सावंतवाडी:सध्याच्या सोशल नेटवर्किंग युगात जनजागृती करण्यासाठी किंवा आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करून अपेक्षित परिणाम मिळवता येतात. अगदी जवळचे कोकणातील उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर फेसबूक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटवर बनविण्यात आलेले Sawantwadi Railway Station – Terminus हे पेज.
सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि कोकण रेल्वे संबधीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, जनजागृती करून समस्यां सोडविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यात यावा या हेतूने या पेजची निर्मिती करण्यात आली. कोकण रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी हे पेज बनवले आहे. या पेज द्वारे त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर, विहंग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर,तेजस पोयेकर ईत्यादींनी पोस्ट, लाईव्ह च्या माध्यमातून वेळोवेळी अनेक कोकण रेल्वे संबधी अनेक समस्या येथे मांडून जनजागृती केली आहे.
दोन दिवसांपूर्वी या पेजवर या कार्यकर्त्यांनी फलक मोहीम राबवून काही फोटो पोस्ट केले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्यावर दृश्ये views, लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. “कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा आशयाची फलक मोहीम ”कोकणवाचवा” आणि ”SaveKokanRailway” या hashtag सहित कार्यकर्त्यांनी राबवून ते फोटो या पेज वर पोस्ट केले होते.
आम्हाला अजून पाठिंबा दर्शविण्यासाठी आमच्या ह्या चळवळीत सामील व्हा.या पेज ला फॉलो करून आमच्या सोबत जोडले जा ही तुम्हा सर्वांना विनंती. आवाहन या पोस्ट मध्ये करण्यात आले आहे
#Save Konkan Railway..
#Merge Konkan Railway With Indian Railways.
#Sawantwadi Terminus
Railway News: प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा तब्ब्ल १२०० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणारी ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या मार्च अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने या गाडीच्या एकूण ५४ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक ०३ एप्रिल २०२४ ते २९ जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक ०४ एप्रिल २०२४ ते ३० जून २०२४ या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
मुंबई:होळीचा सण आणि लागोपाठ तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी जायला निघाला असल्याने पुढील तीन ते चार दिवसांत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंग तिकीटही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे चाकरमान्यांना वाहतुकींच्या अन्य पर्यायांकडे वळावे लागणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांच्या दिनांक 22, 23 आणि 24 या दिवसांच्या आरक्षणाची स्थिती पाहता मांडवी आणि जनशताब्दी या गाड्यांच्या सेकंड स्लीपर श्रेणीचे आरक्षण Regret असे दाखवत असून तुतारी, कोकणकन्या आणि एलटीटी मडगाव गाड्यांच्या आरक्षणाची स्थितीही जवळपास 400 वेटिंग लिस्ट असल्याने ती Regret होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.
रेल्वे प्रशासनाने या मार्गावर काही विशेष गाड्या चालविल्या असल्या तरी त्या अपुऱ्या पडत आहेत. या गाड्यांच्या आरक्षणाची स्थितीही 200 वेटिंग लिस्ट वर पोहोचली आहे. विशेष गाड्या सोडताना रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप प्रवासी संघटनाकडून होत आहे. खास शिमग्यासाठी विस्तारित केलेली रोहा चिपळूण गाडी रद्द करण्यात आली पण तिच्या बदल्यात दादर ते चिपळूण/रत्नागिरी अनारक्षित गाडी चालवणे अपेक्षित होते,तशी मागणी प्रवासी संघटनांनी निवेदने देवून केली होती. मात्र त्या मागणीला रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.
सध्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत. कोकण रेल्वेने गर्दीतून, हालअपेष्टा सहन करत गाव गाठायचे किंवा हंगामाचा फायदा घेऊन लुटणाऱ्या खासगी वाहनातून परवडत नसले तरीही प्रवास करणे.
Konkan Railway News : स्लीपर डब्यांना मोठी मागणी असूनही या डब्यांचे रूपांतर replacement एसी कोच मध्ये करत असल्याचा आरोप रेल्वे प्रशासनवर होत असताना सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 16336 /16335 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस या गाडीच्या स्लीपर कोच मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ही गाडी सध्या एकूण 11 स्लीपर कोचसहित धावत आहे त्यामध्ये एका स्लीपर कोचची वाढ करून 12 एवढी करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी दिनांक 19 मार्च 2024 तर गाडी क्रमांक 16335 गांधीधाम नागरकोईल एक्सप्रेस दिनांक 22 मार्च 2024 रोजीपासून या बदलासह चालविण्यात येणार आहे.
