Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटणाऱ्या दोन प्रमुख विशेष गाड्यांचा समावेश आहे.

पहिली विशेष गाडी (ट्रेन क्र. ०११७१/०११७२) मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावेल. ही गाडी मुंबईहून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाव येथून ही गाडी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडीची रचना (Composition): एकूण २२ कोच – २ टियर एसी (१), ३ टियर एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२).

दुसरी विशेष गाडी (ट्रेन क्र. ०१११९/०११२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान १७ एप्रिल ते १२ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ही गाडी LTT वरून मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाववरून ही गाडी शुक्रवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता LTT ला पोहोचेल.

या गाडीला एकूण २१ आधुनिक LHB कोच जोडण्यात आले आहेत. गाडीची रचना (Composition): एकूण २१ एलएचबी कोच – फर्स्ट एसी (१), २ टियर एसी (३), ३ टियर एसी (७), स्लीपर (८) आणि जनरेटर कार (२).

दोन्ही गाड्यांचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

या विशेष गाड्या दादर (केवळ CSMT गाडीसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबतील.

विशेष म्हणजे, ट्रेन क्र. ०११७२ आणि ०११२० साठीचे बुकिंग उद्या, १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत; उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे दादा साईल यांची वर्णी

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा तिढा अखेर सुटला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची, तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे सेनेचे पावशी जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य दादा साईल यांची निवड निश्चित झाली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली असून, महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

​निवडणूक प्रक्रियेनुसार, आज दुपारी ३.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेवर भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीचे वर्चस्व अधिक घट्ट झाले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही नवी कार्यकारिणी सज्ज झाली आहे.

Facebook Comments Box

Railway Updates: आता बूकिंग होणार सेकंदात! ४० वर्षांनंतर रेल्वे तिकीट बुकिंगसाठी येणार नवीन ‘सुपरफास्ट’ तंत्रज्ञान

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी तिकीट बुकिंगच्या ४० वर्षे जुन्या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करत आहे. साधारण १,००० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली ही नवीन रिझर्व्हेशन सिस्टीम (PRS) येत्या एप्रिल ते जून २०२६ दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. १९८५ पासून सुरू असलेले जुने सॉफ्टवेअर आता पूर्णपणे बदलले जाणार असून, त्या जागी आधुनिक ‘ओपन सोर्स’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे तिकीट बुकिंगची क्षमता पाच पटीने वाढणार असून, सध्याच्या २५,००० प्रति मिनिटाऐवजी आता एका मिनिटात १.२५ लाख तिकिटे बुक करता येतील.

​या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तत्काळ बुकिंगच्या वेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि हँग होणारी वेबसाईट यापासून प्रवाशांची सुटका होईल. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘गदर’ किंवा ‘स्पेसएक्स’ सारख्या बेकायदेशीर सॉफ्टवेअर आणि बॉट्सच्या माध्यमातून होणारी तिकीट चोरी रोखण्यासाठी या सिस्टीममध्ये कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय, रेल्वेने ‘आधार’ आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याच्या दिशेने पावले उचलली असून, यामुळे बनावट युजर आयडी आणि दलालांच्या मक्तेदारीला लगाम बसेल.

​केवळ तिकीट बुकिंगचा वेगच नाही, तर रेल्वेने डिजिटल सुरक्षेसाठी ६०० कोटी रुपयांचे ‘इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर’ (IR-SOC) देखील उभारले आहे. हे केंद्र सायबर हल्ल्यांपासून रेल्वेच्या डेटाचे संरक्षण करेल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला हा बदल भारतीय रेल्वेला अधिक पारदर्शक आणि हायटेक बनवणारा ठरेल. वेटिंग लिस्टची समस्या कायमस्वरूपी संपवण्याच्या दृष्टीने हे पहिले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Facebook Comments Box

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

   Follow us on        

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.

मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 7 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल.

मतदानानंतर 4 मे 2026 (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Facebook Comments Box

PNG गॅस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून LPG नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांच्या घरात पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन कार्यान्वित आहे, त्यांना आता घरगुती LPG सिलिंडर वापरण्याची परवानगी नसेल. इंधनाचा तुटवडा रोखण्यासाठी आणि संसाधनांचे योग्य वाटप करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ज्या ग्राहकांकडे सध्या PNG आणि LPG अशी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना त्यांचे LPG कनेक्शन तात्काळ सरेंडर (परत) करावे लागेल. यापुढे अशा दुहेरी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना गॅस कंपन्यांकडून LPG सिलिंडरचे रिफिल घेता येणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, एकदा अधिकृत गॅझेटमध्ये या नियमाची प्रसिद्धी झाली की, तेल कंपन्यांना अशा ग्राहकांचा सिलिंडर पुरवठा त्वरित बंद करावा लागेल.

