Category Archives: कोकण रेल्वे

वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा मिळण्याचे संकेत…

Mumbai-Goa Vande Bharat Express |वंदे भारत एक्सप्रेसला खेड स्थानकावर थांबा देण्यात यावा यासाठी जल फाऊंडेशन आणि कोकण विकास समितीने कंबर कसली होती. या एक्सप्रेसला खेड तालुक्यात थांबा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा पण या संघटनांनी दिला होता. त्याचा पाठपुराव्याला यश मिळणार असल्याचे दिसत आहे, कारण वंदे भारत एक्सप्रेसला या स्थानकावर थांबा मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यादृष्टीने मंगळवारी खेड स्थानकावर रंगरंगोटी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दिनांक ३ जून रोजी या गाडीला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेस CSMT हून सुटणार असून ती ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ आणि त्यानंतर मडगाव अशी जाणार आहे. सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्यांसाठी कुडाळ तर रत्नागिरी आणि चिपळूणला जाणाऱ्यांसाठी रत्नागिरी खेड दोन थांबे आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिकृत माहिती रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच देण्यात येईल अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

 

Loading

प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्या – खा. विनायक राऊत.

मुंबई – गणेशोत्सवानिमित्त मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर 350 जादा गाड्या सोडण्याची मागणी काल शिवसेनेच्या (उबाठा) शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन केली आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे या ठिकाणावरून चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणात गावी जातात, मात्र अनेक भाविकांच्या हाती रेल्वेचे तिकीट लागले नाही आहे. अनेकांची प्रतीक्षा यादी मध्ये आरक्षण केले नाही आहे अशा प्रवाशांच्या सोयीसाठी ३५० जादा गाड्या सोडून  मध्ये सध्या प्रतीक्षा यादीत असलेल्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट द्या अशी मागणी या शिष्टमंडळाने यावेळी केली. शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांची भेट घेत चाकरमान्यांना रेल्वेचे तिकीट काढताना येणाऱ्या आडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच दलालांच्या रॅकेटमुळे गाडीचे बुकिंग सुरू होताच फुल होत असल्याची बाब निदर्शनास आणत कारवाईची मागणी केली. 

Loading

Vande Bharat Express | नवा कोरा रेक मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल; लवकरच उद्घाटन

Konkan Railway News | मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस बद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून आठ डब्यांचा वंदे भारतचा नवा कोरा रेक आज मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. हा नवा रेक काल 27 मे ला रात्री साडेदहा वाजता उडपी स्थानक सोडून मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला होता.

मुंबई गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी झाल्याने या मार्गावर ही एक्सप्रेस चालू होणार आहे हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकावर या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सोहोळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. कोकण रेल्वे मार्ग धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही उद्घाटनाच्या फेरीवेळी केवळ निमंत्रितांना घेऊन धावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या आधी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचे उद्घाटन मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे असे सांगण्यात आले होते. मात्र सद्यस्थिती पाहता हे उद्घाटन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.

 

 

Loading

विद्युत इंजिनचा तुटवडा; कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या डिझेल इंजिनसह धावणार

Konkan Railway News |कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनसह धावत आहेत. मात्र विद्युत इंजिनाचा तुटवडा निर्माण झाल्याने या मार्गावरील तिन गाड्या डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवल्या जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव (10103/20104) मांडवी एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी एक्सप्रेस (10105/10106) तसेच 50107/50108) सावंतवाडी- मडगाव -सावंतवाडी या तीन गाड्या दिनांक 27 मे रोजी च्या फेरीपासून इलेक्ट्रिक ऐवजी डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. इलेक्ट्रिक लोकोचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेल्वेवर ही वेळ आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या आता पुन्हा एकदा डिझेल इंजिनसह धावणार आहेत. रेल्वेने हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे.

कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होत असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होत आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील ६ गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे

Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.

गाडी क्र./नाव अतिरिक्त डबे दिनांक
22908 Hapa - Madgaon Express01- Sleeper२४/०५/२३ बुधवार
22907 Madgaon Jn.  - Hapa Express01- Sleeper२६/०५/२०२३ शुक्रवार
20910 Porbandar - Kochuveli Express01- Sleeper२५/०५/२०२३ गुरुवार
20909 Kochuveli - Porbandar  Express01- Sleeper२८/०५/२०२३ रविवार
12431 Thiruvananthapuram Central - H. Nizamuddin “Rajdhani” Express01 - Three Tier AC२३/०५/२०२३ मंगळवार
12432 H. Nizamuddin - Thiruvananthapuram Central - “Rajdhani” Express01 - Three Tier AC२८/०५/२०२३ रविवार

Loading

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस | संभाव्य वेळापत्रक, तिकीट दर आणि थांबे

Vande Bharat Express : चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे जून पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, अशीही माहिती मिळाली आहे.

