Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या जामनगर तिरुनेवेली एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच…

Konkan Railway Updates  | सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या  जामनगर तिरुनेवेली एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबा वाढवण्यात आला आहे. 
 जामनगर ते तिरुनेवेली दरम्यान धावणाऱ्या 19578 Jamnagar – Tirunelveli Express या गाडीला दि. 16 आणि 17  जून 2023 रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 19577 Tirunelveli – Jamnagar Express या गाडीला दिनांक 19 आणि 20 जून 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.

Loading

Mumbai-Goa Vande Bharat Express | उद्घाटनाची नवीन तारीख समोर….

Vande Bharat Express | बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस संबंधी एक नवी बातमी आली आहे. या एक्सप्रेसच्या उद्घाटनाची नवीन तारीख समोर आली आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन 26 जून रोजी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जूनपासून मुंबई-गोवा मार्गावर बहुप्रतिक्षित सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन आणि देशातील अजून चार मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे पुढे ढकलण्यात आले. 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विडिओ कॉन्फरन्सच्या पद्धतीने या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. त्यानंतर 05 जूनपासून ट्रेनची नियमित सेवा सुरू होणार होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाड्यांचे लोकार्पण करतील अशी अपेक्षा आहे. त्याच दिवशी ज्या इतर मार्गांवर गाड्या सोडल्या जातील त्या बेंगळुरू-हुबळी, पटना – रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर असतील. याआधी एका दिवसात जास्तीत जास्त दोन वंदे भारत एक्सप्रेसंना हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. आता 26 जून रोजी एकाच दिवशी 5 वंदे भारत एक्सप्रेसंना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पाहिलीच वेळ असेल. 

महत्वाची सूचना – दिनांक ३० जून २०२३ पर्यंत आपले आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे..लिंक कराण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

Loading

हापा मडगाव एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच.

Konkan Railway News : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या हापा मडगाव एक्सप्रेस ला स्लीपर दर्जाचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी वरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वेकडून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार  कोकण रेल्वे मार्ग धावणारी हापा- मडगाव (22908 ) या एक्सप्रेस गाडीला दि. 14 जून 2023 साठी स्लीपरचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. परतीच्या प्रवासात या गाडीला (22907) मडगाव येथून हापासाठी धावताना दि.16 जून रोजी जादा डबा जोडण्यात येणार आहे.

 

 

Loading

Sawantwadi Railway Terminus | रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी तरुण वर्ग पुढे सरसावला..

सिंधुदुर्ग |सावंतवाडी टर्मिनसच्या फेज-1 चे काम पूर्ण होवून फेज-2 चे काम रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यास येथे सर्व गाड्यांना थांबा मिळणे शक्य होणार असल्याने हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रश्नासाठी सावंतवाडी तालुक्यातील तरुण वर्ग पुढे आला आहे. रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागावे तसेच या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबा देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू व सावंतवाडी रोट्रॅक्ट कल्ब अध्यक्ष मिहिर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज खासदार राऊत यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भावेश भिसे ,साहिल नाईक, प्रणय गावडे, रौनक रेडीज आदी उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस व्हावे म्हणून सतत पाठपुरावा सुरू आहे. टर्मिनस झाल्यावर विशेषतः सर्वच रेल्वेना थांबा मिळेल. तसेच रेल्वे स्टेशनवर पाणी भरण्याची सुविधा निर्माण होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 

तरुणांनी एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे त्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी धन्यवाद दिले. रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत ते काम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वच गाड्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading

Konkan Railway | पावसाळी वेळापत्रकाचा एलटीटी-मडगाव आणि तेजस एक्सप्रेसवर परिणाम; ‘हा’ बदल होणार

Konkan Railway News: जून महिन्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येतात. यावर्षी पावसाळी हंगामात कोकण रेल्वेने या मार्गावरील काही गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार पावसाळी वेळापत्रकाचा परिणाम खालील गाड्यांवर होणार असल्याचे जाहीर केले आहे. 
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक ११/०६/२०२३ ते २९/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे. 
तसेच ही गाडी १०/०६/२०२३ (शनिवार) आणि ३१/१०/२०२३ (मंगळवार)  रद्द केली गेली आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १२/०६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे. 
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२३ ते २९/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
तसेच ही गाडी ३१/१०/२०२३ मंगळवारी रद्द केली गेली आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक ११/०६/२०२३ ते ३०/१०/२०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे. 
दिनांक ०१/११/२०२३ पासून या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे. 
टीप: सदर माहिती रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे. भविष्यात त्यामध्ये रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा.

Loading

चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी | कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार एक विशेष ट्रेन; एकूण ६ फेर्‍या

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.  चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे पूर्व रेल्वेच्या सहकार्याने एक वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे. या गाडीच्या दोन्ही दिशेने एकूण ६ फेर्‍या सोडण्यात येतील. ही गाडी विशेष प्रवासी भाडे आकारून चालविण्यात येणार आहे. 

