रत्नागिरीकरांसाठी २१ दिवसीय मोफत योग शिबिराचे आयोजन

   Follow us on        
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात पार पडणार योग शिबिर 
नवीन वर्ष सुरू होतंय..प्रत्येकजण मनाशी एक नवीन निश्चय करत असतो. तर मग विचार कसला करताय रत्नागिरीकरांनो ..कारण नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची एक नामी संधी उपलब्ध होणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात संपन्न होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबिर १ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज सायं ०५ वाजता होणार आहे.मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरी करांना प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक नागरिकांनी  दिलेल्या लिंक वर https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9
 क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा
Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; ७ प्रवासी जखमी

   Follow us on        

Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले

Facebook Comments Box

Revas-Reddi Coastal Highway: रेवस रेडी सागरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होणार – खासदार सुनील तटकरे

   Follow us on        
अलिबाग: कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्‍या रेवस रेडी सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामात  गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या महामार्गामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होवू शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुसर्‍या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील 12 बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत.
या 12 विकसीत होणार्‍या बंदरांमध्ये पालघरचे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसीत होईल. हे बंदर जेएनपीटीच्या बरोबरीचे विकसीत होणारे बंदर ठरेल. यामुळे जलवाहतूकीला मोठा वाव मिळणार आहे. याशिवाय पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 48 छोटी बंदरे विकसीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांजवळील 12 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारचे औद्योगिक प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र यांच्याशी सागरमालातील विविध प्रकल्पांचा समन्वय साधला जाणार असल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.
Facebook Comments Box

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

   Follow us on        
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण  दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही  दिनदर्शिकेला  वाढती  मागणी आहे.  टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या  टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे  वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
Facebook Comments Box

२९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 28:03:47 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 23:22:41 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:53:51 पर्यंत, शकुन – 28:03:47 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 21:40:25 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 23:22:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:37:00
  • चंद्रास्त- 16:38:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८४५: टेक्सास हे अमेरिकेचे २८ वे राज्य बनले.
  • १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.
  • १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
  • १९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
  • १९७२: कोलकता मध्ये मेट्रो रेल्वे च्या कामाला आजच्या दिवशी सुरुवात.
  • १९८३: भारतीय क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध २३६ रन बनविले, तेव्हा हा स्कोर कसोटी सामन्यामधील सर्वात जास्त होता.
  • २००६: चीन ने राष्ट्रीय सुरक्षेसाठी श्वेत पत्र जारी केले.
  • २०१२: पाकिस्तान मध्ये पेशावर जवळ आतंकवादी हल्यात २१ सुरक्षाकर्मी मरण पावले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८००: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू: १ जुलै १८६०)
  • १८०८: अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ३१ जुलै १८७५)
  • १८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.
  • १८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.
  • १९००: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)
  • १९०४: कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)
  • १९१७: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)
  • १९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)
  • १९४२: राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य (मृत्यू: १८ जुलै २०१२)
  • १९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.
  • १९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६७: पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २४ जून १८९७)
  • १९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.
  • १९८०: भारतीय चित्रपट निर्माते नंदुभाई वकील यांचे निधन.
  • १९८६: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)
  • २००८: प्रसिद्ध चित्रकार मंजीत बावा यांचे निधन.
  • २०१२: टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ आक्टोबर १९४६)
  • २०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)
  • २०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)
  • २०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

सावंतवाडीकरांना रेल्वेकडून नववर्षाची भेट; नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा मंजूर

   Follow us on        
Konkan Railway:सावंतवाडी पंचक्रोशी प्रवाशांना रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासनाने नागपूर  ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणाऱ्या नागपूर -मडगाव-नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देताना सावंतवाडी स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडीची मुदत या महिन्याच्या अखेरीस समाप्त होणार होती. मात्र तिला आता पुढील सूचना येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर- मडगाव या गाडीला दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून तर गाडी क्रमांक ०११४० मडगाव नागपूर या गाडीला दिनांक ०२ जानेवारी २०२५ पासून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे थांबा मंजूर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश. 
सुरवातीला या गाडीला सावंतवाडी सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला होता. मात्र चांगल्या प्रमाणात प्रवासी संख्या असतानाही या गाडीचा सावंतवाडी येथील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यावेळेपासून हा थांबा पूर्ववत करण्यात यावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने अनेकदा निवेदने दिली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. संघटने तर्फे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी रेल्वे प्रशासनाचे,  कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट, आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत
या गाडीचे सावंतवाडी स्थानकावरील वेळापत्रक
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.
Facebook Comments Box