संभाव्य वेळापत्रक 
या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी ही गाडी तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाच्या आसपास चालवली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून ५.३० सुटून मडगाव या स्थानकावर दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी १:३० वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर रात्री ८:३० वाजता पोहोचेल. 
गाडीचे थांबे
या गाडीला कोणते थांबे असतील याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ थांबा या गाडीला मिळण्याचे संकेत आहेत. ठाणे या स्थानकावर या गाडीला थांबा असेल. पनवेल या स्थानकाचे महत्व पाहता या गाडीला येथेही थांबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनकडून थांब्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. 
तिकीटदर 
वंदे भारत एक्सप्रेस एसी चेअर क्लास आणि एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास या दोन श्रेणीसह चालविण्यात येणार आहे. दोन्ही मिळून एकूण १६ डबे असणार आहेत,त्यात एकूण ११२८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.  चेअर क्लास या श्रेणीचे मुंबई ते मडगाव तिकीट भाडे सुमारे १५८० असेल तर एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचा तिकीटदर अंदाजे २८७० रुपये एवढा असेल.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

अवघ्या एका मिनिटात सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणींचेआरक्षण फुल्ल कसे? दाल मे जरूर कुछ काला; प्रवाशांचा आरोप…

संग्रहित छायाचित्र
Konkan Railway News | सकाळी ८ वाजता आरक्षण चालू होते आणि ८ वाजून १ मिनिटाला सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणीची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवते. असा प्रकार मागील २/३ दिवसांपासून गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी आरक्षण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चाकरमान्यांनी अनुभवला आहे. एका मिनिटात सर्वच गाड्यांतील सर्वच वर्गाचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ कशी काय होऊ शकते असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात असून दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशीही मागणी होत आहे. 
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. हंगामात ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
तिकिटे मिळवण्यासाठी  हे  दलाल गैरमार्गाचा वापर सुद्धा करत आहेत. कधी रेल्वे कर्मचाऱ्यांना हाताशी धरून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वर हॅक करण्याचा प्रकार पण ते अवलंबत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. 
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

Loading

वंदे भारत एक्सप्रेसला सावंतवाडी टर्मिनस येथे थांबा मिळणे गरजेचे…

सिंधुदुर्ग | शाम जोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.

कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत. 

अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे. 

सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्‍या पर्यटकांना होणार आहे. 

 

 

Loading

गणेशोत्सव रेल्वे आरक्षण | दलालांची चांदी; सामान्यांची लूट..

Konkan Railway News | यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी रेल्वे आरक्षण चालू झाले आहे. या मार्गावरील नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही मिनिटात फुल्ल होऊन जवळ जवळ सर्वच गाड्यांच्या सर्वच श्रेणीचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे. आज तर १६ सप्टेंबर चे आरक्षण फक्त एक मिनिटात रिग्रेट दाखवत होते,त्यामुळे दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे. 
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
दलाल आरक्षित तिकिटे कशी मिळवतात?
१) काही दलाल तिकीट विंडो समोर रात्रभर आपली माणसे उभी करून हंगामाच्या काळातील गाड्यांची  तिकिटे काढतात.
२) दलाल आता आधुनिक टेकनॉलॉजिचा वापर करून गैर मार्गाने ऑनलाईन तिकिटे मिळवतात. यासाठी ते जलदरित्या तिकीट बुकिंगसाठी काही सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअर मध्ये आवश्यक ती माहिती अगोदरच भरून काही क्षणात तिकीट आरक्षित करता येते. 
३) दलाल काही  रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने  काळा बाजार करीत असल्याचा संशय आहे. 
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

Loading

गणेश चतुर्थी २०२३| सीट आरक्षणासाठी रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे

Konkan Railway News |यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वेचे आगावू आरक्षण १६ मे पासून चालू झाले आहे. भाविकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरक्षण चालू होताच अवघ्या काही मिनिटांत आरक्षण फुल्ल होत आहे. आज १९ मे रोजी दिनांक १६ सप्टेंबर चे आरक्षण चालू झाले होते. मात्र काही मिनिटांत कन्फर्म तर सोडाच वेटिंग लिस्ट चे तिकीट मिळणे कठीण झाले होते. कारण जवळपास सर्वच गाड्यांचे, सर्व श्रेणीचे आरक्षणाचे स्टेटस ‘Regret’ दाखवत आहे. त्यामुळे अनेकांच्या त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर २०२३, रोजी मंगळवारी आहे. यावर्षी अंगारक योग जुळून आला आहे, त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात कोकणात आपल्या गावी जाण्याची शक्यता आहे. आज १६ सप्टेंबर, शनिवारचे आरक्षण खुले झाले होते. सहाजिकच आज अपेक्षेप्रमाणे मागील २/३ दिवसांच्या तुलनेत रेल्वे सीट आरक्षणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला आहे.

[irp posts=”7965″

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search