रत्नागिरी |राज्यात होणार्या अतिवृष्टीचा परिणाम कोकण रेल्वेवर पण झाला आहे. कुडाळ आणि झाराप या स्थानकांदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमूळे रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणुन या मार्गावरील काही गाड्या आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सुटणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या सूचनापत्रकानुसार खालील गाड्यां आज दिनांक 20 जुलै रोजी आपल्या सुरवातीच्या स्थानकावरून उशिरा सोडण्यात येणार आहेत.
1.संध्याकाळी 7 वाजता सुटणारी 01140 मडगाव नागपूर विशेष गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 10 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.
2.संध्याकाळी 6 वाजता सुटणारी 20112 मडगाव – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 9 वाजता मडगाव स्थानकावरून सुटणार आहे.
3.संध्याकाळी 5:55 सुटणारी 11004 सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस गाडी 3 तास उशीरा म्हणजे रात्री 8:55 वाजता सावंतवाडी स्थानकावरून सुटणार आहे.
Kokan Railway | रेल्वे प्रशासनाने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या LHB डब्यांच्या संरचनेत काही बदल केले आहेत. या दोन्ही गाड्यांचे प्रत्येकी एक जनरल डबा कमी करण्यात आले असून इतरही काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल पुढीलप्रमाणे
दिनांक ०४/११/२०२३ पासून Train no. 22113 ex. Lokmanya Tilak (T) ही गाडी तर दिनांक 06/11/2023Train no. 22114 ex. Kochuveli ही गाडी या सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी लागोपाठ दोन दिवस देखभालीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
A) संगमेश्वर ते भोके
संगमेश्वर ते भोके दरम्यान दि. 11 जुलैला सकाळी 7.30 ते 10.30 असा 3 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक मुळे खालील गाड्यांवर परिणाम होणार आहे.
1) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुनेलवेली-जामनगर एक्सप्रेस 11577 ही गाडी ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 2 तास 30 उशिराने चालविण्यात येणार आहे.
2) दि. 10 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेंट्रल- लो. टिळक टर्मिनस नेत्रावती एकस्प्रेस (16346) कर्नाटकातील ठोकुर ते रत्नागिरी दरम्यान 1 तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
B) कुडाळ ते वेर्णा
दि. 12 रोजी कुडाळ ते वेर्णा दरम्यानच्या कामासाठी घेण्यात येणार्या सायंकाळी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा तीन तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या चार गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) 12 जुलै रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी -मडगाव (12051) ही जनशताब्दी एक्स्प्रेस गोव्यातील थीवी स्थानकावर तीन तास थांबवून ठेवण्यात येणार आहे.
2) दि. 11 जुलैला सुटणारी हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस (12618) ही गाडी रोहा ते कुडाळ दरम्यान अडीच तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
3) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस (10105) ही गाडी रोहा ते कणकवली दरम्यान 50 मिनिटे उशिराने चालणार आहे.
4) दिनांक 12 जुलै रोजी सुटणारी तिरुअनंतरपुरम सेट्रल- हजरत निजामुद्दीन (22653) ही गाडी ठोकुर ते वेर्णा दरम्यान 2 तास 50 मिनिटेे उशिराने चालविण्यात येणार आहे.
Kokan Raiway | गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जायचे आहे, नियमित गाड्यांची तिकिटे अवघ्या 1 मिनिटांत बूक झाल्याने भेटली नाहीत म्हणुन रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे तरी आरक्षण भेटेल या आशेने प्रयत्न करणार्या गणेश भाविकांची रेल्वे प्रशासनाने चक्क थट्टा मांडली असल्याचे दिसत आहे.
गणेशोत्सवासाठी 204 अतिरिक्त गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या गाड्यांच्या आरक्षणावेळी प्रवाशांना विचित्र अनुभव मिळताना दिसत आहे. ईतर गाड्यांच्या आरक्षणा सारखे या गाड्यांचे आरक्षणही सकाळी ८ वाजता रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तसेच IRCTC च्या अधिकृत वेब पोर्टल वर सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र जे प्रवासी ऑनलाईन तिकीट बूकिंग करत आहेत त्यांना या गाड्यांचे स्टेटस पाहिल्या 15 मिनिटांसाठी ‘Train Cancelled’ असे दाखवते आणि त्यानंतर बूकिंग चालू होते तेव्हा आरक्षणाचे स्टेटस वेटिंग लिस्ट पर्यंत दाखवते. फक्त एका दोघांना हा अनुभव आला असे नाही तर बहुतेक प्रवाशांना असा अनुभव आला आहे. अनेक तक्रारी सोशल मीडिया मार्फत केल्याचे दिसून येत आहे.
हा नेमका प्रकार काय आहे या साठी काही जणांनी सोशल मीडिया आणि ऑनलाईन तक्रार नोंदवून याबाबत जाब विचारला होता. रेल्वेने औपचारिकता म्हणुन या तक्रारीला उत्तरे दिली असून त्याला कोणताही आधार नाही आहे. मध्यरेल्वेने एका प्रवाशाच्या ट्विटर वरील तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दिले आहे.
