MSRTC: शिवशाही बस बद्दलची ‘ती’ बातमी खोटी; महामंडळाकडून मोठा खुलासा

मुंबई: शिवशाही बसच्या वाढत्या अपघात घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच वाढलेल्या शिवशाही बसच्या अपघातांमुळे शवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, शिवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या अफवांना एसटी महामंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. एसटी महामंडळाने या चर्चांना मूळ नसल्याचं सांगत प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.एसटी महामंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, शिवशाही बस सेवा प्रवाशांच्या सोईसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवशाही बस या राज्यभर प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, ती वेळेवर सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते.

महामंडळाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. अपघातांमुळे आलेल्या आव्हानांना सामोरं जात असतानाही महामंडळाने बस सेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात असून, वाहनांची नियमित तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या अधिकृत ‘एक्स’ माध्यमातून महामंडळाने या बद्दल खुलासा केला आहे. एसटी महामंडळाकडे सध्या ७९२ शिवशाही (वातानुकूलित )बसेस चालना मध्ये आहेत. त्यामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच सदर बसेस या बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही. असे या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वेचे विलीनीकरण व्हावे ही कोकणवासीयांची खरी गरज – सागर तळवडेकर

 

Konkan Railway: कर्नाटक येथील खासदार श्रीनिवास पुजारी यांनी लोकसभेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे हा मुद्दा उचलून धरला असतानाच महाराष्ट्रातील खासदारांनी देखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी २९ नोव्हेंबर रोजी हा मुद्दा पुन्हा राज्यसभेत उपस्थित केला होता.

गेले काही महिने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती,महाराष्ट्र या कोकणातील २५ प्रवासी संघटनेच्या शिखर समितीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे आणि रोहा ते सावंतवाडी पर्यंतचा भाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करण्यात यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, त्यासंदर्भात समितीने संबंधित लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष आणि इमेल मोहीमेद्वारे लक्ष वेधले होते, त्याला अनुसरून समितीने दिलेल्या निवेदनात मांडलेले मुद्दे खासदार श्री धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित करून रेल्वे मंत्र्यांकडून लेखी उत्तर प्राप्त केले आहे. प्रवासी समितीचा तसेच कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल कोकणवासीयांतर्फे प्रवासी समितीने खासदार पाटील यांचे आभार मानले.

खासदार पाटील यांचा प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यापूर्वी त्याचे १००% समभाग केंद्र शासनाच्या हाती येणे आवश्यक आहे. आजच्या घडीला केवळ गोवा शासनाने कोकण रेल्वे महामंडळातील त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन करण्यास संमती दिल्याचे सांगितले.

आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील रेल्वे विकास, अमृत भारत स्थानक योजना, एक स्थानक एक उत्पादन योजना, रेल्वे मार्गाची क्षमतावृद्धी आणि आधुनिकीकरण, फलाट व इतर यंत्रणांचा कायापालट याकरिता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक आहे. तसेच राज्याच्या राजधानी मुंबईशी सुलभ संपर्कासाठी ज्या रेल्वे विभागाअंतर्गत मुंबई त्याच रेल्वे विभागात संपूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हेही यावेत ही समितीची भूमिका आहे असे समितीचे सचिव श्री अक्षय महापदी यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेवरील बरीच विकासकामे निधीअभावी रखडली आहेत, त्यात प्रामुख्याने सावंतवाडी टर्मिनस हा विषय बरीच वर्षे रखडला आहे. आजच्या घडीला महामंडळ या मार्गाचे दुपदरीकरण करण्यास असमर्थ आहे त्यातच विविध राज्यांच्या हिस्सेदारीमुळे रेल्वे मंत्रालय किंवा संबंधित राज्य शासन निधी देण्यास हात आखडता घेत आहेत. त्यामुळे केवळ राज्यशासनांनी समभाग हस्तांतरित केल्यावर विलीनीकरण करण्याची भूमिका केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने न घेता ही प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी राज्य शासनाचे समभाग केंद्र शासनाकडे हस्तांतरित करताना राज्य शासनांनी गुंतवलेला निधी त्यांना परत कोण आणि कसा देणार किंवा देणार नाही याबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. यात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व राज्य शासनांचे समभाग विकत घेणे हा सोयीस्कर पर्याय आहे. तरी, याबाबत पुढील निर्णय जलदगतीने होण्यासाठी आपले असेच सहकार्य अपेक्षित आहे, असे समितीकडून दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

राज्यसभा खासदार श्री धैर्यशील पाटील यांचे आभार व्यक्त करताना कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे काळाची गरज आहे ते लवकरात लवकर होणे हे सर्वांच्या हिताचे आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल असे मत समितीला संलग्न असलेली कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले.

