रत्नागिरी: नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळावा यासाठी तीन वर्षापासून पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही जाग येत नसलेल्या रेल्वे प्रशासनाविरोधात २६ जानेवारी २०२३ म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून निसर्गरम्य चिपळूण-संगेमश्वर ग्रुप तसेच संगमेश्वरवासियांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
संगमेश्वर रोड स्थानकातून रेल्वेला दर महिन्याला चांगला महसूल मिळत असतानाही कोकण रेल्वे प्रशासनाकडून दुजाभाव का केला जातो, असा प्रश्न संगमेश्वरमधील जनता विचारत आहे. कोकणवासियांचे मुंबईत मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यात संगमेश्वर तालुक्यात १९६ गावातील चाकरमानी कामधंद्यानिमित्त कोकण ते मुंबई असा नेहमी प्रवास करत असतात. संगमेश्वर स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्या थांबाव्यात यासाठी निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर फेसबुक ग्रुपवर वारंवार रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करत आहे. त्यास स्थानिकांचीही मोठी साथ लाभली आहे. जनतेच्या या मागणीकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष देवून जनतेवर होणारा अन्याय दूर करेल असे वाटले होते. असे आंदोलनाची हाक दिलेल्या संदेश जिमन यांनी म्हटले आहे.
मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या, शुक्रवार दिनांक 23/12/2022 पासून सुरू होत आहे.
या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
अशी आहे सेवा…
मुंबई सेंट्रल ह्या स्थानकावरून सुटून पनवेल पर्यंत मार्गात येणारी महत्त्वाची स्थानके घेऊन ही गाडी चिपळूण, लांजा, राजापूर, खारेपाटण, तारला, कणकवली, कसाल, आरोस, कुडाळ,सावंतवाडी, इन्सुलि, बांदा, पत्रादेवी, म्हापसा आणि पणजी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.
सुटणार : मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : पणजीमध्ये सकाळी ७ वाजता
परतीचा प्रवास
सुटणार : पणजीहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : मुंबईसेंट्रल येथे सकाळी ७ वाजता
मुंबई सेंट्रल ते काही महत्त्वाच्या स्थानकापर्यंत प्रवासी भाडे
मुंबई सेंट्रल – चिपळूण > ५९५ रुपये
मुंबई सेंट्रल – राजापूर > ८८० रुपये
मुंबई सेंट्रल – कणकवली > १००५ रुपये
मुंबई सेंट्रल – कुडाळ > १०८५ रुपये
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी > ११२५ रुपये
मुंबई सेंट्रल – बांदा > ११५० रुपये
मुंबई सेंट्रल – पत्रादेवी > ११६० रुपये
मुंबई सेंट्रल – पणजी > १२५५ रुपये
वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी कोकण तसेच गोवा ह्या ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत त्यांना ही सेवा फायदेशीर ठरेल अशी आशा एसटी महामंडळाने केली आहे.
ह्या गाडीचे आरक्षण MSRTC च्या पोर्टल वर आणि मोबाईल अॅ प वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Konkan Railway News : ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
Train no. 01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 22/12/2022 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 24/12/2022 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन संध्याकाळी 14.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.00 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
Konkan Railway News : कोंकण रेल्वेने कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 20923/20924 गांधीधाम – तिरुनवेल्ली – गांधीधाम वीकली एक्सप्रेस हि गाडी जी ह्या आधी २१ LBH डब्यांसहित चालविण्यात येत होती ती आता २२ LBH डब्यांसहित चालविण्यात येणार आहे. १ स्लीपर कोच कायमस्वरूपी ह्या गाडीला जोडण्यात येणार आहे.
ट्रेन नंबर 20924 गांधीधाम – तिरुनवेल्ली वीकली एक्सप्रेस हि गाडी दिनांक ०२/०१/२०२३ पासून तर 20923 तिरुनवेल्ली – गांधीधाम वीकली एक्सप्रेस हि गाडी ०५/०१/२०२३ पासून ह्या अतिरिक्त डब्यासहीत चालविण्यात येणार आहे.
मागील 12 वर्षांपासुन रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत.
Mumbai-Goa Highway News:कोकणाच्या समृद्धीसाठी ‘मुंबई-गोवा महामार्ग’ सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. अशा आशयाचे ट्विट राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केले आहे.