Train No. 09424 / 09423 Ahmedabad – Mangaluru Jn – Ahmedabad Weekly Special on Special Fare :

ही गाडी अहमदाबाद ते मंगळुरू स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 09424 Ahmedabad – Mangaluru Jn Weekly Special on Special Fare :

दिनांक ०९/०६/२०२३, १६/०६/२०२३, २३/०६/२०२३ शुक्रवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन संध्याकाळी १६:०० वाजता सुटेल ती दुसर्‍या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरू या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 09423 Mangaluru Jn – Ahmedabad Weekly Special on Special Fare :

दिनांक १०/०६/२०२३, १७/०६/२०२३, २४/०६/२०२३ शनिवारी ही गाडी मंगळुरू या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल ती तिसर्‍या दिवशी रात्री १:१५ वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल

या गाडीचे कोकणातील थांबे

वसई रोड, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, थिवी, करमाळी आणि मडगाव

डब्यांची संरचना

टू टायर एसी – 03 + इकॉनॉमी थ्री टायर एसी – 12 + स्लीपर – 03 + जनरल – 02 + एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन – 01 असे मिळून एकूण 22LHB डबे

Loading

मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज; सुरक्षिततेसाठी केल्यात ‘या’ उपाययोजना.


Konkan Railway News |कोकण पट्टय़ातील डोंगराळ भाग आणि मोठ्या प्रमाणात पडणार पाऊस यामुळे कोकण रेल्वे मार्ग अत्यंत धोक्याचा बनतो. या कालावधीत अपघात टाळण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणार्‍या गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येते,तसेच सर्व कर्मचाऱ्यांना सावधगिरी साठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात.यावर्षीही मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असून सुरक्षितच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या आहेत. गस्तीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नऊ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी पुलांसाठी पूर चेतावणी देणारी यंत्रणा व चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेने ७४० किमी मार्गावर नियोजित सुरक्षा कामे पूर्ण केली आहेत. पाण्याच्या नाल्यांची साफसफाई आणि कलमांची तपासणी याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणावर भू-सुरक्षा कार्ये राबवण्यात आल्याने, खड्डा पडण्याच्या आणि माती घसरण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षितपणे चालवणे सुनिश्चित झाले आहे.

रेल्वे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जाव्यात यासाठी कोकण रेल्वे विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्सून पेट्रोलिंग करण्य‍ात येते. पावसाळ्यात सुमारे ८४६ कर्मचारी कोकण रेल्वे मार्गावर गस्त घालणार आहेत. असुरक्षित ठिकाणे ओळखून चोवीस तास गस्त घातली जाणार असून, वॉचमन तैनात करण्यात येणार आहे.
रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तरतूद असलेली सेल्फ प्रोपेल्ड एआरएमव्हीएस (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन) सज्ज ठेवण्यात आली आहे. वेर्णा येथे एआरटी (अपघात निवारण ट्रेन) सज्ज ठेवण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कार्यालय / स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन प्रदान करण्यात आले आहेत. दोन्ही लोको पायलट आणि गार्ड ऑफ ट्रेन्सना वॉकी-टॉकी सेट प्रदान करण्यात आले आहेत. तसेच कोकण रेल्वेवरील प्रत्येक स्थानकावर २५ वॅटचे व्हिएचएफ बेस स्टेशन आहे. हे ट्रेन क्रू तसेच ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर यांच्यात वायरलेस संप्रेषण सक्षम करते. कोकण रेल्वे मार्गावर इमर्जन्सी कम्युनिकेशन (ईएमसी) सॉकेट्स सरासरी १ किमी अंतरावर प्रदान करण्यात आले आहेत. ज्यामुळे गस्तीवर, वॉचमन, लोको पायलट, गार्ड आणि इतर फील्ड मेंटेनन्स कर्मचारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्टेशन मास्तर आणि नियंत्रण कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. १ आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्हीमध्ये सॅटेलाइट फोन संपर्क प्रदान करण्यात आला आहे.

सिग्नल दृश्यमानता सुधारण्यासाठी कोकण रेल्वेवरील सर्व मुख्य सिग्नल पैलू आता एलईडीने बदलले आहेत. ९ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत.
माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी या प्रदेशात पावसाची नोंद होईल आणि पावसाचा जोर वाढल्यास अधिकारी सतर्क करतील. पुलांसाठी पूर चेतावणी देणारी यंत्रणा ३ ठिकाणी प्रदान करण्यात आली आहे, उदा. काली नदी (माणगाव-वीर दरम्यान), सावित्री नदी (वीर-सापे वामणे दरम्यान), वाशिष्ठी नदी (चिपळूण-कामठे दरम्यान) आणि पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करेल. चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवण्यात आले आहेत. उदा. पानवल मार्ग (रत्नागिरी-निवसर दरम्यान), मांडोवी पूल (थिवी-करमळी दरम्यान), झुआरी पूल (करमळी-वेर्णा) आणि शरावती पूल (होन्नावर-मानकी दरम्यान) वाऱ्याच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी बसविण्यात आले आहेत.

