Mumbai-Goa Highway :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे. ह्याविषयी कोकणवासियांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. हाच आक्रोश आता एका भजनातून-गजरातून व्यत्क्त केला गेला आहे. श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळद्वारे हा गजर YOUTUBE ह्या माध्यमावर प्रसिद्ध केला आहे.
ह्या गजराचे शब्दांकन केले आहे श्री बाबाजी हरिचंद्र आमडोस्कर (हरि सुत), तर बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी यांनी ह्या गजराला संगीत दिले आहे. त्यांना साथ दिली आहे……
Also Read : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कातळशिल्प सहलीचे आयोजन…
संगीत / गायक – बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी.
ढोलकी:- कु. प्रणव प्र. धुरी.
तबला:- कु. ओंकार प्र. धुरी
झुंजरी/ कोरसः- श्री राजेश परब.
कोरस:- कु. मकरंद तुळसकर.
कोरस:- श्री अजित डिंगंणकर.
कोरस:- श्री सुनिल टिळेकर.
झांज:- श्री लक्ष्मण (गणेश) घाडीगांवकर .
Thumbnail :- कु. सौरभ आंगचेकर.
गजराची रचना (शब्द)
आज होतय म्हणता उद्या होईल बारा वर्षे रखडल
आमच्या मुंबई गोवा हायवेच सारं कामच बिघडल
आले मंत्री गेले मंत्री आणि गेले किती शासन
समृद्धी झाली अती वेगाने ईथे पोकळ आश्वासन
सिंधुदुर्ग झाला सुसाट तरी रायगड रत्नागिरीत अडलं
नाही कधीही कुठेच मोर्चा कधी नाही आंदोलन
शांत संय्यमी कोकणी माणूस करी कायद्याचे पालन
दुःख सोसल गप्प राहूनी कधी नाही कुठे मांडल
अट्टाहास ना कधी कशाचा स्वाभिमानी बाणा
ठेऊनी पाठीवरी हात फक्त लढ एवढेच म्हणा
किती सोसल नुकसान तरी कधी नाही कुठे ताडलं
“गड”करी तील सर ही उरली एकच आशा
नव शासन देईल का नवी कोकणाला दिशा
गाऱ्हाणे हे कोकणाचे आज हरी सुताने मांडल