Cricket: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

   Follow us on        

Kokanai online : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 18 जानेवारी (शनिवार) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. पत्रकार परिषदेत तो उपस्थित होता. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रिड मॉडेल’ अंतर्गत पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळवली जाणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना 19 फेब्रुवारी रोजी कराची येथे यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. तर भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल.

भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यासह स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे आगामी आयसीसी स्पर्धेत सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाही.

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह/हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा.

Facebook Comments Box

१८ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • थि-पंचमी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 14:52:36 पर्यंत
  • करण-कौलव – 18:29:31 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 25:15:29 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:21
  • चन्द्र-राशि-सिंह – 21:29:36 पर्यंत
  • चंद्रोदय- 22:22:59
  • चंद्रास्त- 10:13:00
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १७७८: कॅप्टन जेम्स कूक हा हवाई बेटांवर पोचणारा पहिला युरोपियन बनला.
  • १९११: युजीन बी. इलायने सानफ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
  • १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार
  • १९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले.
  • १९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या.
  • १९९७: नोर्वेच्या बोर्ग आऊसलंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
  • १९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.
  • २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७९३: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले. (मृत्यू: ४ आक्टोबर १८४७)
  • १८३३: अमेरिकन संशोधक रे डॉल्बी यांचा जन्म.
  • १८४२: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (मृत्यू: १६ जानेवारी १९०९)
  • १८५४: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांचा मदतनीस तसेच त्यांचा पहिल्या दुरध्वनी संभाषणातील भागीदार थॉमस वाॅॅॅटसन यांचा जन्म.
  • १८८९: देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी. व्ही. जी. – कन्नड कवी व विचारवंत (मृत्यू: ७ आक्टोबर १९७५ – बंगळुरू, कर्नाटक)
  • १८८९: शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार (मृत्यू: १ आक्टोबर १९३१)
  • १८९२: अमेरिकन अभिनेता ऑलिव्हर हार्डी यांचा जन्म.
  • १९३३: जगदीश शरण वर्मा – भारताचे २७ वे सरन्यायाधीश (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
  • १९५२: वीरप्पन – चंदन तस्कर (मृत्यू: १८ आक्टोबर २००४)
  • १९६६: अलेक्झांडर खलिफमान – रशियन बुद्धिबळपटू
  • १९७२: विनोद कांबळी – भारतीय क्रिकेटपटू
  • १९९५: साहित्यिक, कवी आणि शिक्षणतज्ज्ञ वि. द. घाटे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९३: आत्माराम रावजी भट – कृतिशील विचारवंत, ’मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चे संस्थापक (जन्म: १२ मे १९०५)
  • १९३६: रुडयार्ड किपलिंग – नोबेल पारितोषिकविजेते ब्रिटिश लेखक (जन्म: ३० डिसेंबर १८६५)
  • १९४७: कुंदनलान सैगल – गायक व अभिनेते (जन्म: ११ एप्रिल १९०४)
  • १९६७: कृषितज्ज्ञ डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचे निधन.
  • १९७१: भारीतय वकील आणि संसद सदस्य बॅरीस्टर नाथ पै यांचे निधन.
  • १९९६: एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री (जन्म: २८ मे १९२३)
  • २००३: हरिवंशराय बच्‍चन – हिन्दी कवी (जन्म: २७ नोव्हेंबर १९०७)
  • २०१५: शकुंतला महान तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत ​अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

दिल्लीत खेलरत्न पुरस्कारांचे वितरण; कोण-कोणत्या खेळाडूंना भेटला सन्मान? यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.

भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कारदेण्यात आला, तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला

1. डी गुकेश (बुद्धिबळ)

2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)

3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)

४. मनू भाकर (शूटिंग)

 

यांना अर्जुन पुरस्कार मिळाला

1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)

2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)

3. नीतू (बॉक्सिंग)

4. स्वीटी (बॉक्सिंग)

5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)

6. सलीमा टेटे (हॉकी)

7. अभिषेक (हॉकी)

8. संजय (हॉकी)

9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)

10. सुखजित सिंग (हॉकी)

11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)

12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)

13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)

14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)

15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)

16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)

17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)

18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)

19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)

20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)

21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)

22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)

23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)

24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)

25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)

26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)

27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)

28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)

29. सरबज्योत सिंग (शूटिंग)