प्रश्न ………. आज सकाळी IRCTC एप्लिकेशनवर आरक्षण सुरू झालेल्या विशेष रेल्वे गाडी क्रमांक ०११६५ समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे दाखवले. त्यानंतर अचानक आरक्षण सुरु होताच उपलब्ध तिकीटे दिसण्याऐवजी अवघ्या १० सेकंदात १७१ प्रतीक्षा यादीच दिसू लागली. असं कसं होऊ शकतं ?
उत्तर………. 511 passengers booked online tickets& 1013 booked PRS tickets from 08.00 hrs to 08.05 hrs, in first 5 minutes
511 online tickets booked in first 5 minutes, since train shown online. So question of train cancel does not arise. For those having problem might some technical issue.
मध्यरेल्वेच्या म्हणण्यानुसार 01165 या गाडीचे 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या दिवसांचे आरक्षण सकाळी 08:00 ते 08:05 या काळात ऑनलाईन 511 सीट्स तर पीआरएस काऊंटरवर 1013 एवढ्या सीट्सचे आरक्षण झाले. त्यामुळे ‘Train Cancelled’ असण्याचा प्रश्नच येत नाही. हा फक्त तुमच्या बाजूने काही तांत्रिक इश्यू असेल.
मध्य रेल्वेच्या या उत्तराने समाधान तर सोडाच अजून प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर हा तांत्रिक (टेक्निकल) इश्यू असता तर बरोबर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या याच अतिरिक्त गाड्यांच्या आरक्षणावेळी का घडत आहे?
टेक्निकल इश्यू तंतोतंत 15 मिनिट कसा काय असू शकतो?अगदी सोळाव्या मिनिटाच्या पाहिल्या सेकंदात ”Train Cancelled” हे स्टेटस गायब होऊन आरक्षण चालू कसे झाले?
जर हा तांत्रिक (टेक्निकल) इश्यू असता सर्व्हर स्लो झाले असते, युझरला बाहेर फेकले असते. मात्र येथे क्लीअर ”Train Cancelled” असे का दाखवले गेले?
पाहिल्या 5 मिनीटांत 511 तिकिटे आरक्षित झालीत. पुढील 10 मिनीटांत यापेक्षा दुप्पट/तिप्पट तिकीटे बूक झालीत ती दलालांच्या घशात गेलीत का?
या रेल्वे तिकीट आरक्षणातही दलालांनी रेल्वेतील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गैरप्रकार केला असल्याचा आरोप चाकरमान्यांकडून होत असून या प्रकारची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी शुक्रवारी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
वीर ते खेड विभागादरम्यान बुधवारी दु. १२.२० वाजता सुरू होणारा मेगाब्लॉक दुपारी ३.२० वाजता संपेल. या मेगाब्लॉकमुळे
६ जुलै रोजी सुटणारी २०९१० क्रमांकाची पोरबंदर कोच्युवेली एक्स्प्रेस रोहा-वीर विभागादरम्यान १ तास ५० मिनिटांसाठी थांबवण्यात येईल.
६ जुलै रोजी सुटणारी १२४३२ क्रमांकाची थिरूअनंतरपुरम-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरी-खेड विभागादरम्यान ३० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
७ जुलै रोजी सुटणारी १६३४५ क्रमांकाची थिरूअनंतपुरम-लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्स्प्रेसही रोहा-वीर विभागात ३५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
७ जुलै रोजी सुटणारी १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा पॅसेंजर रत्नागिरी – खेड विभागात १ तास ५ मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून प्रवाशांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवाहन केले आहे.
Ganpati Special Trains : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर गणेशोत्सव दरम्यान अजून 52 विशेष फेर्या चालवण्याचा निर्णय मध्यरेल्वेने घेतला आहे. या आधी सोडलेल्या 156 विशेष गाड्या पकडून एकूण विशेष गाड्यांची संख्या आता 208 झाली आहे.
1)दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी(एकूण 36 फेऱ्या)
01155 मेमू दिवा इथून 13.09.2023 ते 19.09.2023 आणि 22.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज 19.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 01.25 वाजता चिपळूणला पोहोचेल.
01156 मेमू चिपळूण इथून 14.09.2023 ते 20.09.2023 आणि 23.09.2023 ते 03.10.2023 पर्यंत दररोज 13.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता दिवा इथं पोहोचेल.
2) मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्या
01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.09.2023, 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 22.09.2023, 23.09.2023, 23.09.2023, आणि 23.09.2023 -22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन 17.20 वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 19.09.2023, 23.09.2023, 24.09.2023,30.09.2023 आणि 01.10.2023 ला 13.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
1 AC-2 टियर, 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.
Press and hold on image to preview
विशेष गाड्यांसाठी बुकिंग दिनांक 03.07.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.
मुंबई : बहुचर्चित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या सुरवातीच्या फेर्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या गाडीच्या सुरवातीच्या फेरीची म्हणजे दिनांक 28 जूनची मुंबई ते गोवा या फेरीची सर्व तिकीटे विकली गेली होती. तसाच प्रतिसाद उद्याच्या दुसर्या फेरीला फेरीला मिळाला आहे.
