Kokan Railway Updates: गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवत आहेत. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी पाहता याही गाड्या अपुर्या पडताना दिसत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या डब्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
खालील गाड्यांना यापुर्वी जाहीर केलेल्या डब्यांव्यतिरिक्त प्रत्येकी २ सेकंड स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत.
दिनांक ०३ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ विशेष
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद विशेष
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरु जं. विशेष
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरु जं. – अहमदाबाद विशेष
Vision Abroad