शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. त्याच्या ड्रायवरची चौकशी केली असता तो प्रत्येक वेळी वेगळी स्टेटमेंट देत होता. त्यामुळे एका बाजूला संशय घातपाताचा संशय वाढत होता. पण दुसऱ्या बाजूने पाहता तो “रोड हिप्नोसिस” ह्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला बळी पडला हे अधिका अधिक स्पष्ट होत होते.
काय आहे हे “रोड हिप्नोसिस” किंवा रोड संमोहन? निष्णात ड्रायव्हिंग असतानाहि अपघात का होतात? ह्यावर काय उपाय आहेत हे सांगण्याचा आमचा एक हा प्रयत्न. हा लेख पूर्ण वाचा जेणेकरून ह्या कारणाने होणारे अपघात टाळून जीव वाचतील.
“रोड हिप्नोसिस” म्हणजे काय?
रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते.
रस्त्यावर वाहन चालवतांना साधारणपणे २.५ तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते.
संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात,पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही,परिणाम ” रोड हिप्नोसिस ” !
हेच तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे…
‘ रोड हिप्नोसिस ‘ असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या १५ मिनिटांत काहीही आठवत नाही.तो कोणत्या वेगाने जात आहे,किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही,किंवा सविस्तर स्पष्टीकरण देवु शकत नाही. सहसा टक्कर १४० किमी पेक्षा जास्त वेगाने असते.
“रोड हिप्नोसिस” कसा टाळता येईल.
रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर २.५ तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी,
थोडी विश्रांती घ्यावी, ५/६ मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे.
तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या १५ मिनिटांतील काहीही आठवत नसेल,
तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सहप्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात.
‘ रोड संमोहन ‘ हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.
डोळे लागले तर अपघात अटळ आहे,पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे…
खूप वेळा पुरेशी झोप झालेली नसेल…आपण खूप थकलेले असु…ड्रायव्हिंग सतत करणं…अश्या वेळी या स्टेजची अनुभूती खूप वेळा मलाही आलेली आहे…
अश्या वेळी थोडावेळ थांबणे…गाडीतच थोडीशी हालचाल करणे…चहा किंवा पाणी पीणे..काहीच नाही तर स्वतःला करकचून चिमटा काढणे….असं केल्याने आपण सावध होऊ शकतो.गाणं ऐकणे किंवा सोबतच्या व्यक्ती सोबत गप्पा मारल्या तरी अशे प्रसंग टाळता येतात.
कधीतरी दिवस भर किंवा रात्रभर आराम न करता एकटाच गाडी चालवताना आपली गाडी चालू असते पुढे जात असते पण रोजचा रस्ता आपण विसरलेलो असतो…
नेमकी वळण, खड्डे , स्पीड ब्रेकर दिसतात पण लक्षात येत नाहीत,अश्या वेळी समजावं कि हि आपल्यासाठी यावेळी धोक्याची सुचना आहे.वरील उपाय करून आपण स्वतःला व आपल्या गाडीला वाचवू शकतो.
परवा अचानक एका emergency कामासाठी दिवसभर विश्रांती न घेता रात्री बारा वाजता झोपून दोन वाजता उठलो व पहाटे तीनला गाडी घराबाहेर काढली व सकाळी अकरा पर्यंत विनाथांबा सतत आठ तास ड्रायव्हिंग केलं.
त्या वेळी जवळपास तिन चार वेळा हा अनुभव आला..
पैकी दोन वेळा दिवसा अनुभव आला.
स्वतःला सावरलं ,रस्त्यावर खुपच तुरळक गाड्या होत्या.
पण अनुभव आला हे नाकारुन चालणार नाही.
आपणही जरा डोक्याला ताण द्या…लक्षात येईल प्रत्येक गाडी चालवणारा या स्टेजमधुन नक्कीच एकदा तरी गेलेला असतो.
फक्त हि स्टेज म्हणजे ” यमाची वेळ ” असते हे आपल्याला माहित नसतं किंवा माहिती असुनही आपण गांभीर्याने घेत नसतो व गाडी पळवतराहतो,मेंदूच्या निष्क्रिय अवस्थेत…आपल्याच बेधुंद अवस्थेत!
परिणामी भयंकर परिस्थितीला सामोर जाण्याची शक्यता कधीही येऊ शकते !
म्हणजे सावध तो सुखी
डॉ. संजीव लिंगवत, सिंधुदुर्ग.
Vision Abroad