Bank Holiday Cancelled: या दिवशीची सार्वजनिक सुट्टी रद्द; बॅंका राहणार चालू

   Follow us on        

Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

 

३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?

प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.

पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने

सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण

सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

Facebook Comments Box

कोकण रेल्वेच्या ‘गर्दी’ ने घेतला तरुणाचा बळी

   Follow us on        
रत्नागिरी: होळीच्या सणाला गावी गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा मुंबईला परतत असताना ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नांत तोल गेल्याने गाडी खाली येवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी स्थानकावर घडली आहे.
नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्यास असलेला रुपेश आणि त्याचे काही मित्र मुंबईला परत जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. गर्दी अधिक असल्याने सुपरफास्ट गाडीत चढण्यासाठी धडपड सुरू होती. गाडी स्थानकात शिरताच सर्वत्र गोंधळ उडाला. प्रत्येक जण चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच क्षणी रुपेशनेही गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्याचा हात निसटला, तोल गेला आणि तो रेल्वेखाली गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुपेशला तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.
होळी साठी मोठ्या प्रमाणात कोकणकर कोकणात आपल्या गावांत जातात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मोठी गर्दी होत आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विशेष गाड्या चालविल्या आहेत. तरीसुद्धा नियमित गाड्यांतून प्रवास करण्यास प्रवासी पसंदी देत असताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांसाठी चुकीचे नियोजन झाले असल्याने या गाड्यांना प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे.
Facebook Comments Box

१८ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 22:12:37 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 17:52:41 पर्यंत
  • करण-भाव – 08:54:54 पर्यंत, बालव – 22:12:37 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्याघात – 16:42:42 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:47
  • सूर्यास्त- 18:47
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 22:11:59
  • चंद्रास्त- 08:52:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक पुनर्वापर दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1801 : ऑर्डनन्स फॅक्टरी स्थापना.
  • 1850: हेन्री वेल्स, विल्यम फार्गो आणि जॉन वॉरेन यांनी अमेरिकन एक्सप्रेस — एक जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली.
  • 1922 : असहकार आंदोलनासाठी महात्मा गांधींना 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1944 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारतातून कूच करून भारताच्या पश्चिम सीमेवर ब्रिटिशांचा पराभव करून तिरंगा फडकावला.
  • 1965: अंतराळवीर ॲलेक्सी लिओनोव्ह 12 मिनिटे अंतराळात चालणारी पहिली व्यक्ती ठरली.
  • 2001: सरोद वादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार आणि बंगाली अभिनेत्री सावित्री चॅटर्जी यांना अप्सरा पुरस्काराने घोषित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1594 : ‘शहाजी राजे भोसले’ – यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1664)
  • 1858 : ‘रुडॉल्फ डिझेल’ – डिझेल इंजिनचा संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 1913)
  • 1867 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1944)
  • 1869: ‘नेव्हिल चेंबरलेन’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1940)
  • 1881 : ‘वामन गोपाळ  जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जून 1956)
  • 1901 : ‘कृष्णाजी भास्कर वीरकर’ – शब्दकोशकार यांचा जन्म.
  • 1919 : ‘इंद्रजित गुप्ता’ – केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 2001)
  • 1921 : ‘नरेंद्र कुमार प्रसादराव साळवे’  – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2012)
  • 1938 : ‘शशी कपूर’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1948: ‘एकनाथ सोलकर’ – अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 2005)
  • 1989 : ‘श्रीवत्स गोस्वामी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1908 : सर ‘जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1831)
  • 1947 : ‘विलियम सी. डुरंट’ – जनरल मोटर्स (जीएम) आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1861)
  • 2001 : ‘विश्वनाथ नागेशकर’ – चित्रकार यांचे निधन.
  • 2003 : ‘एडम ओसबोर्न ’ – एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक, सॉफ्टवेअर प्रकाशक आणि संगणक डिझायनर यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1939)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Nagpur Violence: नेमके काय घडले?

   Follow us on        

नागपूर: नागपूरमध्ये काल सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सध्या बहुतेक भागात तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत.

सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत.

महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील एसटी सेवेबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी नितेश राणे यांची परिवहन मंत्र्यासोबत बैठक संपन्न

   Follow us on        

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन महामंडळाची बस स्थानके व बसगाडयांच्या विविध अडचणीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून सुलभ रित्या त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती नितीश राणे यांनी दिली, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले

Facebook Comments Box

१७ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 19:36:19 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 14:47:56 पर्यंत
  • करण-विष्टि – 19:36:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-घ्रुव – 15:44:04 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:47
  • सूर्यास्त- 18:47
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 21:22:00
  • चंद्रास्त- 08:18:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • डॉक्टर-पेशेंट विश्वास दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1957: अमेरिकेचा पहिला सौरऊर्जेवर चालणारा उपग्रह व्हॅनगार्ड-1 प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1969: गोल्ड मीर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1997: मुंबईत वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864: ‘जोसेफ बाप्टीस्ता’ – भारतीय अभियंता यांचा जन्म.
  • 1909 : ‘रामचंद्र नारायण दांडेकर’ – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 11 डिसेंबर 2001)
  • 1910 : ‘अनुताई वाघ’ – समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ , पद्मश्री, आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, , सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1992)
  • 1920 : ‘शेख मुजिबुर रहमान’ – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 15 ऑगस्ट 1975)
  • 1927 : ‘विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र यांचा जन्म.
  • 1946 : ‘पृथ्वीराज चव्हाण’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
  • 1962 : ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकिन अंतराळवीर(निधन: 1 फेब्रुवारी 2003)
  • 1975 : ‘पुनीथ राजकुमार’ – भारतीय अभिनेता, गायक यांचा जन्म.
  • 1979 : ‘शर्मन जोशी’ – अभिनेता यांचा जन्म.
  • 1990 : ‘सायना नेहवाल’ – भारतीय बॅडमिंटनपटू, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1210 : ‘मत्स्येन्द्रनाथ’ (मच्छिंद्रनाथ) – आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली.
  • 1782 : ‘डॅनियल बर्नोली’ – डच गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1700)
  • 1882 : ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 मे 1850)
  • 1937 : ‘चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे’ – बडोद्याचे राजकवी  यांचे निधन. (जन्म: 26 जानेवारी 1891)
  • 2019 : ‘मनोहर पर्रीकर’ – गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री  यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1955)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

“मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस मंगळुरू पर्यंत नेण्यापेक्षा…..” कोकण विकास समितीने रेल्वेला दिला हा पर्याय..

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई मडगाव वंदेभारत एक्सप्रेसचा मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता कर्नाटक राज्यातून होत आहे. मात्र या मागणीला महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे. त्यामुळे ती बंद करण्याची नामुष्की येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी बंद न करता तिचा रेक वापरून 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी पुढे मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे.

मात्र महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सध्या जवळपास आपल्या 98% क्षमतेने चालत आहे. ही गाडी पुढे दक्षिणेकडे विस्तारित केल्यास महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांना या गाडीच्या आसन उपलब्धतेच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येईल. त्याच बरोबर स्थानकांना मिळालेल्या आसन कोट्यात परिणाम होऊन खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थीवी या स्थानकांच्या प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होईल. तसेच या गाडीचा लांब मार्ग असल्यास गाडीची देखभाल, दिरंगाई या सारख्या समस्या निर्माण होऊन ही गाडी आपली सध्याची लोकप्रियता गमावून बसेल.

दक्षिणेकडील राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाबद्दल अपेक्षा, मागण्या भिन्न आहेत. ही गाडी दक्षिणेकडे विस्तारित केल्यास भविष्यात दोन्ही प्रवासी गटांत या गाडीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यावर उपाय म्हणजे ही गाडी विस्तारित न करता कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरु पर्यंत नवीन वंदेभारत गाडी या मार्गावर चालवली जावी. मुंबई ते मंगळुरु अंतर पाहता (९०० किलोमीटर) दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे या दोन्ही स्थानका दरम्यान नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस किंवा अमृत भारत एक्सप्रेस चालविण्यात यावी आणि तिला चिपळूण, कुडाळ आणि सावंतवाडी या वंदे भारत एक्सप्रेस सेवेपासून वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्राधान्याने थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात जयवंत दरेकर यांनी केली आहे.

 

 

 

 

Facebook Comments Box

Kudal: डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

कुडाळ:वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर (15, रा. निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली. मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा. निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

Facebook Comments Box

Konkan Railway: मत्स्यगंधा एक्सप्रेस ‘एलएचबी’ झाली तरीही प्रवासी नाराज! कारण काय?

   Follow us on        
Konkan Raiwlay: अलीकडेच मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी लिंके हॉफमन बुश (एलएचबी) कोचसह नवीन रेक मिळाल्याबद्दल प्रवाशांमध्ये उत्साह होता. मात्र तो अल्पकालीनच ठरला आहे. कारण या गाडीला जोडण्यात आलेले ५०% कोच जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान निर्माण केलेले आणि वाईट स्थितीत आहेत.
गाडी क्रमांक १२६२०/६१९ मंगळुरू-मुंबई एलटीटी-मंगळुरू मत्स्यगंधा एक्सप्रेस च्या एलएचबी रेक साठी  १६३४८/३४७ मंगळुरू सेंट्रल-तिरुवनंतपुरम सेंट्रल-मंगळुरू सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी Rake Sharing Arrangement (RSA) साठी निवडण्यात आली आहे. या दोन्ही गाड्यांसाठी चालविण्यात येणारे एकूण चार रेक जुने आणि वाईट स्थितीत आहेत.
दक्षिण रेल्वेच्या तिरुवनंतपुरम विभागाकडे हे २२ कोचेचे चार रेक आहेत. चार रेकसाठी एकूण ८८ कोचपैकी ४४ कोच नवीन म्हणजे २०२४ मध्ये बांधले गेले आहेत तर उर्वरित २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेले होते. यातील एका रेकमध्ये २०२४ मध्ये बांधलेले २१ कोच आहेत, दुसऱ्यामध्ये १२ कोच आहेत, तिसऱ्या मध्ये  ९ आणि चौथ्यामध्ये  २०२४ मध्ये बांधण्यात आलेले फक्त २ कोच आहेत. बाकी सर्व जुने म्हणजे २०१४ ते २०२३ दरम्यान बांधले गेलेले कोच आहेत. अशी माहिती मिळाली आहे.
दक्षिणेकडील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी १२ मार्च रोजी नवी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली आणि ही बाब मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. खासदारांनी श्री. सोमन्ना यांना मत्स्यगंधा एक्सप्रेसच्या सर्व रॅकवर अलीकडेच बांधलेले डब्यांची जोडणी करण्याचे निर्देश संबंधित विभागीय रेल्वेला द्यावेत अशी विनंती केली आहे.  रेल्वेमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले.
Year of manufacture
Number of coaches
2014 1
2015 3
2017 1
2018 8
2019 5
2020 4
2021 8
2022 8
2023 6
2024 44
Total 88
Facebook Comments Box