Loading

Facebook Comments Box

Mumbai Local: मुंबई लोकलच्या १३ एसी फेऱ्या वाढल्या

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांना वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने २७ नोव्हेंबरपासून १३ अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.
पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे जादा लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. या मागणीचा विचार करून नुकतीच एक १२ डब्यांची वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. आता काही सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी नवीन वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. १३ वातानुकूलित लोकल फेऱ्यांपैकी ६ अप आणि ७ डाऊन दिशेने धावतील. यामध्ये १० जलद आणि ३ धीम्या लोकल फेऱ्यांचा समावेश आहे. विरार-चर्चगेट, भाईंदर-चर्चगेटदरम्यान दोन लोकल फेऱ्या, विरार-वांद्रे, भाईंदर-अंधेरीदरम्यान प्रत्येकी एक फेरी, चर्चगेट-विरार दरम्यान दोन लोकल फेऱ्या, अंधेरी-विरार, वांद्रे-भाईंदर, महालक्ष्मी-बोरिवली आणि बोरिवली-भाईंदरदरम्यान प्रत्येकी एक लोकल फेरी धावेल. पश्चिम रेल्वेवर आता १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतील. तर, शनिवार-रविवारी ५२ ऐवजी ६५ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Loading

Facebook Comments Box

Mumbai-Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी बंद

RATNAGIRI: मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी १५ दिवस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.

कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

Loading

Facebook Comments Box

२६ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-एकादशी – 27:49:53 पर्यंत
  • नक्षत्र हस्त – 28:34:53 पर्यंत
  • करण-भाव – 14:27:27 पर्यंत, बालव – 27:49:53 पर्यंत
  • पक्ष कृष्ण
  • योग प्रीति – 14:12:13 पर्यंत
  • वार मंगळवार
  • सूर्योदय 06:55
  • सूर्यास्त 17:57
  • चन्द्र राशि कन्या
  • चंद्रोदय 27:23:59
  • चंद्रास्त-14:46:59
  • ऋतु – हेमंत

 