Follow us on
आपण ह्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत पण बोलणे झाले. समृद्धी महामार्ग जर कमी वेळात पूर्ण होऊ शकतो तर मुंबई गोवा महामार्गाच्या कामात काय अडथळे येत आहेत असे असा सवाल त्यांनी नितीन गडकरी यांना केला. तुम्ही वैयक्तिकरीत्या लक्ष घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही म्हणुन तुम्ही लक्ष घालून हे काम पूर्णत्वास न्या या माझ्या विनंतीवर गडकरी यांनी आठ ते दहा दिवसांत ह्या प्रश्नावर तोडगा काढू असे आश्वासन दिले असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
कोकणाच्या समृद्धीसाठी 'मुंबई-गोवा महामार्ग' सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री @nitin_gadkari ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. pic.twitter.com/uQ8PjmaOK9
सिंधुदुर्ग, दि. 21/12/2022 : आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे येथून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या केळकर ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालत्या लक्झरी बसला आग लागली. सुदैवाने ह्या अपघातात जिवितहानी झाली नाही पण बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. आग शॉर्टसर्किटने लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या लक्झरी मधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले .
Follow us on
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदत कार्य केले. कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला तत्काळ पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, पोलिसांनी ती वाहतूक सुरळीत केली.
Mumbai-Goa Highway :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे. ह्याविषयी कोकणवासियांकडून वेगवेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. हाच आक्रोश आता एका भजनातून-गजरातून व्यत्क्त केला गेला आहे. श्री म.प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) प्रासादिक भजन मंडळद्वारे हा गजर YOUTUBE ह्या माध्यमावर प्रसिद्ध केला आहे.
ह्या गजराचे शब्दांकन केले आहे श्री बाबाजी हरिचंद्र आमडोस्कर (हरि सुत), तर बुवा:- श्री. प्रमोद ना. धुरी यांनी ह्या गजराला संगीत दिले आहे. त्यांना साथ दिली आहे……
Konkan Railway News :कोकणरेल्वेच्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या विद्युत इंजिनावर धावणार आहेत. कोकण रेल्वेचं १००% विद्युतीकरण करण्याचा निर्धार केला गेला आहे. ह्या आधी बहुतेक गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.त्यात भर म्हणून खालील गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.
Follow us on
मत्स्यगंधा एक्सप्रेस (१२६२०/१२६१९) ही दिनांक १८ डिसेंबरपासून पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस गाडी (२२६५३/२२६५४) ही दिनांक १७ डिसेंबर पासून पासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाणार आहे.
तिरुअनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (२२६३३/२२६३४) दिनांक २१ डिसेंबर पासून पासून विजेवर धावणार आहे.
कोचुवेली ते योगनगरी ऋषिकेश दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्सप्रेस(२२६५९/२२६६० ) आहे. ही गाडी २३ डिसेंबरपासून विजेवर धावणार आहे.
सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.
ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.
Follow us on
सहलीची रूपरेषा
दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.
कातळशिल्पे म्हणजे काय?
नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.
Konkan Railway News :ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. कोंकण रेल्वेने ह्या सणासाठी या मार्गावर अजून काही अतिरिक्त गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या विशेष शुल्कासह ह्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
1) Train no. 09057 / 09058 Udhana – Mangaluru Jn. – Udhana (Bi-Weekly) Special on Special Fare
ह्या गाड्या उधना ते मंगुळुरु ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 09057
ही गाडी दिनांक 21/12/2022 ते 01/01/2023 पर्यंत प्रत्येक बुधवार आणि रविवार ह्या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी उधना ह्या स्थानकावरुन रात्री 20.00 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 18.30 वाजता मंगुळुरु स्थानकावर पोहोचेल.
Train No 09058
ही गाडी दिनांक 22/12/2022 ते 02/01/2023 पर्यंत गुरुवार आणि सोमवार ह्या दिवशी चालविण्यात येणार आहे. ही गाडी मंगुळुरु स्थानकावरून रात्री 20.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 19.25 वाजता उधना स्थानकावर पोहोचेल.
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn – Karmali – Ahmedabad Jn (Weekly) Special on Special fare.
ह्या गाड्या अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train no. 09412
ही गाडी दिनांक 20/12/2022 आणि 27/12/2022 मंगळवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी अहमदाबाद स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 05.00 वाजता करमाळी जंक्शन ह्या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411
ही गाडी दिनांक 21/12/2022 आणि 28/12/2022 बुधवारी चालविण्यात येणार आहे. ही गाडी करमाळी स्थानकावरून सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद ह्या स्थानकावर पोहोचेल.
09411 या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 18/12/2022 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.