Video: लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये आढळल्या अळ्या

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडीतील कलंबीस्त गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आलेल्या एका फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये किडे सापडले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर येथील जागृत ग्रामस्थांनी त्या विक्रेत्याला धारेवर धरले आहे.

याबद्दल जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने यात आपली काही चूक नसून या खाद्यपदार्थांची मी फक्त विक्री करत आहे असे सांगितले. त्याने जेथून हे खाद्यपदार्थ विकत घेतो त्या व्यावसायिकाचे नावही सांगितले.

या प्रकारामुळे या विक्रेत्यांकडून हे पदार्थ विकत घेणार्‍या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पदार्थ बनवताना योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा व्यावसायिकांवर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर पुढे या निष्काळजीपणामुळे जीव गमावण्यांची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने अन्नसुरक्षेसाठी FSSAI या संस्थेची नियुक्ती स्थापना केली आहे. या संस्थेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Loading

Facebook Comments Box

११ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 08:16:45 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 26:16:15 पर्यंत
  • करण-बालव – 08:16:45 पर्यंत, कौलव – 20:42:12 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-अतिगंड – 13:16:50 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:52
  • सूर्यास्त- 18:45
  • चन्द्र-राशि-कर्क – 26:16:15 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:25:00
  • चंद्रास्त- 29:37:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • वर्ल्ड प्लंबिंग डे (जागतिक नळसरचना दिन)
महत्त्वाच्या घटना :
  • 1818 : ब्रिटीश सैन्याने पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
  • 1886 : आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना फिलाडेल्फिया विद्यापीठात डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली.
  • 1889 : पंडिता रमाबाईंनी मुंबईत शारदासदन ही विधवा आणि कुमारींसाठी शाळा सुरू केली.
  • 1918 : मॉस्कोला रशियाची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.
  • 1935 : बँक ऑफ कॅनडाची स्थापना झाली.
  • 1984 : ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
  • 1993 : उडिया कवी व साहित्यिक रमाकांत रथ यांना उपराष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सरस्वती सन्मान पुरस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1999 : इन्फोसिस ही नॅसडॅक ( Nasdaq ) शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी पहिली भारतीय कंपनी ठरली.
  • 2001 : बॅडमिंटनपटू पी. गोपीचंद यांनी जवळपास एकवीस वर्षांनी भारतासाठी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • 2001 : हरभजन सिंग कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी ही कामगिरी केली.
  • 2011 : जपानमधील सेंदाईच्या पूर्वेला 8.9-रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे प्रचंड सुनामी आली. जपानमध्ये हजारो लोक मरण पावले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1873 : ‘डेव्हिड होर्सले’ – युनिव्हर्सल स्टुडिओ चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1933)
  • 1912 : ‘शं. गो. साठे’ – नाटककार यांचा जन्म.
  • 1915 : ‘विजय हजारे’ – भारतीय क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार यांचा जन्म. (मृत्यू: 18 डिसेंबर 2004)
  • 1916 : ‘हॅरॉल्ड विल्सन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1995)
  • 1942 : ‘कॅप्टन अमरिंदर सिंह’ – पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री
  • 1985 : ‘अजंता मेंडिस’ – श्रीलंकेचा गोलंदाज यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1689 : ‘छत्रपती संभाजी राजे भोसले’ – मराठा साम्राजाचे दुसरे छत्रपती यांचे निधन. (जन्म: 14 मे 1657)
  • 1894 : ‘कार्ल स्मिथ’ – जर्मन रसायन शास्रज्ञ (जन्म 13 जून 1822)
  • 1955 : ‘अलेक्झांडर फ्लेमिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 6 ऑगस्ट 1881)
  • 1957 : ‘रिचर्ड ईव्हेलिन बर्ड’ – दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर जाणारे पहिले अमेरिकन वैमानिक आणि समन्वेशक यांचे निधन.
  • 1965 : ‘गौरीशंकर गोवर्धनराम जोशी’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1892)
  • 1970 : ‘अर्लस्टॅनले गार्डनर’ – अमेरिकन लेखक आणि वकील यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1889)
  • 1969 : ‘यशवंत कृष्ण खाडिलकर’ – संपादक यांचे निधन.
  • 1993 : ‘शाहू मोडक’ – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म: 25 एप्रिल 1918)
  • 2006 : ‘स्लोबोदान मिलोसोव्हिच’ सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 20 ऑगस्ट 1941)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार पाटणा – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस

   Follow us on        
Konkan Railway: होळी उत्सव – २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल या गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे  घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
१) गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल:
ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल मंगळवार, ११/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार, १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २० एलएचबी कोच = दोन टायर एसी – ०१  कोच, थ्री टायर एसी – ०५  कोच, स्लीपर – १२  कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
Facebook Comments Box

अर्थसंकल्प २०२५ : महायुती सरकारच्या महत्वाच्या घोषणा कोणत्या?

