Category Archives: सिंधुदुर्ग

आंबोली | ग्रामस्थांनी वाचविले सांबाराचे प्राण

आंबोली : जंगलात होणारे मानवीअतिक्रमण, अतिप्रमाणात होणारी वृक्षतोड आणि शिकारीमुळे अनेक वन्य प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही प्रजाती तर समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र वनपरिसंस्थेचे महत्व जाणून त्याचे जाणून त्याचे रक्षण करणे, प्राणिमात्रांवर दया दाखवणे हे आपले आद्य कर्तव्य मानणारे अजूनही काही लोक आपणास कोकणात आढळून येत आहे. याची अनुभूती आज आंबोली येथे अनुभवण्यास मिळाली.
आंबोली फौजदारवाडी येथील हिरण्यकेशी नदीपात्रात आज सकाळी कुत्र्यांनी एका सांबराच्या पिल्लाला शिकारीसाठी घेरले होते. त्याचवेळी तेथून रिक्षा घेऊन जाताना जवळच घर असणाऱ्या रानमाणूस” प्रथमेश गावडे याला लक्षात आल्यानंतर त्याने त्या पिल्लाला सोडवण्यासाठी प्रयत्न केले.त्याच्यासोबत मग शैलेश गावडे आणि राकेश अमृसकर हे देखील आले यानंतर त्यांनी आंबोली वन विभागाला कळवल्यानंतर बाळा  गावडे आणि वनरक्षक श्री. गाडेकर यांनी त्या पिल्लाला आंबोली वनकार्यालयात नेले पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. हे पिल्लू साधारण अंदाजे वर्षभराचे आहे. कुत्र्यांच्या झुंडीत सापडल्याने पिल्लू भयभीत झाले होते. आईपासून दुरावलेले हे पिल्ले भरकटलेल्याने वाट चुकले आणि कुत्र्यांच्या तावडीत सापडले. कुत्र्यांनी त्याला चारही बाजूंनी घेरले; मात्र त्याचवेळी तेथे पोहोचलेले प्रथमेश गावडे यांच्यामुळे पिल्लास जीवदान मिळाले.

Loading

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर! अर्ज कसा कराल?

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती पदाचे नाव/ पदानुसार जागा:

1) आरोग्य पर्यवेक्षक- 01

2) आरोग्य सेवक (पुरूष)- 55

3) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)- 121

4) औषध निर्माण अधिकारी- 11

5) कंत्राटी ग्रामसेवक- 45

6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)- 29

7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 02

8) कनिष्ठ लेखा अधिकारी- 02

9) कनिष्ठ सहाय्यक लेखा- 04

10) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका- 02

11) पशुधन पर्यवेक्षक- 18

12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02

13) तारतंत्री- 01

14) वरिष्ठ सहाय्यक- 04

15) वरिष्ठ सहाय्यक लेखा- 07

16) विस्तार अधिकारी (कृषि)- 03

17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)- 27

अर्ज कसा कराल? शैक्षणिकदृष्टीने पात्र उमेदवारांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन शासनाने केले आहे.

जाहिरात

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/सिंधुदुर्ग-जिल्हा-जिल्हापरिषद-भरती-2023.pdf” title=”सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषद भरती 2023″]

जाहिरातीची पीडीएफ फाईल येथे डाऊनलोड करा 👇🏻

Loading

ब्रेकिंग | सावंतवाडी तालुक्याला भूकंपाचे धक्के | भूकंपाच्या अधिक माहितीसाठी ‘हे’ ॲप डाऊनलोड करा

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात रात्री ८ वाजून ५१ मिनीटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. सह्याद्री पट्ट्यातील सांगेली सह माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मोठा आवाज होऊन जमीन हादरली.
तहसीलदार श्रीधर पाटील  यांनी  हा भूकंपाचाच प्रकार असल्याचे  सांगितले. हा ३ रिस्टर स्केल चा हा भूकंप होता. मात्र, त्याचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे ते निश्चित झाले नसल्याची माहिती त्यांनी सांगितली. हा भूकंप असल्याचे अधिकृत रित्या प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला आहे
भूकंपाच्या अधिक माहितीसाठी https://play.google.com/store/apps/details?id=gov.in.seismo.riseq  हे ॲप डाऊनलोड करावे.

Loading

सावंतवाडी स्थानकाचे नामकरण ”प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” करण्याच्या व ईतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघाचे रेल्वे मंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्ग | सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याचे “प्राध्यापक मधू दंडवते टर्मिनस” असे नामकरण करावे आणि महत्वाचा अशा रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजिस्टर) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.

