५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 24:38:03 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 20:34:08 पर्यंत
  • करण-विष्टि – 13:34:02 पर्यंत, भाव – 24:38:03 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुक्ल – 21:18:46 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:13
  • सूर्यास्त- 18:32
  • चन्द्र-राशि-मेष – 26:16:58 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:56:00
  • चंद्रास्त- 25:26:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
  • १६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.
  • १७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट
  • १९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.
  • १९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.
  • १९४८: गांधी हत्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
  • १९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
  • १९५३: आजच्या दिवशी वॉल्ट डिज़्नी यांची पीटर पॅन मूवीचा प्रीमियर ची सुरुवात झाली.
  • १९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
  • १९६१: आजच्या दिवशी संडे “टेलिग्राफ न्यूज” चा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.
  • १९७१: आजच्या दिवशी अपोलो-१४ अंतरीक्ष यान चंद्रावर उतरून अंतराळवीर सुद्धा चंद्रावर उतरले.
  • १९९९: नेल्सन मंडेला यांनी संसद मध्ये त्यांचे शेवटचे भाषण दिले आणि मे महिन्यात त्यांनी पदाचा त्याग केला.
  • २००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
  • २००४: ’पुण्याची’ स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
  • २००७: सुनिता विल्यम्स हि अंतराळात जास्त वेळ राहणारी पहिली भारतीय महिला बनली.
  • २०१०: आजच्या दिवशी अभिनव बिंद्रा ने नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशिप मध्ये ६०० पैकी ५९६ अंक मिळवून सुवर्ण पदक स्वतःच्या नावावर केले.
  • २०१६: ला आजच्या दिवशी वित्त मंत्रालयाने युटूब चॅनेल सुरु केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७८८: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट पील यांचा जन्म.
  • १८४०: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (मृत्यू: २३ आक्टोबर १९२१)
  • १९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
  • १९१४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी, संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४)
  • १९१६: भारतीय कवी जानकी वल्लभ शास्त्री यांचा जन्म.
  • १९१९: देशाचे पहिले मुस्लीम विदेश मंत्री खुर्शीद आलम खान यांचा जन्म.
  • १९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार
  • १९३६: बाबा महाराज सातारकर – कीर्तनकार
  • १९४९: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा जन्म.
  • १९७६: अभिषेक बच्‍चन – अभिनेता
  • १९९०: ला भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार चा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९२०: आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांनी समाधि घेतली. (जन्म: १४ सप्टेंबर १८६७)
  • १९२७: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२)
  • १९९९: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध नर्तकी इंद्राणी रहमान यांचे निधन.
  • २०००: कालिंदी केसकर – गायिका (जन्म: ? ? ????)
  • २००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या ‘हरिजन’ या मराठी अंकाचे संपादक (जन्म: ? ? ????)
  • २००८: महर्षी महेश योगी – योग गुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७)
  • २०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Konkan Railway | “… तर रात्रीची दिवा – सावंतवाडी गाडी चालविणे शक्य.”

   Follow us on        

वाचकांचे व्यासपीठ: सावंतवाडीहून दिव्याला आलेली गाडी सकाळपर्यंत स्लाइडिंगला उभी करून ठेवण्यात येते. तसे न करता हीच गाडी पुन्हा रात्री दहा वाजता सावंतवाडी करता सोडण्यात यावी.

दुसर्‍या बाजूने दिव्याहून सकाळी मडगावसाठी निघालेली गाडी रात्रभर मडगाव स्थानकावर उभी करून ठेवण्यात येते. तीच गाडी रात्री मुंबईसाठी सोडल्यास दोन्ही बाजूने रात्रीची सेवा उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने याबद्दल तांत्रिक बाबींचा विचार करावा आणि रात्रीची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

पनवेल स्थानकावरील राखीव जनरल डबे पूर्ववत करावेत

मुंबई उपनगरातील शेवटचे रेल्वे स्टेशन पनवेल असून प्रवाशांची वर्दळ असणारे शेवटचे स्थानक आहे. या स्टेशन वरती पनवेल, उलवा, उरण ,अलिबाग, पेण , मानखुर्द ,गोवंडी, चेंबूर कोपरखैरणे, वाशी, बेलापूर नवी मुंबई परिसरातील लोक शेवटची कोकण कन्या किंवा तुतारी गाडी पकडून कोकणात जाण्यासाठी येतात. पूर्वी येथे कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस ईत्यादी गाड्यांचा एक जनरल डबा राखीव असायचा, मात्र ती सोय बंद केल्याने येथील प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

कोकणातील आमदार खासदारांनी यात लक्ष घालून तो डबा पूर्ववत पनवेलला सुरू करावा जेणेकरून उपनगरातील व शेवटचे जंक्शन स्टेशन असलेले पनवेल रेल्वे स्टेशनला स्वतंत्र जनरल डबा उपलब्ध होईल.

