Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway | NSG1 की NSG2? जाणून घ्या तुमचे स्थानक भारतीय रेल्वे स्थानकांच्या कोणत्या श्रेणीत मोडते ..

   Follow us on        
Categorization of Railway Stations:भारतातील रेल्वे स्थानकांच्या वर्गीकरणासाठीच्या निकषांमध्ये नोव्हेंबर, 2017सुधारणा करण्यात आली आहे. नवीन वर्गीकरणानुसार, स्थानकांच्या वर्गीकरणासाठी त्या स्थानकावरील आणि प्रवाशांची संख्या आणि एकूण कमाई या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या आहेत.
त्यानुसार भारतातील स्थानकांची 3 गटांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहेत.
१) नॉन उपनगरीय (NSG)
२) उपनगरीय (SG)
३) हॉल्ट (HG).
पुढे या गटांना अनुक्रमे 1-6, 1-3 आणि 1-3 या श्रेणींमध्ये विभागण्यात येते. ही वर्गवारी खालील कसोटीच्या आधारे करण्यात येते.
नॉन उपनगरीय स्थानके NSG
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या 
NSG 1 500 कोटीपेक्षा जास्त 2 कोटींहून अधिक
NSG 2 100 ते 500 कोटी 1 ते 2 कोटी
NSG 3 20 ते 100 कोटी 50 लाख ते 1 कोटी
NSG 4 10 ते 20 कोटी 20 लाख ते 50 लाख
NSG 5 1 ते 10 कोटी 10 लाख ते 20 लाख
NSG 6 1 कोटी पेक्षा कमी 10 लाख पेक्षा कमी
उपनगरीय स्थानके  SG
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या
SG 1 25 कोटीपेक्षा जास्त 3 कोटींहून अधिक
SG 2 10 ते 25 कोटी 1 ते 3 कोटी
SG 3 10  कोटी पेक्षा कमी 1 कोटी पेक्षा कमी
हॉल्ट  स्थानके   HG  
स्थानकांची वर्गवारी कमाई प्रवासी संख्या 
HG 1 50 लाखपेक्षा जास्त  3 लाखपेक्षा जास्त 
HG 2 5 लाख ते 50 लाख 1 लाख ते 3 लाख
HG 3 5 लाख पेक्षा कमी  1 लाख पेक्षा कमी 
कोकण रेल्वे मार्गावरील स्थानके कोणत्या श्रेणीत मोडतात?
२०२२-२३ च्या वार्षिक उत्पन्नानुसार केलेल्या वर्गीकरणानुसार कोकण रेल्वे मार्गावरील कोणत्याही स्थानकाचा समावेश NSG1 या श्रेणीत समावेश होत नाही. तर फक्त मडगाव या स्थानकाचा NSG2 या श्रेणीत समावेश होतो. इतर स्थानकाचा तपशील खालीलप्रमाणे

NSG2 (१ स्थानक)

मडगाव जं.

NSG3 (७ स्थानके)  

चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, उडुपी

NSG4 (२ स्थानके) 

सावंतवाडी रोड, कारवार

NSG5 (२२ स्थानके)  

माणगाव, वीर, खेड, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, पेर्नेम, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, कुंदापुरा, बारकुर, मुल्की, सुरथकल

NSG6 (३३ स्थानके) 

कोलाड, इंदापूर, गोरेगाव रोड, सपे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाण खवटी, अंजनी, कामठे, कडवई, उक्षी, भोके, निवासर, वेरावली, खारेपाटण, नांदगाव रोड, झाराप, मदुरे, वेर्ना, माजोर्डा जं., बल्ली, कानाकोना, लोलिम, अस्नोती, हार्वर्ड, मानकी, शिरूर, बिजूर, सेनापुरा, इन्नांजे, पाडुबिद्री, नंदीकूर, ठाकूर

HG1 (१ स्थानक)

बाइंदूर मुकांबिका रोड

HG2 (२ स्थानके)

सौंदल,  सुरावली

HG3 (१ स्थानक)

चित्रपूर

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

IMD Alert | राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा.

   Follow us on        
IMD Alert: भारतीय हवामान खात्याने IMD  राज्यात पुढील चार/ पाच दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. खास करून दिनांक १२ आणि १३ मे या दोन दिवशी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  तर दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यातील काही जिल्हे वगळता इतर भागाला येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक १२ मे रोजी नाशिक,अहमदनगर,पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच या जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो र्ट देण्यात आला आहे.
दिनांक १३ मे रोजी अहमदनगर,पुणे, औरंगाबाद, जालना,यवतमाळ, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली  या भागात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर पालघर व हिंगोली हे दोन जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सावधानतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
दिनांक १४ आणि १५ मे या दोन दिवशी राज्यात सावधानतेचा ऑरेंज अलर्ट नसला तरी बहुतेक जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Mumbai Goa Highway | पोलादपुरात कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ जण जखमी

   Follow us on        
Accident on Mumbai Goa Highway:आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथील आंबेडकर नगर येथे झालेल्या कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात  २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की आज सकाळी पोलादपूर येथील आंबेडकर नगर येथे उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक NL01 AE3150 ला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या MH03 CS 1177 या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने हा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कंटेनर च्या मागील भागात अडकली. या कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. या भीषण अपघातात २ जण जागीच मृत्युमुखी तर ०३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास ४५ मिनिटांचा कालावधी लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाणे येथील कर्मचारी, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी,स्थानिक ग्रामस्थ, नरवीर रेसक्यू टीम, श्री काळभैरवनाथ रेसक्यु टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Video : गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होण्यास अडथळा.. प्रवासी म्हणतात ”एसीचे तिकीट नसलेले…. ”

   Follow us on        

Mumbai Local: तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईत तर गरमी वाढल्याने नागरिक तर हैराण झाले आहेत. मात्र उपनगरीय लोकल सेवेत एसी लोकल चा भरणा केल्याने काही जास्त पैसे मोजून गारेगार प्रवासाचा अनुभव घेणे आता शक्य झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकिट अथवा पास नसूनसुद्धा सर्रास या लोकल मध्ये प्रवास करत असल्याचे दिसत आहे. परिणामी एसी लोकल्स मध्ये सामान्य लोकल्स प्रमाणे गर्दी पाहायला मिळत आहे. कित्येकवेळा गर्दीमुळे स्वयंचलित दरवाजे बंद होण्यास अडथळा निर्माण होऊन गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होत आहे.

सोशल मीडियावर ठाणे स्थानकावरील एका एसी लोकलची एक चित्रफित व्हायरल होत आहे. या चित्रफितीत एका डब्यात प्रवाशांची एवढी गर्दी झाली की गाडीचे स्वयंचलित दरवाजे बंद होत नव्हते. एसी लोकल पासधारक आणि तिकीटधारक प्रवाशांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला आहे की गाडीत गर्दी करणाऱ्या बहुतेक जणांकडे एसीचा पास नसतो तरीपण ते एसी लोकल मध्ये प्रवास करत आहेत. सुरवातीला या गाड्यांमध्ये नेहमी दिसणारे टीसी पण आजकाल गायबच असतात त्यामुळे अशा प्रवाशांचे फावतच आहे. मात्र त्यामुळे ज्या प्रवाशांनी एसी वर्गाचा पास किंवा तिकीटे खरेदी केली आहेत त्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन या समस्येवर उपाय काढावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Loading

प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ विशेष गाडीच्या फेऱ्यांत वाढ

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.   वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची वारंवारता Frequency वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 01129 / 01130 लोकमान्य टिळक (टी) – थिविम – लोकमान्य टिळक (टी)  त्रि-साप्ताहिक अनारक्षित या गाडीच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक (टी) – थिविम (साप्ताहिक) अनारक्षित विशेष जी फक्त शनिवारी  चालविण्यात येत होती ती दिनांक13/05/2024 ते 05/06/2024  या कालावधीसाठी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होतील.
 गाडी क्र. 01130 थिविम – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) अनारक्षित विशेष जी फक्त रविवारी चालविण्यात येत होती ती दिनांक 14/05/2024 ते 06/06/2024 या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि रविवारी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होतील.

Loading

ताडोबाच्या वाघांचे सह्याद्रीच्या अभयारण्यात स्थलांतर करण्यात येणार

   Follow us on        
रत्नागिरी : सहयाद्री टायगर रिझर्व (STR)मधील वाघांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्यातील वन विभागाने एक निर्णय घेतला आहे. वन विभाग लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघांचे येथे  स्थलांतर करणार आहे. एसटीआरमधील सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर आणि गोवा, कर्नाटकमधील जंगले पुरेशी सुरक्षित आणि मानवी उपद्रवांपासून मुक्त असल्यामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते.
उत्तर पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा(STR)ची स्थापना जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्यांची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. शिकारी आणि बदलत्या अधिवासामुळे या प्रदेशात वाघांची संख्या ऐतिहासिकदृष्ट्या कमी झाली आहे. एसटीआर राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही, कारण प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही. एसटीआरच्या हद्दीत वाघांच्या उपस्थितीचे फोटो कमी आहेत आणि पद मार्गांच्या पुराव्याने सात ते आठ वाघांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.
वाघांची लोकसंख्या वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एसटीआरच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलांमधून गोवा आणि कर्नाटकातील वाघांना इथे आणणे आहे. त्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर मजबूत होऊ शकतो. परंतु वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. परिणामी, अल्पकालीन परिणामांसाठी वाघांचे स्थलांतर निवडण्यात आले आहे.

Loading

कौल जनतेचा | रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

   Follow us on        

कौल जनतेचा

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?

*नारायण राणे* की *विनायक राऊत*

आपला उमेदवार मागे ईथेही मागे पडता नये… खालील लिंक वर क्लिक करून आपले मत नोंदवा…

Loading

Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणून घ्या मतदानाची पूर्ण आकडेवारी

   Follow us on        

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.

  • लातूर 55.38 %
  • सांगली 52.56 %
  • बारामती 47.84%
  • हातकणंगले 62.18%
  • कोल्हापूर 63.71%
  • माढा 50%
  • उस्मानाबाद 58.24%
  • रायगड 50.31%
  • रत्नागिरी  – सिंधुदुर्ग 53.75 %
  • सातारा 56.38 %
  • सोलापूर 49.17%

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.

  • कुडाळ 59.09%
  • कणकवली 55.14%
  • सावंतवाडी 60.30%
  • राजापूर 47.31%
  • चिपळूण 52.62%
  • रत्नागिरी  49.83%

रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये  सर्वात कमी 45.60%  एवढे मतदान झाले आहे.

  • अलिबाग 52.33%
  • दापोली 59.12%
  • गुहागर 53.77%
  • महाड 45.60%
  • पेण 51%
  • श्रीवर्धन 49.48 %

देशात आज निवडणूकीच्या तिसर्‍या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.

टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे. 

Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

 

 

 

 

 

 

 

Loading

कोकणात टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात अन गणपती स्पेशल रेल्वे गोवा,कर्नाटक व केरळात

