Category Archives: ठाणे

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या एक्सप्रेसच्या मार्गात तात्पुरता बदल; प्रवाशांनी नोंद घ्यावी

   Follow us on        

कल्याणम: ध्य रेल्वेच्या कल्याण जंक्शन ते कसारा स्थानकांदरम्यान तांत्रिक कामांसाठी (प्री-नॉन इंटरलॉकिंग) ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला असून, प्रामुख्याने १२६१७ एर्नाकुलम जंक्शन ते निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी सुटणारी ही गाडी तिच्या नियमित मार्गाऐवजी आता पनवेल, वसई रोड आणि सुरत मार्गे वळवण्यात आली आहे.

​या बदलामुळे मंगला एक्सप्रेस कल्याण जंक्शनवर थांबणार नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या गाडीला भिवंडी रोड स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने, विशेषतः उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी वेळापत्रक आणि गाडीचा मार्ग तपासून घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा ‘मुहूर्त’ हुकला; १ मे पासून बेमुदत उपोषणाचा इशारा

   Follow us on        

ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला असतानाच, प्रशासनाच्या संथ कार्यपद्धतीमुळे आता संताप व्यक्त होत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर हातोडा पडत नसल्याने, “सरकारी बाबू नेमके कोणावर मेहरबान आहेत?” असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. या दिरंगाईच्या निषेधार्थ आता थेट १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसण्यात येणार असल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या काजुवाडी, दत्त मंदिर परिसर आणि नाचरे चाळ येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाढीव बांधकामे झाली आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने ७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित व्यक्ती, श्री. महेश रमेश बागवे यांना नोटीस बजावली होती. २४ तासांच्या आत हे बांधकाम स्वतःहून हटवावे, अन्यथा महापालिका कारवाई करेल असे त्यात स्पष्ट नमूद होते. मात्र, या नोटिशीला दोन आठवडे उलटूनही पालिकेचा एकही कर्मचारी कारवाईसाठी फिरकला नसल्याने ही नोटीस केवळ कागदी घोडा ठरली आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे.

​मंत्रालयाचे आदेशही धाब्यावर?

विशेष म्हणजे, या अनधिकृत बांधकामाविरोधात केवळ पालिकेतच नव्हे, तर थेट मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेही दाद मागण्यात आली होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले होते. १६ मार्च २०२४ पासून यासंदर्भात लेखी पाठपुरावा सुरू असूनही, वरिष्ठ स्तरावरील आदेशांना स्थानिक प्रशासन केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.

​१ मे पासून बेमुदत उपोषण

प्रशासकीय दिरंगाई आणि अनधिकृत बांधकामांना मिळणारे कथित अभय यांविरोधात तक्रारदार श्री. सुरेश जिमन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर ते बेमुदत शांततापूर्ण उपोषणाला बसणार आहेत.

​पालिकेत धाकधूक वाढली

या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाची डोकेदुखी वाढली आहे. उपोषणादरम्यान जर उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास संपूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात ठणकावून सांगण्यात आले आहे. आता १ मे पूर्वी महापालिका प्रशासन आपली ‘मेहरबानी’ सोडून कारवाई करणार की उपोषणाची नामुष्की ओढवून घेणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

​ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल मधून पडल्याने देवगडच्या तरुणाचा मृत्यू

   Follow us on        

दिवा: काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या आपल्या काकांच्या दिवसकार्यासाठी जात असताना देवगड तालुक्यातील रामेश्वर कोलवाडी येथील ३० वर्षीय तेजस उदय पवार याचा ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल मधून पडल्याने मृत्यू झाला.

​तेजस हा आपल्या पत्नीसह गुरुवारी सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनवर पोहोचला. पत्नीला रेल्वेत महिलांच्या राखीव डब्यात सुरक्षितरीत्या बसवून तो अन्य डब्यात बसण्यासाठी गेला. स्टेशनवरून रेल्वे सुटत असताना अचानक डब्यात गर्दी वाढली. या गर्दीत त्याला धक्का लागला आणि तो धावत्या लोकल मधून बाहेर फेकला गेला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

​प्राप्त माहितीनुसार, तेजस हा मुंबई येथील एका खासगी कंपनीत कामाला होता. दीड वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असून तो सध्या पत्नीसोबत राहण्यासाठी मुंबईतील रहिवासी होता.