या मार्गावर डोंगरकड्यांतून बोगदे तयार केले असून पुलांची संख्याही जास्त असल्याने वेगमर्यादा घालून गाड्या चालवल्या जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाकडून रोहा ते वीर ११० किमी प्रतितास, वीर ते कणकवली ७५ किमी प्रतितास, कणकवली ते उडपी ९० किमी प्रतितास, उडपी ते ठोकूर ११० किमी प्रतितास या वेगाने गाड्या चालणार आहेत.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. याशिवाय डोंगरकड्यांतून जाणार्‍या गाड्यांच्या वेगावरही निर्बंध येणार असल्याने प्रवासाच्या कालावधीत वाढ होईल.

Loading

शुक्रवारी सीएसएमटी मडगाव दरम्यान धावणार वन वे विशेष गाडी…

CSMT-Madgaon Special Train | कोकणरेल्वे मार्गावर शुक्रवारी दिनांक ०९ जून २०२३ रोजी एक वन वे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे.

Train No. 01149 Mumbai CSMT – Madagon Jn. One Way Special:

ही गाडी सकाळी 5:30 वाजता सीएसएमटी या स्थानकावरून सुटून मडगाव या स्थानकावर संध्याकाळी 17:20 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीचे थांबे

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली सावंतवाडी रोड आणि करमाळी

डब्यांची संरचना

या गाडीच्या डब्यांची संरचना जनशताब्दी एक्सप्रेस प्रमाणे असणार आहे. विस्टाडोम – 01+ एसी चेअर कार – 03 + सेकंड सीटिंग – 10 + एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 असे मिळून एकूण 16 एलएचबी डब्यांसहित ही गाडी चालविण्यात येणार आहे. 

Loading

…. म्हणुन वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा देण्यात आला; माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले कारण

सिंधुदुर्ग | वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ येथे थांबा मिळाला नसल्याने कुडाळवासिय प्रवासी नाराज झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एका स्थानकावर थांबा मिळणार हे निश्चित झाल्यापासून ते स्थानक कोणते असणार याबाबत प्रवाशांना मोठी उत्सुकता लागून राहिली होती.


साहजिकच तो थांबा या जिल्हय़ात मध्यवर्ती भागातील कुडाळ या स्थानकावर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र या गाडीला अखेर कणकवली या स्थानकांवर थांबा मिळाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतः या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा मिळावा यासाठी प्रयत्न केले होते. 

कुडाळवासियांची नाराजी दूर करण्यासाठी  वंदे भारत एक्सप्रेसला कुडाळ ऐवजी कणकवली येथे थांबा का देण्यात आला याचे स्पष्टीकरण माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून काल केले आहे. त्यांच्या मते ”मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशनसाठी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन झालेलं नाही. भारतीय रेल्वे जेव्हा एका महत्त्वाच्या रूट वर ट्रेन सुरू करते तेव्हा स्टेशनचा ग्रेड तपासते. मागच्या नऊ वर्षांमध्ये कुडाळ रेल्वे स्टेशन चं कसलंही अपग्रेडेशन चं काम झालं नसल्यामुळे कुडाळ रेल्वे स्थानकाला वंदे भारत ट्रेन स्टॉप मिळाला नाही आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून कणकवली रेल्वे स्टेशन हेच जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणून बघितले जाते. त्यामुळे या एक्सप्रेसला कणकवली येथे थांबा देण्यात आला आहे.”

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील काही मोजक्या खालीलप्रमाणे… 

मागील २ टर्म कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) आमदार/खासदार निवडून आले आहेत. याचा राग मनात ठेवून राणे परिवाराने कुडाळला डावलले असल्याचा आरोप काहींनी केला आहे.

येथील आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळ स्थानकाकडे दुर्लक्ष झाले असून अपग्रेडेशनचे काम झाले नसल्याने थांबा मिळाला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे. 

सावंतवाडी स्थानकावर सर्व अपग्रेडेशन झाले आहे, एवढेच नव्हे तर या स्थानकाला टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. असे असूनही सावंतवाडी स्थानकावर या एक्सप्रेसला थांबा का देण्यात आला नाही असाही प्रश्न विचारण्यात आला आहे.

 

Loading

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे अंतिम वेळापत्रक जाहीर; ‘या’ स्थानकांवर मिळणार थांबा..

Mumbai Goa Vande Bharat Express |मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे हे निश्चित झाल्यापासून या एक्सप्रेसच्या वेळापत्रकाबाबत, थांब्यांबाबत या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उत्सुकता लागून राहिली होती. खासकरून या गाडीला कोणत्या स्थानकांवर थांबा मिळणार आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मध्य रेल्वे प्रशासनाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले असून त्यात या गाडीचे थांबे आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या गाडीच्या थांब्या बाबत असलेल्या प्रश्नांस उत्तर मिळाले आहे. 

या गाडीला दादर, ठाणे,पनवेल, रोहा, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी ही स्थानके मिळाली आहेत.

नॉन मान्सून वेळापत्रकानुसार ही गाडी सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी ही एक्सप्रेस सिएसएमटी स्थानकावरून सुटणार आहे ती दुपारी 13.15 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.

परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी 14:35 वाजता सुटून सिएसएमटी स्थानकावर रात्री 22:25 वाजता पोहोचणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता सर्व दिवशी धावणार आहे

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

   

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search