सुरेन्द्र हरिश्चंद्र नेमळेकर

संस्थापक सदस्य कोकण रेल्वे

Facebook Comments Box

रत्नागिरी: कातळशिल्पांकडे लोकांचा कल वाढवा यासाठी अनोखा उपक्रम

   Follow us on        

रत्नागिरी:कोकणातील कातळशिल्पांकडे लोकांचा कल आणखी वाढावा, त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, या निमित्ताने या अश्मयुगीन कातळशिल्प रेखांकित टीशर्टचे अनावरण रत्नागिरीतील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र येथे करण्यात आले. कातळशिल्प संशोधक धनंजय मराठे यांच्या मागणीनुसार माजी मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून आणि अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने आणि वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी या कातळशिल्प रेखांकित टीशर्टचे अनावरण केले गेले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे , युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, दक्षिण तालुका अध्यक्ष दादा दळी, उत्तर तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर अध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संकेत कदम, मनोर दळी, भक्ती दळी, निलेश आखाडे, उमेश देसाई आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Comments Box

मोठी बातमी: सरकारी कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य; तसा फलक लावणे बंधनकारक

   Follow us on        

मुंबई: मराठी भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार दिल्यास शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला अलिकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेचे महत्व टीकविण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचे संवधर्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे.

शिस्तभंगाची कारवाई होणार

मराठी भाषा बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावावा लागणार आहेत. शासकीय कार्यालयांतील संगणकावरील कळफलक देखील मराठी भाषेतच असणार आहेत. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अनुसार सर्व शासकीय कार्यालयांतील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असतील आणि कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे आणि संकेतस्थळे मराठीत असतील याची काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केले आहे. मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या कार्यालयातील फलक मराठी

केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये आणि सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचनाफलक, अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांची तसेच महामंडळे, मंडळे, शासन अंगीकृत उपक्रम, कंपन्या यांची शासनाने (मंत्रिमंडळाने) निश्चित केलेली मराठी नावेच आस्थापनांच्या कामकाजात वापरली जातील. नवीन नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केले जाईल. त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ त्याचे रुपांतर करण्यात येईल. ज्या आस्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचा कारभार यापुढे मराठी नावाने होईल असे सरकारने म्हटले आहे.

Facebook Comments Box

४ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 26:33:05 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 21:50:25 पर्यंत
  • करण-गर – 15:34:57 पर्यंत, वणिज – 26:33:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 24:05:59 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:14
  • सूर्यास्त- 18:31
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 11:13:00
  • चंद्रास्त- 24:25:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • जागतिक कर्करोग दिन;दरवर्षी 4 फेब्रुवारीला जागतिक आरोग्य संस्था (WHO) याच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी ‘गड आला पण सिंह गेला ‘ असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
  • १७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
  • १९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.
  • १९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.
  • १९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
  • १९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान
  • २०००: विश्व कर्करोग दिन
  • २००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण कर ण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.
  • २००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
  • १९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली. वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४)
  • १९१७: जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट १९८०)
  • १९३८: पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू
  • १९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११)
  • १९३८: लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू पं. बिरजू महाराज यांचा जन्म.
  • १९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: ? ? ????)
  • १८९४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४)
  • १९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४)
  • २००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८)
  • २००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Union Budget 2025: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद

   Follow us on        

मुंबई :- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापूर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.

महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी’ चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्ग, भुयारी मार्ग (आरएफओबी, आरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट, ३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर वाढीव थांबे देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात – संतोषकुमार झा, व्यवस्थापकीय संचालक (कोरे)

   Follow us on        
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर स्थानकांवर गाड्या थांबवण्याबाबत अनेक मागण्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. गाड्यांच्या थांब्यांबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेत असते. त्यामुळे आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे हे प्रस्ताव सादर केले आहेत. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी दादरपर्यंत नेण्याचा निर्णय मध्यरेल्वेचा आहे. ही गाडी दादरपर्यंत गेली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल असे, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण म्हणजे ७४० किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण गेल्यावर्षी पूर्ण झाले असल्याने कोकण रेल्वे ही देशात १०० टके ग्रीन रेल्वे झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. विद्युतीकरणामुळे डिझेलच्या तुलनेमध्ये दर वर्षाला जवळपास १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोकण रेल्वेला आता २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वे उभारणीचा कालावधी पकडला तर तो काळ ३३  वर्षांचा आहे. गेल्या वित्तीय वर्षामध्ये कोकण रेल्वेला 301 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा रेल्वे वाहतूक आणि प्रकल्प उभारणीतून झाला आहे. कोकण रेल्वे केवळ ६४४ किमी रेल्वेमार्गापुरती आता मर्यादित राहिली नसून रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण रेल्वे देशातील 16 राज्यांमध्ये काम करत असल्याचा अभिमान कोकण त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आज रत्नागिरीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोकण रेल्वेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. कोकण रेल्वेने जम्मूमध्ये १९  हजार कोटी रुपयांचे कटरा-उधमपूर येथे रेल्वेमार्गाचे यशस्वी काम केले आहे. या मार्गावर १६ बोगदे आणि २२ रेल्वेपूल आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेला चिनाब रेल्वेपूल कोकण रेल्वेने उभारलेला आहे. तसेच एनजी रेल्वेपूल केबलवर उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वे नेपाळ आणि नैरोबीमध्येही काम करत असल्याचे झा यांनी सांगितले.
प्रवासी सुविधांमध्ये कोकण रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी विभागामध्ये खेड तसेच चिपळूण येथे सर्व कॅटेगिरीतील प्रवाशांसाठी एक्झिक्यूटिव्ह लाऊंज ही सुविधा पुरवली आहे. पुढील प्रत्येक वर्षी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर वर्षी सात ते आठ एक्झिक्युटिव्ह लाऊंज निर्माण केले जाणार आहेत.यावेळी मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता आर नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते.
Facebook Comments Box

Western Railway: हमाल दरांवरून होणारे वाद टाळण्यासाठी रेल्वेची नामी शक्कल

   Follow us on        
मुंबई: अनेकदा रेल्वे स्थानकावर हमालीच्या दरांवरून हमाल आणि प्रवाशांत वाद होतात. यावर उपाय म्हणून  रेल्वे स्थानकांवरील पश्चिम रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आता मुंबई सेंट्रल टर्मिनससह काही प्रमुख स्थानकांवर हमालांचे दर डिजिटल डिस्प्लेवर (टीव्ही) प्रदर्शित करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना हमाल सेवेसाठी अधिकचे पैसे देण्याची वेळ येणार नाही. हा उपक्रम हळूहळू सर्व रेल्वे स्थानकांवर लागू करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर लावण्यात आलेल्या डिजिटल डिस्प्ले स्क्रीनवर जाहिरातींसोबतच रेल्वेशी संबंधित महत्त्वाची माहितीही दाखवली जाते. सध्या या टीव्हीवर हमालांच्या सेवेसाठी अधिकृत दरपत्रक प्रदर्शित केले जात आहे. यामुळे प्रवाशांना हमालीच्या दराबाबत अधिक स्पष्टता मिळत आहे.उदाहरणार्थ, जर एखाद्या हमालाने दरपत्रकापेक्षा अधिक शुल्क मागितले, तर प्रवाशांना लगेचच टीव्हीवरील अधिकृत दर दाखवता येतात. तसेच, ज्या प्रवाशांना हमालांकडून अधिक शुल्क आकारले जात असल्याचे जाणवेल, ते अधिकृत तक्रार नोंदवू शकतात.
पारदर्शकतेसोबत कमाई टीव्हीवर जाहिराती दाखविण्यासाठी रेल्वे ५ वर्षांचा करार करते. या कराराच्या लायसन्स फीच्या स्वरूपात रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळतो. उदाहरणार्थ, मुंबई सेंट्रल स्थानकावर ४४ डिजिटल डिस्प्ले स्क्रीन लावण्यात आले असून, या माध्यमातून रेल्वेला वार्षिक ४१ लाख रुपये तर पाच वर्षांमध्ये २ कोटी २० लाख रुपये महसूल मिळाला आहे.
Facebook Comments Box

