यात राजकारण आणून मुंबईकरांवर अन्याय करू नका असे ते म्हणाले.
”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे आज ईश्वर साक्षीने शपथ घेतो…… ” अशा शब्दांनी सुरवात करून आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे ३० वे मुख्यमंत्री म्हणुन आज संध्याकाळी शपथ घेतली.
त्यांच्या बरोबर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आपण मंत्रिमंडळात सामील न होता बाहेरूनच सरकार चालवायला आवश्यक ते सहकार्य करेन अशी त्यांनी भूमिका ह्या आधी मांडली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहास्तव त्यांनी आपला निर्णय बदलला आणि महाराष्ट्र राजच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली आहे.
आज संध्याकाळी राजभवन मध्ये शपथ विधीचा कार्यक्रम पार पाडला गेला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शपथ दिली.
महाराष्ट्रातील सध्याची राजकिय परिस्थिती पाहून केंद्राने शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढविली आहे.
या आधी त्या सर्व आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. पण उद्या शिंदे गटातील आमदार गोव्यातून मुंबईला येणार आहेत. तसेच उद्या मविआ सरकारची बहुमत चाचणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आज ३ विशेष विमानांतून केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) २००० जवान मुंबई मध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय राज्य पोलिसांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातून गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आलाय. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. शिवसेनेच्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रक्षोभक भाषणे करू नये तसेच बॅनरबाजी व ईतर गोष्टी ज्यामुळे वातावरण बिघडले जाण्याची शक्यता आहे असे कोणतीही वर्तन करू नये अशा आशयाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
शिंदे गटाचे प्रवक्ते शिवसेना आमदार यांनी twitter वर एका पत्राद्वारे आपली आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची भूमिका मांडली आहे. ते लिहितात……..
हिंदुत्वाच्या रक्षणासाठी…..
बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा.
गेल्या ५ दिवसांपासून शिवसेनेचे राजकारण ढवळून निघाले आहे. आम्ही वंदिनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे, शिवसेनेचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर का पडलो, तर घाण ठरलो, डुकरे ठरलो. आमच्याच भरवशावर राज्यसभेत बसलेले रोज विखारी भाषा वापरतात. आता तर त्यांना आमच्या मृतदेहांची आस लागली आहे. कळीचा मुद्द्दा हाच आहे आणि गुवाहाटीत बसून आमचा, शिवसेनेचा आवाज बुलुंद करण्याचे तेच खरे कारण आहे, तीच या सन्मानाच्या लढाईची पार्श्वभूमी आहे. हे बंद नाही तर शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. अर्थात आमच्या नेतृत्वाला हे समजून उमजत नाही, हेही आमचे मोठे दुःख आहेच. आज आम्हाला विकले गेलेले ठरविणारे कोण, केव्हा, कसे आणि कुणाला विकले गेले, हे थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न.
आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्याची पाळेमुळे जुनी आहेत. शिवसेना आणि भाजपाची युती अतिशय जुनी. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढलो. शिवसेनेची ताकद होतीच, पण सोबतच नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या परिश्रमामुळे शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्रित लढवायचे ठरवले होते. त्यावेळी युवानेते आदित्यजी ठाकरे यांनी +१५१ ची घोषणा दिली होती. अशात भाजपने १४० जागांचा प्रस्ताव दिला होता. पण वाटाघाटींनंतर भाजपने १२७ जागा घायचा आणि शिवसेनेला १४७ जागा द्यायच्या यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेची ताकद होतीच पण ४ जागांचा आग्रह सोडला गेला नाही. शेवटी जे व्हायला नको तेच झाले. दीर्घकाळाची युती तुटली आणि आम्हाला वेगवेगळ्या निवडणुका लढवाव्या लागल्या. येथे एक बाब आर्वजून नमूद केली पाहिजे कि, २०१४ ची निवडणूक असो कि, २०१९ नंतर राज्यात उद्भवलेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत कि भाजपचे केंद्रीय अथवा अगदी राज्यस्तरावरील नेते अगदी कुणीही आमचे आदर्श वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही.