ही गाडी कोकणात वसई, भिवंडी, पनवेल , माणगाव, चिपळूण, रत्नागिरी या स्थानकावर थांबे घेते.
Absenceof FOB :कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूल नसल्याने दोन प्लॅटफॉर्म च्या मधील रुळावरून जीव मुठीत पलीकडे जावे लागत आहे. खासकरून वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि लहानमुले आणि स्त्रियांना रेल्वे रूळ ओलांडताना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीवरून येथे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र येथे प्रवासी संख्या आणि चांगले उत्पन्न मिळत असूनही तसेच अनेक वर्ष मागणी करूनही येथे पादचारी मंजूर होत नसल्याने येथे अपघात घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघणार का असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
सध्या वैभववाडी मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस स्थानकावर सध्या ४ नियमित गाड्या थांबा घेतात. तसेच सणावारीआणि हंगामात चालविण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच गाडयांना येथे थांबा देण्यात येतो. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी उत्पन्नाच्या बाबतीत वैभववाडी स्थानक रत्नागिरी विभागातून सातव्या स्थानावर तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या स्थानकांचा विचार करता ७२ स्थानकामध्ये १४ व्या स्थानावर आहे. हे वास्तव असूनही या स्थानकावर एक पादचारी पूल का मंजूर होत नाही हा पण एक मोठं प्रश्च म्हणावा लागेल
Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत? – Kokanai
पनवेल : पनवेल स्थानक गर्दीचे स्थानक बनले आहे. या रेल्वेस्थानकात कधीही दुर्घटना घडू शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे वास्तव सध्या पनवेलच्या रेल्वे स्थानकामधील आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. गावी जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांसाठी आणि लोकलसाठी येथे वापरात असलेल्या पादचारी पुलांचे योग्य नियोजन केलेले नसल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगरा चेंगरी होण्याचा धोका आहे.
पनवेल रेल्वेस्थानक हे जंक्शन होत आहे. दररोज या स्थानकातून सूमारे सव्वा लाख प्रवासी प्रवास करतात. यातील पन्नास हजार प्रवासी नवीन पनवेल परिसरातून मुंबई, ठाणे व इतर उपनगरीय रेल्वे गाड्या पकडण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर करतात. नवीन पनवेल व रेल्वेस्थानक जोडण्यासाठी सध्या हाच एक पुल प्रवाशांसाठी शिल्लक आहे. सध्या स्थानकात विस्तारीकरणाचे काम सूरु आहे. प्रवाशांना दररोज जिवमुठीत घेऊन या पादचारी पुलावरुन जावे लागते. एक्सप्रेसमधून उतरणा-या प्रवाशांना गर्दीतून पाठीवरील बोजा घेऊन मार्ग काढावा लागतो. या गर्दीचा भयानक अनुभव सध्या पनवेलचे रेल्वे प्रवासी घेत आहेत. पादचारी पुलावरील ही गर्दी टाळण्यासाठी हताश झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून बेकायदा व जिवघेणा प्रवास करत आहेत.
अशा वेळी दुर्घटना होण्याची शक्यता
पनवेल स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांसाठी सध्या ३ प्लॅटफॉर्म आहेत. कोणत्याही गाडीसाठी निश्चित असा प्लॅटफॉर्म नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कित्येक प्रवासी बाहेरच्या प्लॅटफॉर्मवर किंवा पादचारी पुलावर गाडी येण्याची वाट पाहत असतात. अशा वेळी अचानक गाडीची घोषणा झाल्यावर चेंगरा चेंगरी होऊन दुर्घटना घडण्याची मोठी शक्यता आहे.