30. अभय सिंग (स्क्वॉश)

31. साजन प्रकाश (पोहणे)

32. अमन (कुस्ती)

 

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
  • मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

  • सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  • दीपाली देशपांडे (शूटिंग)
  • संदीप सांगवान (हॉकी)

 

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
  • अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)

 

 

Facebook Comments Box

१७ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 29:33:19 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 12:46:03 पर्यंत
  • करण-भाव – 16:46:21 पर्यंत, बालव – 29:33:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सौभाग्य – 24:56:24 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:21
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 21:33:59
  • चंद्रास्त- 09:39:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • जागतिक धर्म दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १६०१: आजच्या दिवशी मुघल सम्राट अकबर ने असीरगढ येथे असलेल्या किल्यात प्रवेश केला.
  • १७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
  • १८७४: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा मृत्यू. (जन्म: ११ मे १८११)
  • १९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
  • १९४१: नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
  • १९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
  • १९४५: भारतीय चित्रपटाचे गीतकार आणि स्क्रिप्ट लेखक जावेद अख्तर यांचा जन्म.
  • १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
  • १९५६: बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
  • १९८५: इंग्लंड विरुद्ध माजी भारतीय कर्णधार मो.अझरूद्दीन यांनी दुसरे टेस्ट अर्धशतक मारले.
  • १९८९: जे. के. बजाज हे उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय ठरले.
  • २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
  • २००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर
  • २००७: ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर माइकल बेवन यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
  • २००९: भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस रणधीर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४७१: भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म.
  • १७०६: बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
  • १८८८: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक बाबु गुलाबराय यांचा जन्म.
  • १८९५: विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी (मृत्यू: ३ मे १९७८)
  • १९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: ? ? १९८६)
  • १९०६: शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू: ३ मे २०००)
  • १९०८: अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ जून १९९४)
  • १९१७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
  • १९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
  • १९१८: रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९) (मृत्यू: १६ मे २०१४)
  • १९३२: मधुकर केचे – साहित्यिक (मृत्यू: २५ मार्च १९९३)
  • १९४२: मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५५६: हुमायून – दुसरा मुघल सम्राट (जन्म: ७ मार्च १५०८)
  • १७७१: गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार (जन्म: ? ? ????)
  • १८९३: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ आक्टोबर १८२२)
  • १९३०: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म: २६ जून १८७३)
  • १९५१: प्रसिद्ध साहित्यकार ज्योति प्रसाद अग्रवाल यांचे निधन
  • १९६१: पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म: २ जुलै १९२५)
  • १९७१: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (२५ सप्टेंबर १९२२)
  • १९८८: लीला मिश्रा – अभिनेत्री (जन्म: ? ? १९०८)
  • १९९५: डॉ. व्ही. टी. पाटील – ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • २०००: सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते
  • २००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.
  • २००८: रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म: ९ मार्च १९४३)
  • २०१०: ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)
  • २०१३: ज्योत्स्‍ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
  • २०१४: रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट भिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)
  • २०१४: ला भारतीय उद्योजक सुनंदा पुष्कर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

“खोटा प्रचार करणाऱ्या सरकारची पोलखोल करणार”… शक्तिपीठ महामार्ग विरोधी शेतकरी संघर्ष समितीचा इशारा

   Follow us on        

कोल्हापूर: येत्या 24 जानेवारी रोजी शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यातून शेतकरी हे आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे आंदोलन एक इशारा आंदोलन असेल. महाराष्ट्र सरकारने शपथविधी आटोपल्या आटोपल्यानंतर युद्ध पातळीवर शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी व सरकारचा खोटारडेपणा उघडा पाडण्यासाठी 24 जानेवारी रोजी या 12 जिल्ह्यातून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शक्तीपीठ महामार्ग बाधित 12 पैकी दहा जिल्ह्यांतील आंदोलनाच्या प्रतिनिधींची ऑनलाईन मोडवर मीटिंग दिनांक 16 जानेवारी रोजी संध्याकाळी पार पडली. यामध्ये सरकारने उचललेल्या पावलांबद्दल सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये बोलताना संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,” महाराष्ट्रातील महायुती सरकार सरकार हे मोठे पसरवून निवडून आले आहे. या निवडणुकीनंतर देखील शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी ते या महामार्गास फक्त कोल्हापुरातून विरोध आहे व इतर जिल्ह्यातून विरोध नाही असे खोटे नेरिटीव्ह वापरत आहेत. हे सर्व ज्ञात आहे की इतर जिल्ह्यांमध्ये देखील आंदोलन सुरू होती व आता देखील आहेत. या सरकारला कंत्राटदारांचे भले करण्यासाठी व उद्योगपतींना नैसर्गिक साधन संपत्ती खनिज संपत्ती लुटी साठी हा महामार्ग म्हणजे रेड कार्पेट आहे. पर्यावरण विभागांनी ग्राउंड सर्वे करणे गरजेचे असताना एक-दोन दिवसांमध्ये या महामार्गाच्या प्रस्तावास कशी मंजुरी देते. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला तसेच पर्यावरण विरोधी शेतकरी विरोधी व जनविरोधी शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी जर शासन जिद्दीस पेटले असेल तर शेतकरी देखील छातीचा कोट करून घाव झलक लढायला तयार आहे.

नांदेडचे गोविंद घाटोळ म्हणाले,”मराठवाडा मधील सर्व जिल्हे संघर्ष समितीने पिंजून काढून शेतकऱ्यांना त्यांच्यावरती होणारा अन्याय अन्यायकारक भूसंपादनाची प्रक्रिया सांगून शेतकऱ्यास लढण्यास सज्ज बनवू.

लातूरचे गजेंद्र येळकर म्हणाले,” स्वतः महायुतीतील अनेक आमदार व खासदार या शक्तिपीठ महामार्ग विरोधात आंदोलनात उतरले किंवा त्यांनी भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने मांडली आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याच आमदार खासदारांचे ऐकत नाही. हे सरकार काही कारभारी मंडळींकडून आदानी अंबानींसाठी चालवले जाते.

यावेळी पुढील आठवड्यात मुंबईमध्ये बैठक घेऊन प्रसार माध्यमांसमोर सरकारच्या छोट्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या मीटिंगमध्ये गिरीश फोंडे,गोविंद घाटोळ, गजेंद्र येळकर,सतीश कुलकर्णी,शांतीभूषण कच्छवे विजयराव बेले,शिवराज राऊत,विठ्ठलराव गरुड,लालासाहेब शिंदे,अभिजीत देशमुख,गणेश घोडके,सुभाष मोरलवार,गजानन तीमेवार, केतन सारंग,भारत महाजन, सुदर्शन पडवळ, संभाजी फरताळे ,अनिल बेळे ,केदारनाथ बिडवे,श्रीधर माने संतोष ब्याळे, सतीशराव घाडगे सुनील भोसले,मेहताब पठाण,रवी मगर ,परमेश्वर मोठे, बसवराज झुंजारे,नानासाहेब चव्हाण रामेश्वर चव्हाण,उमेश एडके प्रकाश पाटील,केदारनाथ बिडवे,गणेश माने,सुरेशराव राजापूरकर,नवघरे बाबुळगावकर हे विविध जिल्ह्याचे शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Facebook Comments Box

राज्यातील बिबट्यांची ‘नसबंदी’ होणार

   Follow us on            Follow us on        

मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

दरम्यान, चालू वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वन मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी मंत्रालयात पहिलीच पत्रकार परिषद घेतली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत आपल्याला पत्र दिले. या नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. सध्या राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Facebook Comments Box

राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” ची “एकलव्य आश्रम शाळा” आदिवासी शाळेस सदिच्छा भेट

   Follow us on        

पालघर:- रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य जननी, राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” च्या वतीने “एकलव्य आश्रम शाळा” हिरडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर या आदिवासी शाळेस सदिच्छा भेट देण्यात आली. सदर प्रसंगी “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” कडून या शाळेस राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, राजश्री शाहू महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर व्यक्तींचे फ्लेक्स फोटो व नकाशे वेगवेगळ्या वर्गात लावण्यासाठी भेट देण्यात आले. शिवाय शाळेतील सर्व मुलांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले….