१६ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 17:01:24 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 11:46:08 पर्यंत
  • करण-गर – 17:01:24 पर्यंत, वणिज – 30:18:07 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वृद्वि – 14:47:37 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:46:32
  • सूर्यास्त- 18:48:21
  • चन्द्र-राशि-कन्या – 25:16:08 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:33:00
  • चंद्रास्त- 07:46:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय लसीकरण दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1521 : ‘फर्डिनांड मॅगेलनने’ जगाला प्रदक्षिणा घालून फिलीपिन्स गाठले.
  • 1528 : फतेहपूर सिक्री येथे ‘राणा संग’ आणि ‘बाबर’ यांच्यातील लढाईत ‘राणा संगचा’ पराभव झाला.
  • 1649 : ‘शहाजीराजांच्या’ सुटकेसाठी ‘शिवाजी महाराजांनी’ शहजादा ‘मुराद’ (शहाजहानचा मुलगा) यास पत्र लिहीले.
  • 1911 : भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ठराव ‘गोपाळकृष्ण गोखले’ यांनी मांडला.
  • 1937 : मुंबई उच्च न्यायालयाने दलितांना महाड येथील चवदार टाकीचे पाणी पिण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिला.
  • 1943: प्रभात चा नई कहानी हा चित्रपट रिलीज झाला.
  • 1945: दुसरे महायुद्धात रॉयल एअर फोर्सने जर्मन शहर वुर्झबर्गचा 20 मिनिटांत तुफान बॉम्बफेक करून नाश केला.
  • 1955 : राष्ट्रीय लसीकरण दिवस
  • 1966 : अमल कुमार सरकार यांनी भारताचे 8 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 1976 : ब्रिटिश पंतप्रधान ‘हॅरोल्ड विल्सन’ यांनी राजीनामा दिला.
  • 2000 : भारतीय हॉकीपटू ‘धनराज पिल्ले’ आणि मध्यम अंतराची धावपटू ज्योतिमय सिकदर यांना के. के. बिर्ला पुरस्कार जाहीर केला.
  • 2001: ‘नेल्सन मंडेला’ यांना गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1693 : ‘मल्हारराव होळकर’ – इंदूर राज्याचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 20 मे 1766)
  • 1750 : ‘कॅरोलिना हर्षेल’ – जर्मन-ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 9 जानेवारी 1848)
  • 1751 : ‘जेम्स मॅडिसन’ – अमेरिकेचे 4थे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1836)
  • 1789 : ‘जॉर्ज ओहम’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 जुलै 1854)
  • 1901 : ‘प्र. बा. गजेंद्रगडकर’ – भारताचे 7वे सरन्यायाधीश, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू: 12 जून 1981)
  • 1910 : नवाब इफ्तिखार अली खान पतौडी 8वे पतौडी यांचा जन्म. (मृत्यू: 5 जानेवारी 1952)
  • 1921 : ‘फहाद’ – सौदी अरेबियाचे राजा यांचा जन्म. (मृत्यू: 1 ऑगस्ट 2008)
  • 1936 : ‘भास्कर चंदावरकर’ – संगीतकार यांचा जन्म.
  • 1936 : ‘प्रभाकर बर्वे’ – चित्रकार आणि कोरा कॅनव्हास चे लेखक यांचा जन्म.
  • 1936 : ‘रेमंड वहान दमडीअन’ – एम.आर.आय. चे शोधक यांचा जन्म
  • 1958 : ‘जनरल बिपीन रावत’ -भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (मृत्यू: 8 डिसेंबर 2021)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1945 : गणेश दामोदर सावरकर उर्फ ‘ग. दा. सावरकर’ – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 13 जून 1879)
  • 1946 : उस्ताद ‘अल्लादियाँ खाँ’ – जयपूर अत्रोली घराण्याचे गायक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1855)
  • 1990 : ‘वि. स. पागे’ – संत वाङ्मयाचे अभ्यासक आणि रोहयोचे जनक यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1910)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search