Category Archives: कोकण

शिंदे-फडणवीस सरकारच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. 

कोकणात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले आहे. उदय सामंत हे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहतील. तर दीपक केसरकर यांची मुंबई शहर आणि कोल्हापूर ह्या दोन राज्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी

देवेंद्र फडणवीस – नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया 
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड
गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
 दादा भुसे- नाशिक
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
 सुरेश खाडे- सांगली
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड
तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग
अब्दुल सत्तार- हिंगोली
दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर
अतुल सावे – जालना, बीड
शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

 

भाजपकडे 21 जिल्हे
भाजपकडे 21 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. तर गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्याचं पालकमंत्री आलेय. मुंबई उपनगर, जालना, बीड, पालघर, सिंधुदुर्ग, सांगली, धुळे, लातूर, नांदेड, नंदुरबार, पुणे, चंद्रपूर, गोंदिया, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली

15 जिल्हे शिंदे गटाकडे – 
15 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारी शिंदे गटाला मिळाली आहे.  सातारा, ठाणे, मुंबई शहर ,  कोल्हापूर, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, रत्नागिरी, रायगड,औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, नाशिक, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे शिंदे गटाकडे आले आहेत. 

 

Loading

० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार?

मुंबई:  शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालकांना ० ते २० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत?संबंधित शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरु आहे? याचा आढावा घेण्यास सांगितले आहे. राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणाची शक्यता आहे.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाने याबाबतचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे.

शिक्षण हक्क कायदा काय सांगतो?

शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या शाळा या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर अंतरावर असाव्यात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा तीन किलोमीटर अंतरावर असाव्यात असा आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि शाळा जवळ असावी असा शिक्षण हक्क कायदा सांगतो, त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा बंद झाल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होईल असं तज्ञांचा म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा एकदा अशा शाळा बंद करायला विरोध केला जाण्याची शक्यता आहे.

सरकारद्वारे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना जवळपासच्या शाळांपर्यंत चांगली वाहतूक सुविधा देता येईल का याचा पूर्ण आढावा कदाचित घेऊन काही निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

Loading

सणासुदीच्या हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाडी… आरक्षण 22 सप्टेंबर पासून.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 30 ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे.

 

ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.

 

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.

 

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

ह्या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत. 

एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

 

ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 22/09/2022 पासून रेल्वेच्या टीकेट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.

 

   

Loading

कोकणकन्या एक्सप्रेस आता होणार सुपरफास्ट, कमी वेळात जास्त अंतर कापणार

कोकण रेल्वेच्या प्रवाशांना एक खुशखबर आहे.  सर्व कोकणकरांची आवडती आणि सर्वांची पहिली पसंती असणारी कोकणकन्या एक्सप्रेस 10112 / 10111 आता “सुपरफास्ट” कॅटेगरी मध्ये येणार आहे. ह्या गाडीचा नंबर सुद्धा बदलणार आहे. हि गाडी आता 20112 / 20111 Madgoan Jn – Mumbai CSMT -Madgoan Jn Konkan Kanya Superfast Express  ह्या नावाने चालविण्यात येणार आहे. दिनांक २० जानेवारी २०२३ पासून हा बदल अमलात आणला जाणार आहे.

“सुपरफास्ट” कॅटेगरी मध्ये आल्याने हि गाडी मुंबई ते मडगाव हे अंतर कमी वेळात कापणार आहे. 20111 Mumbai CSMT -Madgoan Jn Konkan Kanya Superfast हि गाडी मुंबई सीएसमटी स्थानकावरून रात्री २३:०५ वाजता सुटून मडगावला  सकाळी ९:४६ ला पोहोचेल. 20112 Madgoan Jn – Mumbai CSMT Konkan Kanya Superfast हि गाडी मडगाव स्टेशन वरून संध्याकाळी ७ वाजता सुटून मुंबई सीएसमटी स्टेशन ला सकाळी ५.४० ला पोहोचेल. ह्या गाडीच्या स्थानकामध्ये काही बदल करण्यात आलेली नाही आहे.

   

Loading

प्रस्तावित देवगड – मालवण – वेंगुर्ला रेल्वेमार्ग लवकरच अस्तित्वात येणार.

देवगड – मालवण – वेंगुर्ला रेल्वेमार्ग लवकरात लवकर अस्तित्वात यावा ह्यासाठी केंदीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ह्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

127 किलोमीटर च्या ह्या रेल्वे मार्गासाठी नारायण यांनी पुढाकार घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे किनारे ह्या मार्गा मुळे जोडले जाणार आहेत. कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड मालवण वेंगुर्ला असा हा रेल्वे मार्ग असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनार पट्टीत सध्या रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा वाटा उचलेल हे नक्की. ह्या मार्गावर टुरिस्ट ट्रेन किंवा माथेरान, सिमला येथे चालविण्यात येणाऱ्या ट्रेन सारख्या गाड्या चालू करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात त्यांनी केंदीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 2021 साली एक पत्र लिहिले होते. ह्या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन’ च्या मार्गाचा एक प्राथमिक सर्वे पण करण्यात आला होता.