मुंबई परिवहन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा; महाराष्ट्रात कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न राबविण्याची शक्यता

   Follow us on        

मुंबई : कर्नाटकमधील परिवहन महामंडळ प्रवाशांना देत असलेल्या लांब पल्ल्याच्या उत्तम सेवेसाठी ओळखले जाते. कर्नाटक परिवहन सेवेतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘गरुडा’, ‘ऐरावत’, ‘अंबारी’ आदी लांबपल्ल्याच्या सेवा प्रवासीभिमुख ठरल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

इतर राज्यातील चांगल्या गोष्टींना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक १ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले होते . या दोन दिवसीय दौऱ्यात ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेची माहिती घेतली. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र) हे अधिकारी होते.

या दौऱ्यात त्यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या “ऐरावत”, “अंबारी”, “राजहंस”, तसेच “कर्नाटक सर्वोदय”, “कर्नाटक सिरीगंधा” या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या बस सेवेचा अभ्यास केला.

”कर्नाटक परिवहन सेवेतील आधुनिक तंत्रज्ञान, प्रादेशिक व्यवस्थापन, प्रवाशांसाठीच्या उत्कृष्ट सोयी-सुविधा, जसे की वायफाय, ई-तिकीट, ऑनलाईन बुकिंग, आणि युरिनल सारख्या सेवांचा समावेश प्रभावी वाटला. ही सेवा खासगी बसेसच्या तुलनेत सुरक्षित व वेळेवर असल्याने प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार, इतर राज्यांतील यशस्वी योजना महाराष्ट्रात राबवण्याचा विचार आहे. कर्नाटक परिवहन सेवेतील आदर्श कल्पना आपल्या एसटी महामंडळासाठी उपयोगी ठरतील यासाठी सकारात्मक पाऊल उचलणार आहे.”

प्रताप सरनाईक

परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य

 

 

Facebook Comments Box

३ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 28:39:25 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 23:17:29 पर्यंत
  • करण-कौलव – 17:46:11 पर्यंत, तैतुल – 28:39:25 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-साघ्य – 27:02:08 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय-07:14
  • सूर्यास्त-18:31
  • चन्द्र राशि-मीन – 23:17:29 पर्यंत
  • चंद्रोदय-10:31:59
  • चंद्रास्त-23:23:59
  • ऋतु-शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
  • १८१५: स्विझर्लंड येथे पहिली पनीर बनविण्याचा कारखाना बनविण्यात आला.
  • १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
  • १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
  • १९२८: ‘सायमन गो बॅक’ या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
  • १९३४: आजच्या दिवशी विमानाने पार्सल पाठविण्याची सेवा सुरु झाली.
  • १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
  • १९७२: जापान च्या साप्पारो नावाच्या शहरात पहिल्यांदा आशियात हिवाळी ऑलंपिक चे आयोजन केल्या गेले.
  • १९९९: भारतीय राज्य जम्मू काश्मीर मध्ये डेमोक्रेटिक जनता दल या पार्टीची पुन:स्थापना करण्यात आली.
  • २००६: आजच्या दिवशी इजिप्त चे जहाज एम.एस अल-सलाम बोकॅसिओ-९८ हे जहाज समुद्रात बुडाले.
  • २००९: आजच्या दिवशी शिल्पा शेट्टी यांनी राजस्थान रॉयल्स मध्ये स्वतःची हिस्सेदारी खरेदी केली.
  • २०१८: आजच्या दिवशी भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमने चौथ्यांदा वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२१: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१०)
  • १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)
  • १८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.
  • १९००: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)
  • १९०९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सुहासिनी गांगुली यांचा जन्म.
  • १९३८: भारतीय चित्रपट अभिनेत्री वहीदा रहमान यांचा जन्म.
  • १९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ
  • १९८३: चित्रपट अभिनेता सिलांबरासन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.
  • १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
  • १९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २८ डिसेंबर १८५६)
  • १९५१: वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणाऱ्यांपैकी एक चौधरी रहमत अली यांचे निधन.
  • १९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)
  • २०००: ला प्रसिद्ध तबलावादक उस्ताद कुरैशी अल्‍ला रक्‍खा खान यांचे निधन.
  • २०१२: ला बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक राज कवर यांचे निधन.
  • २०१६: ला मध्य प्रदेश चे माजी गव्हर्नर बलराम जाखड यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search