उद्याच्या फेरीचे 94% आरक्षण आतापर्यंत झाले आहे. 530 पैकी 499 सीट्स आरक्षित झाल्या आहेत. या आरक्षणातून 6.75 लाख रुपये जमा झाले आहेत. रात्रीपर्यंत पूर्ण म्हणजे 100% आरक्षण होण्याची अपेक्षा आहे.
परतीच्या प्रवासासाठी पण प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दिनांक 01 जुलै च्या मडगाव ते मुंबई फेरीची फक्त 58 तिकिटे बूक होण्याची बाकी आहेत. उद्याचा दिवसात ती पण आरक्षित होतील अशी अपेक्षा आहे.
Konkan Railway : गणेशोत्सवासाठी नियमित गाड्यांची तिकिटे न मिळाल्याने विशेष गाड्यांची तिकिटे तरी मिळतील अशी आस धरून बसलेल्या बर्याच चाकरमान्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. IRCTC या संकेतस्थळावर आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर सुरुवातीची १५ मिनिटे ट्रेन ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. त्यानंतर अचानक आरक्षण चालू झाले आणि त्वरित फुल्ल झाले. या प्रकारामुळे या आरक्षणात गैरप्रकार झाला आहे असा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 27 जून रोजी कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार होते. आरक्षित तिकीटे मिळविण्यासाठी अनेक चाकरमानी आरक्षण सुरू होण्यापूर्वी लॅपटॉप मोबाईल वर लॉग इन करुन बसले होते. मात्र 8 वाजता जेव्हा आरक्षण चालू झाले तेव्हा आरक्षण सुरू झालेल्या सर्व गाड्यांच्या समोर ‘Train Cancelled’ असे स्टेटस दाखवत होते. काही तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेने या गाड्यांचे आरक्षण पुढे ढकलले असेल आणि आरक्षणाची नवीन तारीख रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर होईल असा विचार करून अनेकांनी प्रयत्न सोडले आणि लॉग आउट झालेत. मात्र 15 मिनिटानंतर अचानक बूकिंग चालू झाली आणि नेहमीप्रमाणे 1/2 मिनिटांत आरक्षण फुल्ल झाले. या कारणाने अनेकांना आरक्षित तिकिटे भेटली नाहीत.
या प्रकारामुळे आरक्षणात गैरप्रकार झाला असल्याचे आरोप समाजमाध्यमांतून होत आहेत.
एकतर रेल्वेच्या आरक्षणाचे सर्व्हर हॅक करण्यात आले असेल किंवा रेल्वेचे काही अधिकारी आणि दलाल यांनी मिळून काही गैरप्रकार केला असल्याचा आरोप होत आहे.
रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत या प्रकाराबद्दल काही स्पष्टीकरण दिले नाही आहे, त्यामुळे काही प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.
पहिला प्रश्न म्हणजे या गाड्यांचे स्टेटस ‘Train Cancelled’ असे का दाखवले गेले? तांत्रिक अडचणी असल्यास ‘System/Server Error’ किंवा दुसरा स्पष्ट मेसेज का दाखविण्यात आला नाही?
दुसरे म्हणजे आरक्षण 15 मिनिटे उशिराने चालू करण्याचे पूर्वनियोजन असल्यास त्यासंबंधी आधीच जाहीर करण्यात का आले नाही?
या संबंधी स्पष्टीकरणाची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Mumbai Goa Vande Bharat Express :मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 जून) हिरवा झेंडा दाखवला. भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी अकरा वाजता मोदींनी मुंबई-गोवासह इतर चार वंदे भारत एक्सप्रेसला गाड्यांचा शुभारंभ केला.
गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन सकाळी अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. उद्घाटन होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात ट्रेनचे स्वागत करण्यात आले. मडगाव स्थानकावर यावेळी उत्साही वातावरण होते.
यावेळी मडगाव रेल्वे स्थानकावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (गोवा राज्य), मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत(गोवा राज्य), केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक (गोवा राज्य), पर्यटनमंत्री रोहन खंवटे(गोवा राज्य), महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, गोवा राज्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, अधिकारी उपस्थित होते.
Vande Bharat trains flagged off by PM #NarendraModi today:
Mumbai Goa Vande Bharat Express :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण आज दिनांक 26 जून पासून सुरू होणार आहे.
आज सकाळी 8 वाजल्यापासून रेल्वेच्या तिकिट खिडक्यांवर तसेच ऑनलाईन संकेतस्थळांवर या गाडीचे आरक्षण करता येईल. आगामी 4 महिन्यांचे बूकिंग चालू होत असल्याने गणेशोत्सवासाठी सुद्धा बूकिंग करता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
उद्या दिनांक 27 जून रोजी या गाडीचे उद्घाटन होणार असून नियमित सेवा बुधवार दि. 28 जून पासून सुरू होणार आहे.