Category Archives: कोकण

बारसू रिफायनरी पाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही येणार एक मोठा प्रकल्प

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग – बारसू रिफायनरी विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी मुळे कोकणाचा विकास नाही तर विनाश होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता कोकणात नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादले जात आहेत अशी सरकारवर टीका होत आहे.

बारसू रिफायनरीचा वाद चालू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर एका नव्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १२,५०० एकर भूसंपादन करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन जमीन, शिल्लक जमीन आणि भूसंपादन प्रक्रिया ठरवण्यात येणार आहे. 

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

 

   

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

मडगाव-हापा-मडगाव एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच

संग्रहित फोटो

Konkan Railway News – सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या  हापा – मडगाव एक्सप्रेस गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबा वाढवण्यात आला आहे. 

हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या 22908 Hapa – Madgaon Express या गाडीला दि. 26 एप्रिल रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 22907 Madgaon Jn. – Hapa Express या गाडीला दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.

 

Loading

मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात; १ ठार, २२ जखमी.

Mumbai Goa Highway News :महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल आगारातून महाडला जात असलेली MH 09 EM 9282 या क्रमांकाची एसी शिवशाही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. हा अपघात आज दुपारी कर्नाळा खिंडीत झाला. अपघातात 1 प्रवासी ठार तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते.

या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलीस आणि पनवेल तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या 22 जणांना जवळच्या पनवेल उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात ठार झालेल्या प्रवाशाची ओळख अजून पटली नाही आहे. 

Loading

कोकण रेल्वेमार्गावर धावणार अजून एक समर स्पेशल ट्रेन; एकूण ४ फेऱ्या

Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक लांब पल्ल्याची वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे.

Train No. 06055 / 06056 Tambaram – Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):

Train No. 06055 /Tambaram – Jodhpur Jn. Superfast Special (Weekly):
दिनांक २७/०४/२०२३ आणि ०४/०५/२०२३ गुरुवारी ही गाडी ताम्बरम स्थानकावरुन दुपारी ०२:०० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता जोधपूर या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06056 /Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):
दिनांक ३०/०४/२०२३ आणि ०७/०५/२०२३ रविवारी ही गाडी जोधपूर स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:१५ वाजता ताम्बरम या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, मडगाव
डब्यांची संरचना
टू टायर एसी – 01 + थ्री टायर एसी – 08  + सेकंड  स्लीपर – 05 + जनरल – 06  + एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन   असे मिळून एकूण 22LHB  डबे

Loading

बारसू रिफायनरी सर्वेक्षण विरोधाप्रकरणी शरद पवार यांनी घेतली दखल; उद्योगमंत्री उदय सामंत यांना केला फोन

Barsu Refinery News – बारसू रिफायनरी सर्वेसाठी स्थानिकांचा विरोध वाढला असून आंदोलक आक्रमक झाले असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधकांनी पोलिसांच्या गाड्या अडवून विरोध केला आहे. आता या सर्व प्रकरणाची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दखल घेतली आहे.

शरद पवार यांनी मंत्री उदय सामंत यांना फोन केला आहे. सर्व्हे थांबवून आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका घ्या, नाहीतर प्रकल्प अडकेल.त्यामुळे चर्चा करावी आणि ज्यांना अटक केली त्यांना सोडून द्यावे असे त्यांनी उदय सामंत यांना सांगितल्याचे समजते. 

 उदय सामंत यांनी या प्रकरणी शरद पवार यांना आश्वस्त केले आहे की ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील. 

Loading

बारसू रिफायनरी सर्वेक्षण; विरोधक महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या

रत्नागिरी– कोकणातील रिफायनरीला स्थानिकांचा विरोध वाढला आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी देखील मोठा विरोध पाहायला मिळाला. आज आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. सकाळपासून आंदोलक जमले होते. त्यांनी प्रकल्पाच्या जागी धरणे धरले होते. दरम्यान, आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हे पोलिस आंदोलन स्थळी येत असतांना आंदोलक महिलांनी रस्त्यावर झोपून पोलिसांचा ताफा अडवला. यावेळी अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी केली.
आज सकाळी आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा ताफा आंदोलक महिलांनी अडवून धरला. सकाळी साडे आठच्या सुमारास महिलांनी पोलिसांच्या गाड्या अडवल्या. काही ही झाले तरी तरीहा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली. विरोधी करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांचे रवानगी रत्नागिरी येथे करण्यात आली आहे.

Loading

सीएसएमटी स्थानकावर ब्लॉक; कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाडीवर होणार परिणाम…

Konkan Railway News – कोकण रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सीएसएमटी स्थानकावर घेण्यात येणार्‍या ब्लॉक मुळे मंगलोर जंक्शन ते सीएसएमटी, मुंबई दरम्यान धावणारी Majn Csmt Exp – 12134 गाडी 23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान सीएसएमटी स्थानकापर्यंत न चालवता ती दादर स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. 

 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 तसेच 12 आणि 13 वर रेल्वेच्या माध्यमातून काही आवश्यक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या दोन लाईनवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. त्यामुळे  23 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान काही गाड्यांची सेवा दादर स्थानकापर्यंत असणार आहे असे रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

Loading

मुंबई ते कोकण प्रवास होणार सुसाट; जवळपास दोन तास वेळ वाचणार…


मुंबई – मुंबई ते कोकण हा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकण प्रवास अधिक गतीमान होणार आहे.

