नवी दिल्ली :मुंबई छत्रपती टर्मिनस स्टेशन आता नव्या स्वरूपात दिसणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ह्या स्टेशनच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. स्टेशन आणि आजूबाजूचा परिसरात आता पर्यटनाच्या दृष्टीने बांधकाम केले जाईल आणि पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनवण्यात येणार आहे.
एकूण १०,००० करोड मूल्याचे ३ प्रमुख स्टेशनचे पुनर्निर्माण आणि सुशोभीकरणाचा प्रस्ताव आज केंद्रीय मंत्री मंडळाने स्वीकृत केलेला आहे. त्यामध्ये मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीतील ३ प्रमुख स्टेशनची नावे आहेत. तसेच हि ३ स्टेशन आणि देशातील इतर १९० रेल्वे स्टेशनच्या पुर्नबांधणीला एकूण ६० हजार करोड रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.