महत्त्वाच्या घटना:
  • १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
  • १९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
  • १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
  • १९६०: भारतात सर्वप्रथम कानपूर आणि लखनो या दोन शहरांत आजच्या दिवशी मध्ये STD सेवा सुरु झाली होती.
  • १९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
  • १९६७: मध्ये लिस्बन शहरात ढगफुटी झाल्यामुळे ४५० लोकांना जीव गमवावा लागला होता.
  • १९८४: इराक आणि अमेरिका ने मध्ये राजनीतिक संबंध पुनर्स्थापित केले होते.
  • १९९०: मध्ये ब्रिटनची माजी प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांनी त्यांचा राजीनामा ब्रिटन च्या राणीला सोपवला होता.
  • १९९२: मध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या संपत्ती वर कर द्यावा लागेल हा नवीन निर्णय त्यांच्या संसद मध्ये घेण्यात आला होता.
  • १९९७: अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
  • १९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.
  • १९९९: विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
  • २००६: ला इराक़ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये २०२ लोक मृत्युमुखी पडले होते.
  • २००८: मुंबई मध्ये ला दहशदवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता, त्यांनी मुंबई च्या ताज हॉटेल मध्ये घुसून अनेक लोकांना बंधक बनवले होते, पण त्यावर देशाच्या जवानांनी आणि पोलिसांनी चोख प्रतिउत्तर देत तीन दिवसात बंधकांना मोकळे केले होते.
  • २००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
  • २००८: मध्ये मुंबईला झालेल्या दहशदवादी हल्यात १६४ लोक मारले गेले होते आणि २५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.
  • २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
  • २०१२: ला सिरीया मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात १० मुले मृत्युमुखी पडले होते आणि १५ गंभीर जखमी झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.
  • १८८५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २ जून १९७५)
  • १८९०: सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७)
  • १९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)
  • १९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)
  • १९१९: भारताचे प्रसिद्ध इतिहासकार शिक्षविद राम शरण शर्मा यांचा मध्ये जन्म.
  • १९२१: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)
  • १९२२: अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चार्ल्स एम. शुल्झ यांचा मध्ये जन्म.
  • १९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)
  • १९२३: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)
  • १९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.
  • १९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.
  • १९२६: महान शास्त्रज्ञ आणि शिक्षक यशपाल यांचा मध्ये जन्म.
  • १९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.
  • १९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.
  • १९३९: टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
  • १९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.
  • १९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९)
  • १९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.
  • १९७२: अर्जुन रामपाल – अभिनेता
  • १९८१: प्रसिध्द लेखक, प्रकाशक, कवी, संपादक आणि भाषाशास्त्रज्ञ नाथुराम प्रेमी यांचा जन्म मध्ये जन्म.
  • १९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.
  • १९९१: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९३७: भारताचे राजनीतीतज्ञ तसेच हिंदी साहित्यामध्ये आपली छवी निर्माण केलेले शंकर दयाल सिंग यांचे मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले होते.
  • १९८२: च्या आयपीएस बॅच चे अधिकारी २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झाले होते.
  • १९८५: ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. (जन्म: ९ मार्च १८९९)
  • १९९४: भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (जन्म: २ मे १८९९)
  • १९९९: दत्तात्रय शंकर जमदग्नी – पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक (जन्म: ?? ????)
  • २००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत. (जन्म: ? ? ????)
  • २००४: मध्ये याच दिवशी भारताचे इतिहासकार तपन राय चौधरी यांचे निधन झाले होते.
  • २००८: हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
  • २०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)
  • २०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

२५ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-दशमी – 25:04:11 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 25:24:11 पर्यंत
  • करण-वणिज – 11:41:55 पर्यंत, विष्टि – 25:04:11 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 13:10:27 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:54
  • सूर्यास्त- 17:57
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 26:37:59
  • चंद्रास्त- 14:16:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Day for the Elimination of Violence against Women
  • शाकाहार दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
  • १७५८: ब्रिटन या देशाने आजच्याच दिवशी फ्रांस च्या डोक्विन्सोन या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून किल्ला काबीज केला होता.
  • १८६७: अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने आजच्या दिवशी डायनामाईट चे पेटंट केले होते.
  • १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
  • १९४१: आजच्याच दिवशी लेबेनॉन या देशाला फ्रांस या देशाकडून स्वातंत्र्य मिळाले होते.
  • १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
  • १९६५: आजच्याच दिवशी फ्रांस या देशाने स्वतःचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता.
  • १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
  • १९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ’राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर
  • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
  • २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
  • २००१: आजच्याच दिवशी वरिष्ठ पाकिस्तानी राजनेता बेनजीर भुट्टो या तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्ली येथे भेटल्या होत्या.
  • २००२: लुसिया गुटेरेज आजच्याच दिवशी इक्वाडोर या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
  • १८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
  • १८७२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
  • १८७९: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
  • १८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८)
  • १८८९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
  • १८९०: प्रसिध्द साहित्यकार सुनीती कुमार चाटर्जी यांचा जन्म झाला होता.
  • १८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
  • १९८२: प्रसिध्द भारतीय महिला क्रिकेट खेळाडू व वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
  • १९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
  • १९२६: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
  • १९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
  • १९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
  • १९३९: उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
  • १९५२: इम्रान खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी
  • १९६३: लोकसभा सदस्य अरविंद कुमार शर्मा यांचा जन्म झाला होता.
  • १९६९: त्रिपुरा राज्याचे १० वे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता.
  • १९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८५: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
  • १९२२: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
  • १९६०: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
  • १९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)
  • १९७४: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९)
  • १९८४: यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३)
  • १९८७: परम वीर चक्र सन्मानित भारतीय सैनिक मेजर रामास्वामी पारामेस्वरण यांचे निधन झाले होते.
  • १९९८: परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
  • २०१३: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
  • २०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)
  • २०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

