बळी गेला आणि 2500 जण जखमी झाले.
  • 2017 : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 25 CRPF जवान शहीद झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1889 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1952)
  • 1896 : ‘रघुनाथ वामन दिघे’ – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1980)
  • 1910: ‘राजा परांजपे’ – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1979)
  • 1929 : ‘राजकुमार’ – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक यांचा जन्म. (मृत्यू: 12 एप्रिल 2006)
  • 1942 : ‘जॉर्ज वेला’ – माल्टा देशाचे १०वे अध्यक्ष
  • 1942 : ‘बार्बारा स्ट्रायसँड’ – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1970 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.
  • 1971 : ‘कुमार धरमसेना’ – श्रीलंका चे क्रिकेट खेळाडू व पूर्व कप्तान.
  • 1973 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.
  • 1987 : ‘वरुण धवन’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1993 : 73 वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1942 : ‘दीनानाथ मंगेशकर’ – नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 29 डिसेंबर 1900)
  • 1960 : लक्ष्मण बळवंत तथा ‘अण्णासाहेब भोपटकर’ – नामवंत वकील यांचे निधन.
  • 1972 : ‘जामिनी रॉय’ – चित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 एप्रिल 1887)
  • 1974 : ‘रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1908)
  • 1994 : उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: 28 मे 1903)
  • 1999 : ‘सुधेंदू रॉय’ – चित्रपट कला दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2014 : भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: 16 नोव्हेंबर 1968)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

सावंतवाडी स्थानकापासून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ; सुविधांच्या नावाने मात्र बोंब

   Follow us on        

सावंतवाडी: निसर्गरम्य कोकणातील सावंतवाडी शहर हे नेहमीच पर्यटनासाठी ओळखले जाते, येथील गंजिफा, लाकडी खेळणी ही देशातच नाही तर विदेशात ही प्रसिद्ध आहेत. या शहराच्या जवळच असणारे शिरोडा बीच, आंबोली हिलस्टेशन, वेंगुर्ला बंदर ई. तसेच धार्मिक स्थळे ही देशभरात प्रसिद्ध आहेत, म्हणूनच संस्थानकालीन वारसा असणाऱ्या या ऐतिहासिक शहराला कोकण रेल्वे जोडली गेल्याने या शहराची ओळख ही संपूर्ण देशात पसरली.

तळकोकण म्हणजे कोकणातील दक्षिणेकडील भाग त्यात प्रामुख्याने दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी हे प्रमुख तालुके गणले जातात. या भागात रेल्वेने जायचे असल्यास सावंतवाडी रेल्वे स्थानक हे या भागातील प्रमुख स्थानक, जे सावंतवाडी शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. या स्थानकात २०१५ साली तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेशजी प्रभू, मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार श्री दीपकभाई केसरकरजी आदींचा उपस्थितीत रेल्वे टर्मिनस होण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले. परंतु आजतागायत टर्मिनस प्रती असणारी राजकीय इच्छाशक्ती आणि कोकण रेल्वे महामंडळाची सावंतवाडी प्रति असणारी सापत्निक वागणूक ही परिपूर्ण टर्मिनस न होण्यामागची कारणे असावीत असे सध्याच्या परिस्थिती नुसार दिसत आहे. परंतु असे असताना प्रवासी वर्ग मात्र या स्थानकातून रेल्वे महामंडळाला कोटींच्या घरात उत्पन्न मिळवून देत आहे असे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

गेल्यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३ – २४ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे वार्षिक उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे होते, आणि या स्थानकातील एकूण प्रवासी संख्या ही ७ लाख ७९ हजार इतकी होती, याचा अर्थ असा की प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर आपल्या प्रवासासाठी केला. यावर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १६ कोटी १६ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात वाढ ही १०.९२ टक्के एवढी आहे. या आर्थिक वर्षी या स्थानकाचा वापर एकूण ७ लाख ९९ हजार ७२७ म्हणजेच जेमतेम ८ लाख प्रवाशांनी केला. मागच्या वर्षीचा तुलनेत ही वाढ ४.५७ टक्के एवढी आहे. एकूण सरासरी प्रवासी संख्या ही प्रतिदिन ५७ ने वाढून २१९१ एवढी झाली आहे.