   Follow us on        

अर्थसंकल्प २०२५ : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर करण्यात आला आहे. राज्यातील नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात देखील अनेक घोषणांचा अक्षरश:पाऊस पाडण्यात आला आहे.

उद्योग विकास :

  • महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार, त्यानुसार ५ वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व ५० लाख रोजगार निर्मिती
  • केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार नवीन कामगार नियम तयार करण्यात येणार
  • 10 हजार एकराहून अधिक क्षेत्रावर समर्पित लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करणार
  • मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे “ग्रोथ हब” म्हणून विकसित करणार, वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण करणार, मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलरवरून सन 2030 पर्यंत ३०० बिलीयन डॉलर, तर सन 2047 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट
  • गडचिरोली जिल्हा “स्टील हब” म्हणून उदयास येणार, गडचिरोली जिल्ह्यातील खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित करण्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे 500 कोटी रुपये
  • सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत 6 हजार 400 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान
  • ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत
  • राज्यात “महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन” ची स्थापना
  • नागपूर येथे “अर्बन हाट केंद्रां”ची स्थापना
  • नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर-इनोव्हेशन सिटीपायाभूत सुविधा विकास
  • पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26 टक्के सहभाग
  • वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडणार
  • काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु होणार
  • गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत प्रवासाकरिता बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण

पायाभूत सुविधा विकास

  •  पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराच्या विकासात राज्य शासनाचा 26 टक्के सहभाग
  • वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ, वाढवण बंदराजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक, हे बंदर समृध्दी महामार्गालाही जोडणार
  • काशिद- जिल्हा रायगड येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु होणार
  • गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत प्रवासाकरिता बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन धोरण
  • महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 400 कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित शोअर प्रकल्प
  • महाराष्ट्र शाश्वत पर्यावरणपूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या 450 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे 158 कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता
  • अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करणार
  • आशियाई विकास बँक प्रकल्प, टप्पा-3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6 हजार 589 कोटी रुपये किंमतीची 23 कामे हाती घेणार.
  • सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत 36 हजार 964 कोटी रुपये किंमतीची 6 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे
  • प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3, सन 2025-26 साठी 1500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3, एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या 3,582 गावांना 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडणार-प्रकल्प किंमत 30 हजार 100 कोटी रूपये
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गालगत अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित करणार, प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना होणार
  • महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या 86 हजार 300 कोटी रुपये किंमतीच्या 760 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाची भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर
  • ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग उभारणार.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू- वांद्रे ते वर्सोवा- 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे, 2028 पर्यंत पूर्ण करणार
  • उत्तन ते विरार सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
  • पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेणार
  • तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग- 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित

मेट्रो

  • मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण 143.57 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित-सुमारे १० लाख प्रवाशांचा रोज लाभ
  • येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार, येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार
  • नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात 6 हजार 708 कोटी रुपये किंमतीचे 43.80 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर

विमानतळ

  • छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार
  • नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85 टक्के काम पूर्ण एप्रिल, 2025 मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार
  • नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण
  • शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटी रुपये किंमतीच्या विकास कामांना मान्यता- नाईट लँडिगची सुविधाही लवकरच सुरु करणार
  • अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण – 31 मार्च, 2025 पासून प्रवासी सेवा सुरु करणार
  • रत्नागिरी विमानतळाची 147 कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर
  • गडचिरोली येथील नवीन विमानतळाच्या सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे सुरु
  • अकोला विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार
  • 6 हजार डिझेल बसचे रुपांतर सीएनजी आणि एलएनजी बसमध्ये करणार- नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य

