कोकण रेल्वेमध्ये १९० जागांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
एकूण रिक्त पदे – १९०
शैक्षणिक पात्रता –
  • पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
  • जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात अवश्य पाहा.

Loading

Facebook Comments Box

ख्रिसमस आणि हिवाळी पर्यटनासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

Konkan Railway News: पुढील महिन्यात कोकणात गावी कोकणवासीयांची आणि गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्वाची  बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी या मार्गांवर या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – थिविम – मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक)
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01151 मुंबई CSMT – थिविम स्पेशल म्हणून रोज धावणार आहे 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत ही गाडी जाणार आहे. मुंबई CSMT येथून दररोज 00.20 वाजता हि गाडी सुटे आणि त्याच दिवशी 14.00 वाजता थिविमला पोहोचेल.
गाडी क्र. 01152 थिविम – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) गाडी असेल. थिविम येथून हि गाडी 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत दररोज 15.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना
ही गाडी एकूण 22 डब्यांची असेल. त्यात दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 05 डबे, एसएलआर – 02 अशी रचना असेल.
२) गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक)
गाडी क्र. ०१४४५ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन शुक्रवार, 22/12/2023 आणि 29/12/2023 रोजी 17:30 वाजता सुटून ट दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४६ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार, 24/12/2023 आणि 31/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:35 वाजता पोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची संरचना
एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.
3) गाडी क्र. ०१४४८ / ०१४४७ करमाळी – पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) :
गाडी क्र. 01448 करमाळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01447 पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी पनवेल येथून 22:00 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.
या गाडीचे थांबे
ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.

Loading

Facebook Comments Box

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा.

मुंबई :सध्याच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर पाहण्यास मिळत आहे. या गर्दी मुळे कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गर्दीच्या वेळेत मुंबई मधील महत्वाच्या स्थानकांवर होणार्‍या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात येणार आहे.

दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही मर्यादा असणार आहेत. गर्दीच्या ठराविक वेळेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र वरीष्ठ नागरिक, अपंग तसेच लहान मुल असलेल्या महिलांसाठी या मर्यादेतून वगळण्यात आले आहे. 

प्रवाशांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा आणल्यास ही अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे. 

 

Loading

Facebook Comments Box

सोनुर्लीची लोटांगणाची जत्रा २८ नोव्हेंबरला

सिंधुदुर्ग :दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच लोटांगण नवसही फेडतात.

श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो.

या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे

Loading

Facebook Comments Box

ऐन सणासुदीत कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; सावंतवाडी दिवा एक्सप्रेससह ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात राजापूर ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५  गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 50108 Madgaon Jn. – Sawantwadi Road Passenger
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी आपल्या आरंभ स्थानकावरून ८० मिनिटे उशिराने सुटणार आहे. सकाळी ६ वाजून १० मिनिटाने सुटणारी गाडी ७ वाजून ३० मिनिटाने सुटणार आहे.
२)Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी आपल्या आरंभ स्थानकावरून म्हणजे सावंतवाडी स्थानकावरून १२५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. सकाळी ८ वाजून ४० मिनिटाने सुटणारी गाडी १० वाजून ४५ मिनिटाने सुटणार आहे.
३)Train no. 10104 Madgaon Jn. – Mumbai CSMT Mandovi Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी करमाळी ते सावंतवाडी दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
४)Train no. 12051 Mumbai CSMT Janshatabdi Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.
५)Train no. 22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
दिनांक १७ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते राजापूर दरम्यान २० मिनिटे उशिराने धावणार आहे.

Loading

Facebook Comments Box

आजच्या एलटीटी – मडगाव एक्सप्रेसचा प्रवास पनवेलपर्यंतच

Konkan Railway News :रेल्वे प्रशासनाने काही कारणास्तव आजच्या एलटीटी – मडगाव (11099/11100)या गाडीचा प्रवास पनवेल ते एलटीटी दरम्यान रद्द केला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार दिनांक 10 नोव्हेंबर या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक 11100 मडगाव – एलटीटी एक्सप्रेस या गाडीचा प्रवास पनवेल या स्थानकावर संपणार असून पनवेल ते एलटीटी या स्थानकां दरम्यान ती रद्द करण्यात आली आहे.

तर दिनांक 11 नोव्हेंबर (मध्यरात्री) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी गाडी क्रमांक 11099 एलटीटी – मडगाव एक्सप्रेस ही पनवेल या स्थानकावरून सुटणार आहे. ही गाडी तिच्या पनवेल स्थानकावरील वेळेनुसार सुटणार आहे.

 

Loading

Facebook Comments Box

देवगड : ब्रेक निकामी झाल्याने एसटीला अपघात

देवगड : देवगड आगाराची वरेरी देवगड या दुपारच्या एसटी प्रवासी फेरीला दुपारी दोनच्या सुमाराला तळवडे खडवी येथे तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी नजीकच्या मांगरावर अडकली अपघातात तळेबाजार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. या एसटी प्रवासी फेरीचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. देवगड आगराची वरेरी तळवडे मार्गे देवगडकडे परतीच्या प्रवासाला येत असताना हा अपघात घडला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या प्रवासी फेरीत सुमारे १५ विद्यार्थी अन्य १ प्रवास करीत होते त्यापैकी तीन विद्यार्थीनीना किरकोळ दुखापत झाली. आहे. 