वरील माहितीद्वारे एवढे नक्की आहे की सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक हे उत्पन्नाचा बाबतीत सरस आहे. असे असून देखील कोकण रेल्वे महामंडळ या ठिकाणी प्रवाश्यांना हव्या त्या सुविधा देण्यास टाळाटाळ का करत आहे असा प्रश्न येथील प्रवाशांना नक्की पडत आहे,

म्हणूनच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या प्रवासी संघटनेने गेल्या वर्षभरात अनेक आंदोलने केली, भेटी गाठी घेतल्या, पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून या स्थानकात वांद्रे – मडगाव द्विसाप्ताहिक एक्सप्रेस चा थांबा आणि नागपूर – मडगाव एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत केला गेला, याठिकाणी पीआरएस सुविधा पूर्णवेळ करून घेतली. टर्मिनस करिता लागणारा अप्रोच रोड आता पूर्ण रूप घेत आहे. वर्षभरात येथील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून एवढी कामे मंजूर करून घेतल्यानंतर देखील संघटनेने कोकण रेल्वेच्या १७ मार्च २०२५ च्या बैठकीत सावंतवाडी स्थानकात लिफ्ट, प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर १७० मीटर लांबीची निवारा शेड, एक्झिक्युटिव लाँन्ज आणि प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म वर डिजिटल इंडिकेटर बसवण्यासाठी परिपूर्ण चर्चा केली गेली आणि ही कामे त्याच दिवशी रेल्वे अधिकाऱ्यांनी मंजूर केली गेली. काही कामांचे टेंडर देखील निघाले आहे.

नवीन थांबे नाहीच..

सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात काढून घेण्यात आलेले राजधानी एक्सप्रेस आणि गरीबरथ एक्सप्रेसचे थांबे अजून पूर्वरत न होणे हे या ठिकाणच्या प्रवाशांवर अन्याय नाही का असा सवाल उपस्थित होतोय. कोकण रेल्वेच्या १२ जुलै च्या पत्रानुसार या ठिकाणी काही गाड्यांचे थांबे हे कोकण रेल्वेने सावंतवाडी स्थानकासाठी मंजूर केले होते आणि तसा प्रस्ताव केंद्रातील रेल्वे बोर्डाकडे पाठवला देखील होता, परंतु रेल्वे बोर्डाने तो प्रस्ताव लालफितीत का गुंडाळला हे कोडे अजून ही सुटत नाही. कोकण रेल्वे मार्गावर इतर ठिकाणी थांबे मिळत असताना सावंतवाडी स्थानक मात्र उपेक्षितच राहिले. परंतु वरील उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता आतातरी कोकण रेल्वे महामंडळ आणि रेल्वे बोर्ड सावंतवाडीला न्याय देईल का अशी भाबडी आशा येथील जनतेत निर्माण झालीय.

सागर तळवडेकर 

उपाध्यक्ष – कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

Konkan Railway: प्रवाशांच्या सोयीचा विचार करून मुंबई ते चिपळूण दरम्यान विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: सद्यस्थितीत सण-उत्सव किंवा सुट्ट्यांदरम्यान चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्या प्रामुख्याने गोवा व सिंधुदुर्ग भागासाठी सोडल्या आहेत. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, महाड, माणगाव, रोहा, पेण व अन्य स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळवणे अत्यंत कठीण होते, कारण या गाड्या आधीच भरलेल्या असतात. अनेकदा आरक्षण असणाऱ्या प्रवाशांनाही गाडीत चढता येत नाही. मोठ्या कष्टाने चढायला मिळालेच तर आपल्या जागेपर्यंत पोहोचता येत नाही. यामुळे अबालवृद्धांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा बल यांचीही मदत वेळेवर मिळत नाही. कोकण रेल्वे व मध्य रेल्वेच्या हद्दीच्या वादात बऱ्याचदा चिपळूण/खेडला तक्रार केली तरी थेट पनवेलला तिकीट तपासनीस व पोलीस येतात. तोपर्यंत अर्धे प्रवासी उतरलेले असतात. त्यामुळे खेड, महाड, माणगाव येथील प्रवाशांमध्ये आरक्षण करूनही काही उपयोग होत नाही अशी भावना वाढीस लागली आहे.

 

रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण गाडी सोडताना पनवेलहून सोडली जाते. परंतु, मुंबईतील लालबाग, गिरगाव, परळ, माहीम, वरळी, अंधेरी, सांताक्रूझ, बोरिवली तर पुढे घाटकोपर, भांडुप, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, विरार, वसई, नालासोपारा येथील प्रवाशांना पनवेल स्थानक अजिबात सोयीचे नाही. तसेच, लहान मुले, वृद्ध नागरिक यांना आणि बरेचसे सामान सोबत घेऊन दोन-तीन गाड्या बदलत प्रवास करण्यास सांगणे म्हणजे एकप्रकारची क्रूरता आहे असे आम्ही मानतो. म्हणूनच, खेड/चिपळूण सारख्या मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावर असणाऱ्या स्थानकांवर जाणाऱ्या गाडीला दादर आणि ठाणे हे थांबे आवश्यकच आहेत. मुंबईपासून कमाल २०० किलोमीटरच्या प्रवासासाठी ६० किलोमीटरवर पनवेलला गाडी बदलण्यास प्रवासी उत्सुक नसतात. तसेच परंपरेनुसार या पनवेल चिपळूण गाडीला एकही आरक्षित डबा नसल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना गाडीत जागा मिळण्याबाबत अनिश्चितता असते.

