![]()
Category Archives: कोकण
![]()
माणगाव :-भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधुवार दि १८ रोजी माणगावाला येणार आहेत त्याचबोबर ग्रामपंचायत निवडणूक घोषित झाल्याने निवडणूक विषयी विचार विनिमय करण्यासाठी रविवारी दि.०८ रोजी बामणोली रोड, खरे मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली.लोकसभा निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येवून ठेपल्यांने रायगड रत्नागिरी जिल्हातील लोकसभा भाजपा लदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राज्याचे प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा रायगड जिल्ह्यात दोन दिवस प्रवस दौरा पार पडणार आहे.
दि.१८ रोजी भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे येणार असल्याने स्वागताची जंगी तयारी केली जात आहे.नुकतीच अदावा बैठक घेण्यात आली. व्यासपीठावर रायगड जिल्हा भाजपा अध्यक्ष माजी आमदार तसेच लोकसभेचे सांभाव्य उमेदवार धैर्यशील पाटील तसेच लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, प्रशांत शिंदे ,श्रीवर्धन विधानसभा प्रमुख व दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटिल, बिपिन दादा महामुंकर जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा,जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले,महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष सौ.हेमा मानकर,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नीलेश थोरे, न.पं.चे उपनगराध्यक्ष राजेश मेहता,ता.अध्यक्ष उमेश साटम,सचिव गोविंद कासार माजी अध्यक्ष संजय अप्पा ढवळे सह आदी मान्यवर विराजमान झाले होते. धैर्यशिल पाटील यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान धैर्यशील पाटील तसेच इतर मान्यवर यांचे सह सर्व मान्यवर यांना स्थनिक पदाधिकारी यानी पुष्प गुच्छ देवून स्वागत केले.पुढे स्वागत व प्रास्ताविक भाषण ता.अध्यक्ष उमेश साटम यांनी केले. धैर्यशिल पाटील म्हणाले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी हातभर लावण्याची आवश्यकता आहे. मी आमदार असताना विधानसभा सभग्राहात माझा सर्वोत्कृष्ट आमदार महणून गौरव करण्यात आला होता. माझे वडील पाच वेळा आमदार महणून कार्य केले आत्ता तुमच्या बक्कम पाठींब्याने मी निवडूण रिंगणात उतरणार आहे. शिवसेना पक्ष सत्तेत असताना विकास खुंटल्याचे सांगून
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप तगडे उमेदवार उतरविणार आहे लोकसभा निवडणुकीत तूम्ही मला मताधिक्याने निवडून देणार असल्याचा पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.यावेळी नाना महाले, प्रशांत शिंदे तसेच निलेश थोरे यांचेही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी गोविंद कासार यानी आभार मानले तसेच सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम दरम्यान माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी उमेश साटम यांना माणगाव तालुकाचे नवनिर्वाचित अध्यक्ष झाल्याबद्दल पुष्प गुच्छ देवून स्वागत,अभिनंदन तसेच शुभेच्छा दिले.
![]()
![]()
![]()
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळबांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.चीन, मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेली दोन वर्षापासून या कोळीवर संशोधन केलं आहे. ‘जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.
‘स्पारबांबॅरस सिंधुदुर्ग’ या नावाने या ‘जम्पिंग स्पायडर’ कोळीचं नामकरण करण्यात आलं आहे. या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पारबांबॅरस हे नाव हा कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तस नामकरण करण्यात आले आहे. हा कोळी ज्या ठिकाणी जाळ बनवतो त्याचं ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या कीटकांचा भक्ष करतात. भारतात जवळपास 2000 कोळ्याचे प्रजाती सापडतात. तर जगभरात 51,000 कोळ्यांचे प्रजाती सापडतात. जम्पिंग स्पायडरच्या 300 प्रजाती भारतात आढळतात.
![]()
Konkan Railway News :मध्यरेल्वेच्या काही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन काही गाड्यांच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एकूण 10 एक्सप्रेस गाड्यांमध्ये एकुण 34 (सर्व 10 गाड्यांचे मिळून) डबे कायमस्वरुपी वाढविण्यात येणार आहेत.
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्या नागपूर-मडगाव-नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीला एक थ्री टायर एसी आणि एक जनरल असे दोन अतिरिक्त डबे कायमस्वरूपासाठी जोडण्यात येणार आहेत.
Nagpur – Madgaon Jn Special (Bi-Weekly) 01139 या गाडीला दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून तर
Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01140 या गाडीला दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून हे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना
2 Tier AC – 01, 3 Tier AC – 05, Sleeper – 11, General – 05, SLR-02 =एकूण 24 आयसिएफ कोच.
मध्य रेल्वे खालील १० एक्सप्रेस मध्ये १२/१०/२३ पासुन पुढे एकुण ३४ डब्बे कायमस्वरुपी
वाढवत आहे…१) २२१३९ पुणे अजनी एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
२) २२१४० अजनी पुणे एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
३) २२१४१ पुणे नागपूर एक्सप्रेस-… pic.twitter.com/ggfWyv4BNB— Central Railway (@Central_Railway) October 10, 2023
![]()
![]()
![]()
सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
![]()














