Category Archives: महाराष्ट्र




Shakteepith Expressway: राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंबधी काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आजरा ते बांदा हे अंतर जलद गतीने पार करण्यासाठी या महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली २ बोगदे मोठे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर हा कदाचित देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.
आंबोली घाटातून आजरा ते बांदा प्रवास करण्यासाठी सुमारे १.५ तास लागतात. डीपीआरनुसार, आजरा ते बांदा या पॅकेजच्या संपूर्ण ३९ किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी लागणारा प्रवास वेळ फक्त २० मिनिटे असणार आहे. तर या टप्प्यात वेगमर्यादा १२० किमी प्रतितास असणार आहे.
नागपूर आणि गोवा यांना जोडणारा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळेल. या मोठ्या प्रकल्पाची अंदाजीत किंमत ८६,००० कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग १२ जिल्ह्यांना जोडून प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ पत्रादेवी येथे संपेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.
𝐍𝐚𝐠𝐩𝐮𝐫-𝐆𝐨𝐚 𝐒𝐡𝐚𝐤𝐭𝐢𝐩𝐞𝐞𝐭𝐡 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
The package 4 of the Nagpur-Goa Shaktipeeth Expressway will have 2 tunnels under the western ghats near Amboli with a total length of 21.9 kilometres!
Not just… pic.twitter.com/0qyG75ZehS
— Infra News India (INI) (@TheINIofficial) June 17, 2025




Konkan Railway: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू केले जाणार आहे.
प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट NTES म्हणजेच enquiry.indianrail.gov.in किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर ट्रेनच्या वेळा तपासाव्यात.
कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते आणि तुमच्या सहकार्याबद्दल आणि समजुतीबद्दल धन्यवाद.
–कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (KRCL)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी १.१० वाजता
- दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता
- ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
- कल्याण – दुपारी २.०४ वाजता / २.०६ वाजता –
- नाशिक रोड – दुपारी ४.१८ वाजता / दुपारी ४.२० वाजता
- मनमाड जंक्शन – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता –
- अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता –
- छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.०५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता –
- जालना – रात्री ८.५० वाजता / रात्री ८.०७ वाजता
- परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता
- हुजूर साहिब नांदेड – रात्री ११.५० वाजता
- हुजुर साहिब नांदेड – पहाटे ५.०० वाजता
- परभणी – पहाटे ५.४० वाजता / पहाटे ५.४२ वाजता –
- जालना – सकाळी ७.२० वाजता / सकाळी ७.२२ वाजता –
- छत्रपती संभाजीनगर – सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता
- अंकाई – सकाळी ९.४० वाजता
- मनमाड जंक्शन – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता –
- नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता
- कल्याण जंक्शन – दुपारी १.२० वाजता / दुपारी १.२२ वाजता
- ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
- दादर – दुपारी २.०८ वाजता / दुपारी २.१० वाजता –
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी २.२५ वाजता




मुंबई: एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील. हे कॅमेरे चालकांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणार आहेत. गाडी चालवत असताना चालक जर अपघात होण्यास कारणीभूत होईल अशी कृती करत असेल तर (उदा. झोप लागणे, डुलकी घेणे, जांभई देणे) मोबाईल वापरणे असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे.
एसटी महामंडळ एकूण पाच हजार बसेस विकत घेणार आहे. त्यातील किमान एक हजार बसेस या ई-बसेस असणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात,एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ई-बसेस एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे आज सादरीकरण करण्यात आले.
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभई देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
आणखी काय उपाययोजना ?
बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.




Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे पूर्णतः विस्कळीत झाली आहे. सीएसएमटी ते पनवेल दरम्यान अप आणि डाउन लोकलसेवा थांबवण्यात आली आहे. नेरुळ स्थानकातही गाड्या थांबवल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितलंय. बेलापूर ते सीवूड्स स्थानकादरम्यान अनेक गाड्या थांबवण्यात आल्या असून प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
कामाच्या वेळेत अचानक लोकलसेवा सेवा बंद झाल्याने स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काही ठिकाणी प्रवाशांनी संतापही व्यक्त केलाय. रेल्वेकडून तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. अद्याप हार्बरची लोकलसेवा सुरू झालेली नाही.
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.मध्य रेल्वेची १२६ वी क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही निर्णय घेण्यात आला. सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस व हुबळी-पुणे वंदे भारतला कराड येथे थांबा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याच वेळी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले.सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली-परळी एक्स्प्रेस सध्या डेमू धावतो, त्याऐवजी आयसीएफ कोचने सोडण्याचा मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी व गजाधर मानधना उपस्थित होते