सदर कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, सचिव श्री. नारायण चव्हाण, उपाध्यक्ष श्री. ओमप्रकाश सिंह, खजिनदार श्री. सूरज सिंह, तसेच विश्वस्त श्री. सतिश राणे व सुनिल सिंह उपस्थित होते. शाळेतर्फे शाळेचे संचालक श्री . दिलिप पटेकर, मुख्याध्यापक श्री. मेदगे, शिक्षक श्री. राजेश विंचूरकर, श्री. नागरगोजे, श्री.जरे, श्री. पाटील , श्री. इंगळे, श्री. बडगुजर उपस्थित होते.

ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ट्रस्ट तर्फे केली जाणारी मदत योग्य ठिकाणी पोहचत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या……

Facebook Comments Box

१६ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 28:09:19 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 11:17:47 पर्यंत
  • करण-वणिज – 15:42:37 पर्यंत, विष्टि – 28:09:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-आयुष्मान – 25:05:42 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:20
  • चन्द्र-राशि-कर्क – 11:17:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:41:59
  • चंद्रास्त- 09:03:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
  • १६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला
  • १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
  • १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
  • १९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
  • १९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
  • १९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
  • १९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
  • १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
  • १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलाव तरण झाले.
  • १९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
  • १९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ’ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
  • २००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६३०: शिखांचे सातवे गुरु गुरु हर राय यांचा जन्म.
  • १८५३: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
  • १९२०: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
  • १९२६: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (मृत्यू: २८ जानेवारी २००७)
  • १९२७: भारतीय चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म.
  • १९४६: कबीर बेदी – चित्रपट अभिनेते

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १६६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)
  • १९०१: समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.
  • १९०९: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १८४२)
  • १९३८: शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
  • १९५४: बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म: ३ जून १८९०)
  • १९६२: प्रसिद्ध लेखक राम नरेश त्रिपाठी यांचे निधन.
  • १९६६: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
  • १९६७: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० डिसेंबर १९०१)
  • १९८८: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)
  • १९८९: तमिळ चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रेम नाझीर यांचे निधन.
  • १९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म: ? ? १९३३)
  • २०००: त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत (जन्म: ? ? १९१३ – बारामुल्ला, जम्मू काश्मीर)
  • २००३: रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • २००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

मुंबई लोकल्स समोरा समोर आल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        

Mumbai Local: मिरा रोड रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बातमी आज समाज माध्यमांवर आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मोठा अपघात थोडक्यात टळला अशा या शीर्षकाखाली न्यूज चॅनेल्सने सुद्धा या बातमीचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचा खुलासा पाश्चिम रेल्वेने केला आहे.

“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मीरा रोड स्थानकावर एकाच रुळावर गाड्या जवळपास समोरासमोर आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. आज 17.00 वाजता, एक लोकल ट्रेन पुरेशा आणि सुरक्षित अंतर राखून त्याच ट्रॅकवर दुसऱ्याच्या मागे उभी होती. हे ऑपरेशनल नियमांनुसार होते. उपनगरीय ट्रेन ऑपरेशन नियमानुसार, जर सिग्नल दिवसा 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लाल असेल (आणि रात्री 2 मिनिटे) तर EMU ट्रेन मर्यादित वेगाने पुढे जाऊ शकते आणि पुढील ट्रेनच्या जवळ येऊ शकते.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे आणि दहशत पसरवणे थांबवावे.” अशा शब्दात पाश्चिम रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

   Follow us on        

 

 

 

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच ‘4G’ अपग्रेड होणार

   Follow us on        
4G Service in Sindhudurg: सिंधुदुर्गात येत्या ४ महिन्यात सर्वत्र ‘४जी’ सेवा कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्कळीत बीएसएनएलची सेवा सुधारण्यासाठी विद्यमान खासदार  नारायण राणे साहेब यांनी केंद्रीय दळणवळण व दूरसंचार विभाग मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८७ साईट पैकी १५५ नवीन आणि ३२ विद्यमान 2G व 3G टॉवर 4G टॉवर मध्ये रूपांतरित करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी २५ टॉवर कार्यान्वित झालेले आहेत. फेस टू प्रकल्पांतर्गत 4G अपग्रेडेशनसाठी ३२३ साईट पैकी ३८ साईट 4G आणि २८५ विद्यमान साईट कार्यवाहीत करण्याची ठरवलेली आहेत. यातील ४ साइट्स कार्यान्वित झालेल्या आहेत, उर्वरित टॉवर हे जून २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे ठरवलेले आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला याचा फायदा होईल असा विश्वास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी  व्यक्त केला आहे.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search