पनवेल रेल्वे स्थानकावर सायंकाळच्या वेळेला नोकरदार वर्गाची पादचारी पूल ओलांडण्यासाठी मोठी गर्दी होते. pic.twitter.com/3aQCT9xsMz
रत्नागिरी : स्वर्गीय श्री. जॉर्ज फर्नांडिस आणि अर्थमंत्री, स्वर्गीय श्री. मधु दंडवते यांच्या अतोनात प्रयत्नाने १९९८ साली कोकणात रेल्वे आली. रेल्वे आल्याने मुंबईतील चाकरमान्यांना गाव ते मुंबई आणि इतर ठिकाणच्या प्रवासासाठी एक जलद आणि सोयीचे माध्यम उपलब्ध झाले. या २५ वर्षात ही रेल्वेसेवा चालविणाऱ्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने KRCL अनेक प्रकारच्या सुधारणा करून प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यावर भर दिली. यात नवीन स्थानकांची निर्मिती, पूर्ण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, नवीन गाड्यांचा समावेश आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
यात काही शंका नाही की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन आपल्या परीने येथील रेल्वे सेवेचा विकास करते आहे, आणि भविष्यातही ती असे प्रयत्न करणार आहे. मात्र हा विकास पुरेसा आहे का? याबाबत विचार करणेही गरजेचे आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे यासाठी कोकण विकास समितीने प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विन वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वे मध्ये विलीनीकरण करावे अशा मागणीचे एक पत्र लिहिले आहे. या पत्रात समितीने विलीनीकरण केल्याने कोणते फायदे होतील त्याचे स्पष्टीकरणही दिले आहे. या पत्राची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोकणातील आणि राज्यातील आजी आणि माजी नेत्यांनाही पाठविण्यात आली आहे.
पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे……
“महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारी प्रदेशातील संबंधित नागरिक, आमच्या प्रदेशाच्या वाढीसाठी आणि विकासाची अपार क्षमता असलेल्या एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देण्यासाठी आज तुम्हाला पत्र लिहित आहोत.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ची स्थापना १९९० मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री, स्वर्गीय श्री. जॉर्ज फर्नांडिस आणि अर्थमंत्री, स्वर्गीय श्री. मधु दंडवते यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) तत्त्वावर करण्यात आली. यात भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५%, गोवा राज्य शासन ६% व केरळ राज्य शासन ६% असा आर्थिक वाटा होता. साधारण १० वर्षांच्या कामकाजानंतर कॉर्पोरेशन भारतीय रेल्वेमध्ये विलीन होईल या अटीसह, रोहा आणि ठाकूर (मंगळुरू) दरम्यान अस्तित्वात नसलेला रेल्वे मार्ग नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली होती.
आता २५ वर्षांनंतरही कोकण रेल्वेचा कारभार स्वतंत्रच असून केवळ आपल्याला मिळणाऱ्या नफ्याच्या जोरावर हे महामंडळ आमच्या विभागात रेल्वे चालवण्याखेरीज इतर पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी लक्षणीय कामगिरी करू शकत नाही.
1) आर्थिक मर्यादा: महामंडळाला भेडसावणाऱ्या आर्थिक मर्यादांमुळे केवळ नफ्याच्या जोरावर मार्गाचे दुहेरीकरण, सध्या अस्तित्वात असणाऱ्या स्थानकांमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा, नवीन स्थानके बांधणे, यांसारखी कामे होणे दुरापास्त आहे.
2) अर्थसंकल्पीय वाटप: सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) असल्यामुळे कोंकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून केंद्रीय अर्थसंकल्पात स्थान मिळत नाही. यामुळे पायाभूत सुविधांच्या विकामकामांना खीळ बसली आहे.
3) दायित्वे आणि कर्ज घेणे: स्वतंत्र आर्थिक कारभारामुळे व अर्थसंकल्पात स्थान नसल्यामुळे भरीव विकासकामांसाठी कोंकण रेल्वेला कायम इतर संस्थांकडून कर्ज घेण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु, स्थापना करताना सर्व देणी देऊन झाल्यावर भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात येईल असा आशय असल्यामुळे हे चक्र कधीच संपणार नाही. त्यामुळे आता हे महामंडळ त्यावर असलेल्या कर्जासहित भारतीय रेल्वेत विलीन करण्याची गरज आहे.
