Konkan Railway News :काल पनवेल स्थानकाजवळ झालेल्या मालगाडीच्या अपघातामुळे या मार्गावरून जाणार्या एक्सप्रेस गाड्यांची वाहतुक विस्कळीत झाली आहे. अजून पर्यंत या मार्गावरील वाहतुक विस्कळित असून ती पूर्वपदावर आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीन डबे या मार्गावरून बाजूला करण्याचे काम चालू आहे.
या अपघातामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत तसेच काही गाड्या अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणारी मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या या कल्याण, मिरज मार्गे वळण्यात करण्यात आल्या आहेत. अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.
शनिवारी रात्री सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस आज पहाटे सुटणार होती. मात्र तिला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1) दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 10103 CSMT-madgaon mandvi exp
2) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 01165 LTT mangluru exp, JCO 30/9/23
3) आज दिनांक 01/10/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 01171 CSMT Sawantwadi exp-
पुणे मिरज मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या
1) दिनांक 30/09/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12133 CSMT Mangluru exp-
2)दिनांक 01/10/2023 रोजी मुंबईवरून सुटणारी 12051 CSMT Madgoan Janashatabdi Exp.
आरंभ स्थानकावरून सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आलेल्या गाड्या.
काल दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू करणारी 20111 CSMT Madgaon exp आज सकाळी 11:05 वाजता आपला प्रवास सुरू करेल.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
1)दिनांक 01/10/2023 रोजी सुटणारी 01151 CSMT Madgaon exp- पनवेल या स्थानकावरून सुटेल.
2)दिनांक 30/09/2023 रोजी प्रवास सुरू केलेली 01172 Sawantwadi CSMT exp ही गाडी आपला पनवेल स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे.