Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने डॉ. आंबेडकर नगर (DADN) आणि ठोकूर (TOK) (मंगळूर जवळ) दरम्यान विशेष भाड्यावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
ट्रेन क्र. ०९३०४: डॉ. आंबेडकर नगर – ठोकूर विशेष
प्रस्थान: रविवार, २१ आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी.
वेळ: डॉ. आंबेडकर नगर येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटणार.
आगमन: ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ०३:०० वाजता ठोकरू येथे पोहोचेल.
ट्रेन क्र. ०९३०३: ठोकूर – डॉ. आंबेडकर नगर विशेष
प्रस्थान: मंगळवार, २३ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी.
वेळ: ठोकूर येथून सकाळी ०४:४५ वाजता सुटणार.
आगमन: ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १५:३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.
महत्त्वाचे थांबे
प्रवाशांच्या सोयीसाठी, ही विशेष एक्स्प्रेस दोन्ही दिशांना खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:
इंदूर जं., देवास, उज्जैन जं., नागदा जं., रतलाम जं., वडोदरा जं., भरूच जं., सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जं., काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकर, मूकांबिका रोड बायंदूर (हॉल्ट), कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल.
गाडीची रचना (Composition)
या विशेष गाडीमध्ये प्रवाशांसाठी एकूण २२ एलएचबी (LHB) डबे असणार आहेत,
ज्यामध्ये: वातानुकूलित ३ टायर (AC 3 Tier) – १९ डबे, वातानुकूलित ३ टायर इकोनॉमी (AC 3 Tier Economy) – ०१ डबा, जनरेटर कार (Generator Car) – ०२ डबे
प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.












