कोल्हापूर – प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गासंबंधी एक महतवाची बातमी आहे. या मार्गाचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी दिली. लल्लन हे शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
१०७ किलोमीटरच्या या मार्गाचे याआधीही सर्वेक्षण झाले आहे. आता या मार्गाचे अंतर २८ किलोमीटर ने वाढणार आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी घाट असल्याने उतार जास्त आहेत. हे उतार कमी करण्यासाठी फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे लालवाणी यांनी सांगितले. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, स्वप्नील नीला, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी, जयेश ओस्वाल उपस्थित होते.
२०१५ मध्ये नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जे. पी. इंजिनियरिंग कंपनीला देण्यात आले. या कंपनीने गुगल मॅपचा आधार घेत अतिशय खडतर असलेल्या या मार्गाचे सर्वेक्षण अवघ्या काही महिन्यांत पूर्ण केले. मंत्री श्री. प्रभू २०१६ मध्ये यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची घोषणा करीत १०७ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात ३ हजार २०० कोटीची घोषणा केली.एवढेच नाही तर अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतूद देखील केली होती. रेल्वेमंत्री प्रभू असल्यामुळे त्या कामाला गती मिळेल आणि मार्गाला मूर्तस्वरूप येईल, अशी धारणा सर्वसामान्यांची होती; मात्र अवघ्या काही महिन्यांत श्री. प्रभू यांना काही कारणास्तव केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि त्याचबरोबर वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या प्रकियेलाच खीळ बसली. प्रकल्पाच्या घोषणेनंतर आता तब्बल सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या सात वर्षांत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग पूर्णत्वास जाईल, अशी कोणतीही हालचाल सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू नाही. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग एक स्वप्नच ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र ललवाणी यांच्या वक्तव्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांच्या या मार्गाबद्दलच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.

Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Facebook Comments Box