हा बदल प्रामुख्याने ‘अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत’ (Essential Commodities Act) करण्यात आला आहे. सध्या पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यात येणारे अडथळे पाहता, सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या भागात अजूनही पाईपलाईन पोहोचलेली नाही, अशा ग्रामीण आणि गरजू भागातील नागरिकांना LPG सिलिंडरचा सुरळीत पुरवठा व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

सरकारने या नियमाची अंमलबजावणी कडक करण्याचे निर्देश दिले असून, वितरकांनाही अशा ग्राहकांची ओळख पटवून नवीन कनेक्शन न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सरकारला सहकार्य करावे आणि इंधनाची बचत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

एक्सप्रेसची चाके रुळावरून घसरली; रेल्वेचा मोठा अपघात टळला!

   Follow us on        

नागपूर: केवळारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी दुपारी एक मोठी रेल्वे दुर्घटना थोडक्यात टळली. शहडोलहून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ‘शहडोल-नागपूर एक्सप्रेस’च्या काही डब्यांची चाके नैनपूर-खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रेन वेगात असताना अचानक डब्यांची चाके रुळावरून खाली उतरली. यामुळे ट्रेनला जोराचा धक्का बसला, ज्यामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणताही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.

रेल्वे प्रशासनाची धावपळ:

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

​सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने आणि गाडीचा वेग मर्यादित असल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे प्रशासन आता या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहे.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी हालचाली सुरू; दोन टप्प्यांच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी निविदा जाहीर

   Follow us on        

मंगळुरू: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वेने कर्नाटक आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये ‘पॅच डबलिंग’ (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) करण्याच्या उद्देशाने व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत.

​या निविदेनुसार, प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विभागांचा अभ्यास केला जाणार आहे. यात मंगळुरूजवळील थोकूर ते मूकंबिका रोड बिंदूर या ११२ किलोमीटरच्या अंतराचा आणि गोव्यातील माजोर्डा ते महाराष्ट्रातील वैभववाडी रोड या १५१ किलोमीटरच्या अंतराचा समावेश आहे. एकूण २६३ किलोमीटर लांबीच्या या मार्गांच्या अभ्यासासाठी सुमारे 1.31 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार, निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. निवडलेल्या यशस्वी कंत्राटदाराला कामाचे आदेश मिळाल्यापासून पुढील तीन महिन्यांच्या आत हा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात जमिनीची उपलब्धता, तांत्रिक अडचणी आणि बांधकामासाठी लागणारा अंदाजित खर्च यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, ज्यावर पुढील प्रत्यक्ष कामाची दिशा ठरेल.

​कोकण रेल्वे मार्ग हा सध्या प्रामुख्याने एकेरी स्वरूपाचा असल्याने गाड्यांना क्रॉसिंगसाठी अनेकदा थांबावे लागते. यापूर्वी रोहा ते वीर या ४७ किमी अंतराचे दुहेरीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आता प्रस्तावित असलेल्या या नवीन ‘पॅच डबलिंग’मुळे रेल्वे हाताळणी क्षमता वाढेल, विलंबाच्या समस्या कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतुकीचा ताण पाहता हे पाऊल कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

Facebook Comments Box

वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रणा कार्यान्वित

   Follow us on        

नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासीबहुल क्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत असलेले गाव. या शेजारी पिपरिया नावाचे छोटेसे गाव. वाघांच्या डरकाळ्या व संचार या गावात तसा नवा नाही. वेळोवेळी पाळीव प्राण्यांसह या गावात माणसांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. यातून माणसांना वाचविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस व वन विभागाने अभिनव उपाययोजनांवर विचार सुरु केला. यातून एआय आधारित प्रकल्पाने आकार घेतला. याची फलश्रुती म्हणून तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून देवलापारजवळील पिपरिया येथे वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले.

विशेष म्हणजे येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे.