4) हुकलेली संधी: भारतीय रेल्वेवर जास्त प्रवासी वाहतूक असणाऱ्या मार्गांचे उच्च-घनता मार्ग (High Density Network – HDN) आणि अति गर्दीचा मार्ग (Highly Utilized Network – HUN) असे वर्गीकरण केले जाते. यात मुंबई दिल्ली, मुंबई चेन्नई यांसारख्या मार्गांचा समावेश आहे. परंतु, वर्षभर प्रवाशांची गर्दी असूनही कोंकण रेल्वे मार्ग केवळ स्वतंत्र कारभारामुळे या वर्गीकरणांपासून मुकला आहे, ज्यामुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना अडथळा निर्माण होतो.
5) वाढीव भाडे आणि मर्यादित क्षमता: कोंकण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतुकीवर ४०% तर मालवाहतुकीवर ५०% अधिभार आहे. कोकणातील प्रवासी इतर मार्गांवरील प्रवाशांपेक्षा जास्त भाडे देत असूनही त्यांना हव्या तितक्या सुविधा मिळत नाहीत. मालवाहतुकीवरील अधिभार तसेच कोंकण रेल्वेकडे कोणतेही बंदर नसल्यामुळे महसूल वाढीची संधीही मिळत नाही.
6) विकास योजनांमध्ये अन्याय: माननीय पंतप्रधानांनी ऑगस्ट २०२३ मध्ये उदघाटन केलेल्या अमृत भारत योजनेत कोंकण रेल्वे मार्गावरील एकाही स्थानकाचा समावेश नव्हता. नंतर मडगाव आणि उडुपीचा समावेश केला गेला, परंतु महाराष्ट्रातील रोहा ते मडुरे दरम्यानचे एकही स्थानक अद्यापही या योजनेत नाही. त्याऐवजी महाराष्ट्र राज्य शासनाने काही स्थानकांच्या केवळ बाह्य परिसराचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. ते पुरेसे नसून संपूर्ण मार्ग भारतीय रेल्वेत जाऊन सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे.
7) व्यवस्थापन संरचना: देशात इतरत्र कुठेही एवढा मोठा मार्ग स्वतंत्र महामंडळाच्या ताब्यात नाही. केवळ कोकणात असे करण्याचा निर्णय तत्कालीन परिस्थितीमुळे घेण्यात आला होता. परंतु आता तशी परिस्थिती नसल्यामुळे हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन व्हायला हवे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून सध्या असलेल्या कर्जासहित कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
रेल्वेच्या दोन विभागांत समन्वय साधून गाड्या चालवण्यात अडचणी येतात. तसेच कोंकण रेल्वे स्वतंत्र झोन राहिल्यास लोको शेड, वर्कशॉपसारख्या काही सुविधांसाठी इतर विभागांवर अवलंबून राहायला लागेल. तसेच सावंतवाडी ते रोहा मार्गावरील ठिकाणांवरून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांकडे जाणाऱ्या गाड्या वाढवण्याच्या दृष्टीने हा संपूर्ण विभाग एकाच झोनमध्ये असणे फायदेशीर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रोहा ते मडुरे विभाग मध्य रेल्वेकडे तर कर्नाटकातील कारवार ते मंगळुरु भाग नैऋत्य (दक्षिण पश्चिम) रेल्वेकडे देण्यात यावा. गोव्यातील मार्ग स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार ठरवण्यात यावा. प्रवासी हे रेल्वेचे सर्वात मोठे भागधारक असल्यामुळे प्रवाशांचे मत विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही हीच अपेक्षा.
या विलिनीकरणामुळे संपूर्ण मार्ग दुहेरीकरण, सर्व स्थानकांवर पुरेशा उंचीचे फलाटांचे बांधकाम, शेडची तरतूद, विविध स्थानकांवर टर्मिनल सुविधा आणि स्वतंत्र मालवाहतूक मार्गाची बांधणी यांसारखे प्रमुख प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करता येतील.”
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. यंदा होळीसाठी चालविण्यात येणार्या रोहा – चिपळूण मेमू या गाडीच्या फेर्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीच्या दिनांक 15 मार्च ते 30 मार्च पर्यंतच्या सर्व फेर्या रद्द करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
रोहा – चिपळूण – रोहा मेमू विशेष ०१५९७/०१५९८ ही गाडी यावर्षी दिनांक ०८ मार्च ते ३० मार्च पर्यंत चालविली जाणार होती. आता ती फक्त १४ मार्च पर्यंत चालविण्यात येणार आहे. त्यानंतर ती रद्द करण्यात येणार आहे.