कृषि व संलग्न क्षेत्रे

  •  नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा- २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येणार-त्यासाठी ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय
  •  “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी
  • महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर
  • जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत ५ हजार ८१8 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची एकूण १ लाख 48 हजार 888 कामे हाती घेणार, अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करणार
  • “गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार” योजना कायमस्वरुपी राबविणार
  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता -अंदाजित किंमत 88 हजार ५७4 कोटी रुपये -लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर
  •  नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ-प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये
  • दमणगंगा -एकदरे -गोदावरी या 2 हजार 300 कोटी रूपये किंमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार
  • तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ
  • कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार, मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
  • सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना-1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता
  • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
  •  38 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार – 2.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 90 हजार रोजगार निर्मिती
  • मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज
  • राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत २ लाख १३ हजार ६२५ लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी २५५ कोटी रुपयांचा निधी
  • नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रियेचा 8 हजार 2०० कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
  • बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात ४ हजार ३०० कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार
  •  “आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2025” राज्यात विविध कार्यक्रम, महोत्सव  आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध देणार
  •  2100 कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार
  • राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0” हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार
  • शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार
  • बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार

सामाजिक क्षेत्र

  •  “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – 2 अंतर्गत  घरकुल बांधणीच्या अनुदानात राज्य शासनाकडून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार
  • प्रधानमंत्री आवास योजना – शहरीसाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी
  • पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेतून छतावरील सौर उर्जा संच खरेदीसाठी अनुदान
  • अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन – ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करुन स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करणार
  • जलजीवन मिशन योजनेसाठी सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता 3 हजार 939 कोटी रुपये नियतव्यय
  • गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे 37 हजार 668 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प राबविणार
  • स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, टप्पा-2 साठी सन 2025-26 मध्ये त्यासाठी 1 हजार 484 कोटी रुपये नियतव्यय
  • ठाणे येथे 200 खाटांचे, रत्‍नागिरी जिल्ह्यात १०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्‍णालय, रायगड जिल्ह्यात २०० खाटांचे अतिविशेषोपचार रुग्‍णालय उभारणार
  • धनगर तसेच गोवारी समाजाकरिता आदिवासी उपयोजनेच्या धर्तीवर एकूण 22 कल्याणकारी योजना राबविणार
  • अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी
  • दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1 टक्‍के निधी राखीव
  • विविध समाजाच्या उन्नतीसाठी 18 महामंडळांच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप, सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय, अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार
  • 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दीष्ट
  • प्रत्येक जिल्ह्यात एक “उमेद मॉल” उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांसाठी 150 कोटी रुपयांचा निधी देणार
  • शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करणार
  • क्रीडा संकुलांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1 टक्‍का निधी राखीव
  • पोलीस आयुक्त, बुहन्मुंबई यांच्या कार्यालयात कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारीत नवे हायटेक कमांड कंट्रोल सेंटर स्थापन करणार
  • सायबर सुरक्षेसाठी महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ स्थापन करणार
  • राज्यात 18 नवीन न्यायालयांची स्थापना

पर्यटन व स्मारके

  • पर्यटन धोरण-2024 च्या माध्यमातून 10 वर्षात पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
  • आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
  • आंबेगांव, पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये निधी
  • कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे उभारणार
  • मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानिपत येथे स्मारक
  • चैत्यभूमी दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकासाठी पुरेसा निधी
  • भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारणार
  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 220 कोटी रुपयांचा निधी
  • आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगांव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारणार
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगांव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील स्मारकासाठी पुरेसा निधी
  • सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने “नमामि गोदावरी” अभियानाचा आराखडा तयार
  • कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना
  • नाशिक येथे रामकाल पथविकास प्रकल्पांतर्गत रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 146 कोटी 10 लाख रुपये
  • दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे 45 ठिकाणे रोप-वेव्दारे जोडण्यात येणार
  • महानुभव पंथाच्या श्रध्दास्थानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार
  • रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरण, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
  • ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार

दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन,

3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह

अनुवाद अकादमी स्थापन करण्यात येणार

Facebook Comments Box

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.
Facebook Comments Box

१० मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 07:47:23 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 24:52:10 पर्यंत
  • करण-विष्टि – 07:47:23 पर्यंत, भाव – 19:58:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 13:55:54 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय- 06:53
  • सूर्यास्त- 18:45
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 15:28:59
  • चंद्रास्त- 28:57:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1922: ‘महात्मा गांधींना’ प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1922 : चीनने परमाणु अप्रसार संधीवर हस्ताक्षर केले होते.
  • 1929: मिस्र देशाच्या सरकारने देशातील महिलांना घटस्फोटाचे मर्यादित अधिकार दिले
  • 1945 : दुसऱ्या महायुद्धादरम्यान, अमेरिकन हवाई दलाने जपानची राजधानी टोकियोवर जोरदार बॉम्बहल्ला चढवला. त्यामुळे टोकियोतील एक लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता
  • 1952: केंद्रीय मंत्री ‘काकासाहेब गाडगीळ’ यांनी पिंपरी येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलीन कारखान्याची पायाभरणी केली.
  • 1969 : गोल्डा मीर यांची इस्रायलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.
  • 1969 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना (CISF)
  • 1972: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
  • 1977: युरेनसला शनीच्या सारखे कडा असल्याचे आढळून आले.
  • 1985: रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट संघाकडून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब देण्यात आला.
  • 1998: भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने लिनरेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
  • 2010: भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1628 : इटालियन डॉक्टर ‘मार्सेलिओ माल्पिघी लादेन’ यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1694)
  • 1918: गायक आणि अभिनेते ‘सौदागर नागनाथ गोरे’ उर्फ ‘छोटा गंधर्व’ यांचा जन्म. (मृत्यू: 31 डिसेंबर 1997)
  • 1929: कवी ‘मंगेश पाडगावकर’ यांचा जन्म.
  • 1945: केंद्रीय रेल्वे मंत्री – ‘माधवराव शिवाजीराव शिंदे’ यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2001 – मैनपुरी, उत्तर प्रदेश)
  • 1957: अलकायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक – ओसामा बिन लादेन जन्म. (मृत्यू: 2 मे 2011)
  • 1974: ट्विटर चे सह-संस्थापक – ‘बिझ स्टोन’ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1872 : इटालियन स्वातंत्र्यसैनिक ‘जोसेफ मॅझिनी’ यांचे निधन (जन्म: 22 जून 1805)
  • 1897 : पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: 3 जानेवारी 1831)
  • 1940 : रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.
  • 1959 : पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1873)
  • 1971 : कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1894)
  • 1985 : सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टँटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1911)
  • 1999: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1912)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Konkan Railway: पुणे – कल्याण – सावंतवाडी विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत

पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड

रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: उधना – मंगळुरू विशेष एक्सप्रेसला अतिरिक्त कोच

   Follow us on        
Konkan Railway: प्रवाशांची  अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर होळी सणासाठी चालविण्यात आलेल्या गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन मंगळुरू-  उधना जंक्शन  या गाडीला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे. याबद्दल अधिक तपशील खालीलप्रमाणे
१. उधना जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला ०९ मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
२. मंगळुरू जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला १० मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हातील रेल्वे स्थानकांवरील समस्या मार्गी लावणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसांत स्टेशन पाहणी दौरा करू, तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग व वैभववाडी स्थानकातील पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.
सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. सा. बां. विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: असनिये गावात पट्टेरी वाघाचा वावर?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: असनिये गावात कणेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका घराच्या आवारात कुत्र्याचा जंगली प्राण्याने फडशा पडला असल्याची घटना समोर आली आहे. हा जंगली प्राणी पट्टेरी वाघ असल्याचे ग्रामास्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे असनिये परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कणेवाडी येथील दिनेश सावंत यांच्या घरातील कुत्रा रात्री अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा माग काढला असता त्याला घराच्या आवारात पटेरी वाघाच्या पायाचे अनेक ठसे मिळाले. या परिसरात पट्टेरी वाघ अनेक वेळा ग्रामस्थांना दृष्टीस पडत असून हा बिबट्या नसून पटेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी या पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे ही टिपले. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी आणि लाकडांसाठी जंगलात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

पट्टेरी वाघ कि बिबट्या?

दरम्यान याबाबत निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक तसेच बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी टिपलेले हे ठसे पट्टेरी वाघाचे नसून ते बिबट्याचे आहेत. तसेच वाघ जंगलातून भर वस्तीत येऊन शिकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा बिबट्या असल्याचे सांगितले.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search