​तेजस हा मनमिळावू स्वभावाचा होता आणि त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच रामेश्वरसह गीर्ये, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली.

​तेजस हा देवगड तालुका नाभिक संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सल्लागार उदय पवार यांचा मुलगा होता.

Mumbai Local: थांबा असूनही स्थानकावर गाडी थांबली नाही; भाईंदरच्या प्रवाशांना ‘नायगाव’ची वारी!

   Follow us on        

मुंबई:पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा फटका गुरुवारी प्रवाशांना बसला. विरारच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकल ट्रेनचा नियोजित थांबा भाईंदर स्थानकावर असतानाही, चालकाने गाडी स्थानकात न थांबवता थेट पुढे नेली. या प्रकारामुळे फलाटावर उभ्या असलेल्या आणि गाडीतून उतरणाऱ्या शेकडो प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.

​नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, विरारकडे जाणारी ही लोकल नेहमीप्रमाणे भाईंदर स्थानकावर थांबणे अपेक्षित होते. भाईंदर हे पश्चिम रेल्वेवरील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे स्थानक आहे. मात्र, गाडी स्थानकात येत असताना वेग कमी करण्याऐवजी चालकाने गाडी तशीच पुढे नेली. गाडी थांबेल या आशेने फलाटाच्या टोकावर उभे असलेल्या प्रवाशांना गाडी थेट निघून गेल्याचे पाहून धक्काच बसला.

​प्रवाशांचे हाल आणि संताप:

या घटनेमुळे भाईंदरला उतरणाऱ्या प्रवाशांना नाहक नायगाव स्थानकापर्यंत जावे लागले. तिथून पुन्हा विरुद्ध दिशेची गाडी पकडून त्यांना भाईंदरला परतावे लागले, ज्यामुळे त्यांचा ३० ते ४० मिनिटांचा वेळ वाया गेला. दुसरीकडे, भाईंदरवरून विरारच्या दिशेने जाण्यासाठी फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना पुढच्या गाडीची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागले. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.

​रेल्वे प्रशासनाची भूमिका:

या तांत्रिक चुकीनंतर पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चूक लोको पायलटच्या (चालक) विस्मरणामुळे झाली की सिग्नल यंत्रणेत काही बिघाड होता, याचा शोध घेतला जात आहे. “अशा प्रकारच्या घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई केली जाईल,” असे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.:

रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे हे प्रवाशांच्या सोयीसाठी निश्चित केलेले असतात. अशा प्रकारे स्थानक चुकणे ही चालकाची मोठी चूक मानली जाते. वाढत्या कामाचा ताण किंवा मानवी त्रुटी यांमुळे असे प्रकार घडत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

ठाण्यातील पाहिल्या ‘प्लॅनेटेरियम’चे ५ एप्रिलला उद्घाटन

   Follow us on        

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील पहिले प्लॅनेटेरियम ५ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. शाहापूर येथील साकदभाव परिसरात उभारण्यात आलेले हे ‘स्पेस अ‍ॅस्ट्रोटेनमेंट अँड प्लॅनेटेरियम ऑब्झर्व्हेटरी (SAPO)’ नावाचे प्रकल्प खाजगी स्वरूपात उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन खगोलशास्त्रज्ञ डॉ. के. सोमन आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला असून, लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सुमारे ३.५ एकर उंच ठिकाणी उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पात अत्याधुनिक प्लॅनेटेरियमसह चार मोठ्या दुर्बिणी असलेले वेधशाळा केंद्र उभारण्यात आले आहे. येथे ५६ आसनांची व्यवस्था असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अर्धा ते एक तासांचे खगोलशास्त्रीय शो दाखवले जाणार आहेत.

या केंद्रामध्ये पर्यटकांना शनीचे वलय, गुरू ग्रहाचे पट्टे व त्याचे उपग्रह, तसेच आकाशगंगेचे सुंदर दृश्य स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सर्वोत्तम स्टारगेझिंग अनुभव देणारे हे ठिकाण ठरणार आहे.