 

Loading

कोकणरेल्वे मार्गावरील ‘तेजस’ एक्सप्रेस धावणार विस्टाडोम कोचसह

आज दिनांक 15.09.2022 पासून मुंबई ते करमाळी दरम्यान चालविण्यात येणारी तेजस एक्सप्रेस एका विस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोच सोबत धावणारी कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी गाडी ठरली आहे. ह्या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान रोज चालविण्यात येणारी जनशताब्दी एक्‍स्प्रेस या कोच सह चालविण्यात येत होती. विस्टाडोम कोच साठी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे हा डबा तेजस एक्सप्रेसला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या गाडीतील विस्टाडोममध्ये एका डब्यात 40 प्रवासी असणार आहेत.

गाडीचा मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार 

तसेच ही गाडी मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे.

कसा असतो विस्टाडोम कोच? 

विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्‍या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगरदर्‍यांचे विहंगम दृश्य टिपता येते.

Loading

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-बदलापुर ते CSMT जाणार्‍या गाड्यांचा जीवघेणा ‘गॅप’.

अंबरनाथ : मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-बदलापुर स्टेशन वरुन CSMT च्या दिशेने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी दोन लोकल्समधील अर्ध्या तासाचा ‘गॅप’ जीवघेणा ठरत आहे.

कर्जत वरुन सुटणारी आणि अंबरनाथ स्टेशन येथे सकाळी 9:06 ला येणाऱ्या CSMT जलद लोकल नंतर सुमारे अर्ध्या तासाने 9:37 वाजता CSMT ला जाणारी दुसरी लोकल आहे. पुढे अर्धा तास लोकल नसल्याने साहजिक 9:06 च्या लोकलला जीवघेणी गर्दी असते. अंबरनाथ वरुन पकडणाऱ्या प्रवाशांना अक्षरशः दरवाज्यावर लटकून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढते.

सकाळच्या 10/10.30 ड्युटी टाइम असलेल्या प्रवाशांसाठी हा गॅप खूपच गैरसोयीचा आहे. ह्या दोन लोकल्सच्या मध्ये एक जलद लोकल चालविण्यात यावी अशी प्रवाशांकडून मागणी होत आहे.

Loading

याला विसर्जन म्हणतच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???- भाजप नेते निलेश राणे

कोल्हापूर येथे बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. पंचगंगेत विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे इराणी खाणीत प्रशासनातर्फे बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. एका सरकत्या रॅम्पच्या मार्फत इथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सोय केली गेली आहे.

विसर्जनाच्या वेळी  होणारे अपघात टाळण्यासाठी आणि विसर्जनासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आले आहे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. ह्या आधुनिक पद्धतीचा भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर अनेक भाविकांनी आपला विरोध पण दर्शविला आहे.

ह्या रॅम्पवरून गणेश विसर्जन करून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे असे बोलले जात आहे. रॅम्प च्या टोकावरून मूर्ती पाण्यात टाकली जात आहे. गणेश मुर्त्यांची संख्या वाढली असल्याने काही कर्मचारी अक्षरशः गणेशमूर्ती पाण्यात फेकून देत असल्याचे दिसून येत आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी ह्या पद्धतीवर आपला आक्षेप दर्शविला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी

”याला विसर्जन म्हणताच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???” ह्या शब्दात आपला विरोध दर्शविला आहे.

 

 

Loading

मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे भीषण अपघात, २ ठार

पोलादपूर:मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर येथे आज सकाळी शिवशाही बस आणि कार चा भीषण अपघात होऊन २ जण ठार झालेत तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून  कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल केले आहे.

जयवंत सावंत;६० वर्ष; अंबरनाथ, किरण धागे;२८ वर्ष; घाटकोपर हे या अपघातात मरण पावले आहेत तर अमित दिगले;30 वर्ष; बदलापूर, जयश्री सावंत, ५६ वर्ष; अंबरनाथ, गिरीश सावंत; ३४ वर्ष; अंबरनाथ हे तिघे ह्या अपघातात जखमी झाले आहेत.

Loading

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सरकार आणि पक्ष प्रयत्नशील. – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :गणेशोत्सव हा  सण समस्त कोकणकरांचा महत्वाचा सण आहे. ह्या उत्सवास मुंबई-पुण्यातून अगणित भक्त कोकणातील आपल्या गावी जातात .गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून सरकार तसेच पक्ष प्रयत्नशील आहे.पक्षातर्फे ३०० पेक्षा अधिक बसेस ह्या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत, त्यासोबत मोदी एक्सप्रेस हि सोडण्यात आली आहे. सरकारतर्फे ST बसेस च्या ज्यादा फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत तसेच रेल्वे मार्फत पण अनेक विशेष फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत असे आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले.

स्वतः रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरून ह्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आणि हा रस्ता प्रवासासाठी सुखकर करण्याचे निर्देश दिले आहेत. ह्या महामार्गाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही पुढील वर्षी पाठपुरावा करून नक्की सोडवू असे ते पुढे म्हणाले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search