या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे

कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते ठोकूर असा कोकण रेल्वे मार्ग असला तरी महाशय कोकण रेल्वे प्रवासी यांचा रेल्वे प्रवास वा कोकणवासियांच्या तळ कोकणातील अत्यंत अतिमहत्वाचे स्थानक “सावंतवाडी रोड” होय. कालांतराने आता सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक असे नावारूपास आले. कोकणवासियांच्या महत्त्वाच्या मेल/ एक्सप्रेस मधील जनशताब्दि एक्स., मांडवी एक्स., कोकणकन्या एक्स,. या गाड्यांव्यतिरिक्त तुतारी एक्स. व दिवा एक्स. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात दैनंदिन प्रकारात आग कोकणवासियांना या एक्सप्रेस गाड्यांचा बराच मोठा फायदा तर होतोच आहे; परंतु दैनंदिन गाड्यांच्या तुलनेत आणि सावंतवाडी हे तळकोकण चे रेल्वे स्थानक असल्यामुळे खालील काही मुद्दे मांडत सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकासाठी अधिक थांब्यासाठी काही गाड्यांची मागणी करीत आहोत असे राजू कांबळे यांनी सांगितले.

१. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळावा यासाठी पूरेपूर यशस्वी प्रयत्नशील राहत कार्य सिद्धीस करावे.

२. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास कोकण रेल्वे मार्गाचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेब यांचे नाव देवून *प्रा. मधू दंडवते टर्मिनल्स* असे नामकरण करण्यात यावे.

३. सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट विक्री खिडकी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावी.

३. गाडी क्र.१२६१८/१२६१७ मंगला लक्षद्विप एक्सप्रेस, निजामउद्दीम-एर्नाकूलम/ एर्नाकूलम-निजामउद्दीम. या दैनंदिन गाड्यंस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा.

४. गाडी क्र. १६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-तिरूवअनंतपूरम/तिरूवअनंतपूरम-लो. टिळक टर्मि. या दैनंदिन गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

५. गाडी क्र. १२६१९/१२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस, लो. टिळक टर्मि.-मेंगलोर सेन्ट्रल/मेंगलोर सेंट्रल-लो. टिळक टर्मि., या गाड्यांसही सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

६. गाडी क्र. ०११३९/०११४० नागपूर-मडगांव विशेष/मडगांव-नागपूर विशेष गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास थांबा देण्यात यावा.

७. गाडी क्र. २२२२९/२२२३० वन्दे भारत एक्सप्रेस, मुंबई-मडगांव/मडगांव- मुंबई या वातानुकूलित गाडीस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहोत.

महोदय, कोकणवासियांच्या गर्दीचा वाढता ओघ पाहता तसेच सावंतवाडी तालुक्यात बऱ्याच गावांचा

समूह असताना तळ कोकण म्हणून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास टर्मिनल्स चा दर्जा मिळालाच पाहिजे. त्याचप्रमाणे सदर गाड्यांस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात थांबे मिळाल्यास इतर गाड्यांवरील प्रवाशांचा गर्दीचा भार कमी होण्यास मदत होईल आणि जास्तीत जास्त कोकणवासियांना याचा बऱ्याच मोठ्या संख्येने लाभ घेता येईल. महोदय कृपया या निवेदनाचा प्रत्यक्षपणे सबब पाहता कार्य सिद्धीस आणावे ही समस्त कोकणवासियांची मनपेक्षा.

Loading

दोडामार्ग तिलारी परिसरात सापडले दुर्मिळ ‘तारा’ कासव

दोडामार्ग : निसर्गसंपन्नतेचे वरदान असलेल्या तळकोकणातील तिलारी परिसरात काल एक दुर्मिळ ‘तारा’ GEOCHELONE ELEGANS प्रजातीचा कासव सापडला आहे. कासवांची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून वन्यजीव कायद्याखाली संरक्षित आहे. सध्या हे कासव दोडामार्ग वन विभागाच्या ताब्यात असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

दोडामार्ग तालुक्यातील पाळये येथील उद्योजक सुभाष दळवी यांना हे कासव आढळून आले. त्यांनी दोडामार्गचे वनक्षेत्रपाल अरुफ कन्नमवार यांच्याकडे ते सुपूर्द केले. या कासवाच्या पृष्ठभागावर तारे व कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा वेगळा आहे. पंचनामा व अन्य प्रक्रिया पूर्ण करून या कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वनाधिकारी कन्नमवार यांनी सांगितले आहे.