प्रवासी संघटनांनी केली होती मागणी
सध्या दिवा ते रोहा दरम्यान चालविण्यात येणार्या मेमू गाडी क्रमांक ०१३४७/०१३४८ चा विस्तार करून रोहा चिपळूण ०१५९७/०१५९८ ही गाडी चालविण्यात येणार होती. मात्र या विस्ताराला रोहा रेल्वे प्रवासी महासंघ आणि कोकण विकास समिती या संघटनांनी विरोध दर्शविला होता. कारण सध्या चालविण्यात येणारी दिवा – रोहा अनारक्षित मेमू रोजीरोटीसाठी कित्येक जणांची जिवनवाहिनी बनली आहे. या गाडीचा विस्तार झाल्यामुळे त्याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन गाडी तीन /तीन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे हा विस्तार रद्द करून रेल्वे प्रशासनाने दादर ते चिपळूण दरम्यान नवीन मेमू गाडी सोडावी अशी मागणी या संघटनांनी केली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने ही मागणी अंशतः मान्य केली असून नवीन गाडीची घोषणा अजून केली नाही आहे.
महत्त्वाचे: कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी चालविण्यात येणारी विशेष गाडी रद्द –
Megalock on Konkan Railway : कोकण रेल्वेवर देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त येत्या शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून त्यामुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे.
कोकण रेल्वेवर देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त शुक्रवारी सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत २.३० तासांचा राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लाॅक कालावधीत
1)गाडी क्रमांक ५०१०८ मडगाव – सावंतवाडी रोड पॅसेंजर गाडी १.२० तास उशिरा सुटेल.
2)गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेस २ तास उशिरा सुटेल.
3)गाडी क्रमांक १०१०४ मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस करमळी – सावंतवाडी रोड दरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येईल.
4)गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस रत्नागिरी – राजापूर रोड दरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येईल.
5)गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस रत्नागिरी – राजापूर दरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
Konakn Railway News: यंदा उशिरा का होईना मध्य रेल्वे प्रशासनाने होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. एक/ दोन नव्हे तर मुंबई, पुण्याहून एकूण 8 गाड्या यंदा होळीसाठी विशेष गाड्या म्हणुन चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांमध्ये रोहा चिपळूण या अनारक्षित मेमू गाडीचा देखील समावेश आहे. त्याच प्रमाणे पुणे – सावंतवाडी, पुणे – थिवी या दोन विशेष गाड्यांमुळे पुणे स्थायिक चाकरमान्यांची मोठी सोय झाली आहे.
१) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ११८७/११८८
गाडी क्र. ०११८७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष
ही गाडी गुरूवार दि.१४ मार्च,२१ मार्च व २८ मार्च २०२४ ला मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री.१०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११८८ थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष
परतीच्या प्रवासात थिविवरून शुक्रवार दि.१५ मार्च,२२ मार्च व २९ मार्च रोजी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २० एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०१
2) पुणे जं. – सावंतवाडी – पुणे जं. साप्ताहिक विशेष ०१४४१/०१४४२
गाडी क्र. ०१४४१ पुणे जं. – सावंतवाडी साप्ताहिक विशेष
ही गाडी मंगळवार दि.१२ मार्च,१९ मार्च व २६ मार्च २०२४ या दिवशी पुणे जं. या स्थानकावरून सकाळी ०९:३५ वाजता सुटेल ती सावंतवाडी स्थानकावर रात्री १०:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०१४४२ सावंतवाडी – पुणे जं. साप्ताहिक विशेष
ही गाडी बुधवार दि.१३ मार्च,२० मार्च व २७ मार्च २०२४ या दिवशी सावंतवाडी या स्थानकावरून रात्री ११:२५ वाजता सुटेल ती पुणे जं. स्थानकावर दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी लोणावळा, खंडाळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २० एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०१
3) सावंतवाडी – पनवेल – सावंतवाडी साप्ताहिक विशेष ०१४४४/०१४४३
गाडी क्र. ०१४४४ सावंतवाडी – पनवेल साप्ताहिक विशेष