 

 

Loading

Facebook Comments Box

रत्नागिरीत एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प येण्याच्या बेतात

रत्नागिरी: जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्याची शक्यता आहे. एप्रिल एशिया कंपनी असे त्याचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमआयडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे; परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.(Latest Marathi News)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या काही उद्योगांची धडधड पुन्हा सुरू केली आहे. नवे उद्योग यावे यासाठी स्टर्लाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जेके फाइल्सच्या जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगांना सहज गुंतवणूक करता यावी यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे.
त्यामुळे सिंगापूरची एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. हे टिश्यू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात. हे टिश्यू निर्यात केले जाणार असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे. 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात २ ठिकाणी मेगाब्लॉक

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या गुरुवार दिनांक ०९ नोव्हेंबर आणि शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ४ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
A) गुरुवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी कुमठा – भटकल दरम्यान दुपारी १२:०० ते १५:०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१)Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी भटकल स्थानकावर २० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे .
B) शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान दुपारी ०८:३० ते ११:०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) “Netravati” Express 
दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी उडपी ते कणकवली दरम्यान २ तास ३० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) TTrain no. 10106 Sawantwadi Road – Diva Jn. Express 
दिनांक १० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी रोड ते कणकवली दरम्यान ३० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक १० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी स्थानकावर १० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

धोक्यातली कातळ खोदचित्रे !!!

वाचकांचे व्यासपीठ: जैतापूर हातिवले हमरस्त्यावरील साखर या गावच्या कातळावर चिरेखाणींच्या विळख्यात कातळ खोदचित्रांच्या दोन साईट आहेत.पैकी एलिफंट बर्डचे 12 फुट x 4 फुटाचे चित्र नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले दिसते.लगतच्या चिरेखाणीचे मार्किंग या चित्रावर झाल्याचे स्पष्टपणे दिसते.कदाचित नजिकच्या काळात ते नष्ट झालेले असेल.

एकीकडे कोकणातल्या निवडक नऊ साईट्सचा समावेश जागतिक वारसा प्राथमिक यादीत झालेला असतानाच अनेक ठिकाणची चित्रे रस्ते,चिरेखाणी,आंबा कलमबागा यामुळे नष्ट झाली आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.

रत्नागिरीतील “निसर्गयात्री” संस्थेसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक संस्था, समुह किंवा व्यक्तींनी आजवर 125 गावांमधून 151 साईट्सवरची 2000 हजारहून अधिक कातळ खोदचित्रे (Geoglyphs) शोधून काढली आहेत.मात्र त्यातील काही निवडक साईट्स सोडल्या तर बहुतांश ठिकाणी हा अनमोल ठेवा बेवारस अवस्थेत पडून आहे.

या सर्व साईट्स खासगी मालकीच्या असून बहुतांश मालकांना त्यांचे महत्व/गांभीर्य अद्याप कळलेले नाही.बहुतांश साईट्स अक्षरशः उघड्यावर असंरक्षित अवस्थेत आहेत. कित्येक चित्रांवरून माणसे,गाईगुरे यांची रहदारी सुरू आहे.कित्येक साईट्स वरून पावसाच्या पाण्याचे लोट वहाताना दिसतात.या गोष्टींमुळे ऑलरेडी अनेक चित्रांची भरपूर झीज झाली आहे.ती आता भरून न येणारी हानी आहे.मात्र सध्या अस्तित्वात असणारी सर्वच्या सर्व चित्रे आहेत त्या अवस्थेत संरक्षित होणे ही काळाची गरज आहे.

त्यासाठी त्या त्या साईट्सच्या मालकांना कनव्हिन्स करून माणसे आणि गाईगुरांची रहदारी तसेच पावसाळी पाण्याचे प्रवाह थांबवावे लागतील. त्या त्या गावातील स्थानिक मंडळे, संस्था किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून साईटभोवती दोन दोन चिऱ्यांची लाईन फिरविता येऊ शकेल.तसेच चिरेखाणी,कलम बागा,प्लॉटिंग,रस्ते विस्तार या बाबीही थांबवाव्या लागतील.

“निसर्गयात्री” संस्थेच्या अथक प्रयत्नातून रत्नागिरी येथे नुकतेच “कोकणातील कातळशिल्पे आणि वारसा केंद्र” सुरू झाले आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतील काही टक्के रकमेचा विनियोग या तातडीच्या आणि अत्यावश्यक कामांवर करता येणे शक्य झाल्यास धोक्यात असलेली अनेक कातळ खोदचित्रे नष्ट होण्यापासून वाचविता येतील अशी आशा करण्यास हरकत नाही.

AK मराठे,कुर्धे

पावस,रत्नागिरी

9405751698

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search