पुढे काही दिवसातच शिवसेना आणि भाजप पुन्हा सोबत आली. केंद्रात आमचेही मंत्री झाले. पण, हाच तो कालखंड होता, जेहवापासून संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपच्या सरकारवर टीका करण्याचा विषारी क्रम चालू केला. म्हणजे केंद्रात मंत्रीपदे घ्यायची, मोदींच्या मंत्रिमंडळात राहायचे आणि मोदींवर जहरी टीका सुद्धा करायची, यातून दोन्ही पक्षातील दरी वाढवण्याच्या कामाला पद्धतशीर रित्या सुरवात झाली. याही काळात आम्ही वेळोवेळी पक्ष नेतृत्वाला या बाबी लक्षात आणून देण्याचे काम करीत होतो. पण, त्याचा काही परिणाम होत नव्हता. दररोज अतिशय घाणेरड्या शब्दात टीका होतच राहायची. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा देशातील अन्य विरोधी पक्ष सुद्धा जी भाषा वापरात नाही ती भाषा आमच्या संजय राऊतांच्या तोंडात कायम असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा तर वाढतच होती पण शिवसेना सुद्धा आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीतच होती. या वाटचालीत हिंदुत्वाचा विचार अजून भक्कम होत होता, याचा आम्हाला अधिक आनंद होता. शेवटी युती, आघाड्या यापेक्षाही आपला आक्रमक हिंदुत्व बाणा, हि बाळासाहेबांची पहिली आणि अंतिम शिकवण आहि आणि यापुढीचे तीच आजन्म राहील. आमचा जन्म असो कि मृत्य हिंदुत्वाची चादर पांघरूनच होईल.
हळूहळू शिवसेनेच्या राजकारणाने प्राप्त करणे प्रारंभ केले होते. राजकारणाची दिशा बदलत होती. हे राजकारण शिवसेनेच्या वाढीसाठी आणि हिंदुत्वाच्या वाढीसाठी अनुकूल असते तर ते किमान समजूनही घेता आले असते. हे सत्तेचे राजकारण असते तर एकवेळ तेही समजून घेतले असते. पण, सत्ता कशाच्या बळावर तर स्वतःला संपवून? हे आम्हाला कदापिही मान्य नाही. शिवसेनेचे अस्तित्व राहणार नसेल तर मिळणारी पदे आणि सत्ता काय कामाची?
आमचा लढा सत्तेसाठी नाही, सत्तेत तर आम्ही होतोच. पण संजय राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष जर शरद पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तिव काय उरेल.
ज्या काश्मीरच्या प्रश्नावर वंदनीय हिंदुह्रिदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली, नव्हे काश्मिरी पंडितांना महाराष्ट्रात निमंत्रण दिले, त्या कलम ३७० च्यावेळी उघडपणे आमच्या नेत्यांना बोलता येऊ नये, इतकी वाईट अवस्था? सोनिया गांधी आणि शरद पवाय यांना खुश करण्याच्या नादात आम्ही आमचा आत्मसन्मान घालवायचा का? सर्व महत्वाची खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देऊन टाकायची आणि मुख्यमंत्री पद तेवढे ठेवायचे. दाऊदशी संबध असल्याचा आरोप असलेल्या नेत्याचा बचाव करायचा तरी कसा? राज्यसभा निवडणुकांतही या पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवारांना हरवायचे. मग करायचे तरी काय? नुसते सहन करीत बसायचे?
दुर्दैव म्हणजे जे कधीही जनतेतून निवडून आले नाहीत, ते संजय राऊत पक्ष संपवायला निघाले आहेत. संजय राऊत हेच शरद पवारांच्या गळ्यातील ताईत आहेत. भाजपापासून तुम्ही कदाचित शिवसेनेला दूर नेऊ शकाल., पण हिंदुत्वापासून शिवसेना दूर नेणार असाल तर ते आम्ही कसे खपवून घ्यायचे?आणि दुर्दैव म्हणजे याच संजय राऊतांचे ऐकुन पक्ष चालणार असेल तर आणि आमच्या सारख्या अनेकदा निवडून आलेल्या आमदारांना दूर ढकलण्यात येत असेल तर करायचे तरी काय? उद्धवजी आणि आमच्यात दरी वाढविण्याचे काम संजय राऊतांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची, त्यासाठी खांदा संजय राऊतांचा खांदा वापरायचा आणि त्यातून मारले जाणारे कोण तर पक्षाचे शत्रू नाही तर आपणच. आम्हाला हे मान्य नाही म्हणुन आमचा हा लढा हा शिवसेनेचा आहे, शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा आहे, शिवसेनेच्या अस्तित्वाचा तसेच मराठी आणि हिंदू संस्कृतीच्या अस्मितेचा आहे. हे बंड नाही हा शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा आहे आणि तो जिंकल्याशिवाय आता माघार नाही. म्हणुन महाराष्ट्राच्या सदिच्छांचे आणि आशिर्वादाचे बळ आम्हाला लाभते आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. शिवसेनेचे आणि आमचे पक्षनेते उद्धव साहेबांनी आमच्या आग्रहाचा विचार करावा आणि विद्यमान आघाडी सोडून भाजपसोबत युती करावी. महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेल्या युतीचे पुनर्जीवन करावे.