ही गाडी मंगळवार दि.१२ मार्च,१९ मार्च व २६ मार्च २०२४ या दिवशी सावंतवाडी रोड या स्थानकावरून रात्री २३:२५ वाजता सुटेल ती पनवेल स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:४० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०१४४३ पनवेल – सावंतवाडी साप्ताहिक विशेष
ही गाडी बुधवार दि.१३ मार्च,२० मार्च व २७ मार्च २०२४ या दिवशी पनवेल या स्थानकावरून सकाळी ०९:४० वाजता सुटेल ती सावंतवाडी स्थानकावर त्याच दिवशी रात्री ०८:०५ वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २० एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०१
4) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष ०११०७/०११०८
गाडी क्र. ०११०७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष
ही गाडी शुक्रवार दि.१५ मार्च,२२ मार्च व २९ मार्च २०२४ या दिवशी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून रात्री १०:१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११०८ थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष
ही गाडी रविवार दि.१७ मार्च,२४ मार्च व ३१ मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी ११:०० वाजता सुटेल ती मुंबई एलटीटी स्थानकावर त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण १८ कोच: फर्स्ट एसी -०१, संयुक्त (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१, टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५ , जनरल – ०८, एसएलआर – ०२
5) थिवी – पनवेल – थिवी साप्ताहिक विशेष ०१११० /०११०९
गाडी क्र. ०१११० थिवी – पनवेल साप्ताहिक विशेष
ही गाडी शुक्रवार दि.१६ मार्च,२३ मार्च व ३० मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी ११:०० वाजता सुटेल ती पनवेल स्थानकावर त्याच दिवशी रात्री १०:१५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११०९ पनवेल – थिवी साप्ताहिक विशेष
ही गाडी शुक्रवार दि.१६ मार्च,२३ मार्च व ३० मार्च २०२४ या दिवशी पनवेल या स्थानकावरून रात्री ११:५५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:५० वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण १८ कोच: फर्स्ट एसी -०१, संयुक्त (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१, टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०५ , जनरल – ०८, एसएलआर – ०२
6) पुणे – थिवी – पुणे साप्ताहिक विशेष ०१४४५/०१४४६
गाडी क्र. ०१४४५ पुणे – थिवी साप्ताहिक विशेष
ही गाडी शुक्रवार दि.०८ मार्च,१५ मार्च, २२ आणि २९ मार्च २०२४ या दिवशी पुणे या स्थानकावरून संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०१४४६ थिवी – पुणे साप्ताहिक विशेष
ही गाडी रविवार दि.१० मार्च,१७ मार्च, २४ आणि ३१ मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी ०९:४५ वाजता सुटेल ती पुणे स्थानकावर त्याच दिवशी रात्री ११:५५ वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ कोच: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४, स्लीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर – ०२
7) थिवी – पनवेल – साप्ताहिक विशेष ०१४४८/०१४४७
गाडी क्र. ०१४४८ थिवी – पनवेल साप्ताहिक विशेष
ही गाडी शनिवार दि.०९ मार्च,१६ मार्च, २३ आणि ३० मार्च २०२४ या दिवशी थिवी या स्थानकावरून सकाळी ०९:४५ वाजता सुटेल ती पनवेल स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी रात्री ९ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०१४४७ पनवेल – थिवी साप्ताहिक विशेष
ही गाडी शनिवार दि.०९ मार्च,१६ मार्च, २३ आणि ३० मार्च २०२४ या दिवशी पनवेल या स्थानकावरून रात्री १० वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ कोच: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४, स्लीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर – ०२
8) रोहा – चिपळूण – रोहा मेमू विशेष ०१५९७/०१५९८
गाडी क्र. ०१५९७ रोहा – चिपळूण मेमू विशेष
ही गाडी शनिवार दि.०८,०९,११,१५,१६,१८,२२,२३,२५,२९,३० मार्च २०२४ या दिवशी रोहा या स्थानकावरून सकाळी ११:०५ वाजता सुटेल ती चिपळूण स्थानकावर त्याच दिवशी दुपारी रात्री १३:३० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०१५९८ चिपळूण- रोहा मेमू विशेष
ही गाडी शनिवार दि.०८,०९,११,१५,१६,१८,२२,२३,२५,२९,३० मार्च २०२४ या दिवशी चिपळूण या स्थानकावरून सकाळी १३:४५ वाजता सुटेल ती रोहा स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता पोहोचेल.
थांबे
ही गाडी कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, अंजनी या स्थानकांवर थांबे