याशिवाय येथे प्रदर्शन हॉल, सेल्फी पॉइंट्स, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक आणि खाद्यपदार्थांसाठी कॅन्टीनचीही सुविधा उपलब्ध आहे. खगोलशास्त्रप्रेमींसाठी हे ठिकाण मोठे आकर्षण ठरणार असून, भेट देण्यापूर्वी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mumbai Local: ठाणे स्थानकावरील गर्दीवर तोडगा; ठाणेकरांना मिळणार अजून एक रेल्वे स्थानक

नवीन रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी

   Follow us on        

ठाणे : ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एका नवीन स्थानकाची निर्मिती केली जात आहे. हे नवीन स्थानक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर उभारले जात असून, यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी विभागली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आणि आसपासच्या परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या नवीन रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली आहे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून, ते आजही जनमानसात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून या स्थानकाला त्यांचे नाव देणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

​खासदार नरेश म्हस्के यांनी या मागणीबाबत रेल्वे मंत्रालयाकडे आणि राज्य सरकारकडे औपचारिक पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्तावावर वेगाने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. ठाणे शहराच्या अस्मितेशी जोडले गेलेले हे नाव प्रवाशांच्या भावनांशी देखील जुळलेले असल्याचे त्यांनी नमूद केले असून, या प्रस्तावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

​हे नवीन स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होईल. सध्या या स्थानकाचे काम वेगाने सुरू असून, त्याला ‘आनंद दिघे’ यांचे नाव मिळाल्यास ठाणेकरांसाठी हे स्थानक ऐतिहासिक महत्त्वाचे ठरेल. आता या प्रस्तावावर रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्जत-पळसदरी घाटात उतारावर मालगाडीचे नियंत्रण सुटले; थोडक्यात अनर्थ टळला! थरारक व्हिडिओ समोर

   Follow us on        

ठाणे: मध्य रेल्वेच्या पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी एक थरारक घटना घडली. उतारावरून धावणाऱ्या एका मालगाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी प्रचंड वेगात धावू लागली. सुदैवाने, या वेळी अपघात झाला नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या गंभीर प्रकारामुळे रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून मध्य रेल्वेने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, तीन इंजिन असलेली ही मालगाडी मालवाहतूक करत असताना अचानक उतारावर तिचा वेग अनियंत्रित झाला. ही मालगाडी पळसदरी ते कर्जत दरम्यानच्या तीव्र उतारावरून धावत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आणि पुढील धोके टाळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सुदैवाने गाडी रुळावरून घसरली नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही गाडीला धडकली नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या मालगाडीच्या इंजिनमध्ये काही प्रशिक्षणार्थी लोको पायलट्स (Trainee Loco Pilots) कार्यरत होते. गाडी उतारावरून खाली येत असताना वेगावर योग्य नियंत्रण ठेवण्यास ते अपयशी ठरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ येथे पहा 👇

Megablock News: दिवा-वसई रोड रेल्वे मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक; वीकेंडला अनेक गाड्या रद्द

   Follow us on        

मुंबई: खारबाव येथे नवीन मालवाहू मार्गिकेच्या (Goods Line) कामासाठी दिवा-वसई रोड विभागामध्ये १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी या मार्गावरील प्रवासी रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार असून अनेक मेमू (MEMU) गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

​पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित होणाऱ्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​रद्द करण्यात आलेल्या गाड्या (२१ फेब्रुवारी, २०२६)

​१. गाडी क्र. ६१००७: वसई रोड – दिवा मेमू (दुपारी १५:३५ वा.)

२. गाडी क्र. ६९१६६: वसई रोड – पनवेल मेमू (दुपारी १६:४० वा.)

३. गाडी क्र. ६१००६: दिवा – वसई रोड मेमू (दुपारी १४:३३ वा.)

४. गाडी क्र. ६९१६१: पनवेल – डहाणू रोड मेमू (संध्याकाळी १९:०५ वा.)

​रद्द करण्यात आलेल्या गाड्या (२२ फेब्रुवारी, २०२६)

​१. गाडी क्र. ६१००१: बोईसर – वसई रोड मेमू (सकाळी ०८:३५ वा.)