याकरिता, खालील स्थानकांवर थांबा असलेली आणि चिपळूणपर्यंत धावणारी विशेष गाडी सुरू करण्याची विनंती कोकण विकास समिती तर्फे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकरराव दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

या गाडीसाठी सुचविलेला मार्ग आणि थांबे:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर – ठाणे – पनवेल – पेण – नागोठणे – रोहा – कोलाड – इंदापूर – माणगाव – गोरेगाव रोड – वीर – सापे वामने – करंजाडी – विन्हेरे – दिवाणखवटी – कळंबणी बुद्रुक – खेड – अंजनी – चिपळूण

 

सुचविलेले वेळापत्रक:

प्रस्थान: पहाटे ४:५० किंवा सकाळी ७:५०/८ वाजता मुंबईहून

परतीचा प्रवास: दुपारी चिपळूणहून

 

डब्यांची रचना:

सामान्य द्वितीय श्रेणी (अनारक्षित)

द्वितीय श्रेणी आरक्षित (सिटिंग)वा

तानुकूलित चेअर कार (AC Chair Car)

ही गाडी विशेषतः खालील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल:

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईकडे येणारे विद्यार्थी, नोकरदार व पर्यटक

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आपल्या गावी जाणारे व परत येणारे नागरिक

२३ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 16:46:54 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 12:08:56 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:46:54 पर्यंत, भाव – 27:46:12 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 18:50:40 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:18
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 27:30:00
  • चंद्रास्त- 14:31:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय सहलीचा दिवस International Picnic Day
  • इंग्रजी भाषा दिन English Language Day
  • जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन World Book & Copyright Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1635 : बोस्टन लॅटिन स्कूल, अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा, स्थापन झाली.
  • 1818 : ब्रिटीश अधिकारी मेजर हॉल यांना कर्नल प्रायर यांनी रायगड किल्ल्यावर गस्त घालण्यासाठी पाठवले.
  • 1984 : वैज्ञानिकांना एड्सचा विषाणू सापडला.
  • 1990 : नामिबियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1995 : जागतिक पुस्तक दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 2005 : मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1564 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचा जन्म. (निधन: 23 एप्रिल 1616)
  • 1791 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1868)
  • 1858 : ‘मॅक्स प्लँक’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑक्टोबर 1947)
  • 1858 : ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ – समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 1922)
  • 1873 : ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ – अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1944)
  • 1897 : ‘लेस्टर बी. पिअर्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे 14 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 27 डिसेंबर 1972)
  • 1938 : ‘एस. जानकी’ – शास्त्रीय गायिका यांचा जन्म.
  • 1968 : ‘किशोरी शहाणे’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1969 : ‘मनोज बाजपेयी’ – अभिनेते मनोज बाजपेयी यांचा जन्म.
  • 1977 : ‘काल पेन’ – भारतीय-अमेरिकन अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1616 : ‘विल्यम शेक्सपियर’ – इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते यांचे निधन. (जन्म: 23 एप्रिल 1564)
  • 1850 : ‘विल्यम वर्डस्वर्थ’ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी यांचे निधन. (जन्म: 7 एप्रिल 1770)
  • 1926 : ‘हेन्री बी. गुप्पी’ – ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 डिसेंबर 2854)
  • 1958 : ‘शंकर श्रीकृष्ण देव’ – निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1871)
  • 1968 : पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1902)
  • 1986 : ‘जिम लेकर’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1922)
  • 1992 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 2 मे 1921)
  • 1997 : ‘डेनिस कॉम्पटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 मे 1918)
  • 2000 : ‘बाबासाहेब भोपटकर’ – 40 वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे यांचे निधन.
  • 2001 : ‘जयंतराव टिळक’ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1921)
  • 2007 : ‘बोरिस येलत्सिन’ – रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1931)
  • 2013 : ‘शमशाद बेगम’ – पार्श्वगायिका यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1919)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

मोठी बातमी! पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय स्थगित

   Follow us on        

मुंबई:राज्य सरकारनं मंगळवारी शाळेत हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्तावावर मोठा निर्णय घेतला होता. राज्यातील शाळेत हिंदी शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारनं रद्द केला आहे. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकण्याचा प्रस्ताव यापूर्वी मान्य करण्यात आला होता. तो निर्णय सरकारनं स्थगित केला आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली. याबाबत यापूर्वी सादर केलेल्या अध्यादेशावर स्थगिती आणल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जीजीआर-3 भाषा फॉर्म्युल्यानुसार पहिली ते पाचवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. पण, या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. त्यानंतर सरकारनं हा निर्णय स्थगित केला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने नेमलेल्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाला विरोध केला होता. तसेच, समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search