ट्रान्स हार्बर लिंक हा मुंबईतील प्रकल्प आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांना हा मार्ग जोडतो. त्याचा बहुतांश लाभ मुंबईकरांना होणार असला तरी या मार्गामुळे मुंबई स्थित कोकणवासीयांचा फायदा होणार आहे. 

हा सागरी पूल पूर्वेकडील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पश्चिमेकडील कोस्टल रोडशी जोडतो. त्यामुळे मुंबईकरांना कोकणात जाणे सोपे होणार आहे. सध्या मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करण्यासाठी दोन तासांहून अधिक वेळ लागतो, ट्रॅफिक जामची पण मोठी समस्या आहे. 

मात्र या सागरी मार्गामुळे 25 मिनिटात मुंबई ते नवी मुंबई हे अंतर पार करता येणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकणातील आपल्या गावचा प्रवासातही जवळपास दोन तास वाचणार आहेत.

 

   






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाचे सर्वेक्षण सोमवारपासून; परिसरात शासनाचा जमावबंदी आदेश लागू

रत्नागिरी – कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षणाच्या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवारपासून केली जाणार आहे. रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आणि काही ग्रामस्थांकडून या कामात अडथळा आणण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राजापूर बारसू सोलगाव या परिसरात राजापूरच्या तहसीलदार शितल जाधव यांनी आदेश जारी केले आहेत.
सोमवारी २४ एप्रिल म्हणजे उद्यापासून हे ड्रिलिंग करून माती सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या परिसरात कलम १४४ म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच या परीसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २२ एप्रिल ते ३१ मे या कालावधीपर्यंत हे मनाई आदेश लागू असणार आहेत. बारसू सडा बारसू, पन्हळे तर्फे राजापूर, धोपेश्वर, गोवळ, वरचीवाडी गोवळ, खालचीवाडी गोवळ या ड्रिलिंग करण्यात येणाऱ्या एक किलोमीटरच्या परिसरात हे आदेश लागू असणार आहेत.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे सदर प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरात नियोजित आहे.
 ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग’ विरोधात काही स्थानिक ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. रिफायनरी विरोधी संघटना राजापूर तसेच मुंबई येथे स्थापन झालेल्या आहेत. त्या माध्यमातून ते विरोध दर्शवित आहेत. याबाबत रिफायनरी विरोधकांनी राजापूर शहरात मोर्चा, मेळावे, मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे, हिंसक आंदोलन अशा स्वरुपाची आंदोलने केली आहेत. तसेच इतर भागांतूनही आंदोलक अशा आंदोलनात सहभागी होत असतात, अशी टिप्पणी या आदेशात करण्यात आली आहे.बारसू परिसरात औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता जमीन योग्य आहे किंवा कसे? याकरीता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्राथमिक सुसाध्यता तपासणी करण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण व भू सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळच्या कालावधीत ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रकल्प विरोधी भूमिका घेऊन लोकांचे नेतृत्व करणे, दंगल करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, चिथावणी देणे, समान उद्देशासाठी बेकायदेशीर जमाव जमवून त्यात सामील होणे, इच्छा पूर्वक दुखापत पोहोचविणे, नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आवेग करणे, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करणे, जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे, असे गुन्हे घडलेले आहेत, असे स्पष्टपणे नमूद करत प्रशासनाचा मागील अनुभव लक्षात घेऊन हे मनाई आदेश जाहीर करण्यात आले आहेत.

Loading

बंदी असतानाही भोस्ते येथील धोकादायक जगबुडी पुलावरून अवजड वाहतूक चालूच; सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता

संग्रहित छायाचित्र
रत्नागिरी – भोस्ते जगबुडी पूल धोकादायक स्थितीत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला होता. त्यानुसार हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसा सूचना फलकही पुलाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आला आहे. मात्र या पुलावरून अवजड वाहतूक सुरूच आहे. रात्री-अपरात्री व सकाळच्या सुमारास वाळूचे डम्पर याच पुलावरून राजरोसपणे धावत आहेत. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव लाल फितीतच अडकून पडला पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांसह स्वयंसेवी संस्था व प्रशासनाकडे सातत्याने पक्षांनी पत्रव्यवहारही पुलाच्या दुरुस्तीसाठी कुठलीच ठोस पावले उचललण्यात आलेली नाहीत. सरकारने दुर्लक्ष केल्यास सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही 
शहरातून चिपळूण तसेच खाडीपट्ट्यातील शिवभागातील सुमारे १५ ते २० गावांना जवळचा रस्ता म्हणून या पुलाचा वापर केला जातो. या पुलाचे बांधकाम सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले होते. सद्यःस्थितीत रेल्वस्थानकाकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून हा पूल अत्यंत महत्वाचा आहे; मात्र हा अरुंद असल्याने तसेच कुमकुवत असल्याने या पुलावरून अवघड वाहनातून राजरोसपणे खडी, वाळू तसेच खासगी बसेसच्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली होती. हा पूल कमकुवत होऊ नये यासाठी भोस्ते गावातील नागरिकांनी आक्रमक पवित्र घेतला होता. बांधकाम विभागाने या पुलाच्या सुरक्षिततेचा विचार करून या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घातली होती .

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search