नागपूर ग्रामीण भागात मागील अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात गावकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या १५ घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटनांमध्ये गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून वन विभाग आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘एआय’ आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात योगदान देणाऱ्या मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मार्व्हल संस्थेचे सीईओ देखील आहेत. पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, मागील दोन ते तीन वर्षात घडलेल्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्यावर उपाय म्हणून आम्ही ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. गावाच्या परिसरात वाघ, बिबटे, अस्वलांसारख्या आक्रमक प्राण्यांचा परिसरात वावर असल्यास सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर मार्व्हलने काम केले. त्याअंतर्गत विशिष्ट ठिकाणांवर उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान ‘बायो अॅक्यूस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (प्रत्यक्ष दृष्य आधारित) अशा दोन प्रकारे काम करते. वाघ किंवा बिबटे परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड यासारखे तृणभक्षी प्राणी आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून संपूर्ण परिसराला सतर्क करतात. ते विशिष्ट आवाज टिपून हे ‘एआय’ तंत्रज्ञान डेटाचे विश्लेषण करुन त्यासंबंधीचे सतर्कतेचे इशारे संबंधितांना पाठविण्याचे कार्य करते. सतर्कतेचे इशारे वन विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळू शकतात. याशिवाय ‘बायो व्हिज्युअल’ प्रकारच्या तंत्राच्या माध्यमातून कॅमेरात प्रत्यक्ष प्राण्याचे फोटो ‘कॅप्चर’ झाल्यास हे तंत्रज्ञान सतर्कतेचे इशारे पाठवते.

पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, वन विभागाच्या मदतीने आम्ही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील अशा ४० ठिकाणांची निवड केली असून तेथे प्राधान्याने कॅमेरे लावण्यात आले आहेत. याच आठवड्यात तब्बल तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वितही झाली असून मागील चार दिवसात दोनदा वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचा सतर्कतेचा इशारा वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आला आहे. वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असलेल्या वन्यजीव क्षेत्रासह प्रादेशिक विभागातही खापा व पारशिवनी परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभागाचा मार्व्हल संस्थेशी सामंजस्य करार झाला असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

Facebook Comments Box

आखाती युद्धाच्या झळा कोकणच्या हापूसला; ५०% आंबा निर्यात धोक्यात! स्थानिक बाजारपेठेत दर पडण्याची शक्यता

   Follow us on        

मुंबई: आखाती देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. भारताच्या एकूण आंबा निर्यातीपैकी तब्बल ३० ते ५० टक्के आंबा हा दुबई, सौदी अरेबिया आणि कुवेत यांसारख्या आखाती देशांमध्ये जातो. मात्र, या भागातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग, विशेषतः ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’, धोक्याच्या छायेत आहे. यामुळे अनेक मालवाहू जहाजांची ये-जा थांबली असून, जेथे वाहतूक सुरू आहे तिथे विम्याचे हप्ते आणि मालवाहतुकीचे दर दुपटीने वाढले आहेत. नाशवंत माल असल्याने आंबा वेळेत पोहोचणे गरजेचे असते, परंतु कंटेनरची कमतरता आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे निर्यातीचा वेग कमालीचा मंदावला आहे.

निर्यातीत येणाऱ्या या अडथळ्यांचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होण्याची दाट शक्यता आहे. जर परदेशात जाणारा आंबा देशांतर्गत बाजारपेठेत वळवला गेला, तर वाशी, पुणे आणि कोल्हापूर सारख्या मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होईल. पुरवठा वाढल्याने साहजिकच हापूसच्या दरात मोठी घसरण होऊ शकते, ज्याचा फटका थेट बागायतदारांच्या खिशाला बसणार आहे. यंदा हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन खर्च आधीच वाढलेला असताना, आता निर्यातीचे मार्ग बंद झाल्यास बागायतदारांचे कंबरडे मोडण्याची भीती वर्तवली जात आहे. अशा स्थितीत शासन आणि निर्यातदार संस्थांनी पर्यायी बाजारपेठा शोधणे किंवा प्रक्रिया उद्योगाला चालना देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Facebook Comments Box

Mumbai Water Metro: मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘जल मेट्रो’चा उतारा; खासदारांच्या प्रस्तावाची सरकारकडून सकारात्मक दखल

   Follow us on        

मुंबई: मुंबई शहराला भेडसावणाऱ्या वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी आणि पर्यावरणपूरक उपाय शोधण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी मांडलेल्या ‘मुंबई जल मेट्रो’ (Mumbai Water Metro) प्रकल्पाच्या प्रस्तावाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, सदर विषय पुढील तपासणीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग केला आहे.

मुंबईतील वाढती लोकसंख्या, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि इतर गृहनिर्माण प्रकल्पांमुळे भविष्यात रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार वायकर यांनी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही जलवाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. कोचीमध्ये हा प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरला असून, तेथील सुरक्षितता आणि कार्यक्षमता पाहता मुंबईच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून जलद सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे वायकरांनी पत्रात नमूद केले होते.

मुंबई महानगर क्षेत्राची (MMR) लोकसंख्या २०३० पर्यंत सुमारे २.९ कोटी आणि २०३७ पर्यंत ३.८ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ रस्ते वाहतूक पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे जल मेट्रोसारखा आधुनिक, इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक पर्याय मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार वायकर यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले असून, हा प्रकल्प मार्गी लागल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search