आम्ही संपणार नाही, आम्ही थांबणार नाही, महाराष्ट्राला पुन्हा नवीन उंचीवर नेऊन ठेवल्याशिवाय आता माघार नाही. जय महाराष्ट्र
दीपक केसरकर
शिंदे गटातील आमदारांचे संरक्षण काढण्याचे आदेश सरकारने दिले आहेत अशी Tweet प्रसारित होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटर च्या माध्यमातून ह्या वर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी खालील शब्दात एक एक ट्विट प्रकाशित केली आहे.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.
ह्या ट्विट वर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांना निलंबनाची कारवाई चालू असलेल्या १६ आमदारांनी सही केलेले आपली सुरक्षा काढू नये अशा विनंतीचे पत्र पब्लिश केले आहे. ह्या पत्रात ते म्हणतात
” आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केलं जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकासआघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झालं आहे”,
दरम्यान ह्या सर्व घडामोडींवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ते म्हणतात की असा कोणताही आदेश अजून पर्यंत कोणाकडून दिला गेला नाही आहे. या संदर्भात ट्विटर वर केले जाणारे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत.
रेल्वेने आपल्या नियमांमध्ये एक बदल केला आहे. आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे रेल्वे च्या प्रवासामध्ये काही नियम लागु केले गेले होते. त्यातील जनरल तिकिट बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता. जनरल तिकीट च्या बदल्यात आरक्षित तिकिटे देण्यात येत होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाला पण रेल्वेने आपल्या निर्णयात बदल केले नाही होते. पण आता प्रवाशांच्या मागणीमुळे रेल्वेने हा नियम आता रद्द केला आहे.
येत्या २९ जून पासून रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल पोर्टल वर उपलब्ध होतील.
२९ जूनपासून तुम्ही हे तिकीट काढू शकता. मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचं जनरल म्हणजे रिझर्व्हेशन शिवाय मिळत होतं. पण आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल अॅपद्वारे हे जनरलचं तिकीट मिळणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह भावनिक आवाहन करूनही शिवसेनेचे अजून ६ आमदार ”Not Reachable” आहेत.
यात शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादर मधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर, चांदिवली विभागातील आमदार दिलीप लांडे हे सर्व Not Reachable असून सूरत मार्गे गुवाहाटी ला रवाना झाले असे सांगण्यात येत आहे.
मी मुख्यमंत्री पद काय शिवसेना प्रमुख हे पद ही सोडायला तयार आहे असे उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भावनिक वक्तव्यामुळे आणि त्यानंतर वर्षा बंगला सोडण्याच्या निर्णयामुळे गेलेले आमदार पुन्हा येतील अशी अपेक्षा होती पण शिवसेनेसाठी परिस्थिती खूपच वाईट होत चालली आहे.
आमदार एकनाथ शिंदे आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती नको आहे. पण उद्भव ठाकरे यांच्या कालच्या भाषणात त्यांनी ही युती तोडण्याबाबत काही विधान केलेले नाही आहे. उलट काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी आपल्या साठी खूप काही केले त्याचा उल्लेख त्यांनी केला होता.
आता ह्या होणार्या घडामोडी नंतर महाराष्ट्राचे राजकारण कोणते वळण घेते यावर सर्व महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागले आहे.
आम्ही शिवसेना सोडली नाही आहे. पण शिवसेनेने जे धोरण अंगिकारले आहे ते चुकीचे आहे आणि त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे असे शिवसेनेचे आमदार श्री. एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे.
त्यांनी आताच एक ट्विट पब्लिश केली आहे. त्यात काय त्यांनी पुढील मुद्दे नमूद केले आहेत.
- गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
- घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
- पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
- महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
Content Protected! Please Share it instead.