‘गुगल मॅप’ ने चुकीचा रस्ता दाखवल्याने अपघात होऊन तिघांचा मृत्यू

   Follow us on        
नवीन ठिकाणी वाहनाने प्रवास करायचा असल्यास आपण सरार्स पणे गुगल मॅपचा वापर करतो. या आधुनिक सुविधेमुळे निश्चित स्थळी पोचण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग गुगल मॅप आपल्याला दाखवते आणि आपला प्रवास जलद आणि सोयीचा होतो. मात्र या आधुनिक सुविधेवर १००% विश्वास दाखवणेही जीवघातक ठरू शकते. असे केल्याने उत्तरप्रदेशातील बरेली येथे अपघात होऊन तिघांचा जागीच मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
उत्तरप्रदेशातील बरेली येथे तिघेजण एक लग्नसमारंभ आटोपून घरी जायला निघाले होते. मार्ग समजण्यासाठी त्यांनी गुगल मॅप सुरु केला होता. मात्र या मॅप च्या दिशादर्शकाने त्यांना खल्लपुर-दातागंज येथे एका पुलाकडे जाणारा रस्ता दाखवला. मात्र हा पूल निर्माणाधीन असल्याने अपुरा होता. गाडी वेगाने असल्याने अंतिम क्षणी तिला नियंत्रित करणे शक्य झाले आणि गाडी पुलावरून खाली पडून मोठा अपघात झाला ज्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Loading

Facebook Comments Box

Maharashtra Assembly Election: सत्तेत येण्याचा दावा करणारी मनसे पुन्हा अपयशी

   Follow us on        

Maharashtra Assembly Election:महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उत्तरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण
मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला.
मनसेच्या मतांचा टक्का घसरला
मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ५.७१ टक्के मते मिळाली होती. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. सन २०१९च्या निवडणुकीत हाच टक्का अवघा २.२५ टक्के राहिला. यंदा त्यात आणखी घट झाली असून मनसेचा जनाधार आता अवघ्या १.५५ टक्के इतका तुटपुंजा आहे.

Loading

Facebook Comments Box

Maharashtra Assembly Election: संख्याबळाअभावी विरोधी पक्षनेता नाही?

   Follow us on        

Maharashtra Assembly Election:विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेते पदच नसणार आहे. या अगोदर लोकसभेत २०१४ आणि २०१९ निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेते पद नव्हते. आता राज्यात हे पद नसणार आहे.

राज्य विधीमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागांच्या दहा टक्के जागा मिळणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात  घेता महाविकास आघाडीतील विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाकडे तेवढे संख्याबळ नाही, काँग्रेसकडे सध्या १९, शिवसेना उबाठाकडे १९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १३ जागा आहेत.

Loading

Facebook Comments Box

Maharashtra Assembly Election Statistics: पक्षनिहाय मतदान टक्केवारीत चित्र काहीसे वेगळे.

   Follow us on        
यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला आहे. एकूण  १३२ जागा जिंकून तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर त्यानंतर जागा जिंकण्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी बाजी  मारली आहे.
मात्र पक्षनिहाय मतदान टक्केवारीत चित्र काहीसे वेगळे आहे.
पक्षनिहाय मतदान टक्केवारीतही  भाजप राज्याच्या मतांच्या २६.७७% मते घेऊन क्रमांक १ वर आहे. तर १२.४२% टक्क्यानिशी दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. शिवसेना शिंदे गट एकूण मतांच्या १२.३८% मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकूण मतांच्या १.५५% वाटा भेटला असला तरी तिला त्याचे रूपांतर एकाही विजयी जागेत करता आले नाही.
पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी
क्र. पक्ष टक्केवारी
1 भारतीय जनता पार्टी – भाजपा 26.77%
2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 12.42%
3 शिवसेना 12.38%
4 राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार 11.28%
5 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 9.96%
6 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) 9.01%
7 महाराष्ट्र नवनिर्माण सेना 1.55%
8 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन 0.85%
9 नोटा 0.72%
10 बहुजन समाज पार्टी 0.48%
11 समाजवादी पक्ष – सपा 0.38%
12 भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) 0.34%
13 इतर 13.86%

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search