सिंधुदुर्ग | शाम जोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.
कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत.
अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्या पर्यटकांना होणार आहे.
Konkan Railway News |यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेचे आगावू आरक्षण १६ मे पासून चालू झाले आहे. भाविकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरक्षण चालू होताच अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल होत आहे. आज १९ मे रोजी दिनांक १६ सप्टेंबर चे आरक्षण चालू झाले होते. मात्र काही मिनिटांत कन्फर्म तर सोडाच वेटिंग लिस्ट चे तिकीट मिळणे कठीण झाले होते. कारण जवळपास सर्वच गाड्यांचे, सर्व श्रेणीचे आरक्षणाचे स्टेटस ‘Regret’ दाखवत आहे. त्यामुळे अनेकांच्या त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशाच पडली आहे.
यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३, रोजी मंगळवारी आहे. यावर्षी अंगारक योग जुळून आला आहे, त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या गावी जाण्याची शक्यता आहे. आज १६ सप्टेंबर, शनिवारचे आरक्षण खुले झाले होते. सहाजिकच आज अपेक्षेप्रमाणे मागील २/३ दिवसांच्या तुलनेत रेल्वे सीट आरक्षणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे.
सिंधुदुर्ग |कुडाळ तालुक्यातील साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर मध्ये वार्षिक उत्सवाचे आयोजन दि. 20 मे व 21 मे रोजी केले आहे. शनिवार दि. 20 मे 2023 रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन केले आहे. रात्रौ 8:30 वाजता लहान मुला मुलींचे, महिलांचे नृत्य, गायन, वादन असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
रविवार दि. 21 मे 2023 रोजी रात्रौ 8:30 वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ चा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सावंत कुलस्वामि मंडळ ( भांडारसावंतवाडी साळगाव ) ने केले आहे.
- Train no. 12202 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express ही गाडी २१/०५/२०२३ रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे.
- Train no. 12201 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express ही गाडी २२/०५/२०२३ रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे.
- Train no. 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddinही गाडी २१/०५/२०२३ रोजी थ्रिसूर ते एर्नाकुलम या स्थानकांदरम्यान रद्द करण्यात आलेली आहे.
- Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Express ही गाडी दिनांक २१/०५/२०२३ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल या स्थानकावरून आपल्या नियमित वेळापत्रकाच्या वेळेपेक्षा सुमारे ३ तास उशिरा दुपारी १२:१५ वाजता सुटेल.
- Train no. 20909 Kochuveli – Porbandar Express ही गाडी दिनांक २१/०५/२०२३ रोजी तिरुवनंतपुरम सेंट्रल या स्थानकावरून आपल्या नियमित वेळापत्रकाच्या वेळेपेक्षा सुमारे 1 तास ३५ मिनिटे उशिरा दुपारी १२:४५ वाजता सुटेल.
Konkan Railway News |गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मेल-एक्स्प्रेससाठी तिकीट आरक्षणाची लगबग सुरू झाली आहे. यंदा गणरायाचे आगमन १९ सप्टेंबर रोजी होणार असून १६ मे २०२३ पासून रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी आरक्षण सुरु झाले आहे. परंतु रेल्वे गाड्यांचे आरक्षण अगदी काही मिनिटात फुल्ल होत आहे. त्यामुळे अनेकांच्या पदरात निराशा पडत आहे. तर काही प्रवासी प्रतीक्षा यादीत तिकीट काढत आहेत; त्यामुळे प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० च्या घरात गेली आहे. तर काही गाड्यांची वेटिंग लिस्ट पण बंद होऊन Regret स्थिती दाखवत आहे.
कोकण मार्गावर सर्वाधिक लोकप्रिय असलेली कोकणकन्या एक्सप्रेस, मंगुळुरु एक्सप्रेस या गाड्यांच्या १५ सप्टेंबरची स्लीपर श्रेणीची कणकवली पर्यंतची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे. तर तुतारी, जनशताब्दी, एलटीटी-मडगाव या गाड्यांची आरक्षण प्रतीक्षा यादी २०० च्या वर गेली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षण स्थिती Regret दाखवत आहे.