२. गाडी क्र. ६१००२: डोंबिवली – बोईसर मेमू (सकाळी ०५:४९ वा.)

३. गाडी क्र. ६१००३: वसई रोड – दिवा मेमू (सकाळी ०९:५० वा.)

​वेळेत बदल आणि नियमन (Regulation)

​सिकंदराबाद – राजकोट एक्सप्रेस (२२७१८): २१ फेब्रुवारी रोजी सुटणारी ही गाडी भिवंडी रोड स्थानकावर १ तास ३० मिनिटे थांबवून (Regulated) चालवण्यात येईल.

​वेरावळ – पुणे एक्सप्रेस (११०८७): २१ फेब्रुवारी रोजी ही गाडी तिच्या नियोजित वेळेपेक्षा (११:०५ वा.) उशिरा म्हणजेच दुपारी १४:३५ वाजता वेरावळ येथून सुटेल.

​इंदूर – दौंड एक्सप्रेस (२२९४४): २१ फेब्रुवारी रोजी ही गाडी नियोजित वेळेऐवजी (१६:३० वा.) संध्याकाळी १८:३० वाजता इंदूर येथून सुटेल.

​खारबाव येथील नवीन ‘अप’ आणि ‘डाऊन’ मालवाहू मार्गिकेच्या कार्यान्वयनासाठी (Commissioning) हा ब्लॉक अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

​दु:खद: HSC परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू

   Follow us on        

डोंबिवली:मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील गर्दी आणि सुरक्षेच्या अभावामुळे आणखी एका तरुण विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय सोहम सचिन कठरे या विद्यार्थ्याचा मंगळवारी (१० फेब्रुवारी २०२६) सकाळी कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडल्याने मृत्यू झाला.

​सोहम आपल्या इंग्रजी विषयाच्या HSC (बारावी) बोर्ड परीक्षेसाठी कळव्याला जात होता. सकाळी सुमारे ९.१५ वाजता हा अपघात झाला. रेल्वे रुळांजवळ गंभीर जखमी अवस्थेत आढळल्यानंतर त्याला तातडीने कळवा पोलिसांनी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सकाळी १०.३० वाजता त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे, त्याची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती.

​ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी ‘अपघाती मृत्यू’ (ADR) नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु मुंबई लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीमुळे असे अपघात सातत्याने घडत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

​या घटनेमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सुरक्षा उपाययोजना आणि गर्दी नियंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोशल मीडियावर अनेकांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र सरकारला टॅग करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सोहमच्या निधनामुळे कठरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे.

”मीरा-भाईंदरचा महापौर मराठीच हवा; अन्यथा…” मराठी एकीकरण समितीचा इशारा

   Follow us on        

मीरा-भाईंदर: मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदासाठी मराठी व्यक्तीचीच निवड व्हावी, अशी आक्रमक भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतली आहे. समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला कडक इशारा दिला आहे.

काय म्हणाले गोवर्धन देशमुख?

देशमुख यांनी स्पष्ट केले की, मुंबईप्रमाणेच मीरा-भाईंदरमध्येही मराठी महापौर बसला पाहिजे. जर प्रशासनाने किंवा राजकीय पक्षांनी ‘अमराठी’ व्यक्तीला महापौर बनवण्याचा प्रयत्न केला, तर समिती गप्प बसणार नाही. त्यांनी पुढील मुद्दे मांडले:

रक्त सांडले तरी चालेल: “जर अमराठी महापौर बसवला, तर शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल किंवा माझे बलिदान द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही,” असे भावनिक आणि आक्रमक आवाहन त्यांनी केले.

पर्याय उपलब्ध: भाजपमध्ये अनिता पाटील, ध्रुवकिशोर पाटील यांसारखे अनेक अनुभवी मराठी चेहरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना डावलून अमराठी व्यक्तीला संधी दिल्यास ते सहन केले जाणार नाही.

*दुसरा ‘संयुक्त महाराष्ट्र’ लढा: जर मराठी अस्मितेचा विचार केला नाही, तर मीरा-भाईंदरमध्ये दुसऱ्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यासारखे चित्र पाहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search