२८ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 27:34:55 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 22:13:45 पर्यंत
  • करण-गर – 15:06:41 पर्यंत, वणिज – 27:34:55 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 22:22:26 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 29:38:59
  • चंद्रास्त- 15:48:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६१२: गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला. मात्र तेव्हा त्याला तो तारा आहे असे वाटले होते.
  • १८३६: स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • १८४६: आयोवा हे अमेरिकेचे (USA) २९ वे राज्य बनले.
  • १८९५: ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला. या खेळाचे तिकीट होते एक फ्रँक. पहिल्या खेळाचे उत्पन्न आले फक्त ३५ फ्रँक. मात्र नंतर तो खेळ एवढा लोकप्रिय झाला की आठवडाभरातच त्याचे दिवसाला २० खेळ होऊन दिवसाला २००० फ्रँक एवढे भरघोस उत्पन्न मिळू लागले. ल्युमिअर बंधू
  • १८८५: मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
  • १९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.
  • १९२६: इंपिरियल एयरवेज ने भारत आणि इग्लंड यांच्या मध्ये पहिली पोस्ट सेवा सुरु केली.
  • १९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
  • १९८३: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध ३० वे शतक पूर्ण करून सर डॉन ब्रॅडमन यांचे रेकॉर्ड तोडले.
  • १९८४: राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये कॉंग्रेसने लोकसभेची निवडणूक जिंकली.
  • १९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.
  • २०००: भारतीय डाक विभागाने वीरता पुरस्काराच्या सन्मानार्थ पाच पोस्टाचे तिकीटांचा एक सेट ३ रुपयांचे एक सचित्र तिकीट जारी केले.
  • २०१३: आम आदमी पार्टी ने कॉग्रेस सोबत गठबंधन करून दिल्ली मध्ये सरकार बनविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८५६: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
  • १८९९: गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
  • १९००: मराठी पत्रकार लेखक तसेच कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म.
  • १९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.
  • १९११: फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (मृत्यू: १६ मे १९९४)
  • १९२२: अमेरिकन कॉमिक्स लेखक स्टॅन ली यांचा जन्म.
  • १९२६: हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
  • १९३२: धीरुभाई अंबानी – उद्योगपती (मृत्यू: ६ जुलै २००२)
  • १९३७: जगप्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांचा जन्म.
  • १९४०: ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
  • १९४१: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.
  • १९४५: वीरेंद्र – नेपाळचे राजे (मृत्यू: १ जून २००१)
  • १९५२: अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
  • १९६९: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.
  • २००१: अंडर-१९ च्या भातीय टीम चे सदस्य यशस्वी जैसवाल चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६६३: फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी – इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २ एप्रिल १६१८)
  • १९३१: आबालाल रहमान – चित्रकार (जन्म: ? ? १८६०)
  • १९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.
  • १९७४: राजस्थान चे पहिले मुख्यमंत्री हीरा लाल शास्त्री यांचे निधन.
  • १९७७: सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी (जन्म: २० मे १९००)
  • १९८१: हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले. (जन्म: ? ? १९०९)
  • २०००: मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
  • २०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
  • २००२: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युत कानविंडे यांचे निधन
  • २००३: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.
  • २००६: प्रभाकर पंडित – संगीतकार व व्हायोलिनवादक (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

मुंबई आणि ठाण्यात लवकरच दिसणार केबल टॅक्सी

   Follow us on        

मुंबई: रस्त्यावरची ट्रॅफीक हवेत नेण्यासाठी परिवहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जबरदस्त प्लान बनवत आहेत. मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यात रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासाठी एमएमआर क्षेत्रात भविष्यात केबल टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. केबल टॅक्सी प्रकल्प हा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सध्या युरोपियन देशांमध्ये केबल टॅक्सी सेवा सुरू आहे. बंगळुरूतील रोप वे वाहतुकीचा अभ्यास करुन अहवाल तयार केला जाणार आहे. याच्या मदतीनेच मुंबई आणि ठाण्यात केबल टॅक्सी सुरु केली जाणार आहे. सध्या महाराष्ट्रात कुठेही केबल टॅक्सी कुठेच सुरु नाही. केबल बोर्न टॅक्सी ही रोप वे प्रमाणे काम करेल. यामध्ये एका वेळी 15-20 प्रवाशांची वाहतूक करता येईल. हा प्रकल्प मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (एमएमआरडीए) च्या अंतर्गत नसून राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या अंतर्गत असेल असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आपण मेट्रो चालवू शकलो तर केबल टॅक्सी चालवायला काहीच हरकत नाही, कारण रोप वे बांधण्यासाठी आपल्याला जास्त जमीन लागणार नाही असेही असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.