या प्रजातीबद्दल अधिक माहिती
भारत आणि श्रीलंकेत हे तारा कासव आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ते दुर्मिळ प्रजाती असल्याची माहिती प्राणीमित्रानी दिली. या कासवाबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. हा कासव घरात ठेवल्यास घरात भरभराट अन् नोकरीधंद्यात प्रगती होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळेच ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

प्रजातीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायद्याच्या तरतुदी
इंडियन स्टार कासवे ही वन्यजीव संरक्षण अधिनयानुसार संरक्षित असून त्यांची खरेदी विक्री करण्यास बंदी आहे. तसेच ती जवळ बाळगण्यास बंदी आहे. त्यामुळे तारा कासव वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत संरक्षित आहे. तेथे प्रजाती ताब्यात आढळल्यास त्याला सहा महिन्यांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे या कासावाच्या पृष्ठभागावर तारे आणि कुबड्यासारखे फुगीर भाग असतात. त्यामुळे हा कासव इतर कासवांपेक्षा विशेष आहे.

Loading

आंबोली धबधबा | पर्यटकांकडुन शुल्क आकारण्याचा निर्णय स्थगित

सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.

 

Loading

Amboli Waterfall | धबधब्याला भेट देण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार.

सावंतवाडी | प्रतिनिधी :पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. हा धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. तर 5 वर्षापर्यंतच्या मुलांना कोणतेही शुल्क नसणार आहे.

कोरोना पूर्व काळात या धबधब्याला भेट देणार्‍या सर्व पर्यटकांना सरसकट 10 रुपये असे तिकीट दर अस्तित्वात होते. त्यानंतर ही तिकीट पद्धत बंद झाली होती. आता ती पुन्हा सुरू करण्यात येणार असून ही रक्कम जमा करण्याचा अधिकार वनव्यवस्थापन समितीला दिला असून मिळणार्‍या पैशाचा वापर धबधबा आणि आजूबाजूचा परिसरातील वनविकास करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिली आहे. येत्या शनिवार पासून हे पैसे आकारले जातील.

Loading

आंबोली धबधबा : प्रवाहाबरोबर दगड खाली; पर्यटकांची तारांबळ

सिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनासाठी पहिली पसंती असलेल्या आंबोली येथे धबधब्याच्या ठिकाणी सायंकाळी धबधब्याचा प्रवाह वाढल्याने दगड त्याबरोबर खाली येवून पर्यटकांना धोका निर्माण झाला होता. या वेळी काही पर्यटक आनंद लुटत असताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दोन- तीन दगड खाली आले. यामुळे तेथे असलेल्या सगळ्यांचीच धावपळ उडाली. त्यातील एक दगड एका पर्यटकाच्या पायावर आदळल्याने दुखापत झाली.

काल आंबोली येथील मुख्य धबधब्यकडे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दगड कोसळू लागल्याने पर्यटकांची तारांबळ उडाली. यात बेळगाव येथील युवक किरकोळ जखमी झाला. ही बाब तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास मनाई केली.

Aam

Loading

दोडामार्गात पट्टेरी वाघाचा वावर; चरायला गेलेल्या म्हशीवर हल्ला

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काल वाघाने म्हशीवर हल्ला केल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की काल सोमवारी तेरवण मेढे येथील शेतकरी लक्ष्मण घाटू काळे हे आपली गुरे चरवण्यासाठी सायंकाळी मेढे येथे माळरानावर गेले होते. सुमारे 4.30 च्या सुमारास अचानक एका पट्टेरी वाघाने एका म्हशीवर हल्ला चढविला. म्हशीच्या केलेल्या मोठ्या ओरड्याने जवळपास असणारे गुराखी लक्ष्मण यांनी तेथे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. एक पट्टेरी वाघाने एका म्हशीची मान आपल्या जबड्यात पकडली होती आणि म्हैस जिवाच्या आकांताने सुटकेचा प्रयत्न करत होती. हा प्रकार पाहून लक्ष्मण यांनी मोठ मोठ्याने ओरडा केल्याने वाघाने म्हशीला सोडून धूम ठोकली.

म्हशीच्या मानेत वाघाचे दात घुसल्याने रक्तस्त्राव झाला होता. मात्र आता उपचार केल्याने तिच्या जिवावरचा धोका टळला आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

 

Loading

Sawantwadi : वाहतुक पोलिसांची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

सिंधुदुर्ग : तळकोकणातील सातुळी तिठा येथे काल उशिरा वाहतूक शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दारू सह ११ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील संशयित दोघे आपल्या ताब्यातील महेंद्रा बोलेरो पिकअप घेवून सावंतवाडीहून कोल्हापुरच्या दिशेने चालले होते. यावेळी त्या ठिकाणी ड्यूटी बजावत असलेल्या वाहतूक पोलिस प्रविण सापळे यांना त्यांची हालचाल संशयास्पद दिसली. यावेळी त्यांनी त्या दोघांना थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान आनंद व्हनमाने (२१), बिरुदेव उर्फ बिरुजानू खरात (२४, दोघेही रा.सांगोला) अशी त्यांची नावे आहेत .

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search