सावंतवाडी रोड स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे केली मागणी

   Follow us on        
आवाज कोकणचा : कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली.कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोकणातील भूमिपुत्रांनी आपल्या स्वतःच्या जमिनी या बहाल केल्या, मात्र कोकण रेल्वेतून कोकणातील भूमिपुत्राला काय मिळाले हा प्रश्न आजही निरूत्तरीतच आहे, या ठिकाणी भूमिपुत्रांना अपेक्षित असणारा सुलभ आणि सोयीस्कर प्रवासा आजही होताना दिसत नाही, यासाठीच कोकणात सावंतवाडी रोड येथे सुसज्ज टर्मिनस बनवावे व त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते यांचे नाव दयावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
गणेश उत्सवाच्या दरम्याने सर्व कोकण रेल्वे प्रवासी संघटना साधारण ३०० ते ३५० रेल्वेच्या फेऱ्यांची मागणी करतात मात्र कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात आणि सर्व गणपती स्पेशल ट्रेन दक्षिणेतील गोवा,कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यात न्याव्या लागतात. त्यामुळे गणपतीस्पेशल रेल्वे सोडूनही अर्धा रिझर्वेशन कोटा हा दक्षिणेतील राज्यांना मिळतो व खरा लाभार्थी वेटींगलिस्टमध्येच राहतो. त्यामुळे कोकणातील भूमिपुत्रांना कोकण रेल्वेचा काहीच फायदा होताना दिसत नाही.
सावंतवाडी स्टेशन येथे फेज एक मध्ये फक्त प्याटफॉर्म व ब्रिजचे काम करण्यात आले मात्र टर्मिनस म्हणून आवश्यक असणारे मुबलक पाणी, ट्रेन सरव्हिसींग व मेंटेनसचे काम येथे होत नसल्याने या कामासाठी पुढील राज्यांचा आधार घ्यावा लागतो.परिणामी कोकणातील प्रवाशांना कोकण रेल्वेच्या सेवेचा अपेक्षित फायदा घेता येत नाही.सावंतवाडी येथे सुसज्ज टर्मिनस झाल्यास प्रतिक्षेत असलेल्या वसई सावंतवाडी पॅसेंजर,कल्याण सावंतवाडी पॅसेंजर,दादर चिपळूण मेमू व सिएसएमटी रत्नागिरी इंटरसिरी एक्सप्रेस अशा कोकणाच्या हक्काच्या कमी अंतराच्या रेल्वे चालवल्या जातील त्याचा फायदा कोकणातील भूमिपुत्रांना होईल,अशी प्रवासी संघटनेची धारणा आहे.
सावंतवाडी रोड टर्मिनसच्या कामाला गती मिळावी यासाठी १६ मे २०२३ रोजी सावंतवाडी रोड स्टेशन मास्तर यांना वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तर २६ जाने.२०२४ रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांच्या सहकार्याने लाक्षणिक उपोषणही करण्यात आले.
म्हणूनच सावंतवाडी रोड स्टेशन ला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
-अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती- मुंबई
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Election 2024 Voting Live Updates: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५% टक्के मतदान; टक्केवारीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या मागे

   Follow us on        
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत  ३१.५५% मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (३८.४२%)  झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (२६.६१%)झाले आहे.
लातूर – ३२.७१ %
सांगली २९.६५ %
बारामती २७.५५%
हातकणंगले ३६.१७%
कोल्हापूर ३८.४२%
माढा २६.६१%
उस्मानाबाद ३०.५४%
रायगड ३१.३४%
रत्नागिरी  – सिंधुदुर्ग ३३.९१ %
सातारा ३२.७८ %
सोलापूर २९.३२%
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान झाले आहे. या मतदारसंघात चिपळूण येथे सर्वाधिक ३७.९० % एवढे मतदान झाले असून रत्नागिरीत सर्वात कमी २८% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ ३२.८८%
कणकवली ३१.५९%
सावंतवाडी ३६.६५%
राजापूर ३७.०५%
चिपळूण ३७.९०%
रत्नागिरी  २८%
रायगड मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.३४% मतदान झाले आहे. या मतदारसंघात गुहागर येथे सर्वाधिक ३९.००% एवढे मतदान झाले असून पेण मध्ये  सर्वात कमी २२.२०%  एवढे मतदान झाले आहे.
अलिबाग ३२.९०%
दापोली ३६.४५%
गुहागर ३९.००%
महाड ३२.००%
पेण २२.२०%
श्रीवर्धन २६.९४ %
देशात १ वाजेपर्यंत एकूण ३९.९२% एवढे मतदान झाले असून गोवा आणि पश्चिम बंगाल येथे सर्वाधिक सुमारे ४९% मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत सर्वात मागे आहे.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search