सरनाईक यांच्या आधी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही केबल टॅक्सी हे वाहतुकीचे उत्तम साधन असल्याचे सांगितले होते. केबल टॅक्सी पॉड टॅक्सी म्हणूनही ओळखली जाते. केबल टॅक्सी वीज आणि सोलर एनर्जीवर चालते. हे वाहतुकीचे अतिशय पर्यावरणपूरक साधन आहे.

 

 

 

Facebook Comments Box

२७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 26:29:02 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 20:29:05 पर्यंत
  • करण-कौलव – 13:42:07 पर्यंत, तैतुल – 26:29:02 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 22:36:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त- 18:08
  • चन्द्र-राशि-तुळ – 13:57:25 पर्यंत
  • चंद्रोदय- 28:41:59
  • चंद्रास्त- 15:03:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १८६१: पहिल्यांदा कोलकत्ता येथे चहा ची सार्वजनिक बोली पार पडली.
  • १९११: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ’जन गण मन’ हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले व संगीतबद्ध केलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. नंतर २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
  • १९१८: बृहद पोलंडमध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड पुकारले गेले.
  • १९३४: पर्शिया च्या शाह ने पर्शिया चे नाव बदलवून इरान ठेवण्याची घोषणा केली.
  • १९४५: २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
  • १९४९: इंडोनेशियाला (हॉलंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६६: जगातील सर्वात लांब गुफा “Cave of Swallows” चा शोध लागला.
  • १९६८: चंद्राची परिक्रमा करणारे अपोलो-8 स्पेस एअर क्राफ्ट समुद्रात उतरविले.
  • १९७२: उत्तर कोरिया मध्ये नवीन संविधान मंजूर झाले.
  • १९७५: बिहारमधील (हल्लीचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
  • १९७८: ४० वर्षाच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक बनले.
  • २००४: मॅग्नेटर एसजीआर १८०६-२० ला स्फोट झाल्यामुळे उत्सर्जित किरण पृथ्वीला पोहोचते.
  • २००८: व्ही शांताराम पुरस्कार समारोहा मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तारे ज़मीं पर ला पुरस्कार मिळाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५७१: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १५ नोव्हेंबर १६३०)
  • १६५४: जेकब बर्नोली – स्विस गणितज्ञ (मृत्यू: १६ ऑगस्ट १७०५)
  • १७७३: इंग्लंडचे शास्त्रज्ञ, शोधक आणि राजकारणी जॉर्ज केली यांचा जन्म.
  • १७९७: मिर्झा गालिब – उर्दू शायर (मृत्यू: १५ फेब्रुवारी १८६९)
  • १८२२: लुई पाश्चर – फ्रेन्च सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २८ सप्टेंबर १८९५)
  • १८९८: डॉ. पंजाबराव देशमुख – स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते. (मृत्यू: १० एप्रिल १९६५)
  • १९२७: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
  • १९३७: लोकसभेचे माजी सदस्य शंकर दयाल सिंह यांचा जन्म.
  • १९६५: हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान यांचा जन्म.
  • १९४२: परमवीर चक्र विजेता आणि देशाचे सैनिक अल्बर्ट एक्का यांचा जन्म.
  • १९४४: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (मृत्यू: २ फेब्रुवारी २००७)
  • १९८६: दोन वेळा वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बनणारी जमैका ची धावपटू शैली एन फ्रेजर प्राईस यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९००: ब्रिटीश स्थापत्यशास्त्री विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग यांचे निधन.
  • १९२३: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (जन्म: १५ डिसेंबर १८३२)
  • १९४९: भालकर भोपटकर यांचे निधन.
  • १९६५: मराठी साहित्यिक, ज्ञानोदयचे संपादक देवदत्त नारायण टिळक यांचे निधन.
  • १९७२: लेस्टर बी. पिअर्सन – कॅनडाचे १४ वे पंतप्रधान आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २३ एप्रिल १८९७)
  • १९९७: मराठी भावगीत गायिका मालती पांडे-बर्वे यांचे निधन.
  • २००२: आसामी लोकगीत गायिका प्रतिमा बरुआ-पांडे यांचे निधन.
  • २००३: ला भारतीय कवी के एस एस नरसिंहस्वामी यांचे निधन.
  • २००७: पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भूट्टो यांची हत्या (जन्म: २१ जून १९५३)
  • २०१३: अभिनेता फारुख शेख यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

दुःखद बातमी! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आलं नाही. रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मनमोहन सिंग यांना  8 वाजून 6 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search